१ रूपयात पिच्चर साईन करणारा लक्ष्या मराठीतला पहिला सुपरस्टार कसा झाला | Laxmikant Berde Biography

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ต.ค. 2023
  • १ रूपयात पिच्चरसाईन करणारा लक्ष्या मराठीतला पहिला सुपरस्टार कसा झाला | Laxmikant Berde Biography
    मागं कधीतरी एक किस्सा वाचनात आला होता. सलमान as a लीड हिरो म्हणून मैने प्यार किया सिनेमाचं शूट करत होता. तर सिनेमाच्या शूट दरम्यान एके दिवशी नवखा सलमान खान त्याच्या मेकअप रूममध्ये फुल्ल टेन्शनमध्ये हाताची नखं खात बसला होता. आता टेन्शन कसलं तर लक्ष्मीकांत बेर्डे नावाच्या मुरलेल्या मराठी कलाकारासमोर acting करण्याचं. कारण तेव्हा त्याला कुणीतरी सांगितलं होतं की लक्ष्मीकांत बेर्डेपासून सावध राहा. तो सीनमध्ये ऑन दि स्पॉट ऍडिशन घेतो. ते ऐकल्यापासून सलमान बेक्कार नर्व्हस झाला होता. त्यानं लक्ष्मीकांत बेर्डे नावाची धास्ती खाल्ली होती. कारण तोपर्यंत लक्ष्मीकांत बेर्डे या नावापुढं मराठी फिल्म इंडस्ट्रीचा सुपरस्टार अशी उपाधी लागली होती. नाटकं, सिनेमा, टीव्ही सिरीयल सगळीकडं त्यांच्या नावाचा डंका वाजत होता. अन सलमानच्या नावावर केवळ 1988 साली आलेल्या बीवी हो तो ऐसी या सिनेमातल्या सहकलाकाराची भूमिका नोंद झाली होती. त्याचा अनुभव कमी होता आणि तो कमी अनुभव स्क्रीनवर दिसून येईल याची त्याला भीती वाटत होती. कारण सलमाननं आणखी एकाकडून असंही ऐकलं होतं की लक्ष्मीकांत बेर्डे नावाचा माणूस जेव्हा जेव्हा स्क्रीनवर येतो तेव्हा तेव्हा तो समोरच्या व्यक्तीरेखेला पार खाऊन टाकतो अन लोकांचं सगळं अटेंशन एकटाचं खेचून घेतो. आता एवढ्या ताकदीच्या कलाकारापुढं आपला निभाव लागेल का, त्यांच्यापुढं लोकांना आपली acting साधारण वाटेल का ? तसं झालं तर आपलं करिअर सुरु व्हायच्या आधीचं डब्यात जाईल का याची सलमानला भीती वाटत होती. त्यामुळं सलमान बेर्डेसोबत अंतर ठेवून वागत होता. पण ती गोष्ट जेव्हा लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या कानावं पडली तेव्हा ते थेट सलमानच्या रूममध्ये गेले अन म्हणाले, तू माझ्याशी असा का वागतोयस, आपलं ट्युनिंग जुळलं नाही तर सीन व्यवस्थित शूट कसा होणार. तेवढ्यावर न थांबता त्यांनी सलमानशी हात मिळवणी केली. पुढं बोलताना विनोदी पंच काढून सलमानची घुसमट, भीती दूर केली अन त्याला सीनसाठी तयार केलं. नंतर मग लोकांना मैने प्यार किया मध्ये लक्ष्मीकांत बेर्डे आणि सलमानच्या अभिनयाची ती टॉप क्लास जुगलबंदी पाहायला मिळाली. तर एकूण असा होता आपल्या लाडक्या लक्ष्याचा अभिनय क्षेत्रातला टेरर ज्याला खुद्द बॉलिवूडचा भाईजान सुद्धा टरकून असायचा. लक्ष्या हा खऱ्या अर्थानं कॉमेडीतला बापमाणूस होता. माफ करा पण लहानपणापासून लक्ष्मीकांत बेर्डे या नावापेक्षा लक्ष्या हेच नाव जास्त जवळच आणि आपलं वाटत असल्यामुळं या व्हिडीओत त्यांचा एकेरी उल्लेख होण्याचे चान्सेस जास्त आहेत. तरी कृपया लक्ष्या या नावामुळं त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांच्या भावना दुखावणार नाहीत अशी आशा आहे. आज आपल्या लाडक्या लक्ष्याचा जन्मदिवस म्हणजे बर्थडे हो. खरं तर लोकं आपल्यातून गेलेल्या माणसांची जयंती साजरी करतात पण लक्ष्या आपल्यातून गेलाय असं मला तरी वैयक्तिकरित्या कधी वाटलं नाही. माझ्यासारख्या अनेकांचं बालपण समृद्ध करण्यात लक्ष्याचा मोलाचा वाटाय. त्यामुळं आजच्या या व्हिडीओमध्ये आपण लक्ष्मीकांत बेर्डे उर्फ लक्ष्याच्या आयुष्याचे काही इंटरेस्टिंग पैलू जाणून घेणारंय,
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #vishaychbhari
    #विषयचभारी
    #laxmikantberdemovies
    #laxmikantberdesongs
    #laxmikantberdemarathi movie
    #laxmikantberdedeath
    #laxmikantberdecomedy scene
    #laxmikantberdeinterview
    #laxmikantberdefuneral
    #laxmikantberdecomedy
    #laxmikantberdefamily
    #laxmikantberde
    #laxmikantberdesonmovie
    #laxmikantberdedeath news
    #laxmikantberdeandashoksarafmarathimovie
    #laxmikantberdeson

ความคิดเห็น • 79

  • @Kk_offical21
    @Kk_offical21 8 หลายเดือนก่อน +43

    काहीही झाल तरी लक्ष्या आणि महेश यांची जोडी आजही बघताना खूप भारी वाटते❤❤

  • @sachinjayanna5272
    @sachinjayanna5272 8 หลายเดือนก่อน +16

    एक अफाट लोकप्रियता लाभलेले.. विनोदाचे अचूक टायमिंग पकडणारे.... नेहमी हजर जबाबी असणारे.... सर्व कलाकारांचा लाडका मित्र....एक हरहुन्नरी कलावंत.... आपल्या अभिनयाने संपूर्ण मराठीच नव्हे तर हिंदी चित्रपट सृष्टीला वेड बाणेदारपणे लावणारे... सीन कोणताही असो लहान किंवा मोठा त्यात आपल्या अभिनयाचा कस लावून ती व्यक्तिरेखा साकारण्यात हातखंडा असलेले.... कितीही मोठे झालो तरी नेहमी आपले पाय जमिनीवरच असावेत याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे हे व्यक्तिमत्त्व..... लहान मुलांच्या पासून ते अगदी मोठ्यांपर्यंत संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या नावाने वेड लावणारे..... एक दशक आपल्या विनोदी शैलीने गाजवलेले..... आज ते आपल्यात नाहीत पण त्यांच्या लोकप्रिय अभिनयाच्या जोरावर ते आपल्या सर्वांच्या मनामध्ये अजूनही जिवंत आहेत....
    लक्ष्या म्हणजे विनोद हे जणू समीकरणच असलेले....असे हे माझे आवडते व सर्व महाराष्ट्राचे लोकप्रिय विनोदी कलाकार श्री लक्ष्मीकांत उर्फ लक्ष्या बेर्डे यांना आदरपूर्वक भावपूर्ण आदरांजली 💐💐💐💐 असा नट पुन्हा होणे नाही.......................
    एवढ्या मोठया कलाकाराला काल जन्माला आलेला सुद्धा आपलेपणाने "लक्ष्या" च म्हणणार
    यातच सर काही आलं
    Miss you "लक्ष्या"

  • @aaplamaharashtra15
    @aaplamaharashtra15 8 หลายเดือนก่อน +18

    रविवारची ती हसरी संध्याकाळ आजही आठवते ♥️

  • @akashgaikwad8946
    @akashgaikwad8946 8 หลายเดือนก่อน +20

    सुपर स्टार लक्ष्मीकांत बेर्डे 👍🙏

  • @mahendrawahulkar2562
    @mahendrawahulkar2562 8 หลายเดือนก่อน +12

    लक्षात राहिलं असा आपला लक्ष्या ❤️❤️❤️

  • @atulkulkarni9259
    @atulkulkarni9259 8 หลายเดือนก่อน +11

    खुपचं छान माहिती सांगितली... खरोखर लक्ष्मीकांत जीचा चित्रपट म्हटले की लोक हमखास पहायचे... विनोदाचे अचूक टाईमिंग त्यांना जमायचे...

  • @CopyNinjaFF69
    @CopyNinjaFF69 8 หลายเดือนก่อน +15

    अत्यंत दुर्देव आहे. का या माणसाने तब्येती कडे लक्ष दिले नाही
    लक्ष्या तूला काही अधिकार नव्हता असा... आमच्या सारख्या लाखो करोडो चाहत्यांचे मन दुखवायचा..

  • @vaibhavnikure5201
    @vaibhavnikure5201 4 หลายเดือนก่อน +3

    माझा पहिला आवडता विनोदी कलाकार म्हणजे लाडका लक्ष्या मामा❤❤❤❤

  • @sarangdhande9107
    @sarangdhande9107 8 หลายเดือนก่อน +6

    खरंच आमचं बालपण 😊

  • @kmEdits1108
    @kmEdits1108 8 หลายเดือนก่อน +5

    जोडीच एक नंबर लक्षा अशोक सराफ.💯

  • @shreedevsalunkhe9679
    @shreedevsalunkhe9679 3 วันที่ผ่านมา

    मी आलो, मी पाहिलं, हे हमाल दे धमाल चित्रपटातील गाणं मला फार आवडतं. विनोदी सुपरस्टार म्हणून सुप्रसिद्ध असलेले बेर्डे साहेबांच्या 'एक होता विदुषक' हा चित्रपट त्यांच्या फार काळजाच्या जवळ होता. या चित्रपटात ते एक क्षणही हसले नाहीत की हसवले नाही. पुर्ण गंभीर भुमीका होती त्यांची. या चित्रपटाचे अपयश ते पचवू शकले नाहीत आणी मग तब्येतीकडे दुर्लक्ष करु लागले आणी मग तो वाईट दिवस उजाडला. आणी संपुर्ण महाराष्ट्र एका महान कलाकाराला मुकला. बेर्डे साहेब तुमची जागा कोणी नाही घेऊ शकत. तुम्ही आयुष्यभर आमच्या ह्रदयात राहाल.

  • @sanskrutishelar1900
    @sanskrutishelar1900 3 หลายเดือนก่อน +1

    मराठी चित्रपट सृष्टीतला बादशाह व आमच्या लहानपणीचा सुपरहिरो म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे आज सुद्धा तो आम्हाला सर्वात जास्त लोकप्रिय आहे कारण त्यांनी लहानपणी आम्हाला भरभरून हसवलेला आहे.

  • @kishorbagal186
    @kishorbagal186 8 หลายเดือนก่อน +9

    खरं तर लक्ष्या गेल्यापासून मराठी चित्रपट च बघु वाटतं नाही

  • @user-vq6ij8re1d
    @user-vq6ij8re1d 4 หลายเดือนก่อน +2

    लक्ष्मीकांत बेर्डे हे मराठी सिनेमाचे सम्राट होते

  • @tanjirodslayer
    @tanjirodslayer 8 หลายเดือนก่อน +4

    One and only our Marathi Superstar Laxmikant Berde sir.Tyana amche naman.

  • @Ganu.pi.
    @Ganu.pi. 6 หลายเดือนก่อน +2

    जेव्हा पासुन लक्ष्या मामा गेले तेव्हा पासुन मराठी इडिस्ट्री पडली.
    माझे बालपण लक्ष्या मामाचे चित्रपट बघत बघत गेल. Miss you laksya mama😢

  • @sagarindulkar1288
    @sagarindulkar1288 8 หลายเดือนก่อน +3

    मी पाहिलेला त्याचा शेवटचा कार्यक्रम - चौफुला
    नाद करायचा नाही लक्ष्याचा miss you.

  • @sagarkshirsagar1424
    @sagarkshirsagar1424 8 หลายเดือนก่อน +2

    हमाल दे धमाल सिनेमातल गोविंदाच गाणं

  • @stonerakki5935
    @stonerakki5935 8 หลายเดือนก่อน +6

    Lakshya❤❤❤

  • @nitinadhagale2374
    @nitinadhagale2374 8 หลายเดือนก่อน +2

    Love u lakshya....😭

  • @anilshelke9833
    @anilshelke9833 8 หลายเดือนก่อน +6

    अशी ही बनवाबनवी हा मूव्ही मी आत्तापर्यंत 200 वेळा पाहिला असेल बोरच होत नाहीं कितीही वेळा पाहिला तरीही

  • @deepakyewale6599
    @deepakyewale6599 8 หลายเดือนก่อน +3

    सदैव लशात राह नारे अपले लक्शुमिकांत बेरडे 💐

  • @Ganeshvalasevlogs
    @Ganeshvalasevlogs 5 หลายเดือนก่อน +2

    खरंच आपल्या लक्षा मामांसारखं व्यक्तीमत्व न भुतो न भविष्य अशी आहे, त्यांच्या सारखा विनोदी कलाकार होने नाही..

  • @prashantguruji5299
    @prashantguruji5299 4 หลายเดือนก่อน +1

    Miss you lakshya mama

  • @truthadventure0407
    @truthadventure0407 8 หลายเดือนก่อน +2

    I love you laksha mama

  • @vinodpawar1826
    @vinodpawar1826 8 หลายเดือนก่อน +4

    लक्षा लय भारी ❤

  • @rajeshpuranik8880
    @rajeshpuranik8880 8 หลายเดือนก่อน +3

    नरेंद्र दाभोळकरांवर लिहा ना..त्यांच्या खुनापर्यंतचा इतिहास..

  • @Sushiels
    @Sushiels 8 หลายเดือนก่อน +2

    लक्ष्या हा लक्ष्या होता,कायम लक्ष्या लक्ष्यात राहील.

  • @madanjadhav6991
    @madanjadhav6991 8 หลายเดือนก่อน +3

    तुम्ही खूप उशीरा व्हिडीओ बनवता

  • @abhijeetdholepatil4005
    @abhijeetdholepatil4005 8 หลายเดือนก่อน +1

    मराठी चित्रपट सृष्टी मधील पहिले सुपरस्टार फक्त दादा कोंडके आहेत.

  • @ajitkokade4242
    @ajitkokade4242 8 หลายเดือนก่อน +2

    Very nice presentation

  • @saishraddhaband1907
    @saishraddhaband1907 8 หลายเดือนก่อน +2

    मराठी चित्रपट सृष्टीचा.....बादशहा

  • @user-jd6ug3gc2b
    @user-jd6ug3gc2b 4 หลายเดือนก่อน

    Miss you लक्ष्या😢😢

  • @user-rc3fb8dh8p
    @user-rc3fb8dh8p 4 หลายเดือนก่อน

    Miss u so much Lakshya

  • @vishalmore2743
    @vishalmore2743 8 หลายเดือนก่อน +1

    Super star Laxmikant sir ❤❤😢

  • @AmitAswar
    @AmitAswar 3 หลายเดือนก่อน +1

    लक्ष्या आजपर्यंत असता तर त्याला भारतरत्न मिळाला असता

  • @XXyy1409
    @XXyy1409 8 หลายเดือนก่อน +3

    Aamchya sathi Amitabh peksha hi mota superstar hota. Asa Abhineta punha hone nahi… miss you Lakshya ❤❤❤

  • @ayajmulla3313
    @ayajmulla3313 8 หลายเดือนก่อน +1

    Number 100 legend lakshya

  • @devdasmane5289
    @devdasmane5289 8 หลายเดือนก่อน +2

    Super hero

  • @SaharaHome-ib8gh
    @SaharaHome-ib8gh 8 หลายเดือนก่อน

    Great actor,, Lakshya

  • @vilassolanke7651
    @vilassolanke7651 7 หลายเดือนก่อน +1

    Laksha jatya comedi is best

  • @surajhargude6845
    @surajhargude6845 5 หลายเดือนก่อน

    All time fev lakshya❤❤❤

  • @prasadfake1803
    @prasadfake1803 8 หลายเดือนก่อน +2

    Laksha asayla pahije hota

  • @kashifbagwan0916
    @kashifbagwan0916 8 หลายเดือนก่อน +2

    20 वर्ष झाली पण तो कधीही मनातून जाणार नाही

  • @bittuavi3475
    @bittuavi3475 8 หลายเดือนก่อน +1

    Manmohana he gaane he maaz favorite aahe

  • @ramjkhedkar3990
    @ramjkhedkar3990 8 หลายเดือนก่อน +3

    असे 1000 सलमान खान बरोबरी करू शकत नाही

  • @truthadventure0407
    @truthadventure0407 8 หลายเดือนก่อน +1

    Kharach dada radayla laglo re mi mama la kafhi bagl nahi pan ajj pan to javalacha vatato love you re mama ekda janm ghe tu

  • @gk_photo_graphics3076
    @gk_photo_graphics3076 8 หลายเดือนก่อน +2

    मिस you लक्ष्या 😢😢 लक्षाचे नाव ऐकताच डोळे पानावतात मराठीच काय हिंदी श्रुष्टीत पण लक्षणे आपला ठसा उमटवला असा हिरो होने नाही लक्षाला मिस करतात त्यांनी like करा कॉमेंट ला

  • @vaibhavgodhade6520
    @vaibhavgodhade6520 8 หลายเดือนก่อน

    Lakshya mhntlyabaddal. Explkanation diplyabddal manal bhsvad.good....❤❤❤

  • @pawankapase22
    @pawankapase22 8 หลายเดือนก่อน +2

    विनोदाच्या बेताज बादशहाला सलाम🙏🌍

  • @sachinmanohar82
    @sachinmanohar82 7 หลายเดือนก่อน +1

    "एक होता विदुषक"

  • @aatinm3684
    @aatinm3684 7 หลายเดือนก่อน

    Bollywood filmfare award show madhe aple ladke lakshmikant berde na bhavpurna shraddhanjali dili.... he best ahe😊😊😊

  • @prakashjadhav7798
    @prakashjadhav7798 4 หลายเดือนก่อน

    ❤❤

  • @Tatya351
    @Tatya351 8 หลายเดือนก่อน

    👌👍

  • @mrunalinibondre7233
    @mrunalinibondre7233 8 หลายเดือนก่อน

    My favourite actor❤ Lakshmikant Berde .
    Amachya lahanoan tranche movie pahanyatach gele
    Sunday evening waat Pahat asayacho

  • @muktrangproduction
    @muktrangproduction 8 หลายเดือนก่อน +2

    एक होता विदूषक ❤❤❤😢

  • @shubhamjadhav1510
    @shubhamjadhav1510 8 หลายเดือนก่อน +1

    Mi bol bhidu walyana khup vela sangitl hot aplya lkshya vr video bnva shevti tu bnvlas bhava love u....😘😘

  • @ajitkokade4242
    @ajitkokade4242 8 หลายเดือนก่อน

    🙏

  • @satishparkar5997
    @satishparkar5997 8 หลายเดือนก่อน

    ❤❤❤

  • @rahulshewale6363
    @rahulshewale6363 8 หลายเดือนก่อน

    धनंजय माने

  • @jayeshpakhare6318
    @jayeshpakhare6318 8 หลายเดือนก่อน +2

    लक्ष्याला एकेरी उल्लेख आवडायचा...., असे मी ऐकले आहे.कसलेले नट होते ते...

  • @siddheshchavan2642
    @siddheshchavan2642 8 หลายเดือนก่อน +3

    *Lakshya aani Ashok mama* Bollywood sathi banle navhte...
    Hindi walyani tyana fakt *commedion* banvun sodle!!!
    *Dada Kondke; Master Bhagwan aani V Shantaram* yani *Bollywood* ghadavle!!!

  • @sidmore2211
    @sidmore2211 8 หลายเดือนก่อน

    Marathi chitrpat shrusthitil ek adhal druv tara aahe to,,,, to sadaiv aaplya barobar aahe 🙏

  • @user-lz2rm5mp8o
    @user-lz2rm5mp8o 8 หลายเดือนก่อน

    First like

  • @LalitKale-bc4lg
    @LalitKale-bc4lg 8 หลายเดือนก่อน +4

    भावा तुझ्या सारखे माणसं पाहिजे राव 😘

  • @sachinumbarsada3639
    @sachinumbarsada3639 4 หลายเดือนก่อน

    😢😢😢😢

  • @bhaveshshinde427
    @bhaveshshinde427 7 หลายเดือนก่อน +1

    हो म्हणजे हिंदी चित्रपटात नोकर म्हणून काम मिळाले असते

  • @yogeshtodankar8725
    @yogeshtodankar8725 8 หลายเดือนก่อน

    Waite ewde wate ki laxani Faqt Nokrachi Bhumika keli

  • @shaukiyasinger_31
    @shaukiyasinger_31 8 หลายเดือนก่อน +1

    असा नट होणे नाही...

  • @sachubenure3875
    @sachubenure3875 8 หลายเดือนก่อน +1

    नमस्कार शेवटीच करत जा ना😂😂😂😂

  • @tejasv.nandurkar7589
    @tejasv.nandurkar7589 8 หลายเดือนก่อน

    Laxmikant आणी अशोक सराफ यांचे picture रविवारी 4 ला लागायचे असं वाटायचं ते वेगळ्याच जगातून आले आहेत

  • @rameshkshirsagar8408
    @rameshkshirsagar8408 8 หลายเดือนก่อน

    Banva Bani khoob hansne sar ka😢 Lakshya picture TV lala lala

  • @digabayas-em1wv
    @digabayas-em1wv 7 หลายเดือนก่อน

    De dana dan 😂😂😂😂😂😂😂😂😊😊😊😊

  • @jaydeep85
    @jaydeep85 8 หลายเดือนก่อน

    Daru mule gela bichara...

  • @ra12896
    @ra12896 3 หลายเดือนก่อน

    Laksha marathit kiti hi famous asla tari hindi madhe duyyam bhumika karun mati keli

  • @ashwinimohite-tw3ur
    @ashwinimohite-tw3ur 8 หลายเดือนก่อน

    Sarkh sarkh tyach zadavar kai😅😅😅 ashi hi banvabanvi

  • @SagarBagade-wl7cr
    @SagarBagade-wl7cr 8 หลายเดือนก่อน

    जय महाकाली बसा खाली 😂😂😂 पछाडलेला😂😂😂

  • @jagadishlambe9291
    @jagadishlambe9291 8 หลายเดือนก่อน

    Lukkhaa 🏴❌👎