चला जाऊ कोल्हापूरी अंबा दर्शनाला
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 9 ก.พ. 2025
- गाण्याचे बोल:-
चला जाऊ कोल्हापूरी अंबा दर्शनाला
हळदी कुंकू भरुनी तबकी करू पूजनाला || धृ ||
नऊ दिवस नऊ रात्री मातेचा सोहळा
गळा शोभती मातेच्या मौक्तिकांच्या माळा || १ ||
द्वितीयेचे तेज फार भाळावरी चंद्रकोर
तृतीयेला पांघरला भरजरी शेला || २ ||
चतुर्थीची चंद्रकळा पंचमीचा रंग न्यारा
दैत्य संहारोनी अंबा बैसे सिंहासना || ३ ||
षष्ठी दिवशी हिरे चोख अंबा ल्याली अलंकारा
सप्तमीला सप्तऋषी येती दर्शनाला || ४ ||
अष्टमीसी धरुनी फेर खेळे अष्टभुजा
जोडोनिया दोन्ही करा नमस्कार माझा || ५ ||
नवमीला गोंधळ घालू मागू जोगव्याला
दसऱ्याला अंबाबाईचा उदो उदो बोला || ६ ||