युवा दर्पण लाईव्ह बातमीपत्र दि.9/2/2025; ऊसतोड मुकदामाचे अपहरण? तर धनंजय देशमुखांचे मोठे विधान
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 9 ก.พ. 2025
- बीड चे खासदार बजरंग सोनवणे यांच्या मालकीच्या येडेश्वरी शुगर्स या साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांचा अत्यंत खळबळ जनक प्रताप समोर आला आहे . कारखान्याचे ऊसतोड मुकादम सदाशिव सातेराम चव्हाण, आणि किसन भानूदास सूर्वे यांचे बीड शहरापासून जवळच असलेल्या महालक्ष्मी चौकातून पाटील नावाच्या कारखान्याच्याअधिकाऱ्याने अपहरण करून त्यांना कारखाना परिसरात डांबून ठेवत , आमचे पैसे आणून द्या आणि तुमचे माणसं घेऊन जा असे कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी निरोप दिल्याचा आरोप ऊसतोड मुकादम सदाशिव सातेराम चव्हाण यांच्या मुलीने केला आहे , या प्रकरणी मुकादमाच्या मुलीने बीडच्या ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून , डांबून ठेवलेल्या मुकादमाच्या वडिलांचा संताप ग्रामीण पोलीस ठाण्याच्या परिसरात पाहायला मिळाला. तर डांबून ठेवलेला मुकदामाच्या मुलीच्या तक्रारीनंतर जिल्हा पोलीस प्रशासन ख डबडून जाग झाले आणि येडेश्वरी कारखान्याचे अधिकाऱ्यांसह खासदार बजरंग सोनवणे यांचे पीए ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल झाले व त्या डांबून मुकादमाची ही सुटका करण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे . पाहुयात यासंबंधी मुकादमाच्या मुलगी काय म्हणाली ते .................................................................................................. मासाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे दिनांक नऊ डिसेंबर 2024 रोजी अपहरण करून हत्या करण्यात आली होती, या हत्या प्रकरणाला आज दोन महिने पूर्ण झाले आहेत. तर या प्रकरणी स्वर्गीय संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी म्हटले आहे कि दोन महिने पूर्ण झाले आहेत परंतु माझे दुःख काही केल्या कमी होत नाही, दुःख वाढतच चालले आहे न्यायाच्या भूमिकेत सर्वजण आहेत, मात्र माझा भाऊ कुठून येणार ? त्यासाठी कोणते दार ठोटवायचे, त्या वेदना भयानक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यासोबत कृष्ण आंधळे हा आरोपी कागदोपत्री दोन वर्षे फरार होता, त्याला अभय दिले नसते तर हा गुन्हा घडलाच नसता त्यामुळे याला सर्वस्वी सजबाबदार कोण? हे प्रशासनाने आम्हाला सांगावे असा सवालही त्यांनी यावेळी केला
बीड जिल्ह्यातील निर्भिड पणे बातम्या देत रहा.
बीड जिल्ह्याचे खासदार साहेब आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याच बघायचं वाकून.