Navnath Maharaj | श्रीक्षेत्र पुणतांबा | प्राचीन रहस्यमयी यज्ञसेनी देवी मंदिर | 800+Years old |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 16 ม.ค. 2025
- @AlakhNiranjanMS
ओम नमो आदेश मित्रांनो
आजच्या व्हिडिओमध्ये आपण भेट देणार आहोत सुमारे 700 ते 800 वर्षांपूर्वीच्या श्रीक्षेत्र पुणतांबा येथील श्री यज्ञसेनी मातेच्या मंदिराला
श्री क्षेत्र पुणतांबा गावाला हजारो वर्षांची धार्मिक, पौराणिक व ऐतिहासिक परंपरा लाभलेली आहे. ही नगरी राजा विक्रमादित्याची राजधानी होती. गावाचे नाव पुण्यस्तंभ अथवा ताम्रनगरी असे होते. एक रात्रीत तांब्याची बनवलेली नगरी म्हणूनही या गावाला ताम्रनागरी म्हणत असावे. गाव गोदातीरी वसले असून पुणतांबा गावाला दक्षिणकाशी पण म्हणतात. पुणतांबा गावाला पुरातन पूर्ण तटबंदी असून गावाला अकरा वेशी आहेत.व येथेच नदी काठी यज्ञसेनी देवीचे मंदिर आहे.श्री यज्ञसेनी देवी माता ही परिसरातील नागरिकांचे मोठे श्रद्धास्थान आहे.
देवीची आख्यायिका :
शके १६८१ पूर्व काळामध्ये हरिशचन्द्र राजा येथे राज्य करीत होता, त्याच्या मुलास 'जलोदर' नावाचा आजार झाला. अनेक वैद्यांना दाखवूनही आजार बरा झाला नाही. राजास एका रात्री स्वप्न पडले व स्वप्नात त्यांनी असे बघितले की राज्याच्या पश्चिमेला गोदावरी नदी काठी यज्ञ करून त्या यज्ञात १२ वर्षाच्या आतील लहान मुलाचा बळी दिल्यास रोग बरा होईल. राजाने राज्यात दवंडी पिटवली जो कोणी ब्राह्मण आपल्या मुलाला राजाकडे देईल त्याला मुलाच्या वजनाइतके सोने दान करण्यात येईल. राज्याच्या जवळ पुरणगावात गोऱ्हे आडनावाचे गरीब ब्राह्मण कुटुंब राहत होते.त्यांना ५ मुले होती. राजाची दवंडी त्या गरीब ब्राहणाच्या मुद्गल नावाच्या लहान मुलाने ऐकली त्याने विचार केला माझ्या मरणाने जर संपूर्ण कुटुंबाचे कल्याण होत असेल तर मी बळी जाण्यास तयार आहे. त्यांनी बळी देण्याचे ठरवले व तशी वार्ता राजाला कळवण्यात आली. हे ऐकून राजाला हर्षानंद झाला.राजाने लगेच त्याच्या वजनाइतके सोने गोऱ्हे कुटुंबाला देऊन मुद्गलची संपूर्ण राज्यातून मिरवणूक काढण्यात आली व मुद्गलास बळी देण्यासाठी यज्ञ कुंडा जवळ बसवण्यात आले.मुद्गलची पूजा करून त्यास बळी देण्यासाठी यज्ञात टाकताच यज्ञातून देवी प्रकट झाली व तिने मुद्गल यास वरचेवर झेलले आणि त्यास यज्ञकुडा बाहेर सोडले. यज्ञातून निघाली म्हणून यज्ञसेनी देवी नावाने प्रसिद्ध झाली. श्री यज्ञसेनी देवी मातेचं मंदिर गावाच्या पश्चिमेला गोदावरी नदी तीरी शेकडो वर्षांपासून भव्य अश्या स्वरूपात उभे आहे.
यज्ञसेनी देवी मातेच्या गाभार्याच्या भिंतीवर प्राकृत भाषेत दगडावर कोरलेला ४०० वर्षे पुरातन शिलालेख पुढील प्रमाणे आहे- "शके १६८१ पार्थिव नाम संवत्सरे श्रावण शुद्ध पंचमी दिनी श्री आंबेचे देवालय पुरातन होते जीर्ण झाले आंबेच्या चित्तास आले म्हणून नूतन केले आण्णाजी सूत शिवाजी तस्ततनये हरबाजी बिडवाई यांनी निर्मिले".
|| जय श्री यज्ञसेनी माता ||
#navnathparayan #navnathinformation #kanifnathmaharaj #आदेश #अलख #अलखनिरंजन#hindusaint #ancienthistory #maharashtra #maharashtraculture #devotionalplaces #spritual #spritualpath #devotional #devotion #नवनाथ #नवनाथकथासार #नवनाथग्रंथ #rahuri #shirdi #maharshtra #nathsampraday #kanifnath #gorakshnath #gorakshanath #machindranath #machindranathstatus #sai #shirdisai #shirdisaibaba #blogger #blog #blogs #blogging #bloggers #bloger #bloglife #vlog #vlogs #vlogger #vlogging #vlogvideo #vloggers #puntamba #पुणतांबा #mystery #mysterious #temple #oldtemple #devi #shaktipeeth
ओम नमो आदेश ❤
Om nmo adesh adesh ajun videvo banva mahesh bhau
हो नक्कीच
ओम नमो आदेश
माझे जन्मस्थान व गाव आहे
पुणतांबा येथे श्रीराम गल्लीत आमचे श्री कानिफनाथ मंदिर आहे
आल्यावर नक्की भेटू
ओम नमो आदेश