PVMS नवरात्रोत्सव 2024

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ต.ค. 2024
  • प्राथमिक विद्यामंदिर निर्मलनगर शाळेत रौप्य महोत्सव वर्ष व कर्मयोगी आबासाहेब काकडे पुण्यतिथी निमित्त विविध उपक्रम
    एफ. डी. एल.चे प्राथमिक विद्यामंदिर निर्मलनगर शेवगाव शाळेत शाळा रौप्य महोत्सव वर्ष व कर्मयोगी आबासाहेब काकडे पुण्यतिथी निमित्त वकृत्व स्पर्धा व प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आल्या.तसेच माता मेळाव्याचे आयोजन करून विद्यार्थ्यांना विद्यार्थी सुरक्षा व उद्बोधन वर्ग घेण्यात आले, या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सौ. मीनाक्षीताई शिंदे (आदर्श शिक्षिका तथा उचल फाउंडेशन)उपस्थित होत्या,या कार्यक्रमाचे अध्यक्षीयस्थान प्रा. सौ. वंदनाताई पुजारी (शिक्षण विभाग प्रमुख-कर्मयोगी आबासाहेब काकडे शैक्षणिक समूह शेवगाव ) यांनी भूषवले. या कार्यक्रमाप्रसंगी शाळा रौप्य महोत्सव वर्ष व कर्मयोगी आबासाहेब काकडे यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय वकृत्व स्पर्धा व प्रश्नमंजुषा स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले, त्यात इयत्ता चौथी वर्गातून डाके अथर्व ऋषिकेश- प्रथम क्रमांक (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळीवाडा) पाचरणे संचिता मनोज -द्वितीय क्रमांक (प्राथमिक विद्यामंदिर निर्मलनगर शेवगाव) लिंगे प्रणय देविदास -तृतीय क्रमांक(जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळीवाडा) तसेच इयत्ता तिसरी दुसरी पहिली या इत्तेतून प्राथमिक विद्यामंदिर शाळेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत असे यश या वकृत्व स्पर्धेत मिळवले, शालेय स्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली, त्यात इयत्ता चौथी वर्गातून सई इंद्रराव लांडे, इयत्ता तिसरी वर्गातून स्वरा विकास लिंगे इयत्ता दुसरी वर्गातून तूपसेंदर आरोही बाबासाहेब ,इयत्ता पहिली वर्गातून झरेकर शंभू आत्माराम या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळवला,या कार्यक्रमाप्रसंगी माजी विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला त्यात नुकत्याच झालेल्या प्रवेश प्रक्रियेतील एमबीबीएस या वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश प्राप्त करणाऱ्या कु. साक्षी अशोक तमनर एमबीबीएस (ग्रँड गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज एंड सर जेजे ग्रुप ऑफ हॉस्पिटल मुंबई )येथे निवड झाल्याबद्दल सन्मान करण्यात आला,तसेच स्नेहल मगर एमबीबीएस (लखनऊ) या ठिकाणी निवड झाल्याबद्दल या विद्यार्थिनीचाही सन्मान करण्यात आला,तसेच या कार्यक्रमाप्रसंगी माजी माता पालक ज्या सक्षमपणे गृहउद्योग करण्याऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला, त्यात सौ.कल्पनाताई अनिल गोसावी (शिवणक्लास, ब्युटी पार्लर शेवगाव) सौ.साळुंखे संगीताताई संजय (घरगुती पाककृती व्यवसाय व विक्री शेवगाव) सौ. सातपुते प्रतिभा (ब्युटीपार्लर शेवगाव) सौ.वाघमारे श्रद्धा गणेश (ब्युटीपार्लर शेवगाव)या महिलांचाही सन्मान मान्यवरांचा हस्ते करण्यात आला,तसेच या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सौ. मीनाक्षीताई शिंदे यांनी विद्यार्थ्यांना विद्यार्थी सुरक्षा व समुपदेशन पर मार्गदर्शन केले, त्यात त्या म्हणाल्या की, विद्यार्थ्यांनी कोणतेही अनोळखी व्यक्तीशी बोलणे कमी करावे शक्यतो टाळावे,आपल्या अंगाला कोणीही हात लावणार नाही, आपण कोणाकडूनही कोणतीही वस्तू अमिषापोटी घेणार नाही, खाणार नाही, संस्कार हा घरातून आणि शाळेतूनच घडत असतो, म्हणून मूर्तीची, फोटोची पूजा न करता घरातील जे जिवंत देव आहेत त्यांची पूजा करावी असे प्रतिपादन यावेळी केले, नंतर प्रतिनिधीक स्वरूपात मातृपूजन कार्यक्रम घेण्यात आला,त्यात मिराबाई रमेश दसपुते, सुरेखा दत्तात्रय मेघारे,सुरेखा शंकर कवडे, वर्षा लक्ष्मण इथापे, सोनाली अर्जुन मुंढे, अश्विनी सिद्धार्थ काटे, परविन शेख, सीमा शहूल शिंदे,उषा राजेंद्र जगताप या मातांचे त्यांच्या पाल्यांच्या हस्ते मातृपूजन करण्यात आले, कार्यक्रमात विविध मनोरंजनाचे खेळ घेण्यात आले त्यात
    कपाने बॉटल भरणे या स्पर्धेत सुरेखा शंकर कवडे प्रथम, अश्विनी इथापे प्रथम
    संगीत खुर्ची स्पर्धेत कचरे उर्मिला प्रथम,
    ...........
    उत्तेजनार्थ मीरा दसपुते (कपसेट) गंगुबाई पिसे (कपसेट)देऊन सन्मानित करण्यात आले, गरबा/ दांडिया स्पर्धा -राऊत प्रियंका, सोनवणे जयश्री, कवडे मनीषा, गंगुबाई पिसे,कचरे उर्मिला, सुसे, परदेशी, कुरुंद, कडमिचे, दहिवाळकर,चव्हाण,मीनाक्षीताई शिंदे यांनी सहभाग घेतला,कार्यक्रमप्रसंगी पावसाच्या हलक्या सरी बरसत असताना सुद्धा मनोरंजनाचे खेळ माता-भगिनींनी अगदी उत्स्फूर्तपणे या मनोरंजनाचा खेळात सहभाग घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली, या कार्यक्रमासाठी श्रीम.परवीन पटेल मॅडम यांनी प्रस्ताविक केले ,तर श्री.मंगेश वसावे सर यांनी सूत्रसंचालन केले, या कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

ความคิดเห็น •