कविता, किस्से, गाणी.. २ तासांची No Nonsense मुलाखत | Boys Talk With Sandeep Khare | Aarpaar Marathi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ส.ค. 2024
  • #SandeepKhare #आरपार
    Boys Talk. ही सिरीज सुरु करायची असा विचार जेव्हा केला होता तेव्हा Boys Talk हे नाव फार निगेटिव्ह अर्थाने घेतलं जाऊ शकतं अशी आमच्या टीमला एक भिती होती. या नावाविषयी थोडे मतभेद होते. पर्याय सुचवले गेले, अनेकांची सजेशन्स घेतली गेली पण Boys Talk ला पर्याय म्हणून हटके नाव काही सूचेना. मग आम्ही विचार केला.. नाव बदलण्यापेक्षा लोकांचा नावामागचा तो टिपिकल अप्रोच आपण बदलू शकलो तर? झालं.. मनाशी पक्क केलं आणि सेगमेंटचं Boys Talk हेच नाव आम्ही फायनल केलं.. आज पहा या Boys Talk मध्ये कोणी स्त्रियांबद्दलच्या आदरावर बोलतंय, कोणी लहान वयात आलेल्या Maturity वर बोलतंय, कोणी आईबाबांच्या म्हातारपणावर बोलतंय, कोणी प्रेमावर बोलतंय तर कोणी एकटेपणावर बोलतंय.
    आज आपल्याशी संदीप खरे बोलतायत. एक उत्तम कवी ही त्यांची ओळख आहेच पण त्या पलीकडे जाऊन ते म्हणतात, त्यांना आजच्या नो नॉनसेंस पिढीचं कौतुक वाटतं.. ते म्हणतात, कविता समजायला वय लागत नाही.. ते म्हणतात, लहान मुलांचं शोषण त्यांना अस्वस्थ करतं.. ते म्हणतात, लोकांमध्ये नसणारा सिविक सेन्स त्यांना पचनी पडत नाही. आता इथे अजून काही लिहिण्यापेक्षा तुम्ही थेट मुलाखत पहा. वेळेचं वावडं असलं तरी व्हिडीओ स्पीड आहे तोच ठेवा कारण, त्याशिवाय मजा नाही. २ तास खर्ची पडतील पण तुम्ही रिग्रेट नक्की करणार नाही.

ความคิดเห็น • 60

  • @geetasalunke8210
    @geetasalunke8210 4 หลายเดือนก่อน +11

    दोन तासासाठी वेगळ्या दुनियेत घेऊन जाणारी मुलाखत.... खरंच अप्रतिम...

  • @VishalChavan-gv9hm
    @VishalChavan-gv9hm 4 หลายเดือนก่อน +12

    खुप छान प्रकारे मुलाखत दिली, कुठेही उगाच काही बोलायचे म्हणून बोलत नव्हते. विषयाला धरूनच बोलत होते. निवेदिकेने सुध्दा छान प्रश्न केले. कुठेही अतिशयोक्ति नव्हती. मी खूप मुलाखती बघितल्या, पण ही सर्वोत्तम होती. ❤🙌

  • @ruchirapathak7240
    @ruchirapathak7240 4 หลายเดือนก่อน +12

    बोलण्यातला संथ ठेहराव मनाला भावतो.❤

  • @shreyasahasrabudhe4948
    @shreyasahasrabudhe4948 4 หลายเดือนก่อน +3

    संवेदनशीलता या वरील विचार आवडले, पूर्ण सहमत 😊
    संदिप तुझं शांतपणे बोलणं आणि मराठी शब्दांचा वापर, उदाहरणं देत विचार समजावून सांगणं, आवडलं.
    "हे कविचे हृदय आहे" कविता अप्रतिम!! मी पाठ केली!!
    पूर्ण मुलाखत दोन वेळा ऐकली!!
    No nonsense हे शिर्षक अगदी चपखल आहे.
    धन्यवाद या व्हिडिओ साठी सर्व टीम ला.

  • @Ujwalphadtare68
    @Ujwalphadtare68 4 หลายเดือนก่อน +4

    खुप दिवसांनी मुलाखत ही अशी मस्त गप्पान सारखी होऊ शकते आणि रंगू शकते ह्याचा सुखद अनुभव आला. मैथिली तुझ कौतुक खुप सहज सवांद / प्रश्न. संदीपच्या तुमच्यासारख्या माणसानं मुळे मराठी असण्याचा आनंद होतो, अभिमान वाटतो....अजुन बरच काही.

  • @sandhyadeshpande7539
    @sandhyadeshpande7539 4 หลายเดือนก่อน +4

    फारच सुंदर ! जश्या तुमच्या कविता मनाला भिडतात , भावतात तसेच तुमचे बोलणे मनाला भावले

  • @aattar5842
    @aattar5842 2 หลายเดือนก่อน +1

    समृद्ध करणारी मुलाखत. 🙏🙏🙏🙏🙏

  • @SS-nakshatra
    @SS-nakshatra 4 หลายเดือนก่อน +3

    कविता आवडावी असे आम्हाला शिकवलंच नव्हते पण आपण आमच्या मनात घर केले
    जसं आम्ही दैनंदिन व्यवहारात पु ल, वपु यांच्या साहित्याचा संदर्भ वापरतो .तसेच संदीप, सलील यांच्या कविता, गाणी आम्ही म्हणतो
    मात्र अजूनही काही व्यक्ती आहेत ज्यांना साहित्याची जाण आहे हेही मान्य केले पाहिजे खरे सर!
    धन्यवाद व्यक्त झाल्या बद्दल!❤

  • @nehanadkarni1001
    @nehanadkarni1001 4 หลายเดือนก่อน +3

    प्रतिभा प्रतिमा आणि वास्तव याचा झक्क आरसा दाखवला संदीप खरे यांनी सहज पणे केले ❤मैथिली मस्त समंजसपणा

  • @ashleshapokharkar5913
    @ashleshapokharkar5913 4 หลายเดือนก่อน +4

    खुप सुंदर ❤❤❤
    गगनजाईच्या झाडाखाली 🥰😍 ❤ सर कवितेचा कोपरा लवकर सुरू करा plz

  • @sangeetawaikar5108
    @sangeetawaikar5108 4 หลายเดือนก่อน +3

    संदीप काय सलील काय ...फार छान बोलतात...🎉

  • @madhuragaonkar6566
    @madhuragaonkar6566 3 หลายเดือนก่อน

    फार सुंदर मुलाखत.. संदीप खरे माझे आवडते कवी आहेतच.. पण एक व्यक्तिमत्व म्हणून सुद्धा फार आवडतात.. कविता वाचन असो.. किंवा अगदी बोलण असो मनाला आणि कानाला आनंद देत...
    अताशा असे हे मला काय होते ✨👌🏻

  • @nayanaprabhu7317
    @nayanaprabhu7317 11 วันที่ผ่านมา +1

    Mastha❤❤ wonderful listening to Sandip as always❤

  • @rajeshrane353
    @rajeshrane353 4 หลายเดือนก่อน +3

    सलाम...सलाम...सलाम

  • @ashwinibhave4472
    @ashwinibhave4472 หลายเดือนก่อน +1

    खूप छान मुलाखत!!

  • @jayashreedeshpande4509
    @jayashreedeshpande4509 3 หลายเดือนก่อน

    बोलण्यात ली शांतता मनाला शांत करून गेली! 'गगनजाई' अप्रतिम! 👌💐😊

  • @user-gs5qu5qz7z
    @user-gs5qu5qz7z 4 หลายเดือนก่อน +1

    खूप सुंदर,संयत मुलाखत…गेस्ट आणि होस्ट दोघांना कम्फर्टेबल सिटींग ठेवलं तर जास्त चांगलं वाटेल

  • @shravanijoshi9707
    @shravanijoshi9707 4 หลายเดือนก่อน +2

    46:55 kaviche hruday❤ 50:44 maithilichi hi Kavita khup chan aahe ❤

  • @sarikajagtap6784
    @sarikajagtap6784 4 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम आहात संदीप सर तुम्ही.🙏🏻☺️

  • @shilpabhide3750
    @shilpabhide3750 4 วันที่ผ่านมา

    खूप खूप सुंदर अप्रतिम 👌👍

  • @jaiinamdar6479
    @jaiinamdar6479 2 หลายเดือนก่อน

    Khup sundar ❤ Thanks for this treat!

  • @sushantpawar5649
    @sushantpawar5649 4 หลายเดือนก่อน +2

    अतिशय सुंदर मुलाखत ❤

  • @rajanisatwik9432
    @rajanisatwik9432 4 หลายเดือนก่อน +2

    खूप सुंदर मुलाखत

  • @nayanaprabhu7317
    @nayanaprabhu7317 11 วันที่ผ่านมา +1

    Maithili khoop chaan kavita!!

  • @anujawagh7988
    @anujawagh7988 4 หลายเดือนก่อน +3

    Khup sundar❤❤

  • @adityasurve8106
    @adityasurve8106 3 หลายเดือนก่อน

    संदीप खरे हे‌ माझे सर्वात प्रिय कवी आहे. कवी संदीप खरे हे आजच्या काळातिल प्रतिभासंपन्न कवी व व्यक्तिमत्त्व आहेत.
    ही खरोखरच अतिशय no nonsense मुलाखत होती. मैथिली आपटे यांनी अत्यंत उत्तम मुलाखत घेतली. नेमके प्रश्न विचारले.
    संदीप खरे हे खरोखरच एक वलय आहे.
    ते‌ आपल्या खेचून घेते, आणि विलक्षण सुखाची अनुभूती देते. त्यांचे कविता, विचार, किस्स्य नी वेळ सार्थकी लागला.
    मी पाहिल्या सर्वोत्तम मुलाखती पैकी एक.💐💐💐💐🙏🏻🙏🏻

  • @bhargav_7194
    @bhargav_7194 4 หลายเดือนก่อน +1

    Thanks

  • @summer090306
    @summer090306 4 หลายเดือนก่อน +1

    सुंदर मुलाखत...❤❤❤

  • @sonpethkar
    @sonpethkar 3 หลายเดือนก่อน

    अप्रतिम ❤...मैथिली तुझी कविता ही फार सुंदर होती ❤

  • @anishmalap1829
    @anishmalap1829 4 หลายเดือนก่อน +2

    संदीप सर खूप खूप छान आहात तुम्ही

  • @Govind.kamble__09
    @Govind.kamble__09 หลายเดือนก่อน

    खरच खूप छान ❤

  • @ravan3625
    @ravan3625 4 หลายเดือนก่อน +2

    Podcasting सोडून आमच्या सारख्या नवीन पिढीने पाहावी अशी मुलाखत

  • @nayanaprabhu7317
    @nayanaprabhu7317 11 วันที่ผ่านมา

    I have given your cd's as gifts, especially to people who lived abroad. It's so sad now we can't do that😅I can think of giving books but those too don't get read, so the best is share a link and talking about how the song or poetry touched you and speak about the poet too!

  • @jiyabatwal6273
    @jiyabatwal6273 4 หลายเดือนก่อน +2

    Finally released ❤️❤️❤️

  • @am_desh
    @am_desh 4 หลายเดือนก่อน +2

    Beautiful

  • @user-pf2yf2qb8f
    @user-pf2yf2qb8f 2 หลายเดือนก่อน

    Apratim🙌🏻

  • @dr.vijaypandharipande5068
    @dr.vijaypandharipande5068 4 หลายเดือนก่อน +1

    छान गप्पा मजा आला

  • @nutanhodage6977
    @nutanhodage6977 4 หลายเดือนก่อน +2

    खूप आवडलं...संभाषण....लई भारी

  • @dr.abhijeetsafai7333
    @dr.abhijeetsafai7333 4 หลายเดือนก่อน +1

    Liked it! 👍

  • @vaidehibhide2012
    @vaidehibhide2012 3 หลายเดือนก่อน

    अप्रतिम

  • @1417786786
    @1417786786 4 หลายเดือนก่อน +1

    Kiti goud ❤

  • @jagrutibodas8237
    @jagrutibodas8237 4 หลายเดือนก่อน +2

    कवितेचा कोपरा कधी सुरू होणार परत

  • @sunitadeshpande2195
    @sunitadeshpande2195 4 หลายเดือนก่อน +13

    ईर्शाद चा किस्सा नाही सांगितला. ते नाव बदलायला नको होतं असं माझं प्रामाणिक मत आहे

  • @jagrutibodas8237
    @jagrutibodas8237 4 หลายเดือนก่อน +1

    दादा खूप खूप सुंदर

  • @mohinitayade3147
    @mohinitayade3147 3 หลายเดือนก่อน

    Khoop chan gappa ❤

  • @siddheshchavan6564
    @siddheshchavan6564 4 หลายเดือนก่อน

    Khup chaan

  • @user-mb6cv2sd3y
    @user-mb6cv2sd3y 4 หลายเดือนก่อน +1

    झकास

  • @bhaktisalunkhe3083
    @bhaktisalunkhe3083 4 หลายเดือนก่อน +1

    🙏🙏🙏👌👌👌

  • @aattar5842
    @aattar5842 2 หลายเดือนก่อน

    ❤❤❤❤❤

  • @jagrutibodas8237
    @jagrutibodas8237 4 หลายเดือนก่อน +2

    माझं लिखाण म्हणजे मला नुसतं मोकळं होणं वाटतं म्हणूनच तुम्हाला भेटले तेव्हा मी लिहीते हेही मी तुम्हाला सांगीतलं नाही

  • @ShubhamBhave4
    @ShubhamBhave4 4 หลายเดือนก่อน +1

    ❤❤

  • @Justdipthings1
    @Justdipthings1 3 หลายเดือนก่อน +1

    Bol bhidu ithe baghitlya sarkhi vatate hi mulgi

  • @Aj271092
    @Aj271092 4 หลายเดือนก่อน +5

    निवेदिकीचे प्रयत्न वाखण्याजोगे, फक्त मध्ये मध्ये तो ‘मच मच’ (१:१७:२२) (१:१९:४८) (१:२०:०१)आणि हसण्याचा जरा जास्त आवाज तो सुधारलं तर खूपच छान झालं असतं..!!!

    • @jyoti.9012
      @jyoti.9012 4 หลายเดือนก่อน

      Mla असे वाटले मलाच असे जाणवतेय की काय

    • @sagarnar987
      @sagarnar987 4 หลายเดือนก่อน +1

      To technical issue aahe aarpar valyancha, itaki chan मुलाखत पण वाईट background, ugach वाढवलेला music चा आवाज आणि सदोष recording यामुळे सामान्य वाटते..

    • @gayatrikharat8892
      @gayatrikharat8892 4 หลายเดือนก่อน

      Kharay💯💯

    • @Akash.130
      @Akash.130 3 หลายเดือนก่อน

      😂

  • @rupakaradkhedkar3213
    @rupakaradkhedkar3213 4 หลายเดือนก่อน +1

    रूमा चा अर्थ काय ?

  • @DrSwarnaShelke
    @DrSwarnaShelke 4 หลายเดือนก่อน +3

    Maithili..chan ghetlay interview
    Pn kiti hasnyacha aavaj…really disturbing 🙄nd te mach..mach..😒

  • @ASHOKBAPAT
    @ASHOKBAPAT 2 หลายเดือนก่อน +1

    इंग्रजी शब्दांचा सढळ वापर मुलाखतकर्ती एवढाच हिरीरीने संदीप करत आहे, याचे विस्मय वाटते, याचा खेद वाटतो.