भरती - गोष्ट आस्तित्वाची | Bharati | New Adarsh Marathi Short Film 2022

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 พ.ย. 2021
  • श्वेतांबरी एन. ( साक्षी व्हिजन ) निर्मित
    आणि
    आदर्श मराठी
    प्रस्तुत
    "भरती" - गोष्ट आस्तित्वाची ही संपूर्ण शॉर्ट फिल्म आज प्रदर्शित झाली आहे. पाहून तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा.
    या शॉर्ट फिल्मच्या कॅमेऱ्यामागील गोष्टी पाहण्यासाठी 👉 @VantasMedia या चॅनेलला Subscribe करा.
    @sakshivisionproduction244 👈 इथे क्लिक करून पहा "वडाळ" वेब सिरीयल.
    Producer -: Shwetambari N. ( Sakshi Vision )
    Written & Directed By -: Raj Wadekar
    Concept -: Pushpak Vare
    Cinematoghrapher -: Manoj Markale
    Production Head -: Amol Chaugule
    Music By -: Bhagyesh Patil
    Special Thanks -: Shwetambari N. ( Sakshi Vision )
    Mangalashtak - Kaluram Ghenand
    Artist -: Pushpak Vare
    Sujay Gorave
    Siddhi Mahamuni
    Yuvaraj Mane
    Dipak Jadhav
    Rutuja Chavan
    Dhananjay Jamdar
    Amol Chaugule
    Arjun Said
    Tanaji Sapkal
    Abhay Said
    Rukhmini Khude
    Kshitija Chavan
    Prakash Navghane
    Special Thanks -: Dnyandev Kondhalkar
    Sarpanch , Vasole
    Food -: Sahadev Pakire Mama
    Location Management-: Akshay Sapkal
    Production Team-: Akshay Bhalerao
    Balaji Madhurkar
    Sandip Wadkar
    Aryan Patil
    Promotion Team -: Dnyandev Shingate
    Anil Banne
    Vaibhav Patil
    आमच्या या आधीच्या शॉर्ट फिल्म लिंक वर क्लिक करून पाहू शकता.
    फौजी -: • फौजी | Fauji | Award W...
    शेतकरी नवरा - : • शेतकरी नवरा | Shetkari...
    सोनेरी वेब सिनेमा -: • New Marathi Web Movies...
    #shortfilm #bharati
    indian army,indian army short film,short film,indian army film,army short film,inaam short film,short film indian army,indian army- short film,indian army short film 2021,short film indian army 2021,indian army short film hindi,inian army short film,india,blindspot short film,indian army telugu short film2021,tribute to indian army,comedy short film,indian,mukti short film,indian army facts short marathi short film,short films in marathi,short film,new marathi short film,marathi film,marathi short films,marathi short film award winning,best marathi short film,award winning short film,adarsh marathi short film,emotional short film,marathi,marathi shorts,short film hindi,best short film,romantic short film,marathi short story,marathi movies,marathi short film love story,short film marathi,marathi short film paal marathi short film,short film,marathi short film award winning,short films in marathi,marathi short film love story,marathi short film 2022,new marathi short film,marathi short film new,best marathi short film,adarsh marathi short film,award winning short film,marathi film,emotional short film,new marathi short film 2020,marathi short films,new short film,marathi best short film,marathi short film romantic adarsh marathi short film,marathi short film,adarsh marathi,short film,marathi short film award winning,short films in marathi,adarsh marathi short,new marathi short film,award winning marathi short film,award winning short film,marathi film,marathi short film new,best marathi short film,marathi short film 2022,new marathi short film 2021,emotional short film,marathi short films latest,new short film adarsh marathi,indian army short film,short films marathi short film,adarsh marathi short film,short films in marathi,new marathi short film,adarsh marathi short,marathi short film award winning,adarsh marathi,award winning marathi short film,marathi short film new,best marathi short film,marathi short films latest,short film,marathi film,new marathi short film 2021,marathi movies,marathi short film 2021,marathi short video,marathi short story,marathi,short film marathi,marathi short film romantic
  • บันเทิง

ความคิดเห็น • 2.3K

  • @AdarshMarathi
    @AdarshMarathi  2 ปีที่แล้ว +636

    शॉर्ट फिल्म आवडली असेल तर आपले मित्र परिवार आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा. धन्यवाद.

  • @arjunsaidswim
    @arjunsaidswim 2 ปีที่แล้ว +269

    भरतीत नापास झाला हे कळले तेव्हा डोळ्यातून पाणी आले...राव
    शेवटीचे संवाद ऐकून मन सुन्न झाले

  • @saniyajadhav2088
    @saniyajadhav2088 ปีที่แล้ว +53

    कोणी शेवट पर्यंत साथ देत नाही प्रेम तर अजिबात नाही फक्त देव आणि आई वडिलच आपल्या बरोबर असतात

  • @Dj-fp2xk
    @Dj-fp2xk 2 ปีที่แล้ว +205

    भरतीसाठी दिवसरात्र मेहनत करून रक्ताच पाणी करणारऱ्या माझ्या सर्व भावांना माझा मानाचा मुजरा...(मार 1600 हो भरती)💪🏻

    • @aniketbodade228
      @aniketbodade228 2 ปีที่แล้ว +1

      💯

    • @theunique6893
      @theunique6893 2 ปีที่แล้ว +1

      नक्कीच भावा...
      थेट येवला तालुका जि.नासिक मधुन तुला जय हिंद...

    • @shubhamramteke296
      @shubhamramteke296 ปีที่แล้ว

      Dhanwad bhava❤

  • @rahulpatil7956
    @rahulpatil7956 2 ปีที่แล้ว +62

    खूपच भारी सीरियल आहे ,मी स्वतः आर्मी मध्ये आहे .खूप कष्ट सहन केला आहे.आज ११वर्ष पूर्ण केली .

    • @sachinyt7008
      @sachinyt7008 ปีที่แล้ว +1

      Ata kay chlau ahe sir

  • @dnyaneshwarkhade2316
    @dnyaneshwarkhade2316 2 ปีที่แล้ว +319

    पूर्ण स्टोरी बगतच नाही तरी डोळे भरून येतात,खरंच मुलं खूप त्रास सहन करतात,ज्यांनी पण हि स्टोरी बनवलि त्या साठी खूप खूप धन्यवाद...🙏

  • @marutikokitkar2401
    @marutikokitkar2401 2 ปีที่แล้ว +92

    शेवट जबरदस्त.....बाप हा बापच असतो त्याची जागा कोणी घेऊ शकत नाही..

  • @nileshshinde1821
    @nileshshinde1821 2 ปีที่แล้ว +22

    जेव्हा सगळी दुनिया विरोधात असते तेव्हा वडिलच आपल्या पाठिशी असतात . love u papa

  • @ajayadhav999
    @ajayadhav999 2 ปีที่แล้ว +25

    जगण्याची शान आणी मरणाचा अभिमानाय आपली indian army ... जबरदस्त

  • @vijaywadverao3781
    @vijaywadverao3781 2 ปีที่แล้ว +382

    35 मिनिटांची फिल्म बघताना कमीत कमी
    10 -12 वेळेस डोळे भरून आले.
    खूपच हृदयस्पर्शी
    केवळ अप्रतिम
    निःशब्द 😭🙏

    • @vijaykale929
      @vijaykale929 2 ปีที่แล้ว

      Konti

    • @rohiniusare6003
      @rohiniusare6003 2 ปีที่แล้ว +5

      35 मिनिटाच्या फिल्म मध्ये कमीत कमी 10- 12 वेळेस डोळ्यात पाणी आले, एक सच्चा देशभक्त तसेच भरती करणारा नीयुवकाच हे दुःख समजू शकतो...!!!
      खूप हृदय स्पर्शी कहाणी आहे, जी की भावना मधून व्यक्त करू शकत नाही.
      निःशब्द..😭🙏

    • @vinay_chavhan_302.
      @vinay_chavhan_302. 2 ปีที่แล้ว +2

      खरचं भावा

    • @akashyakashymore2152
      @akashyakashymore2152 ปีที่แล้ว

      खरंच खूप छान डोळ्यात पाणी आले राव💐🙏

    • @priyabhujade3092
      @priyabhujade3092 ปีที่แล้ว

      होय खरच....

  • @aaditylatthe6993
    @aaditylatthe6993 2 ปีที่แล้ว +11

    भरती करणार्या पोरांना च याचं दुःख समजत 😌😥😥 पण शेवट मात्र आवडला असाच बाप प्रत्येक भरती करणाऱ्या पोराला भेटला पाहिजे... बाप खंबीर तर मुलगा गंभीर जग गेला उडत मग..😌💯🙌💪💪💪❤️

  • @defencelover5588
    @defencelover5588 2 ปีที่แล้ว +5

    खरी हकीकत दाखवली सगळ्या middle class मुलांच जिवन दर्शविला
    अप्रतीम
    निशब्द 😪😢🙏🙏
    hats off you guys
    पण ही भावना फक्त भर्ती करनार्या मुलाना आणि त्यांचा घरच्याना जास्त भावुक आहे.

  • @sourabhjadhav7090
    @sourabhjadhav7090 2 ปีที่แล้ว +11

    हा विषय फक्त एक भरती करणारा मुलगा समजू शकतो Ground निघाले तरी फौजी फौजी म्हटनारे लोक उद्या अपयश मिळाल्यावर हसतात आणि मुलांचं जगणं मुश्किल करतात पन त्यांना काय माहित की तो किती मेहनत करतो ...😭😭
    Love U भावांनो ❤️❤️
    Best of luck 👍👍🇮🇳🇮🇳
    Jai Hind 🇮🇳⚔️⚔️

  • @niranjankorde2249
    @niranjankorde2249 2 ปีที่แล้ว +10

    हा चित्रपट सत्य परिस्थिती आधारित आहे. आर्मीसाठी कठोर परिश्रम करणाऱ्यांचा मला अभिमान आहे

  • @liku7978
    @liku7978 2 ปีที่แล้ว +24

    ज्या मुलांचे Indian Army मध्ये भरती होण्याचे स्वप्न पूर्ण नाही झालं त्यांनी खचून न जाता Paramilitary forces SSC GD व Maharashtra police याची तयारी करावी आणि बहुतांश मुले तसेच करतात.
    #Indian Army Aspirant
    Jai Hind

  • @adityaraj-bs3or
    @adityaraj-bs3or 2 ปีที่แล้ว +837

    मी जेंव्हा 2014ला पोलीस भरतीसाठी पुन्यात गेलतो माझा जिगरी मित्र पन सोबत होता त्यावेळी मला ग्राउंड ला 98 मार्क पडायचे
    पन भरती मध्ये 100मीटर इव्हेंट फेल झालो अन बाकी 4ईव्हेट मध्ये 80मार्क पडले मीपन तीथे खूप रडलो कारन 2 वर्ष केलेली मेहनत सगळच पान्यात गेलत त्याच भरतीमध्ये मित्र भरती झाला त्यानंतर मला 6महीने माझ्या स्वप्नांनी मला झोपून नाही दिल 2015ला मी इंडियन आर्मी मध्ये भरती झालो

    • @pradeepaagle4096
      @pradeepaagle4096 2 ปีที่แล้ว +2

      Indian army of

    • @rahulgurav4483
      @rahulgurav4483 2 ปีที่แล้ว +3

      Jai hind fouji

    • @worldofpoojafamily728
      @worldofpoojafamily728 2 ปีที่แล้ว +5

      Good luck for your future & I'm always proud of you & all fouji's⚔️🇮🇳⚔️☺️

    • @jadhavaman8927
      @jadhavaman8927 2 ปีที่แล้ว +1

      hatsoff bro....

    • @Tabeldar
      @Tabeldar 2 ปีที่แล้ว +1

      💪👊👍🤩

  • @govindchavan2766
    @govindchavan2766 2 ปีที่แล้ว +162

    जो भरती करतोय पोरगा त्यालाच फक्त समजेल ही स्टोरी मनापासून डोळ्यात पाणी आल्या शिवाय राहणार नाही ❤️

    • @ajayaher123
      @ajayaher123 2 ปีที่แล้ว +3

      😭❤️❤️

    • @akshayuike6987
      @akshayuike6987 2 ปีที่แล้ว +1

      💯

    • @amarkadam1513
      @amarkadam1513 ปีที่แล้ว +1

      हो ना दादा सेम स्टोरी माझी पण😭😭😭😭

  • @prasadandhale2024
    @prasadandhale2024 2 ปีที่แล้ว +21

    चित्रपट पाहून डोळ्यात पाणी आले , माझा जीवनात जन्मापासून एकच स्वप्न होत मी सीमेवर जावं परंतु जे हव ते कधी कधी भेटत नसत 😌😌😥

  • @rajupandit2736
    @rajupandit2736 2 ปีที่แล้ว +9

    रहुदायला भिडणारी गोष्ट आहे भावा..अगदी मनापासून अभिनंदन..मराठी पाऊल पडते पुढे..👌🌷👏🙏🙏💞शेवटचे जे शिवाजी महाराजांचे विचार आहेत ना..तेच सांगून जात आहे..जीवनामध्ये हार मनयची नाही..नव्याने तयारी करून आपल अस्थित्व निर्माण केलं पाहिजे..🚩🚩जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩

  • @ajaysamgir2392
    @ajaysamgir2392 2 ปีที่แล้ว +64

    फौजी होन हे सोपी गोष्ट नाही..
    त्यासाठी खूप कष्ट , मेहनत घ्यावी लागते...
    I love indian army 🇮🇳❤️
    Shevti ek tumhi khup bhari dakhvl ahe...
    बाप बापच असतो 🥺😢😢😢

  • @yy-sp3tq
    @yy-sp3tq 2 ปีที่แล้ว +210

    🙏मुलींनो भरती करणाऱ्या मुलावर जर प्रेम करत असाल तर कशीही परिस्थिती आली तरी त्याची साथ मरेपर्यंत सोडु नका...😭🙏
    नाही तर कोणत्याच आर्मी भरती करणाऱ्या मुलावर प्रेम करू नका 🙏......

    • @Camerawala-lz8rt
      @Camerawala-lz8rt 2 ปีที่แล้ว +3

      right

    • @sarfrajsirse2778
      @sarfrajsirse2778 2 ปีที่แล้ว +2

      💯💯💯 barobar

    • @nakulshelke8857
      @nakulshelke8857 2 ปีที่แล้ว +1

      Bhava la dhoka Dela vat t koni tre

    • @Ghugeviki
      @Ghugeviki 2 ปีที่แล้ว +1

      Kharc sath nhi sodayala pahije 🙏

    • @yy-sp3tq
      @yy-sp3tq 2 ปีที่แล้ว +1

      @@Ghugeviki 👍ho

  • @akashgole6315
    @akashgole6315 2 ปีที่แล้ว +138

    खूप छान 👌🇮🇳मस्त 🙏🏃जिद्द मनाची, ताकद पायांची, खेळ मस्तीचा, नाद भरतीचा 🏃🇮🇳1600-Army - lover💖

    • @krishna21223
      @krishna21223 2 ปีที่แล้ว +5

      Only army 🇮🇳❤️

  • @vishwajeetpatil1122
    @vishwajeetpatil1122 2 ปีที่แล้ว +5

    यशाला सगळेच वाटेकरी असतात पण अपयशाला साक्षीदार सुद्धा कोणी नसत हेच खुप मोठं आव्हान आहे मित्रांनो तुम्हीच आहात तुमच्या जीवनाचे शिल्पकार..... proud on All Team🙏🇮🇳🥺

  • @its_me7267
    @its_me7267 2 ปีที่แล้ว +14

    भर्ती करणाऱ्या मुलांच् जीवन कस् असते हे फक्त् त्यांच्या शिवाय कोणीही जाणू शकत नाई... अक्षरशा रडलो भावा.... 😢🥺🥺😞😞

  • @chinmaynirgude5657
    @chinmaynirgude5657 2 ปีที่แล้ว +31

    भारतीय सैन्यात भरती होणाऱ्या आणि अफाट प्रयत्न करून सुद्धा भरती होऊ न शकणाऱ्या मुलांना मानाचा मुजरा. मेहनत, कष्ट आणि दुःख पचवन की असत हे यानाच माहीत. जय जवान जय किसान

  • @vaibhavsalunkhe5903
    @vaibhavsalunkhe5903 2 ปีที่แล้ว +1052

    माझं सुद्धा शेवटच्या भरती मध्ये पण काम झाले नाही शुभम च्या वाडीलांवानी माझे सुद्धा वडील खुप रडले. आज सुद्धा जर अशा videos पाहिल्या तर डोळ्यात पाणी येते😢😢 हे दुःख फक्त भारतीय सेने वरती मना पासुन प्रेम करतो त्यालाच समजणार🤐.(आयुष्यातील 6 वर्षे भरती साठी खर्च केली आहेत)

    • @badalbinekar2490
      @badalbinekar2490 2 ปีที่แล้ว +21

      Kahi nahi bhava..tuza nashibat vegd kahi ahe khashin jaus Niko fakt tu

    • @vikrantghadge5587
      @vikrantghadge5587 2 ปีที่แล้ว +12

      Ta bhartila tray kar

    • @ketanpawar3234
      @ketanpawar3234 2 ปีที่แล้ว +9

      Bhava police bhartichi tayari kar

    • @ketanpawar3234
      @ketanpawar3234 2 ปีที่แล้ว +10

      Ajun khup bharttya het fhakt Army karav as kahi nahi

    • @mafia_ff9718
      @mafia_ff9718 2 ปีที่แล้ว +5

      Khara ahe bhava

  • @nandkishorkathane7797
    @nandkishorkathane7797 2 ปีที่แล้ว +13

    खूप खूप हृदयस्पर्शी अशी सत्य-कथा आजही समाजात ही स्थिती पहावयास मिळत आहे.

  • @ashwinichavan847
    @ashwinichavan847 2 ปีที่แล้ว +5

    खरच आहे हे आपला सातारा जिल्हा फौजीचा जिल्हा म्हणुन ओळखला जातो जी मुल रक्ताचा पाणी करून हाडाचे मनी करून अतोनात प्रयत्न करतात आणि निकाल च्या वेळ आली पास ना झाल्याचा दुःख हे त्यांच्या कारणाशिवाय कोणाला नाही समजू शकत.. 🙏🇮🇳❤️🇮🇳

  • @GaribManus
    @GaribManus 2 ปีที่แล้ว +270

    जबरदस्त भावा डोळ्यातून पाणी आल खरी जिंदगी अशीच आसते.
    आपल्या स्वप्नासाठी काहीही कराव लागत
    आणि ह्या पोरी आपल्याकडे काही आसेल ना तेव्हाच आपल्या सोबत असत्यात आणि ज्यावेळी आपल्याकडे काही नसेल ना त्यावेळी आपल्या सोबत दुनियादारी प्रेम वैगेरे काही नसत फक्त आपले आई-वडील आसतात धीर द्यायला.
    प्रेम वैगेरे काय नाय सगळा चुत्याचा बाजार आहे.
    जबरदस्त नादखुळा ALL TEAM😊

    • @mayurkumbhar6190
      @mayurkumbhar6190 2 ปีที่แล้ว +4

      Right broo ❤️

    • @arbajpathan3189
      @arbajpathan3189 2 ปีที่แล้ว +4

      खरं आहे दादा तुज ❤️

    • @pavanbarde2234
      @pavanbarde2234 2 ปีที่แล้ว +7

      Same माझे असेच झाले😌😌😌aso पुन्हा ladhai तेथून karnar

    • @samadhankolekar58
      @samadhankolekar58 2 ปีที่แล้ว +1

      Zkas

    • @amitpatil4156
      @amitpatil4156 2 ปีที่แล้ว

      Right bro.....

  • @akshaybatule2111
    @akshaybatule2111 2 ปีที่แล้ว +46

    भावा तू तर आर्मी भरती करणाऱ्या पोरांची भविष्यवाणी केलीस जर भरती नाय झालं तर काय होत हे तू दाखऊन दिलंस... शॉर्ट फिल्म पाहून डोळे भरून आले ..... मन जिंकलस भावा आर्मी भरती करणाऱ्या पोरांचं....

  • @vitthalmirgepatil1817
    @vitthalmirgepatil1817 2 ปีที่แล้ว +18

    खरा जिगर तर असतो तो भरती करणाऱ्या मुला मध्ये असतो ...मला पण शालेय जीवनापासूनच आर्मी भरती ची खूप आवड होती मी एकूण 7 वर्ष आर्मी भरती केली पण मेडिकल पॉईंट असल्या मुळे आर्मी भरती होऊ शकलो नाही ... पण मी प्रयत्न सोडले नाही शेवटी पोलिस मध्ये भरती झालो ....सर्व भरती करणाऱ्या माझ्या भावाना माझी एक विनंति आहे की प्रयत्न सोडू नका तुम्ही नक्कीच भरती होणार.....

  • @sudarshansurvase2753
    @sudarshansurvase2753 2 ปีที่แล้ว +1

    खरंच मनाला खूप भावते ही कथा....आणि ही खरंच वस्तुस्थिती आहे...आज आपण पाहतो समाजात एखाद्याला यशाच्या पायऱ्या चढताना पाहून लोक किती कौतुक करतात...पण हीच लोक जेव्हा आपण अपयशी होऊ तेव्हा कशी आपल्याशी वागतात...डोळ्यातून पाणी आले...शेवटचे वडिलांचे बोलणे ऐकून .. खरंच मित्रांनो जीवनात काहीही करता येत...आपल्या आयुष्याची सुरुवात कुठूनही करता येते...फक्त मनातून खचून जाऊ नका.....

  • @akshaylokare5209
    @akshaylokare5209 2 ปีที่แล้ว +123

    प्रत्येक मुलाच्या आयुष्यात एक शण आसा येतो तो तुम्ही दखवला तुमचं खुप आभार..🇮🇳

  • @tusharpatil7915
    @tusharpatil7915 2 ปีที่แล้ว +144

    Heart touching 💯❤️😓 हिच स्टोरी खरोखरच्या आयुष्यात खुप जवळुन पाहिलेय😓🥺😔

  • @fauji4628
    @fauji4628 2 ปีที่แล้ว +13

    Very nice Story.. सत्य परिस्थितीवर आधारित आणि एकदम तंतोतंत अशी स्टोरी आहे.. पाहून खूप आनंद झाला..

  • @sureshnikam8812
    @sureshnikam8812 2 ปีที่แล้ว +5

    खरच मुल भरती साठी खूप प्रयत्न करतात त्यांच्या आयुष्यात कधीच असला प्रसंग येऊ नये...😔 खूप कष्ट करतात... ही स्टोरी पाहून डोळे भरून आले..😢 heart touching story...

  • @sagaradmapure4736
    @sagaradmapure4736 2 ปีที่แล้ว +18

    गावातील प्रत्येक भरती करणार्या मुलाला हा अनुभव येतो लय भारी सिरिज

  • @sahadevawadan4727
    @sahadevawadan4727 2 ปีที่แล้ว +20

    भावा हिच खरी परिस्थिती आणि हाच प्रसंग घडला आहे माझ्या पण आयुष्यात 💯💯😭

  • @sunildevkate5589
    @sunildevkate5589 2 ปีที่แล้ว +5

    ही गोष्ट खरी आहे माझ पन आसच झालय सेम शुभमवानी सेम स्टोरी आहे भाऊ 😭😭😭😭😭😭जीवनात हार मानुन नाही चालत लोक काय नाव ठेवायलाच असतात पन वेळ प्रत्येकाची येते हार मानुन नाही चालत जिवनात भाऊ 😰😰😰😰

  • @madhurighule8127
    @madhurighule8127 2 ปีที่แล้ว +35

    खरं अस्तित्व तर या ३५ मिनिटांच्या फिल्म ने शिकवलं. प्रेम, आयुष्य आणि करिअर या विषयांना नेमका हात घालून इतकी हृदयस्पर्शी फिल्म बनविल्या बद्दल खूप खूप धन्यवाद. आजच्या युवकांना अशा फिल्म्स ची जास्त गरज आहे.
    धन्यवाद 🙏

  • @arjunsaidswim
    @arjunsaidswim 2 ปีที่แล้ว +125

    लै भारी डोळे भरून आले

    • @ganeshvetal4996
      @ganeshvetal4996 2 ปีที่แล้ว

      खरं यार भावा डोळे भरून आले तुमचा हा व्हिडिओ बगून 👍

    • @chandrakantnikam2646
      @chandrakantnikam2646 2 ปีที่แล้ว +1

      खरंच यार

  • @VantasMedia
    @VantasMedia 2 ปีที่แล้ว +188

    आदर्श मराठीच्या इथून मागच्या कलाकृतीला जस प्रेम दिलंत आशा आहे की याही कलाकृतीला तुम्ही तसंच प्रेम द्याल. शेअर नक्की करा आणि बरं,वाईट जे काही वाटलं असेल ते कमेंट करून नक्की कळवा. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला अजून नवनवीन कलाकृती करण्यासाठी प्रेरणा देतात. धन्यवाद.

    • @samadhanjadhav1620
      @samadhanjadhav1620 2 ปีที่แล้ว +1

      खूप छान dada

    • @shashirajtamnar2520
      @shashirajtamnar2520 2 ปีที่แล้ว

      Very nice👌👌✌️✌️

    • @sandeepshinde2955
      @sandeepshinde2955 2 ปีที่แล้ว

      दुसरा एपिसोड आणण्याची काही गरज नाही जर आम्ही लाईक आणि शेअर केल्यानंतरच तुम्ही जर दुसरा एपिसोड आणणार असाल तर आम्हाला काही गरज नाही.

    • @sahilgangurde7361
      @sahilgangurde7361 2 ปีที่แล้ว +2

      नमस्कार सर
      आपल्या पहिल्या एपिसोड ने तर अक्षरशः डोळ्यात पाणी आणलं... आणि आम्ही सर्वच दुसऱ्या एपिसोड ची वाट बघतोये... तर तुम्हाला विनंती आहे की लवकरात लवकर दुसरा एपिसोड प्रसारित करावा ही नम्र विनंती

    • @sujaykadam1060
      @sujaykadam1060 2 ปีที่แล้ว

      1 Number

  • @aniketbhujbal2590
    @aniketbhujbal2590 2 ปีที่แล้ว +14

    भावा आग लागलीय मनात वेब सिरीज बघून 🔥भरती तर झालंच पाहिजे लका 👍

    • @somnathtribhuvanofficial
      @somnathtribhuvanofficial 2 ปีที่แล้ว +2

      लका तुला माझ्याकडून शुभेच्या

  • @pravinsahare2344
    @pravinsahare2344 2 ปีที่แล้ว +11

    डोळ्यात पाणी न येता कुणीच हा व्हिडीओ पाहू शकत नाही.
    या व्हिडीओ चा भाग 2 कधी येणार .🙏

  • @rahulteli877
    @rahulteli877 2 ปีที่แล้ว +94

    खरचं खूप रडू आलं पाहून भाऊ खरी परिस्थिती दाखवलीत तुम्ही सलाम तुम्हाला😭👏🏼

  • @amrutbhosale49
    @amrutbhosale49 2 ปีที่แล้ว +20

    स्वता ची गोष्ट असल्याचं वाटत आहे... हृदयस्पर्शी ❤️

  • @ishwarshende5530
    @ishwarshende5530 2 ปีที่แล้ว +4

    खूप छान story आहे👌वास्तविकता मांडलेली आहे...गावातील लोक काय बोलतील याकडे लक्ष दिले तर आपण आयुष्यात हरलो असच समजायचं...

  • @dattugaikwad3641
    @dattugaikwad3641 2 ปีที่แล้ว +2

    ह्या पोरी सगळ्यात पाहिले हणल्या पाहिजेत धरून,प्रेम नावाचं पान आयुष्यातून फाडून टाका, आणि सगर्षाचं पान चिटकवा ,संगर्ष हेच खरं आयुष्य आहे.

  • @vishaltonape5434
    @vishaltonape5434 2 ปีที่แล้ว +22

    हि फिल्म बघताना डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही खरच..😥😢😢

  • @Pk_photography_pune
    @Pk_photography_pune 2 ปีที่แล้ว +15

    साहेब आधी तुमच मना पासून आभार🙏🙏 तुम्ही आज सर्व फौजी ची मनातले विचार जगा समोर आणलेत. खरच खुप मन भरून आल निकाल लागल्या नंतर संजल्यावर 😭 एक फौजी प्रेम, मन आणि त्यांच धन फक्त आणि फक्त फौजी बनायच असत. पण शेवटी नाशिबने पण साथ दिली पाहिजे, आणि राहिला विषय प्रेमाचा त्यांच प्रेम तर असत आर्मी वर पण मधेच एक मुलगी प्रत्येक मुलाच आयुष्य बर्बाद करते.
    सर्व साथ सोडतात पण आपले आई वडील कधीच आपली साथ सोडत नाही,परिस्थिति कशी पण एउद्या पण खचून जाऊ नका आधी आई वडिलांचा विचार करा
    सर्व आर्मी प्रेमीना माझी एकच विनंती आहे निकलने काहीही लागो plzz🙏🙏 तुम्ही कधी खचून जाऊ नका पुन्हा नव्याने सुवात करा.
    Love you solder 🇮🇳🇮🇳♥️ जय हिंद जय भारत
    #indianarmy
    #jayhind

  • @samadhanjadhavsarkar4829
    @samadhanjadhavsarkar4829 2 ปีที่แล้ว +8

    मी पण Army la 3 वेळा madical फेल आणि 2 वेळा merit फेल झालो आहे
    खुप इच्छा होती वर्दित रहायची
    पण शेवटी नशीब....😭😭😭
    मनापासून भरती करणाऱ्या पोराची खरी स्टोरी ही अशीच असते 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @rsstarnews8816
    @rsstarnews8816 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान.... वडिलांचा रोल हृदयस्पर्शी
    .. 😐

  • @arjunsaidswim
    @arjunsaidswim 2 ปีที่แล้ว +57

    आपल्याला आणि आपल्या भरतीच्या संपूर्ण टीमला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा....

    • @AdarshMarathi
      @AdarshMarathi  2 ปีที่แล้ว +1

      तुम्हाला पण आदर्श मराठी परिवारातर्फे दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा

  • @shubhamshelke9980
    @shubhamshelke9980 2 ปีที่แล้ว +12

    सलाम आहे भावा तुला आणि तुझ्या पूर्ण टीम ला भरतीच्या मुलांची पूर्ण भविष्यवाणी तू दाखवून दिली
    शेवटी बापाचे शब्द मनाला लागले राव👏👏

  • @ablifememories
    @ablifememories 2 ปีที่แล้ว +6

    जीवनामध्ये प्रथम बेस्ट काहीतरी पाहिलं मी................. 🇮🇳⚔️👑

  • @swarajya43
    @swarajya43 ปีที่แล้ว +1

    अगदी मनाला भिडनारी कथा होती ! ही आजच्या तरुणाईची सध्यस्तीथी आहे ! कष्ट करुनही फळ मिळत नसल्यवर खुप दुख होत. पन सतत अपयश येऊ लागल्यावर समजायच की नशिबने आपल्यासाठी आपण विचार केलेल्या पेक्षा मोठ लिहिलय. फक्त प्रयत्न कधी थांबवायचे नाहित. योग्य दिशेने अपयशासोबतही केलेल्या वाटचालीला फळ मिळणे अटळ असते. 'FORTUNE FAVORS THE BRAVE' 🇮🇳

  • @deepaksonawane2921
    @deepaksonawane2921 2 ปีที่แล้ว +45

    2014 पासून आता प्रयन्त mpsc चा अभ्यास करतोय, 3 वेळेस नापास झालोय पण हार मानली नाही., आणी जो प्रयन्त मी पोलीस मध्ये भरती होत नाही, तो प्रयन्त मी हार मानणार नाही.,

  • @surajajabe02
    @surajajabe02 2 ปีที่แล้ว +9

    खूप छान व्यथा मांडली भरती करणाऱ्या मुलांची...आणि एक प्रेम हे फक्त नावाला राहिलय आता फक्त व्यवहार केला जातो...तू हे कर मी सोबत आहे आणि आपण यशस्वी नाही झालो तर आई-वडील सोडता कोणीही साथ देत नाही..!

  • @ganeshedits1386
    @ganeshedits1386 ปีที่แล้ว +1

    खर आहे जेव्हा सगळ काही संपत तेव्हा वडील नावाची ताकद कायम भक्कम पणे पाठीशी उभी असते...👑💯🥺💪

  • @dnyaneshwarpingle4514
    @dnyaneshwarpingle4514 ปีที่แล้ว +5

    खरचं भावा डोळ्यात पाणी आलं राव 😢😭😭

  • @kamaleshpatil1991
    @kamaleshpatil1991 2 ปีที่แล้ว +5

    यशाला बाप खूप असतात आणि अपयशाला सलागार खूप असतात याचं जिवंत उदाहरण 🙏🙏

  • @rahulthorat8545
    @rahulthorat8545 2 ปีที่แล้ว +27

    खूप चांगल भरती व भरतीतील अपयश या शॉर्टफिल्म मार्फत मांडले आहे .खूप हार्ट टाचींग होत.या story चा अजून एक पार्ट करावा ही नम्र विनंती त्याने काहीना हुरूप मिळेल फक्त याच एका गोष्टीसाठी लई जणांनी आयुष्य संपवलं आहे म्हणजेच प्रयत्नच करायचा सोडलं आहे 🙏🙏🙏🙏🙏

  • @sadashivsawant6627
    @sadashivsawant6627 ปีที่แล้ว +2

    हि साताऱ्यातील प्रत्येक तरुणाची कथा सांगणारी शॉर्ट फिल्म आहे .

  • @kartikrathod9259
    @kartikrathod9259 ปีที่แล้ว +4

    2017 पासून पोलीसचा अभ्यास करतोय पण हार मानली नाही जो पर्यंत मी भरती होत नाही तो पर्यंत माघार घेणार नाही 👌👌

  • @rajendrawani2445
    @rajendrawani2445 2 ปีที่แล้ว +10

    भरती शाॅर्ट फिल्मने दिला
    संदेश छान हिमतीचा
    अपयश आलं तरी उभारू
    किल्ला मनात उभारीचा
    सर्व टीमला देता
    पुष्पगुच्छ अभिनंदनाचा

    • @jhakkasmarathifun
      @jhakkasmarathifun 2 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद सर.....💐💐💐💐खूप सुंदर प्रतिक्रिया

  • @krushnagavate2193
    @krushnagavate2193 2 ปีที่แล้ว +10

    हीच गोष्ट माझ्या स्वतःच्या भावा सोबत झाली रे डोळ्यात पाणी आलं indian army.......jai hind

  • @shetkariraja501
    @shetkariraja501 2 ปีที่แล้ว +1

    एकच नंबर शाॅट फिल्म ही शाॅट फिल्म पाहून डोळात पाणी आल राव

  • @Codeingbydatta
    @Codeingbydatta 2 ปีที่แล้ว +6

    खुप छान फिल्म आहे, तुम्ही तरुण पिढीच्या मनाला जाणून त्यांच्या आयुष्यातील त्यांच्या अस्तित्वाला खूपच उत्कृष्ट प्रकारे दाखवलेत,तुमचे खूप खूप धन्यवाद आणि पुढील वाटचालीस अभिनंदन 👍👍💐💐

  • @yy-sp3tq
    @yy-sp3tq 2 ปีที่แล้ว +42

    Army Lover Jyoti 🥰
    ❤️✨🦋••••••••
    😭"माझ आयुष्य संपल तरी चालेल पण माझ्या फौजीची साथ मरेपर्यंत सोडणार नाही... मग समोर कोणतीही परिस्थिती असो शेवटच्या श्वासापर्यंत एक ढाल बनुन सदैव पाठीशी उभी राहीन".....😭😘
    •••••😘कट्टर फौजी प्रेमी ज्योती 😍••••••
    असेच विचार प्रत्येक भरती करणाऱ्या मुलावर प्रेम करणाऱ्या मुलीने ठेवायला हवे...🙏
    फौजी नवरा मिळायला पण सौभाग्य लागत.😍
    Love you my Fature Lifepartner Fauji ❤️

    • @Ram_patil_1600
      @Ram_patil_1600 2 ปีที่แล้ว +3

      Betal Ho

    • @yy-sp3tq
      @yy-sp3tq 2 ปีที่แล้ว

      @@Ram_patil_1600 Ho nkkich bhetal

  • @shivajikanukale1492
    @shivajikanukale1492 2 ปีที่แล้ว +12

    सध्याच्या परिस्थितीतीवर आधारित कथा आहे खरंच खूप छान बनवलेली आहे मी सुद्धा भारतीची तयारी करतोय मी पण ह्या गोष्टी अनुभवल्या आहेत 😭

  • @vittalwaske2731
    @vittalwaske2731 2 ปีที่แล้ว +2

    खूप खूप छान एपिसोड पहिला एपिसोड खुप मोठा धमाका जणु काय पिकचरच अभिनंदन MH 50 कराड

  • @abhishekpowadi103
    @abhishekpowadi103 ปีที่แล้ว +1

    शेवट महाराजाच उदाहरण ऐकून अंगावर काटा आला खरच भारी घेतलंय हे सगळे सीन

  • @prathameshdurgavale805
    @prathameshdurgavale805 2 ปีที่แล้ว +9

    नाद एकच इंडियन आर्मी भरती 💯💯🇮🇳🇮🇳🇮🇳 ❤️❤️ डोळ्यातून पाणी आल भावांनो

  • @yogeshdeokate511
    @yogeshdeokate511 2 ปีที่แล้ว +6

    भावा डोळे पाण्याने भरून आले...😢
    तूझा हा विडिओ नाही तर असाल जीवनाची खरी जाणीव पटवून देनारि एक हकीगत आहे.
    सलाम तुझ्या विचाराला असेच आणखी कला कृती निर्मांण करत रहा........👌🙏❤🇮🇳
    WE LOVE INDIAN ARMY.......🇮🇳❤💯

  • @ravijadhav1462
    @ravijadhav1462 2 ปีที่แล้ว +4

    अप्रतिम निःशब्द .
    भरती झालो किव्हा नाही
    यात खंत बाळगू नका
    पुन्हा नव्याने पेटून उटा
    एक निष्ठेने पुस्तकात घुसा
    गावं असो वा शहर
    तुम्ही खचून जाऊनका
    जीवन संपवण्याचा विचार
    कधी मनी आणू नका
    Rj... Ravi @

  • @maheshtaksal4958
    @maheshtaksal4958 2 ปีที่แล้ว +3

    खंर तर निशब्द करणारा आणी डोळ्यात पाणी अननारा विडीवो आहे खुप सुंदर अभिनय केला😭❤️👍🙏

  • @rahuldhole2353
    @rahuldhole2353 2 ปีที่แล้ว +18

    दादा एक व्हिडिओ असा बनवा की नाव ठेवणाऱ्या लोकांच्या समोर अंगात वर्दी दाखवली पाहिजे जय हिंद 🇮🇳🇮🇳

  • @yogeshpadale6802
    @yogeshpadale6802 2 ปีที่แล้ว +14

    खुप छान विडिओ
    रियल लाईफ 💯💯
    खरोखोर काहि मुलांची
    ⚔️🇮🇳 INDIAN ARMY🇮🇳⚔️
    मधे जायची स्वप्न अपूर्णच राहिली
    आणि या कोरोना माहामारी मुळे वय पण संपले राव 😔
    जय हिंद 🇮🇳🇮🇳

  • @sainaththakre8277
    @sainaththakre8277 2 ปีที่แล้ว +2

    खुप कमी लोक असतात ते अपयशात पन साथ देतात...
    शेवटी तुम्ही रयतेच्या महानायकाचा उल्लेख केला खुप बरे वाटले

  • @niteshhirave5178
    @niteshhirave5178 2 ปีที่แล้ว +1

    खरोखर मनाला लागणारी it's real fact story अजूनही त्या गोष्टी होत आहेत. यामधून खरोखर बोध घेण्यासारखे आहे. 😔पण प्रयत्न हाच शेवटपर्यंत यशाचा मार्ग आहे. 👍

  • @jhakkasmarathifun
    @jhakkasmarathifun 2 ปีที่แล้ว +6

    भरतीत try करणाऱ्या 100 मधल्या 90 मुलांची पहिल्यांदाच आदर्श मराठीने मांडून नापास झालेल्या सर्व भावंडाना न्याय मिळवून दिल्याबद्दल मनस्वी आभार

  • @entertainment18350
    @entertainment18350 2 ปีที่แล้ว +40

    मी भरती ची तयारी कधीच केली नाही आणि करत पण नाही पण ही फिल्म बघून खूप डोळे भरून आले .. सार्थ अभिमान आहे मला इंडियन आर्मी चा

  • @MTB_mh09
    @MTB_mh09 2 ปีที่แล้ว +5

    खरी परिस्तिथी दाखवली भाऊ तुम्ही....जो मुलगा भरती करतो आणी लेखित नापास होतो त्यालाच कळते की त्याची काय् परिस्थिति चालू असते .........
    पण ज्यांची आता वय वय संपलि त्याच्यासाठी इतर दुसरा मार्ग आभ्यास् करुन् दुसऱ्या पण परीक्षा देऊ शकतात किंवा आपण स्वतःच्या हिमतीवर नवीन business करू शकतो ...म्हणजे भरती नाही झाल म्हणून धीर सोडून् नाही द्यायचा
    शेवटच्या श्वासापर्यंत लडत् रहायच् ...असा
    या स्टोरीचा पार्ट 2 काडा ...

  • @tukaramsawant5094
    @tukaramsawant5094 2 ปีที่แล้ว +2

    भरती झालं तरच लग्न होतय ,😢😢😢हा अनुभव आहे

  • @Surya___12
    @Surya___12 2 ปีที่แล้ว +6

    खूप मुलांच्या बाबतीत अशी गोष्ट घडली आहे प्रत्येक मुलाच्या आयुष्यात एक शण असा येतो तो तुम्ही दाखवला तुमचं खुप आभार ...

  • @sushantmorevlogs8968
    @sushantmorevlogs8968 2 ปีที่แล้ว +11

    जबरदस्त लघुपट आहे 🙏🙏 जय हिंद🇮🇳 प्रत्येक आर्मीची तयारी करणाऱ्या मुलाच्या आयुष्यात असे काही घडत असते

  • @prabhakarpatil3687
    @prabhakarpatil3687 2 ปีที่แล้ว +1

    खरंच ,बाप तो बापच असतो
    लढायची ताकद आणि प्रेरणा देणार अखंड झरा ..........

  • @yogeshsanap4995
    @yogeshsanap4995 2 ปีที่แล้ว +4

    जबरदस्त भावा... सन 2011साली मुंबई पोलीस ला एक मार्गावरुन राहिलो... आणि भरती ला गावातून बरोबर जाणारे पाच जण पास झाले त... असाच तोंड खुपसून ढसा ढसा रडलो भाऊ.. आणि असं वाटलं की आयुष्यच वेटिंगवर राहिले..... माझ्या आयुष्यातली खरी परिस्थिती तू आज व्हिडीओ क्लिप च्या माध्यमातून मांडली.... तुमचे सर्व टीम चे मनापासून धन्यवाद... 🙏🙏

  • @lakhanrathod4715
    @lakhanrathod4715 2 ปีที่แล้ว +9

    Nice bhava... माझी पण अशीच अवस्था झाली होती भाऊ.. मला ही स्टोरी बगितल की माझी रिअल लाईफ वाटली भाऊ.... तुमची ही स्टोरी शाश्वत खरी आहे भावांनो.... ही दुनिया सगळी श्र्वार्थी आहे लोक माणुसकी नाही तर पैसा बगतात..

  • @karanpatil28
    @karanpatil28 2 ปีที่แล้ว +12

    १ नंबर भावा 🥺🇮🇳 व्हिडिओ बघून डोळे भरून आले आणि मनात जिद्द केली भरती झालोच पाहिजे🚩

  • @Balajiagahv1177.
    @Balajiagahv1177. 2 ปีที่แล้ว +2

    प्रत्येक मुलाच्या आयुष्यात मध्ये हा एक क्षण येतो,हि स्टोरी बघुन प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आले आहे, आणि प्रेम चा भाग तर खुप मनाला भिडला.तुमच्यख सर्व टीम ला सलोट 👌✌️.

  • @arjunkavathekar1121
    @arjunkavathekar1121 2 ปีที่แล้ว +1

    सिरियल च्या माध्यमातून खूप छान विचार तुम्ही जनतेपर्यंत पोहचवताय.खूप मस्त वाटल हा एपिसोड पाहून

  • @hemrajdhanvat2278
    @hemrajdhanvat2278 2 ปีที่แล้ว +35

    अतिशय सुंदर भरती करणाऱ्या सर्व मुलांना माझ्याकडुन हार्दिक शुभेच्छा, जय हिंद जय महाराष्ट्र 🙏🙏🙏

  • @milindjadhav437
    @milindjadhav437 2 ปีที่แล้ว +13

    भरती शॉर्ट फिल्म बघितली अगदी काळजा ला लागली जबरदस्त झाली आहै सर्व टीमचे अभिनंदन...👌💐

  • @ganeshgaikwad4950
    @ganeshgaikwad4950 2 ปีที่แล้ว +1

    सुचत नाही काय बोलू ते...
    जसं काय माझ्यावरच बनवली आहे असं वाटलं
    खुप अप्रतिम 👌🏻
    मनाला लागणारी 😢

  • @samadhanmore3789
    @samadhanmore3789 2 ปีที่แล้ว +1

    शुभम दादा खरच भर्ती करणाऱ्या माझ्या सर्व भावांच स्वप्न पूर्ण झाले पाहिजे... कारण भर्ती करणाऱ्या मुलांना कळत की एवडी मेहनत करुण लोकांचे टोमने आयकाव लागत.मित्रा लोक फक्त स्वार्था साठी आहे जो पर्यंत आपल्या कडून लोकांचा फायदा असतो तो प्रयन्त लोक सोबत आसतात ... नाहीतर लोक आर्ध्या तच सोडतात .. नातेवाईक ,प्रेम ,कोणी का असेना शेवट पर्यंत साथ कोन नाही देत शेवट प्रयन्त साथ फक्त !..आई वडील ... खरच खुप रड़लो यार अश्रु अनावर होत नव्हते ...😭😭😭😔😔😔

  • @hiramanwaghmare2342
    @hiramanwaghmare2342 2 ปีที่แล้ว +47

    ग्राउंड मधून किंवा ईतर इव्हेंट मधून जेव्हा मागे यावे लागते तेव्हा त्या मुलाची मनाची अवस्था कोणीच समजू शकत नाही 😭

    • @Tabeldar
      @Tabeldar 2 ปีที่แล้ว

      👍

    • @Vlogs_230
      @Vlogs_230 2 ปีที่แล้ว

      😔 खरयं भावा ज्याचं जळतं त्यालाच कळतं.

  • @jhakkasmarathifun
    @jhakkasmarathifun 2 ปีที่แล้ว +58

    4 ते 5 वेळा हा लघुपट पाहिला पण मन काही भरेना किती किती सुंदर !अतिशय सुंदर कलाकृती

  • @atulchavan5448
    @atulchavan5448 2 ปีที่แล้ว +1

    खूपच छान.. हृदयस्पर्शी

  • @Pritamkar_Sagar
    @Pritamkar_Sagar 2 ปีที่แล้ว +3

    खरच अतिशय मनाला लागणारी स्टोरी दाखवली तुम्ही आपल्या गरीब आणि होतकरू तरुना सोबत हेच होत पण आई वडिलांचं पण विचार करून आपण आपली जिंदगी जगयची 🙌 love you form MH 29 Indian army ♥️