०२. जदुनाथ सरकार यांची बदमाशी आणि बनवाबनवी | False Allegations of Jadunath Sarkar | जावळीचे मोरे

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ก.ย. 2024
  • चंद्रराव मोरे पारिपत्य भाग ०२
    जदुनाथ सरकार यांची बदमाशी आणि बनवाबनवी
    जावळी प्रकरण व चंद्रराव मोरेवर हल्ला हा शिवाजीच्या आयुष्यातला एक काळा अध्याय होता. शिवाजीने स्वत:च्या वैयक्तिक राज्यविस्ताराच्या महत्वकांक्षेपायी आणि चंद्ररावाचा खजिना लुटण्याच्या इच्छेने जावलीवर हल्ला केला. शिवाजीने जाणीवपूर्वक, नियोजन करून, कट रचून वकिलाच्या रुपात मारेकरी पाठवून आधी चंद्रराव व मग हणमंतरावाचा खून केला. शिवाजीने चंद्ररावाच्या सुंदर मुलींची लग्नासाठी मनात अभिलाषा धरली, शिवाजीने चंद्ररावाच्या दोन निरपराध आणि कोणताही धोका नसलेल्या मुलांचा काही कारण नसताना शिरच्छेद केला.
    प्रख्यात इतिहासकार जदुनाथ सरकार यांनी त्यांच्या 'शिवाजी ॲंड हिज टाईम्स' या पुस्तकात हे सगळे ढळढळीत आरोप केले आहेत. जदुनाथ सरकारांची ही पुस्तके वाचूनच परकीय अभ्यासक व परप्रांतातील लोक शिवाजी महाराजांबद्दल चुकीचे मत बनवतात. गिरीश कुबेरांसारखे अन्नाजी दत्तो यांची पिल्लावळ असलेले तथाकथित स्वकिय विद्वान छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करतात.
    त्यामुळे कोण जदुनाथ सरकार? आम्ही त्यांना मानत नाही, असे म्हणून हा प्रश्न निकालात निघणार नाही जदुनाथ सरकारांची पुस्तके नीट वाचून त्यातील चुकीच्या संदर्भहीन विचारांचा विचारांनीच प्रतिवाद केला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा बचाव करण्याची काहीच गरज नाही. कारण हे सगळे आरोपच खोटे आहेत. पण छत्रपती शिवाजी महाराजांची बाजू नीट मांडली पाहिजे. म्हणजे भविष्यात कोणी जदुनाथ सरकारांची ही पुस्तके वाचून छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चुकीचे मत बनवणार नाही.
    प्रख्यात इतिहासकार सर जदुनाथ सरकार यांनी पुर्वग्रहदुषित विचाराने आकसाने छत्रपती शिवाजी महाराजांविषयी त्यांच्या पुस्तकत केलेल्या बदमाशीचा आणि बनवाबनवीचा पोलखोल करणारा हा व्हिडिओ.
    ---------xxxx-----------
    Chandrarao More Punishment Part 02: False Allegations and of Jadunath Sarkar
    The Jawali case and the attack on Chandrarao More were a black chapter in Shivaji's life. Shivaji attacked Jawali out of ambition for his personal empire and to plunder Chandra Rao's treasure. Shivaji deliberately, planned, conspired, and sent assassins as a lawyer, first killing Chandrarao and then Hanamantrao. Shivaji longed for the marriage of Chandra Rao's beautiful daughters,
    Shivaji beheaded Chandra Rao's two innocent children without any reason.
    Renowned historian Jadunath Sarkar in his book 'Shivaji at His Times' has made all these blatant allegations. By reading these books of Jadunath Sarkar, foreign scholars and people from other states form the wrong opinions about Shivaji Maharaj. Chhatrapati Shivaji Maharaj is slandered by so-called self-styled scholars like Girish Kubera who is the thoughtful ancestor of Annaji Dutto.
    So who is the Jadunath Sarkar? We do not believe them. This is the attitude of the Marathi people. But like this question will not be resolved. There is no need to defend Chhatrapati Shivaji Maharaj. Because all these allegations are false. But the side of Chhatrapati Shivaji Maharaj should be clearly stated. This means that in the future no one will read these books of Jadunath Sarkar and form a wrong opinion about Chhatrapati Shivaji Maharaj.
    This is a video about false allegations, defamation of character, and blatant misrepresentation of Chhatrapati Shivaji Maharaj in his book by the famous historian Sir Jadunath Sarkar.
    #MarathaHistory #ChandraraoMore #Jaoli #Jawli #chatrapatishivajimaharaj
    चंद्रराव मोरे पारिपत्य - शिवछत्रपतींना भूषण की दूषण?
    =======================================
    • ०१. चंद्रराव मोरे पारि...
    • ०२. जदुनाथ सरकार यांची...
    • ०३. छत्रपती शिवाजी महा...
    • ०४. शिवाजी महाराजांनी ...
    • ०५. नक्की कोणी कोणाला ...
    • ०६. छत्रपती शिवाजी महा...
    • ०७. चंद्रराव मोरे व पु...
    • ०८. छत्रपती शिवाजी महा...
    • ०९. छत्रपती शिवाजी महा...
    • १०. स्वराज्यसंस्थापनेस...
    • ११. जावळी काबीज करणे न...
    • १२. जावळीच्या राज्याच्...

ความคิดเห็น • 42

  • @sudhakarnagare6032
    @sudhakarnagare6032 2 ปีที่แล้ว +1

    सर जी खूपच छान सत्य समोर आणले आपण 👌🏽👌🏽

    • @KimantuLive
      @KimantuLive  2 ปีที่แล้ว +1

      आपले मन:पुर्वक आभार!

  • @AugustineGajbhiv-vl5mf
    @AugustineGajbhiv-vl5mf 9 หลายเดือนก่อน +1

    Great Explanation Sir...
    Thank You Very Much
    🇮🇳Jai Hind🇮🇳Jai Shivaray🇮🇳

    • @KimantuLive
      @KimantuLive  9 หลายเดือนก่อน

      धन्यवाद साहेब. आपले मन:पुर्वक आभार.🙏

  • @darshanchavan1854
    @darshanchavan1854 2 ปีที่แล้ว +1

    सर, तुम्ही अतिशय चांगले काम केले आले , त्याबद्दल तुमचे आभार !

    • @KimantuLive
      @KimantuLive  2 ปีที่แล้ว

      आपले मन:पुर्वक आभार!

  • @dipakphoto2996
    @dipakphoto2996 5 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्रातील ब्राह्मणवाद बोकाळण्याला शिवाजी महाराज किती जबाबदार होते ?

  • @bajiraojadhav9970
    @bajiraojadhav9970 2 ปีที่แล้ว +6

    यदुनाथ सरकार मुघल निघाला...

    • @KimantuLive
      @KimantuLive  2 ปีที่แล้ว +4

      जदुनाथ सरकार नाही. आपण मुघल आहोत. आपण ओळख मराठा सांगतो आणि करणी मुघलांची करतो. आपण आपल्या शिवछत्रपतींचा आणि मराठ्यांचा इतिहास अभ्यासायचा, वाचायचा कंटाळा करतो. आपण वास्तवातल्या छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा, कल्पनेतल्या आणि जाती-पातीतल्या शिवाजी महाराजांना जास्त मानतो. आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे पाईक होण्याऐवजी त्यांच्या पुतळ्यांचे नाईक जास्त होतो. आपण शिवछत्रपतींचे खरे विचार समजून घेण्याऐवजी फक्त जय शिवाजी जय भवानी घोषणा देण्यात जास्त धन्यता मानतो. आपण आपल्या आयुष्यातला वेळ खरे शिवछत्रपती समजून घेऊन दुसऱ्यांना समजावून सांगण्यात कारणी लावण्यापेक्षा, राज्याभिषेक सोहळे, दोन-दोन जयंत्या, पुण्यतिथ्या, उत्सव, यात्रा, मोर्चे, मशाली आणि दंगली करण्यात जास्त वाया घालवतो. म्हणून तिकडे जदुनाथ सरकार आणि जेम्स लेन सारख्या लोकांना शिवछत्रपतींचे चरित्रहनन करण्यास जास्त जागा होते. आपणच शिवछत्रपतींचे सत्य चरित्र समजुन घेऊन ते आपल्या चरित्रात मुरवले तर मग कशाला कोणाची शिवछत्रपतींचे चरित्रहनन करण्याची छाती होईल? म्हणून मी वर म्हटले आहे की जदुनाथ सरकार मुघल नाही आहेत. आपण मुघल आहोत. कारण आपली कथनी शिवछत्रपतींची असली तरी करणी मुघलांचीच आहे. आणि शिवछत्रपतींचे हेच एक सर्वात मोठे दुर्दैव आहे.

  • @psm4727
    @psm4727 2 ปีที่แล้ว +2

    शिवाजी ला राज्य विस्तारासाठी जावळी अत्यंत जरुरी होते असे राजे स्वतः म्हणतात ।

    • @KimantuLive
      @KimantuLive  2 ปีที่แล้ว +1

      शिवछत्रपतींना जावळी राज्यविस्तारासाठी हवी होती हे खरे आहे. पण त्यामागचा शिवछत्रपतींचा उद्दात्त उद्देश समजावून घेणे गरजेचे आहे. शिवछत्रपतींना जावळी मोऱ्यांप्रमाणे स्वत:च्या भाऊबंदांना वाटून देण्यासाठी नको होती, तर न्यायाचे जे राज्य ते स्थापन करु इच्छित होते त्याच्या रक्षणासाठी हवी होती. त्यामुळे मोऱ्यांप्रमाणे जावळी ताब्यात आल्यावर शिवछत्रपतींनी तिथे लगेच मोऱ्यांप्रमाणे प्रत्येक खोऱ्यात स्वत:च्या भोसले कुळातल्या भाऊबंदांची नेमणूक केली नाही. कर्तबगार माणसे जागोजाग नेमून विजापूरच्या दरबारातून येणाऱ्या आगामी आक्रमणाची तयारी सुरु केली.

  • @AvnishDeshmukhOfficial
    @AvnishDeshmukhOfficial ปีที่แล้ว +1

    खुप छान विश्लेषण व मांडणी

  • @dineshgorivale6028
    @dineshgorivale6028 ปีที่แล้ว

    सर या भागातील विश्लेषण, अप्रतिम आहे, यामुळेच यदुनाथ सरकार कळाले, धन्यवाद

    • @KimantuLive
      @KimantuLive  ปีที่แล้ว

      धन्यवाद साहेब. आपले मन:पुर्वक आभार.

  • @psm4727
    @psm4727 2 ปีที่แล้ว +1

    बाजी प्रभू हे मोरे चे सरदार होते। त्यांना राजांनी जीवदान देऊन पदरात घेतलं ,चतुर्बेट हे गाव आज ही तापोला वरून बोटी ने जाता येतं।

    • @KimantuLive
      @KimantuLive  2 ปีที่แล้ว +1

      साहेब! स्वत:ला मोरे म्हणवता आणि मोरेंच्या इतिहासावर चर्चा करत आहात तर किमान मोरेंच्या इतिहासाचा तरी व्यवस्थित अभ्यास करून प्रतिक्रिया देत जावी अशी विनंती. आपण म्हणता तसे बाजी प्रभू हे मोरेंचे सरदार नव्हते. मुरारबाजी होते. मुरारबाजी हे मोरेंच्या पदरी होते खरे. पण सरदार नव्हते. मोरे स्वत:च विजापूरच्या दरबारचे सरदार होते. स्वत:च्या हाताखाली सरदार ठेवून पोसावे एवढा जावळीचा आणि मोऱ्यांचा दोघांचाही राज्यविस्तार नव्हता. एवढे पराक्रमी सरदार हाताखाली ठेवून राज्य करायची मोऱ्यांची कुवत असती, तर जेधे, बांदल आणि शिळिमकरांसारख्या मोऱ्यांच्या दृष्टीने क्षुल्लक देशमुखांच्या मदतीने शिवछत्रपतींना जावळी जिंकता आली नसती.
      शिवछत्रपतींनी मुरारबाजींना जीवदान देऊन पदरात घेतलं नाही. मुरारबाजींसहित जावळीची आख्खीच्या आख्खी दहा-बारा हजाराची फौजच जुलमी मोऱ्यांच्या नाशानंतर शिवछत्रपतींना सामील झाली हे वास्तव आहे. या फौजेने चंद्रराव मोऱ्यांच्या मृत्यूनंतर लढायचेच ठरवले असते तर शिवछत्रपतींना जावळी सहज किंवा कधीच जिंकता आली नसती. चंद्रराव मोरेंची संकुचित वृत्ती आणि शिवछत्रपती यांच्या उद्दात्त ध्येयामधला फरक लक्षात आला की जावळीची सर्व फौज स्वयंप्रेरणेने शिवछत्रपतींना येऊन मिळाली होती. सभासदाने याचे वर्णन जावळी जिंकल्यावर शिवछत्रपतींची फौज दुप्पट झाली अशा अर्थाने करून ठेवले आहे.

  • @psm4727
    @psm4727 2 ปีที่แล้ว +1

    जावळी हे संघ राज्य होते इतर 6 गाद्या होत्या ,चतुर्बेट ,कंडोशी इत्यादी।

    • @KimantuLive
      @KimantuLive  2 ปีที่แล้ว

      साहेब! संघराज्य म्हणजे काय हे आपण आधी समजून घ्यावे ही आपणास विनंती. एकाच कुटुंबातील अनेक व्यक्ती एखाद्या प्रदेशाच्या अनेक भागावर राज्य करत असतील, तर त्याला संघराज्य म्हणत नाहीत. हुकुमशाही म्हणतात. जसे नेपोलियन बोनापार्ट हा फ्रान्सचा हुकुमशहा झाल्यावर त्याने आपल्या सर्व भाऊबंदांना युरोपच्या जिंकलेल्या देशांचे आणि प्रदेशाचे राजे बनवून टाकले. तसेच मोरेंच्या ताब्यात जावळीचे खोरे आल्यावर सर्व भाऊबंदांनी ते आप-आपसात वाटून घेतले. आणि पुढे आठ पिढ्या सरल्यावर जावळीचे खोरे कमी पडू लागले म्हणून शेजारच्या रोहिड खोरे व इतर खोऱ्यात पण दादागिरी करू लागले. त्यातूनच त्यांचे जेधे आणि शिळिमकरांशी वाकडे येऊ लागले व शिवछत्रपतींना जावळीवर आक्रमण करावे लागले. जे राज्य एकाच वंशाच्या अधिन असते. सर्वत्र त्या एकाच वंशाचे लोक सत्ताधीश असतात. आणि अरेरावीने शेजारच्या राज्यावर दादागिरी करू लागतात. त्याला हुकुमशाही राज्य म्हणतात. संघराज्य नाही.

  • @indwar-vi2os
    @indwar-vi2os 8 หลายเดือนก่อน

    Sir what are best books to read about Maratha history before and after Shiva g Maharaj.. please guide

    • @KimantuLive
      @KimantuLive  8 หลายเดือนก่อน

      मराठ्यांचा इतिहास समजून घेण्यासाठी कोणती पुस्तके वाचावीत?
      th-cam.com/video/dR0vvCYzT00/w-d-xo.html
      भारतीय व परकिय संदर्भग्रंथांची यादी
      th-cam.com/video/86FTWbn9PNY/w-d-xo.html
      आधुनिक मराठी इतिहासकार व मराठा इतिहासाच्या पुस्तकांची यादी
      th-cam.com/video/gjDTlXDHhZM/w-d-xo.html

  • @arunkagbatte7865
    @arunkagbatte7865 11 หลายเดือนก่อน

    सरकार यांनी आकस बुद्धी ने हा खोटा इतिहास लिहिला आहे. खुप मुद्दे क्लिअर केले, धन्यवाद

    • @KimantuLive
      @KimantuLive  11 หลายเดือนก่อน

      धन्यवाद साहेब. आपले मन:पुर्वक आभार.

  • @kiranmarodkar5187
    @kiranmarodkar5187 2 ปีที่แล้ว

    , छ शि वाजी महाराजांचे राज्य हे सामान्य माणसाच्या हिताचे होते त्यांनी आपल्या स्वतः साठी आलिशान महाल बांधले नाही स्वतः सामान्य जीवन जगत होते

  • @dineshgorivale6028
    @dineshgorivale6028 ปีที่แล้ว

    सर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारात सुरवातीला मुस्लिम सरदार किती होते आणि राज्यभिषेक झाला तेव्हा किती होते या बाबत जर काही संदर्भ असेल तर शक्य असल्यास त्या बाबतही काही कळू द्या

    • @KimantuLive
      @KimantuLive  ปีที่แล้ว

      कृपया खालील दोन व्हिडिओ पहावेत ही विनंती.
      शिवछत्रपतींशी संबंधित मुस्लिम अधिकारी : सत्य व असत्य
      th-cam.com/video/Eae3jM8xY8Q/w-d-xo.html
      शिवछत्रपतींच्या सैन्यात मुस्लिम सैनिक किती होते?
      th-cam.com/video/aZ7cRCrLGfg/w-d-xo.html

  • @roshannwankhade4440
    @roshannwankhade4440 2 ปีที่แล้ว +1

    Sir tumhi Sir Jadunath Sarkaranvr brobrr tika keli ani tyancha aadar pn rakhla tyavrun tumcha knowledge ani values disun yetat.

    • @KimantuLive
      @KimantuLive  2 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद साहेब!

  • @AK-wo7qy
    @AK-wo7qy 10 หลายเดือนก่อน

    Jadunath Sarkarne,Sanbhaji Rajanche suddha asech charitra hanan kele aahe.

    • @KimantuLive
      @KimantuLive  10 หลายเดือนก่อน

      जाणून-बुझून नाही त्याकाळातल्या योग्य संसाधनांच्या अभावात ही गोष्ट झाली आहे साहेब.

  • @lilkrishna3792
    @lilkrishna3792 2 ปีที่แล้ว

    Sir Maratha bengal invasion baddal pan video banwa

    • @KimantuLive
      @KimantuLive  2 ปีที่แล้ว +3

      मराठ्यांचं बंगालवरचं आक्रमण हे मराठ्यांच्या इतिहासातलाच नव्हे तर भारताच्या इतिहासातला पण एक काळाकुट्ट अध्याय आहे. कदाचित त्या अनुषंगाने पण सर जदुनाथ सरकार यांचे मत मराठ्यांबद्दल नकारात्मक झाले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मला वेळ मिळाला तर त्यावर पण व्हिडिओ बनवूयात.

    • @lilkrishna3792
      @lilkrishna3792 2 ปีที่แล้ว

      @@KimantuLive sagla khota ahe sir
      Jadunath ne gangaram cha Maharashtra puran la refer kelay
      Jo nawab of Bengal cha darbari itihas kar hota

    • @KimantuLive
      @KimantuLive  2 ปีที่แล้ว +1

      गंगाराम लिखित महाराष्ट्र पुराणाचा लेखनकाल, लेखक व त्यातील माहितीबद्दल बरेच वाद आहेत आणि आजही कित्येक गोष्टींबद्दल इतिहासकारांमध्ये एकमत नाही. या पुस्तकातल्या माहितीच्या विश्वसनीयतेबद्दल देखिल शंका घ्यायला पुष्कळ जागा आहेत. परंतु मराठ्यांचं बंगालवरचं आक्रमण हे मराठ्यांच्या इतिहासातला काळाकुट्ट अध्याय आहे. हे देखिल तितकंच खरं आहे.

    • @lilkrishna3792
      @lilkrishna3792 2 ปีที่แล้ว

      @@KimantuLive sir ek prashna hota tyasathi mala tumhala ek screenshot send karawa lagel
      Mi tumhala kutha contact Karu shakto sir?

    • @KimantuLive
      @KimantuLive  2 ปีที่แล้ว

      WhatsApp Me at +91 99701 28964

  • @ravikantdeshpande6388
    @ravikantdeshpande6388 ปีที่แล้ว

    सर जरा 1 जानेवारी 1818 लढाईचे सत्य पण जनतेला कळु द्या

    • @KimantuLive
      @KimantuLive  ปีที่แล้ว

      ठीक आहे साहेब!

  • @arunkagbatte7865
    @arunkagbatte7865 2 ปีที่แล้ว

    बराच भ्रम दूर झाला