अर्नाळा किल्ला दसरा उत्सव २०२३ 🚩| Arnala Fort 🏰⛵ | Dussehra 🚩 | विजयादशमी | दसरा उत्सव |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ต.ค. 2023
  • --------------------------------------------------------------------------
    नमस्कार मंडळी,
    आपल्या महाराजांनी अनेक गड किल्ले जिंकले तसेच घडविले. त्यातलाच हा एक अर्नाळा किल्ला, विरार वरून अवघ्या १० किलोमिटर अंतरावर हे अर्नाळा गाव आहे. गावच्या १० मिनिट अंतरावर हा किल्ला आहे जो समुद्राने वेढलेला आहे चारही बाजूंनी समुद्र आणि निसर्गाने वेढलेला हा किल्ला पर्यटकांना नेहमीच भुरळ पाडत असतो. सुट्टीच्या दिवशी अनेक पर्यटक या किल्ल्याला भेट देतात.
    या किल्यावर कोळी बांधवांची वस्ती आहे, तसेच कालिका माता व आई एकविरेचे सुंदर मंदिर आहे. दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी भाविक या देवींचे दर्शन घेण्यास किल्यावर जातात. मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी पाहायला मिळते. याच सर्व नजाऱ्याची झलक तुमच्यासमोर पोहोचविण्याचा हा माझं छोटा प्रयत्न. व्हिडिओ आवडल्यास लाईक तसेच सबस्क्राईब करण्यास विसरू नका.
    धन्यवाद..🙏
    ----------------------------------------------------------------------------
    अर्नाळा किल्याचा इतिहास 🚩🏰
    अर्नाळा किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यात किल्ला आहे. अर्नाळा बेटाच्या वायव्येस हा जलदुर्ग आहे. उत्तर कोंकणातील वैतरणा नदी या किल्ल्याजवळ समुद्रास मिळते, त्यामुळे येथून खाडीच्या सर्व प्रदेशावर येथून नजर ठेवता येत असे. भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक २६ मे इ.स. १९०९ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे.
    चारही बाजूने पाणी असणारा अर्नाळा हे बेट गुजरातचा सुलतान महमूद बेगडा याकडे होते. १५३० मध्ये पोर्तुगीजांनी हे बेट जिंकून घेतले. १७३७ मध्ये, सुमारे दोनशे वर्षांच्या पोर्तुगीज सत्तेनंतर हा किल्ला १७३७ मध्ये मराठयांच्या ताब्यात आला. पहिल्या बाजीरावांनी या किल्ल्याची पुनर्बांधणी केली. १८१७ मध्ये हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला.
    पश्चिम रेल्वेच्या मुंबई उपनगरी रेल्वेवर असलेल्या विरार या रेल्वे स्टेशनापासून अर्नाळा गाव अंदाजे १० कि.मी. असून तेथे जाण्यास महापालिकेची बस, एस.टी. बस व रिक्षा यांची सोय आहे. समुद्रकिनाऱ्यापासून होडीने किल्ल्यावर जावे लागते. ह्या होड्या सकाळी ६.०० ते दुपारी १२.३० व संध्याकाळी ४.०० ते ७.०० या वेळेतच आपल्याला किल्ल्यावर घेऊन जातात. इतर वेळी कोळ्यांच्या बारक्या होडक्यांनी किल्ल्यावर जाता येते. समुद्रकिनाऱ्यावर सुरूची बने आणि फळझाडांच्या बागा आहेत. सुट्टीच्या दिवशी हा किनारा हौशी पर्यटकांनी भरलेला असतो.
    ----------------------------------------------------------------------------
    #किल्ला #अर्नाळा #विरार #दसरा #दसरामेळावा #विजयादशमी #instagram #instagood #love #like #follow #photography #photooftheday #instadaily #likeforlikes #picoftheday #fashion #instalike #beautiful #bhfyp #followforfollowback #likes #art #photo #me #followme #smile #happy #insta #nature #style #life #myself #india #likeforfollow #l
  • บันเทิง

ความคิดเห็น •