भजन संतांचे | निवडक भजन, अभंग | Top 6 Bhajans With Lyrics | Best भजनावली By Sanskruti Gavakadchi |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ก.ย. 2024
  • भजन संतांचे | निवडक भजन, अभंग | Top 6 Bhajans With Lyrics | भजनावली By Sanskruti Gavakadchi | मराठी भजन With Lyrics
    १) हर हर शब्दाचा गजर
    २) अरे तैय्यार हो जाओ जमाने का पुकारा है
    ३) जाऊ देवाचिया गावा
    ४) का मज नेता त्या मार्गाने अधम जिथे राहती
    ५) मित्रा कर मैत्री त्याची
    ६) देव खेळला खेळणी
    * हर हर शब्दाचा गजर ( Lyrics )
    हर हर शब्दांचा गजर । करिती भोळे भाविक नर ॥
    डोले शंभु तया नादे । सदा राही तो आनंदे ॥
    नेत्री लागली समाधि । तार न तुटे हा कधी ॥
    तुकड्या म्हणे प्रेम लावा । नेत्री शंकर पहावा ॥
    * अरे तैय्यार हो जाओ जमाने का पुकारा है ( Lyrics )
    अरे ! तैयार हो जाओ, जमाने का पुकारा है।।टेक ।।
    समय आया वही आगे, न किसीका भी सहारा है।
    खडे हो जाओ अपने बल, मिलेगा तब किनारा है।।१।।
    जो हिम्मत छोडके भागे, उसे कायर कहाबेंगे।
    न डरता मौत को अपनी, वही साथी हमारा है।।२॥
    खुशी है देशकी जिसको, उसीपर प्रेम भारत का ।
    चढाओ फूल की माला, लगे घर-घर में नारा है।। ३ ॥
    बखत गम से निकल जावे,तो धोखा ही खडा होगा।
    वह तुकड्यादास कहता है, अनुभव यह हमारा है।।४॥
    * जाऊ देवाचिया गावा ( Lyrics )
    जाऊं देवाचिया गांवां ।
    देव देईन विसांवा ॥१॥
    देवा सांगों सुख दुःख ।
    देव निवारील भूक ॥२॥
    घालूं देवासी च भार ।
    देव सुखाचा सागर ॥३॥
    राहों जवळी देवापाशीं
    आतां जडोनि पायांसी ॥४॥
    तुका म्हणे आम्ही बाळें
    या देवाचीं लडिवाळें ॥५॥
    * का मज नेता त्या मार्गाने अधम जिथे राहती ( Lyrics )
    का मज नेता त्या मार्गाने ?
    अधम जिथे राहती ।। मित्र हो ! ।।धृ0।।
    कधी न कुणाचे बरे चिंतती ।
    अवघी टिंगल आणि फजिती ।।
    सज्जन जेथे उभे राहता, ग्रासाया पाहती।।१।।
    रात्रंदिनी ज्या निशाच दिसते।
    मांस - मदीरा जवळी असते ।।
    वेश्येचा बाजार भोवती, दिसती गुंड अती ! ।।२।।
    असाल जरि तुम्ही मित्र आमुचे ।
    वळवु नका क्षण पाय कुणाचे ।।
    जेथे माणुसकी मुळी नाही,चालतसे गमती ! ।।३।।
    अमोल जन्मा येउनि काही -
    सार्थक जरी केले मुळि नाही ।।
    तुकड्यादास म्हणे यंम येईल,चालुनिया वरती ! ।।४।।
    * मित्रा कर मैत्री त्याची ( Lyrics )
    मित्रा ! कर मेत्री त्याची ।
    जो सत्याविण शब्द‌ न बोले सहजहि कोणासी ।।धृ0।।
    सहनशीलता सरळवृत्तिची, वागणूक ज्याची ।
    अपुले टुःख न वदे कुणाला, चिंता इतराची ।।१।।
    चरित्र निर्मळ, राहणी साधी, निंदि न कवणासी ।
    दिनचर्या सततची योग्य ती, हाव नम मानाची ।।२।।
    हीन दीनाची प्रगती करण्या, कमाल निष्ठेची ।
    तुकड्यादास म्हणे तू तरशिल, कीर्ती जरी गासी ।।३।।
    * देव खेळला खेळणी
    देव खेळला खेळणी । नामा नेला भक्तस्थानी ॥
    होता कच्चा पक्का केला । दावोनिया मार्ग त्याला ॥
    पाठवोनि खेचर-पायी । कृपा करी विठ्ठल आई ॥
    तुकड्या म्हणे धन्य केला । नामा पायरी ठेविला ॥
    🙏Thanks For Watching My Video🙏
    Please Like👍 Comment✍️ Share➡️📲 and Subscribe🔔
    Your Search :-
    Har har shabdacha gajar With Lyrics
    Are Taiyar ho jao jamane ka pukara hai Lyrics
    Jaau devachiya gaava with Lyrics
    Ka maj neta tya margane With Lyrics
    Mitra kar maitri Tyachi With Lyrics
    Dev khedla Khelni With Lyrics
    Marathi Bhajan Song Lyrics
    Hindi Bhajan Song With Lyrics
    तुकडोजी महाराज भजन
    Tukdoji Maharaj Bhajan With Lyrics
    Tukdoji Maharaj Bhajan Spardha
    #Marathi
    #Bhaktigeet

ความคิดเห็น • 8

  • @rameshchoudhari2830
    @rameshchoudhari2830 2 ปีที่แล้ว +1

    उत्कृष्ट भजन मंडळ सर्वांना गुरुदेव शक्ती देवयुक्त देवर भक्ती देव सर्वांना जय गुरु

    • @NikeshArekar
      @NikeshArekar  2 ปีที่แล้ว

      जय गुरुदेव

  • @sanjayghuge5124
    @sanjayghuge5124 3 ปีที่แล้ว

    Jay gurudev

    • @NikeshArekar
      @NikeshArekar  2 ปีที่แล้ว

      जय गुरुदेव

  • @nirajarekar3400
    @nirajarekar3400 3 ปีที่แล้ว +2

    वा हिराजि भाउ

  • @athrameshwar8039
    @athrameshwar8039 3 ปีที่แล้ว

    Bhajan ani lyrics rahav. Excellent💯👍👍👏👏👏

  • @nirajarekar3400
    @nirajarekar3400 3 ปีที่แล้ว +1

    आपन कोन्या गावचे आहात जि भाऊ खुप छान