JALGAON | The Banana City of India
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 15 ม.ค. 2025
- JALGAON | The Banana City of India
-----------------------------------------------------------------------
ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेले व्हिडिओ क्लिप्स व काही फोटो यांची Copyright आमच्याकडे नाहीत. हा व्हिडिओ फक्त educational purpose साठी बनवण्यात आला आहे. धन्यवाद ! 🙏
----------------------------------------------------------------------
महाराष्ट्राच्या उत्तरेस जळगाव जिल्हा हा खूप प्रसिद्ध जिल्हा आहे आणि या व्हिडिओमध्ये या जिल्ह्याबद्दल संपूर्ण माहिती व इतिहास मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे या व्हिडिओमध्ये जिल्ह्यातील सर्व तालुके , पर्यटन स्थळे , जिल्ह्याचा इतिहास , बोलीभाषा , खाद्यपदार्थ , प्रमुख नद्या,
प्रसिद्ध व्यक्ती वर्षा बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहे.
इतिहास -
1906 मध्ये खानदेशाचे दोन भाग झाले पूर्व खानदेश व पश्चिम खानदेश त्यातपूर्व खानदेश हे आज रोजी जळगाव म्हणून ओळखले जाते . 1956 मध्ये खानदेश हे बॉम्बे स्टेट मध्ये ठेवण्यात आले होते. 1960 मध्ये महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर जळगाव जिल्हा हा महाराष्ट्राचा भाग झाला.
क्षेत्रफळ व लोकसंख्या -
या जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ सुमारे 11765 चौरस किलोमीटर इतके असून या जिल्ह्याची लोकसंख्या 2011 च्या जनगणनेनुसार 42 लाख 29 हजार 917 आहे
जिल्ह्यातील तालुके -
जळगाव भुसावळ यावल रावेर मुक्ताईनगर बोदवड जामनेर पाचोरा भडगाव चाळीसगाव पारोळा एरंडोल धरणगाव अमळनेर आणि चोपडा या एकूण पंधरा तालुक्यांचा समावेश होतो
जिल्ह्यातील प्रमुख शहरे-
यामध्ये जळगाव भुसावळ अमळनेर चाळीसगाव चोपडा मुक्ताईनगर या शहरांचा समावेश आहे
प्रमुख नद्या-
जिल्ह्यातील नद्यांमध्ये मुख्यता तापी पूर्णा गिरणा वाघुर अंजनी पांजरा बोरी मोर अशा बऱ्याच लहान मोठ्या नद्यांचा समावेश आहे
प्रसिद्ध व्यक्ती -
प्रसिद्ध बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे
कवित्री बहिणाबाई चौधरी
साने गुरुजी
प्रसिद्ध लेखक हरी नारायण आपटे
संत मुक्ताबाई
पद्मश्री प्राप्त नामदेव महानोर
पद्मश्री प्राप्त भवरलाल जैन
भारताची प्रथम महिला राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील
केळी उत्पादन -
जळगाव जिल्हा हा अख्या जगात केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे म्हणून जळगावला बनाना सिटी म्हटले जाते
महाराष्ट्राचे 66 टक्के केली उत्पादन व भारताचे 16% हे उत्पादन हे फक्त एकट्या जळगाव जिल्ह्यातून होत असते
जळगाव जिल्ह्याच्या केळीचे उत्पादन आणि केळीची कॉलिटी बघून भारत सरकारने जळगाव जिल्ह्याच्या केळीला जीआय टॅग दिला आहे
जळगाव जिल्हा हा केळी सोबतच चहा सोने कडधान्य व कापूस या पदार्थांसाठीचे महत्त्वाचे व्यापारी केंद्र आहे
प्रसिद्ध खाद्यपदार्थ -
जळगाव जिल्ह्यात वरण बट्टी वांग्याची भाजी तसेच भरीतपुरी आणि शेव भाजी हे पदार्थ खूप प्रसिद्ध आहे
बोली भाषा -
जळगाव जिल्ह्यात मराठी सोबतच खानदेशी आणि अहिराणी या दोन बोली भाषा बोलल्या जातात
पर्यटन स्थळे -
या जिल्ह्यात अनेक पर्यटन स्थळे आहेत त्यामध्ये
उनपदेव येथील गरम पाण्याचा झरा
संत मुक्ताबाई मंदिर
चांगदेव मंदिर
फरकांडेच्या झुलते मनोरे
श्री मनुदेवी मंदिर
जागृत हनुमान मंदिर शिरसाळे
चाळीसगाव तालुक्यातील कालीमठ व गंगाश्रम
पाटणादेवी देवस्थान
अमळनेर येथील साने गुरुजींचे तत्त्वज्ञान मंदिर आणि संत सखाराम महाराज मंदिर
पारोळा येथील भुईकोट किल्ला
अमळनेर येथील भुईकोट किल्ला
यावल येथील भुईकोट किल्ला
वडोदा येथे प्राचीन मच्छिंद्रनाथ मंदिर
रावेर तालुक्यातील पाल हे थंड हवेचे ठिकाण आहे
मेहरुन तलाव
वाघुर डॅम
कुसुंबा येथील गोशाळा
पारधी येथील साईबाबा मंदिर
हातनुर धरण
जळगाव मध्ये असलेले धार्मिक व पर्यटन स्थळे
ओंकारेश्वर मंदिर
श्रीराम मंदिर
गांधीतीर्थ
गांधी उद्यान
कांताई बंधारा
आर्यन पार्क
भुसावळ जंक्शन -
भुसावळ सेंटर रेल्वे चा डिव्हिजनल जंक्शन आहे भुसावळ जंक्शन खंडातल्या सर्वात मोठ्या रेल्वेच याड मधले एक आहे जेव्हा 1919 मध्ये भुसावळ लोको शेड इथे बनवण्यात आले तेव्हा ते एशिया खंडतून सर्वात मोठे आणि जगातून तिसरे सर्वात मोठे लोको शेड होते
ऑडनस फॅक्टरी -
भारतात असलेला 41 सोडूनच फॅक्टऱ्यांपैकी दोन फॅक्टरी जळगाव जिल्ह्यात आहेत त्यात एक वरणगावला आणि एक भुसावळला आहे
काँग्रेस अधिवेशन -
भारतातील पहिले ग्रामीण अधिवेशन हे जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथे 12 ते 14 जुलै 1937 ला पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षपदी खाली झाली
जय हिंद! जय महाराष्ट्र !
तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपण असेच इंफॉर्मेशन व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी घेऊन येत असतो . 🙏🙏
----- Thanks For Watching -----
Disclaimer
Copyright Disclaimer under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for “fair use” for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, education and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit ,educational aur personal use tips the balance in favour of fair use
#jalgaon
#jalgaondistric
#jalgaondistricinformation
#jalgaonjilhasampurnmahiti
#khandesh
#khandeshispecial
#khandeshjilla
#heritage
#jalgaonwaterpark
#jalgaoncity
#jalgaonkar
#paryatan
#jalgaonjillaparyatansthale
#जळगावजिल्हा
#जळगाव
#खान्देश
#खान्देशइतिहास
#जलगाव
#जळगावजिल्हाबद्दलपूर्णमाहिती
#जळगावजिल्ह्यातीलअसलेलेधरण
#हतनुरधरण
#उनपदेवगरमपाण्याचाझरा
#भुईकोटकिल्ला
#वाघुरधरण
#भुसावळजंक्शन
#hatnurdam
#vaghurdam
#unapdev
❤❤❤
#Jalgaonkar ❤
मित्रा तु thumbnail कसे बनवतो ? 😱😯
Pixellab वरून बनवल होत मी 👍
Dil se Jalgaonkar ❤