६७ . रेल्वेसाठी भूसंपादन प्रक्रिया

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 149

  • @master_hit4644
    @master_hit4644 หลายเดือนก่อน

    साहेब आपल्या कडील ज्ञान कसे वाटायचे याचे उत्तम उदाहरण तुम्ही आहात....खरेच आहे वडीलधारी व्यक्ति

  • @sharadsuryawanshi9684
    @sharadsuryawanshi9684 ปีที่แล้ว +3

    सर माझी जमीन 2018 ला रेल्वे भूसंपादन झाली आहे .माझी जमीन गावाला लागून 5 मीटर अंतरावर आहे आणि मला जिरायत चा मोबदला मिळाला आहे आणि माझ्या शेतात पाइपलाइन व अन्य सर्व्हे नंबर मध्ये सामायिक विहीर आहे. सातबारा वर बागायती चे पेरे नाहीत. आणि आता. 2023 ला जमीन ताब्यात घेत आहेत . आणि तर आम्ही सर्व रेल्वे भुसंपादित झालेले शेतकरी रेल्वे चे काम थांबवत आहे तर आम्हाला मोबदला वाढून मिळेल का
    आमची जमीन गावच्या प्लाटला लागून 5 मीटर अंतरावर आहे.

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  ปีที่แล้ว

      आता मुदत निघून गेली आहे. तुम्हाला arbitrator कडे अर्ज करता आला असता . पहा अजून विलंब माफ करून अर्ज दाखल करून घेतात का ते .

    • @sharadsuryawanshi9684
      @sharadsuryawanshi9684 3 วันที่ผ่านมา

      सर वाढीव मोबदल्यासाठी तेंव्हाच कोर्टात केसेस चालू आहेत.

  • @akashchiwande
    @akashchiwande 4 หลายเดือนก่อน +1

    सर माझी जमीन तिसरी रेल्वे लाईन प्रकल्पा साठी संपादित केली आहे. आम्ही 2021 ला रजिस्टरी केली. व काही लोकांनी रजिस्टरी नाही केली. त्यांना पैशान मध्ये वाढ मिळाली. सर आम्हाला पैसा मध्ये वाढ मिळेल या साठी काही करता येईल का..

  • @bhushanraut4945
    @bhushanraut4945 3 ปีที่แล้ว +3

    धन्यवाद सर खूप चांगलं मार्गदर्शन

  • @SapnaPatil-e8k
    @SapnaPatil-e8k ปีที่แล้ว +2

    ., सर नमस्कार वाढीव दावा कुठे करायचा व कोणते कालम व मुदत किती

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  ปีที่แล้ว +2

      Arbitrator kade collector अथवा कमिशनर ऑफिस

    • @SapnaPatil-e8k
      @SapnaPatil-e8k ปีที่แล้ว

      धन्यवाद सर कलम कोणते व मुदत कीती.

  • @pradippatil-uw1fw
    @pradippatil-uw1fw ปีที่แล้ว +1

    सर नमस्कार वाढीव दावा कुठे दाखल करायच व कोणते कलम मुदत किती असते...

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  ปีที่แล้ว +1

      कोणत्या कायद्याखाली भूसंपादन झाले ? Arbitrator कडे किंवा भूसंपादन प्राधिकरण

  • @lahanudalavi7754
    @lahanudalavi7754 ปีที่แล้ว +1

    नवीन रेल्वे ट्रॅक साठी किती फुट रुंद भूसंपादन करतात

  • @laxmammagar3363
    @laxmammagar3363 3 ปีที่แล้ว +2

    हर जमिन किती मीटर घेनार

  • @kishorsuryawanshi-ox7zd
    @kishorsuryawanshi-ox7zd 5 หลายเดือนก่อน +1

    सर रेल्वे भूसंपादन मध्ये प्रकल्प सर्टिफिकेट मिळेल का

  • @sudhakargund807
    @sudhakargund807 8 หลายเดือนก่อน +2

    नमस्कार सर माझी जमीन सोलापूर तुळजापूर उस्मानाबाद रेल्वेमध्ये भूसंपादन झाली आहे परंतु माझी जमीन गावालगत असून माझा गट नंबर मध्ये 30-40 घरे २५ वर्षांपासून आहेत माझ्या शेतामध्ये बोरवेल पाईप लाईन यांच्या नोंदी सातबारा वर असताना जमीन हंगामी बागायती च्या नियमांमध्ये बसत असताना जिराईत जमिनीचा भाव दिला आहे व जमिनीचा ग्रामीण भागात असल्यामुळे गुणक 2 न वापरता एक गुणांक वापरला गेला व बाजारभाव जिराईत जमिनीचा दिला गेला त्याबाबत दाद कोठे मागता येईल सदरील अवार्ड मध्ये दुरुस्ती करता येईल का अवार्ड झालेला आहे गेल्या आठवड्यात

    • @sudhakargund807
      @sudhakargund807 8 หลายเดือนก่อน +1

      मला शेताचा चारपट मायेचा दिला गेला नाही

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  8 หลายเดือนก่อน

      तुम्ही आर्बीट्रेटर कोण आहेत त्याची चौकशी करा आणि त्यांचेकडे अर्ज करा.

    • @sudhakargund807
      @sudhakargund807 5 หลายเดือนก่อน

      ​@@pralhadkachare-legalliteracyok

    • @sudhakargund807
      @sudhakargund807 5 หลายเดือนก่อน

      Sir

  • @mahendradhangavkar9374
    @mahendradhangavkar9374 ปีที่แล้ว +1

    Nivada. Zalyanatar land aqization cancel hoto ka

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  ปีที่แล้ว

      निवाडा झाला म्हणजे, भूसंपादन पुर्ण झाले असे समजतात, ते कॅन्सल होत नाही.

  • @balkrishnagawande1098
    @balkrishnagawande1098 11 หลายเดือนก่อน +1

    Thanks sir akola khawandwarail व्हिडीओ करा

  • @Rahulhbagde
    @Rahulhbagde 2 ปีที่แล้ว +2

    नमस्कार सर रेल्वे मध्ये जमीन संपादित केली गेली असल्यास प्रकल्प ग्रस्त दाखला मिळू शकतो काय. कृपया माहिती द्यावी.

    • @Yogesh-i7t
      @Yogesh-i7t 9 หลายเดือนก่อน

      नाही मिळत रेल्वे मध्ये.

  • @ganeshdhoblepatil9230
    @ganeshdhoblepatil9230 2 ปีที่แล้ว

    सर मला वाढीव क्षेत्रासाठी 2015 साली भू संपादनाची पहिली नोटीस दिली गेली. त्या नंतर तब्बल 6वर्षाने आम्हाला थेट खरेदीची नोटीस दिली गेली. परंतु दर कमी देत असल्यामुळे आम्ही निवाड्याची मागणी केली होती. त्या नंतर आमची जमीन नको म्हणून jm रेल्वेने तयार केला आहे. असा jm काढता येतो का

  • @dineshpatil5087
    @dineshpatil5087 2 ปีที่แล้ว +2

    सर आमचा गट नकाशा चुकीच्या असल्यामुळे इंदौर मनमाड रेल्वे मार्गामध्ये येत असुन आमच्या शेतांमध्ये तशी खुन गाडली आहे तरीही आमचे नावे भुसंपादन यादी मध्ये नाही तर आम्हाला काय करावं लागेल याचे मार्गदर्शन करावे

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 ปีที่แล้ว

      तुमचे नाव ७/१२ वर असेल तर ते यादीत येईल. जर ७/१२ वर नाव नसेल तर येणार नाही. प्रथम जिथे शेतामध्ये खुणा केल्या आहेत ते क्षेत्र तुमच्या ताब्यात असेल तर त्या क्षेत्राच्या ७/१२ वर तुमचे नाव आहे की नाही याची खात्री करा.

  • @yogeshsuryawanshi-ip2xn
    @yogeshsuryawanshi-ip2xn ปีที่แล้ว +1

    सर माझी पूर्ण जमीन रेल्वे करिता संपादीत होत आहे या जमिनीतून पाईप लाईन अन्य सर्वे नंबर ला गेली या पाईप लाईन ची लबी 3500 फुट आहे हे पाईप लाईन दुसऱ्याचा शेतातून गेली सदर पाईप लाईन 3 500 फुट उपयोगी राहत नाही याचा मोबदला मिळेल का।

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  ปีที่แล้ว

      तुम्ही पुरावे द्या ना, भूमिगत असो की जमिनीवर असो त्या पाईपलाईन चां मोबदला त्यांना द्यावाच लागेल. बहुतेक जीवन प्राधिकरण किंवा PWD चे अधिकारी यांचेकडून हे मूल्यांकन करून घेतले जाते. तुम्ही भूसंपादन अधिकारी यांचे हे निदर्शनास आणून द्या आणि पाठपुरावा करा.

    • @yogeshsuryawanshi-ip2xn
      @yogeshsuryawanshi-ip2xn ปีที่แล้ว +1

      सर माझी पाईपलाईन माझ्या भावाच्या संपादीत होणाऱ्या शेतात् 300 फुट आहे या पाईप लाईन चा मोबदला। मला भेटेल की भावाला भेटल रेल चे अधिकारी म्हणले की ज्याच्या शेतात पाण्याची पाईप लाईन त्यानंच मोबदला मिळेल . अशी काही तरतूद व कायदा आहे का? Please sir guidance to me.

  • @pravinborphale8678
    @pravinborphale8678 หลายเดือนก่อน

    सर गंगाखेड परली वै चे दोहेरी करण मार्ग बदल केला आहे तशी बातमी आज पेपर लां आली आहे खरे आहे का

  • @dadasonalvade6956
    @dadasonalvade6956 2 ปีที่แล้ว +2

    सर माझे 30 आर क्षेत्र संपूर्ण गट रेल्वेसाठी संपादित होत आहे तरी मला प्रकल्पग्रस्त म्हणून नोकरी संदर्भात काय करावे लागेल कृपया माहिती द्यावी 🙏

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 ปีที่แล้ว

      तुम्ही तुमचा पारदर्शकतेचा हक्क का बजावत नाही, हे सर्व तुम्हाला भूसंपादन अधिकारीच सांगू शकतात, माझ्या आग्रह राहील हे तुम्ही बाहेरून कुणाकडून नाही तर भूसंपादन अधिकारी यांचेकडूनच ही माहिती घ्या .

  • @alankarbhoir2821
    @alankarbhoir2821 3 ปีที่แล้ว +1

    Sir maji jamin रेल्वे कार शेड ल जमीन खरेदी केली आहे तर आम्हाला किती भाव गुंठा मिळाला पायजे आणि आम्हला प्रकल्प गस्त दाखला देतील का आणि आम्हला रेल्वे मदी जॉब ला घेतला पायजे 🙏

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 ปีที่แล้ว

      तुम्ही खरेदी दिली असेल तर पुनर्वसन, जॉब वगैरे कोणतेही लाभ मिळत नाहीत. तुमची जमीन जिथे असेल तेथील बाजारभाव तुम्हाला मिळायला पाहिजे. खरेदी खतामध्ये काय भाव दिला ते नमूद असेल .

  • @ajaybhagat2889
    @ajaybhagat2889 3 ปีที่แล้ว +1

    सर मी तुमचा सुब्क्रिपशन gpay ला येतं नाही सर plz मला रिप्लाय करा

  • @ashishjuikar1434
    @ashishjuikar1434 2 ปีที่แล้ว +1

    2021 Cha Bhusampadan kayada yethe lagu hoto ka?? Ya madhe metro railway sudha yete ka?

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 ปีที่แล้ว

      २०२१ चा कोणता कायदा आहे ?

    • @ashishjuikar1434
      @ashishjuikar1434 2 ปีที่แล้ว +1

      @@pralhadkachare-legalliteracy Gunak 1:2 aivaji 1:1 denyacha

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 ปีที่แล้ว

      Railway साठी नियमित गुणांक लागेल, शहर हद्दीत १:१ तर ग्रामीण भागात २:२ . नॅशनल हाय वें साथीचे नियम इथे नाही लागू होणार.

  • @santoshvyavhare671
    @santoshvyavhare671 2 ปีที่แล้ว +1

    पंढरपूर पंढरपूर लोणंद रेल्वे मार्गासाठी भूसंपादन क्षेत्राचे मुलाकन किती पट होईल

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 ปีที่แล้ว

      तुम्हाला नोटीस आली असेल तर ती नोटीस देणारे अधिकारी यांना विचारून पहाबते जास्त चांगले सांगू शकतील. कारण notification केव्हा काढले त्यावर गुणांक १ की २ लावणार हे अवलंबून असते. ती माहिती तेच देऊ शकतील.

  • @Bhamre_Suresh
    @Bhamre_Suresh ปีที่แล้ว +1

    सर आमचे बोरविहीर धुळे नरडाणा रेल्वे प्रकल्पात शेत जात आहे ३६ आर क्षेत्र आहे त्यातुन २० आर ते घेत आहेत तर तुकडे बंदी कायदा अन्वये हे १६ आर क्षेत्र तुकडा म्हणूनच समजला जाईल ना

    • @lahanudalavi7754
      @lahanudalavi7754 ปีที่แล้ว

      किती फुट रुंद भूसंपादन झाले

    • @lahanudalavi7754
      @lahanudalavi7754 ปีที่แล้ว

      मो न मिळेल का

    • @Bhamre_Suresh
      @Bhamre_Suresh ปีที่แล้ว

      @@lahanudalavi7754 द्या मो न

  • @prashantraut9801
    @prashantraut9801 10 หลายเดือนก่อน +1

    सरकारी नियमानुसार रेल्वे च्या रुळा पासून दोन्ही side ला रेल्वे ची मालकी किती फुट पर्यंत असती

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  10 หลายเดือนก่อน

      Railway ने जितके क्षेत्र भूसंपादन केले तेवढेच त्यांच्या मालकीचे असते.

    • @prashantraut9801
      @prashantraut9801 9 หลายเดือนก่อน

      याची माहिती कुठे भेटू शकेल माझ्या शेत्रातून इंग्रज असताना रेल्वे लाईन्स होती आता रेल्वे नाही परंतु त्याचा कब्जा आहे. तरी सध्या माझ्या वाटणीला असणाऱ्या जमीन च्या मधून जुनी रेल्वे लाईन्स जात होती मला मोजणी करायची आहे पण मला माहिती नाही कि जुन्या रेल्वे लाईन्स ला रुळा पासून दोनीही side ला अंतर किती आहे ते सोडून मोजणी करावी लागेल प्लीज मला माहिती दया 🙏🏻🙏🏻

    • @prashantraut9801
      @prashantraut9801 9 หลายเดือนก่อน

      सर प्लीज माहिती दया ☝🏻

  • @6e11.harshapatil3
    @6e11.harshapatil3 3 ปีที่แล้ว +2

    सर शहरी जमिनिचा मोबदला एकरी काय असतो

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 ปีที่แล้ว

      त्या ठिकाणचे जमिनीचे भाव काय ,रेडी रेकनर काय यावर हे ठरते, स्थनिक चौकशी करा म्हणजे कळेल तेथील भाव काय आहे ते

  • @narendrachipde
    @narendrachipde 2 ปีที่แล้ว +1

    सर रेल्वे भूसंपादन मध्ये जी जमीन जात आहे ती राज्यमार्ग सहमुख आहे. त्यामुळे २९ ब प्रमाणे पैसे भेटण्यासाठी काय करावे लागेल.

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 ปีที่แล้ว

      तुम्हाला काही करण्याची गरजच नाही, भूसंपादन अधिकारी नोटीस देतील तुमचे म्हणणे विचारतील तेव्हा सांगा तुम्हाला काय सांगायचे ते...

  • @Yogesh-i7t
    @Yogesh-i7t 10 หลายเดือนก่อน +2

    सर रेल्वे करिता माझी जमीन भूसंपादन झाली २०२३ ला मला जिरायत जमिनीचा भाव ५३ आ र. दीला २०१३ ते २०१६ या कालावधीत शेतात ऊस हे पीक होते . मात्र ७/१२ बारावर पेरे नव्हते ऊसाचे बिल व् वजन पावत्या आहे बिलाच्या पुराव्यावर बागायातीचा दर मिळेल का . शेतात २बोअरवेल. व् वीहरीच पाणी पाइपलाइन आहे.

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  10 หลายเดือนก่อน

      संयुक्त मोजणीच्या वेळी काय परिस्थिती होती ? उसाचे पीक होते हे संयुक्त मोजणी विवरण पत्रात नोंदविले असेल तर तुम्हाला बागायत चा दर मागता येईल . ७/१२ वर नोंद नसली तरी, पण तुमच्या पावत्या संयुक्त मोजणी शी सुसंगत आहेत का पहा ......

  • @theotherside2406
    @theotherside2406 3 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर माहिती सर

  • @kishorsuryawanshi-ox7zd
    @kishorsuryawanshi-ox7zd 5 หลายเดือนก่อน

    सर् रेलवे भूसम्पदानमधे प्रकल्प सर्टफिकेट मिळते का

  • @ashishmahamuni1809
    @ashishmahamuni1809 ปีที่แล้ว +1

    SIA
    म्हणजे काय ?

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  ปีที่แล้ว +1

      सोशल इम्पॅक्ट असेसमेंट.........प्रकल्पामुळे होणाऱ्या सामाजिक परिणामांचा अभ्यास

  • @viralshort.788
    @viralshort.788 5 หลายเดือนก่อน +1

    Sir जमिनीचा भाव सरकारी rate नुसार मिळत की चालू बाजार भाव नुसार....
    विहीर जात असेल तर किती मोबदला मिळतो..

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  5 หลายเดือนก่อน +1

      चालू बाजारभाव प्रमाणे मिळतो. विहिरीचे मूल्यांकन तज्ञ इंजिनीअर्स करतात. शक्यतो जलसंपदा विभाग किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाचे इंजिनीअर्स असे मूल्यांकन करून देतात.

    • @Yogesh-i7t
      @Yogesh-i7t 2 หลายเดือนก่อน

      Mala 4 65 char Lakha pahshat Hajar bhetale railway 🚂 kadun

  • @narendray8921
    @narendray8921 2 ปีที่แล้ว +1

    लोक अदालत मध्ये रेल्वे मार्ग साठी संपादित केलेल्या जमिनीचे रेट वाढुन मिळाले आहे. त्या वर व्याज किती दराने मिळते आणि केस फाईल केलेल्या तारखे पासून मिळते की निकाल लागला त्या तारखे पासून मिळते अजुन कोणते खर्च मिळतातं

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 ปีที่แล้ว +1

      त्या तडजोड आदेशात काही व्याज द्यावे असे नमूद आहे का पहा.

    • @omkarpatil1059
      @omkarpatil1059 ปีที่แล้ว

      Narendra sir aapla contact number dya...mazi jamin railway sathi adhigrahit hotiy thodi mahiti havi hoti

  • @ravishinde2412
    @ravishinde2412 ปีที่แล้ว +1

    प्रकलपावर किती दिवस कोरटा कडुन टे येऊ शकतो

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  ปีที่แล้ว

      कोर्टातील केसमधले सर्व पक्षकार किती पाठपुरावा करतात त्यावर हे अवलंबून असते. सुप्रीम कोर्ट म्हणते की कोणताही स्टे हा सहा महिन्यापेक्षा जास्त नसावा.

  • @ajaybhagat2889
    @ajaybhagat2889 3 ปีที่แล้ว +1

    सर 'ई पेन्सिल नोंद' आदेश... हा काय प्रकार आहे? सक्षम अधिकारी भूसंपादन यांनी फक्त अधिसूचनेच्या अधारे ते आमच्या 7-12 वर इतर अधिकारा मध्ये ई पेन्सिल नोंद द्वारे नोंद करू शकतात कां?.... कारण आमच्या हरकती 30 दिवसाच्या आत सक्षम अधिकाऱ्या कडे दाखल असताना देखील आमच्या अर्जान वर सुनावणी व्हायच्या पहिलेच नोंद काशीकाय होऊ शकते.. मला या बद्द्ल माहिती हवी आहे.. 🙏🏻🙏🏻

    • @ajaybhagat2889
      @ajaybhagat2889 3 ปีที่แล้ว

      Sir यावर सांगा सर... इथं... अधिसूचना निघल्या निघाल्या यांनी 7-12 वर ई पेन्सिल नोंदी टाकलेत.... आणि आम्हाला सांगतात कीं ह्या मुळे तुमची जमीन safe राहिलं... पण आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या आणि आधीच नोंदी कश्या?

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 ปีที่แล้ว

      प्राथमिक adhisuchane नंतर सुरुवातीला जी ऑनलाईन नोंद घेतात त्याला ई पेन्सिल नोंद म्हणतात, तुमच्या हरकती ऐकल्या नंतर ती नोंद मंजू झाली तो ती पेन ने केलेल्या नोंदी सारखी पक्की नोंद होते.

  • @sachinadke7461
    @sachinadke7461 3 ปีที่แล้ว +1

    सर जमीन अधिग्रहण करतांना जमिनीचे मूल्यांकन खरेदी खताप्रमाणे करणार असेल तर
    चालू वर्षाचे खरेदी खत ग्राह्य धरण्यात येईल का

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 ปีที่แล้ว +2

      ज्या तारखेला भूसंपादनाचा हेतू स्पष्ट करणारे नोटीफिकेशन प्रसिद्ध केले जाते त्या तारखेपर्यंत झालेले खरेदीखत विचारात घेतले जातात. त्यानंतरचे खरेदी खत विचारात घेतले जात नाहीत.

  • @narendray8921
    @narendray8921 3 ปีที่แล้ว +3

    आपले खुप आभारी आहोत खुप छान माहितपूर्ण व्हिडिओ आहे.

  • @sudhirpawar4559
    @sudhirpawar4559 3 ปีที่แล้ว +1

    Sir railway madhe jameen geli tr railway job milel ka

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 ปีที่แล้ว +1

      बहुतेक नाही, अशी तरतूद दिसत नाही. जर रहाते घर व जमीन गेली तरच पुनर्वसनाच्या तरतुदी लागू होतात.केवळ जमीन गेली तर त्याची नुकसान भरपाई मिळते, बाकी पुनर्वसनाचा प्रश्न उदाभवत नाही.

    • @sudhirpawar4559
      @sudhirpawar4559 3 ปีที่แล้ว

      @@pralhadkachare-legalliteracy sir railway sathi survey zala aahe ani tya form madhe tyani apeksha vicharnyat alya aahet...jamini sathi yogya mobadla ani sarkari nokari ashi apeksha sangitali aahe mg he donhi milu shakel ka

    • @sudhirpawar4559
      @sudhirpawar4559 3 ปีที่แล้ว

      But sir tya jameeni vr ch tyacha udar nirvah hot asel tr ya sathi kahi pariyay aahe ka

  • @gajanandeshmukh7201
    @gajanandeshmukh7201 2 หลายเดือนก่อน

    Nanded & Latur
    Kahi asel tar saga sir

  • @bhushanraut4945
    @bhushanraut4945 3 ปีที่แล้ว

    सर आमची जागा रेल्वे कारशेड साठी जात आहे आणि जागेचा सर्वे झाला आहे भुसापादन होण्यासाठी किती वेळ लागू शकतो

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 ปีที่แล้ว

      कोणत्या कायद्याखाली भूसंपादन होणार त्यावर अवलंबून आहे. रेल्वे कायद्यानुसार झाले तर साधारण एक वर्षे लागते, नवीन भूसंपादन कायद्याप्रमाणे केल्यास जरा जास्त वेळ लागतो. थेट खरेदी झाल्यास साधारण ६ ते ८ महिने लागतील.

    • @bhushanraut4945
      @bhushanraut4945 3 ปีที่แล้ว

      सर आमची जागा रेल्वे कारशेड साठी जात आहे व 20A ची नोटीस पब्लिक झाली आहे पुढील प्रोसेस काय असेल

  • @ajaybhagat2889
    @ajaybhagat2889 3 ปีที่แล้ว +1

    आमच्या 7-12 सदरी नोंदी टाकायला घेतलेत आता आम्ही हरकती घेतल्यात... परंतु अधिकारी बोलतात कीं हा फेरफार पडेलच... आणि आम्ही पूर्ण संभ्रमात आहोत कीं... जर ह्यांनी अगोदरच नोंदी टाकल्या आणि नंतर आम्हाला मोबदला आणि समस्या सोडवल्याच नाही तर... आणि कोर्टात जा असं म्हंटल तर...?

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 ปีที่แล้ว

      भूसंपादन प्रक्रियेत जस जसे notification प्रसिद्ध होतात तशा नोंदी घेतल्या जातात, ही कायदेशीर प्रक्रिया आहे. तुम्ही हरकती घेत रहा, मात्र प्रत्येक वेळी लेखी पोच घेऊन ठेवा, जेव्हा आवश्यक वाटेल तेव्हा arbitrator व कोर्टात या सर्व लेखी पोच दाखवायला उपयोग होईल.

    • @m.k1967
      @m.k1967 3 ปีที่แล้ว

      @@pralhadkachare-legalliteracy साहेब सिलिंग जमीन बद्दल मार्गदर्शन करावे ही विंनती🙏🌹

  • @prajaktasuryawanshi6802
    @prajaktasuryawanshi6802 2 ปีที่แล้ว +1

    आधी सूचनेनंतर रूट बदलू शकतो का

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 ปีที่แล้ว

      हो बदलू शकते जर तसे समर्थनीय तांत्रिक कारण असडेल तर

  • @raghavbaravkar6418
    @raghavbaravkar6418 3 ปีที่แล้ว

    माहितीसाठी धन्यवाद सर.
    जर रेल्वे प्रकल्प भूसंपादन मधे एखाद्या दिव्यांग व्यक्तीचे घर आणि व्यवसाय उध्वस्त होत असतील तर त्यासाठी काही विशेष तरतूद आहेका? किंवा मोबदला जास्त मिळावा यासाठी कशा पद्धतीने आणि कुठे अर्ज दाखल करावा, कागदपत्रे काय जोडावीत? कृपया मार्गदर्शन करावे.

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 ปีที่แล้ว +1

      अशी वेगळी तरतूद काही आढळून आली नाही. फक्त जर बाधित कुटुंब अनुसूचित जमातीचे असेल तर त्यांना रू.५००००/- जास्त देण्याची तरतूद आहे. तुमचे बाधित होणाऱ्या मिळकतीचे कागदपत्र, आधार कार्ड, PAN no., व रेल्वे काही दिव्यांग असल्याबद्दल काही लाभ देऊ इच्छित असेल तर दिव्यांगाचे प्रमाणपत्र इतके पुरावे पुरेसे ठरतील.

  • @mahendradhangavkar9374
    @mahendradhangavkar9374 ปีที่แล้ว +1

    Please reply dya

  • @sachinadke7461
    @sachinadke7461 3 ปีที่แล้ว

    सर रेल्वे मार्ग मुळे जमिनीचे दोन तुकडे होत आहेत त्या जमिनीमध्ये द्राक्ष बाग बाधित होणार असेल तर उरलेल्या क्षेत्रामध्ये असलेल्या द्राक्ष बागेची नुकसान भरपाई मिळेल का ?

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 ปีที่แล้ว +1

      Ideally मिळाली पाहिजे. पण ते प्रथमदर्शनी सिद्ध करता आले पाहिजे. नवीन भूसंपादन कायद्यातील कलम २८ वाचा.

    • @sachinadke7461
      @sachinadke7461 3 ปีที่แล้ว

      @@pralhadkachare-legalliteracy धन्यवाद सर

  • @prajaktasuryawanshi6802
    @prajaktasuryawanshi6802 3 ปีที่แล้ว +2

    झाडांचा मोबदला कसा मिळतो

  • @pratikdagadu1280
    @pratikdagadu1280 3 ปีที่แล้ว

    सर खाजगी शेत जमीन मधे गोठा बाँधन्या साथी जागा N/A करावी लागेल का?

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 ปีที่แล้ว

      नाही, पण जमीन महसूल अधिनियम चे कलम ४१ प्रमाणे फॉर्म हाऊस साठी परवानगी मिळू शकते. ती घेतली तर पुढे काही अडचण येणार नाही. तहसील कार्यालयात चौकशी करा हवी तर. केवळ गोठ्यासाठी परवानगी लागणार नाही. मात्र पुढे तिथेच घर बांधायचे असेल तर या तरतुदीचा उपयोग होईल तुम्हाला.

    • @pratikdagadu1280
      @pratikdagadu1280 3 ปีที่แล้ว

      @@pralhadkachare-legalliteracyधन्यवाद सर आपण पुरवलेल्या माहिती बद्दल

  • @ravishinde2412
    @ravishinde2412 2 ปีที่แล้ว +1

    माझी रेलवे मधे जमीन जात आहे एका गटात आमी चार खातेदार आहेत तर दोघाची जमीन जात आहे दोघाची जात नाहि मग आमाला ता दोघाची समती पञ घावे लागेल का

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 ปีที่แล้ว

      तुमचे वाटप झालेले असेल तर, तुमच्या हिस्स्यासाठी समती गरजेची नसते, ७/१२ वर भुसंपदित होणाऱ्या हिस्स्याला तुमचे नाव असेल तर अडचण यायला नको.

  • @kalyanlondhe318
    @kalyanlondhe318 3 ปีที่แล้ว +2

    सर अशीच माहिती पेट्रोलियम अँड मिनरल पाइप लाइन भूसंपादन वरती व्हिडिओ करा प्लीज

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 ปีที่แล้ว +2

      जरूर करू.,..थोड थांबा

    • @kartikdaradmare
      @kartikdaradmare 3 ปีที่แล้ว

      , सर मी तुम्हाला मेल पाठविला आहे पण तुम्ही त्यास उत्तर दिले नाही kartikdmd@gmail.com
      Mail sent on 12th July 2021

    • @kartikdaradmare
      @kartikdaradmare 3 ปีที่แล้ว

      तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल खूप खूप धन्यवाद सर परंतु माझा पुन्हा एक प्रश्न आहे ,तो प्रश्न मी तुम्हाला ई-मेलद्वारे पाठवले आहे.

  • @madhavgophane2422
    @madhavgophane2422 3 ปีที่แล้ว

    रेल्वे प्रकल्प जमिनीच्या मधूनच जात आहे .तुकडे पडत असल्यामुळे जमीन शेती करण्यासाठी योग्य नसणार आहे त्याच मोबदला मिळेल का.? तसेच माझ्या घराच्या ५ फूट अंतरावरून जात आहे त्यामुळे मला दुसरीकडे घर बांधावे लागेल याचा काही मोबदला मला मिळेल का ?
    तसेच यासाठी कायदेशीर काय प्रकीर्या करावी लागेल याची माहिती द्यावी .

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 ปีที่แล้ว +1

      शक्य असेल तर रेल्वे च्या अधिकाऱ्यांना अलिगमेट बदलता येईल का व शेताच्या एका बाजूने नेता येईल का हे विचारून पाहा. प्रत्यक्ष काम करताना पीक असेल तर तुम्हाला सेवेरान्स म्हणजेच दुसऱ्या बाजूच्या पिकांचे नुकसान क्लेम करता येईल. यामुळे जी जमीन निकामी होण्याची शक्यता आहे ती सुधा संपादन करा असा लेखी अर्ज देऊन पोच घेऊन ठेवा, नाहीच ऐकेले तर न्यायालयात जावे लागेल. व्हिडिओ Discription मध्ये डाऊनलोड लिंक दिली आहे त्यात बरेच संदर्भ दिले आहेत. हवेवर ते डाऊनलोड करून घ्या.

  • @mohitpadghanpatil4778
    @mohitpadghanpatil4778 3 ปีที่แล้ว

    बुलेट ट्रेन साठी भूसंपादनाचा व मोबदल्याचा वेगळा कायदा आहे का हीच नियम बुलेट ट्रेन साठी लागू आहेत कृपया माहिती द्यावी सर🙏

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 ปีที่แล้ว +1

      वेगळा कायदा नाही, अगदी रेल्वेज अक्ट्ट प्रमाणे जरी भूसंपादन केले तरी व्हाल्युएशन नवीन भूसंपादनाच्या कायद्याप्रमाणेच होईल.

    • @mohitpadghanpatil4778
      @mohitpadghanpatil4778 3 ปีที่แล้ว

      नागपूर मुंबई बुलेट ट्रेन बद्दल काही माहिती मिळेल का सर

  • @theuniverse314
    @theuniverse314 2 ปีที่แล้ว +2

    सर आपल्या जागेवर सरकारी आरक्षण आहे हे आधीच माहिती करून घेता येते का ? आपली जमीन सरकारी भूसंपादन पासून वाचवता येते का ?

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 ปีที่แล้ว

      भूसंपादन होण्यापूर्वी खूप आधीपासून चर्चा सुरू असते, लोकांना माहीत असते, आरक्षण टाकण्यापूर्वी प्रारूप अधिसूचना येते त्यावर हरकती मागवल्या जातात, त्यावर लक्ष ठेवायला हवे.

  • @javed___shaikh...3680
    @javed___shaikh...3680 3 ปีที่แล้ว

    सर माझा प्लॉट बिगर येणी आहे तो N/A करता येऊ शकतो का?

  • @justhappyforlife555
    @justhappyforlife555 3 ปีที่แล้ว +1

    रेल्वे जमीन गेल्यानंतर मोबदला स्वरूपात रेल्वेत जॉब भेटल की पैसे भेटतील

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 ปีที่แล้ว

      जॉब मुश्कील आहे, जर घरासह जमीन गेल्यामुळे बाधित झाले तर तुम्ही जॉब किंवा त्या बदल्यात रोख रक्कम मागू शकता.

    • @amt359
      @amt359 8 หลายเดือนก่อน

      सर आमच्या शेतातून डबल ट्रॅक जाणार आहे आणि मझ इंजिीअरिंगमध्ये शिक्षण झालेलं आहे तर पैसे न मागता मी जॉब ची मागणी करू शकतो का ​@@pralhadkachare-legalliteracy

  • @sachingodse5329
    @sachingodse5329 3 ปีที่แล้ว

    नमस्कार सर तुम्ही रेल्वेसाठी भूसंपादनाची प्रक्रिया खूप छान प्रकारे सांगितली,
    रेल्वेसाठी जमिनीचे भूसंपादन करताना शेतीचे दोन्ही बाजूला तुकडे पडतात परंतु काही ठिकाणी 1,2,3,4, गुंठे असे छोटे छोटे तुकडे होत असतील तर ती जमीन शेती साठी उपयोगी होत नाही तर अशा जमिनीचे नुकसान होते तर त्या बद्दल काही तरतूद आहे का

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 ปีที่แล้ว +1

      नवीन भूसंपादन कायद्याने मूल्यांकन केले जाईल त्यामध्ये अशी जमीन निरुपयोगी होणार असेल तर त्यांना पूर्ण नुकसान भरपाई द्यावीच लागेल अशी तरतूद आहे.

    • @nurapatel2443
      @nurapatel2443 ปีที่แล้ว

      Sadarahu kshetr bhusampadan karawe lagate

  • @sunillende8559
    @sunillende8559 3 ปีที่แล้ว +1

    👌👌

  • @ajaybhagat2889
    @ajaybhagat2889 3 ปีที่แล้ว +1

    सर तुमचा subscription मी डायरेक्ट gpay करील

  • @pankajmkabra
    @pankajmkabra 3 ปีที่แล้ว

    अशीच माहिती नगरपालिका क्षेत्रात असलेल्या जमिनीवर असलेले नगरपालीकेचे आरक्षण व त्या संबंधित असलेल्या तरतूदी ह्या बद्दल माहिती द्यावी ही विनंती. ह्याच्यात जमिन आरक्षणमुक्त करण्याची प्रक्रिया व compensation च्या मोबदल्या विषयी ही माहिती हवी. Section १२६ व १२७ च्या अन्वये नोटीस देणे त्या संदर्भातली प्रक्रिया ह्या विषयी ही माहिती देणे.

  • @rohitrd9993
    @rohitrd9993 3 ปีที่แล้ว +1

    गुंठ्याला किती पैसे मिळतात

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 ปีที่แล้ว

      तुमच्या जमिनी चा रेडी रेकणेर भाव काय आहे तो पहा, आजू बाजूच्या जमिनीचे जमिनीचे खरेदी विक्री व्यवहार काय दराने झाले ते पहा म्हणजे त्याप्रमाणे मिळेल.

  • @sachingodse5329
    @sachingodse5329 3 ปีที่แล้ว

    सर अजून प्रश्न होते आमची जमीन रेल्वे साठी संपादित होणार आहे, सर्वे झाला आहे, आमची जमिन ज्या गटात आहे तिचे सध्याचे बाजार मूल्य हेक्टर मध्ये दर्शविण्यात आले आहे, परंतु आमच्या लगत असलेल्या जमीनीचे व गावठाण भागातील जमिनीचे मूल्य चौरस मी. मध्ये आहे, तर मोबदला ठरवताना चौरस मी . मध्ये देणार की हेक्टर प्रमाणे देणार . ज्या जमिनीमध्ये द्राक्ष बाग आहे त्यातून 40 ते 50 टक्के बागेचे नुकसान होणार असेल तर त्याचा मोबदला पूर्ण द्राक्ष बागेचा दिला जातो का .

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 ปีที่แล้ว +1

      बहुतेक तुम्हाला बागायत जमिनीचा जी हेक्टरी दर आहे तो मिळेल. तुम्हाला जे वाटते ते म्हणणे लेखी देऊन पोच घेऊन ठेवा.

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 ปีที่แล้ว +1

      जितकी जमीन जाईल तेव्हढी नुकसान भरपाई मिळेल. जर मधून दोन भाग झाल्याने एक बाजूचे crop yield जर adversely affect jhale तर तुम्ही नवीन भूसंपादन कायद्याचे कलम २८ वाचून ठेवा, त्यातील parameter प्रमाणे तुम्ही damages prove करून पूर्ण पिकाची नुकसान भरपाई मिळवू शकता. Discription मधून संदर्भ डाऊनलोड करून घ्या, वाचा, सर्व शेतकरी एकत्र बसा आणि चर्चा करा. हवं तर जवळच्या चांगल्या वकिलांचा सल्ला घ्या.

    • @sachingodse5329
      @sachingodse5329 3 ปีที่แล้ว

      नमस्कार सर आमच्या ज्या जमिनी मधून रेल्वे जात आहे त्याच्या बाजूचे क्षेत्र व आमचे क्षेत्र दोन्ही पण रहिवाशी झोन म्हणून दाखवत आहे. परंतु सब रजिस्टर ऑफिस अधून बाजार मूल्य काढले असता दोन्ही पण वेगळे वेगळे दाखवत आहे. एक हेक्टर मध्ये तर दुसरे चौरस मीटर मध्ये दाखवत आहे. मोबदला देतांनी एकच प्रकारे देने अपेक्षित आहे. या करता काय केले पाहिजे.

  • @SourabhThopate
    @SourabhThopate 3 ปีที่แล้ว +1

    थेट खरेदी वाटाघाटीने दस्त झाला आहे ह्या विषयावर व्हिडिओ दस्त कसा रद्द होतो यासंदर्भात

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 ปีที่แล้ว

      एकदा थेट खरेदीचा दस्त झला तो रद्द का होईल ? रद्द होण्याचा प्रश्नच उदभवत नाही. खूप तपासणी आणि खात्री करून जिल्हाधिकारी रेट ठरवून परवानगी देतात आणि नंतर दस्त होतो. त्यात कुठे फसवाफसवी होण्याची शक्यता नसतेच मुळी. त्यामुळे दस्त रद्द होऊ शकतो हे म्हणणे पटत नाही.

  • @SourabhThopate
    @SourabhThopate 3 ปีที่แล้ว +1

    खरेदी खत रद्द करा कुणाला अधिकार कलेक्टर साहेबांना केव्हा हायकोर्ट

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 ปีที่แล้ว

      का रद्द करायचे हे महत्त्वाचे आहे.....फार अपवादात्मक परिस्थितीत खरेदी खत रद्द करण्याची वेळ येते.

    • @SourabhThopate
      @SourabhThopate 3 ปีที่แล้ว

      खरेदी खत रद्द करायचा आहे वाटाघाटीने झालेले

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 ปีที่แล้ว

      असे नाही होणार ....

  • @allfacultiesavailable3592
    @allfacultiesavailable3592 2 ปีที่แล้ว +1

    सर मला तुमचा मोबाईल नंबर हवा आहे

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 ปีที่แล้ว

      फोन फॅसिलिटी ही फक्त premium member साठी आहे. व्हिडिओ खाली JOIN बटण क्लिक करा यूट्यूब तुम्हाला premium membership सठी guide करेल. काही अडचण वाटल्यास legalliteracy1@gmail.com वर मेल पाठवून संपर्क करू शकता.