ll लाडकी बहिण ll Ladaki Bahin ll बुवा श्री गणेश आखाडे ll Buva Ganesh Akhade ll ढोलकी कु अमित ढेबे ll
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 ก.พ. 2025
- शब्द/चाल - बुवा श्री चंद्रकांत जाधव
गायक - बुवा श्री गणेश आखाडे
ढोलकी - कु अमित ढेबे
चकवा- कु अर्जुन ढेबे
कोरस - श्री आनंद आखाडे, कु अतुल आखाडे, श्री गोविंद आखाडे
गजर लाडकी बहीण
शब्द -
बहिणीसाठी आला दादा धावूनिया
लाडक्या बहिणीची योजना घेऊनिया
योजना लय भारी मलाही प्यारी
एक विचारू का बंधुराया
लाडक्या बहिणीचे रक्षण कराया सांग येशील का भाऊराया ll
पंधराशे रुपये मिळाले आता
संसाराची माझ्या तुलाच चिंता
पण कशी पडू मी बाहेर दादा
बसले हैवान आम्हा धराया ....ll
योजना ही मस्त घेऊ नवीन वस्त्र
पण आली वेळ घेऊन फिरण्याची शस्त्र
टपून बसली नराधम टोळी
वस्त्रे अंगावरचे उतरावया ll
एकच मागणे तुला रे दादा
आता वेळ झाली हवा कठोर कायदा
लाडक्या बहिणीची हिच ओवाळणी
सांग देशील का रे भाऊराया ll