ह भ प श्रावण महाराज जगताप यांच्या कीर्तनातून ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा जातेगाव येथे संपन्न

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ก.ย. 2024
  • ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताह सोहळा उत्साहात संपन्न :
    काल्याच्या किर्तनाने झाली सप्ताहाची सांगता
    ईश्वर जाधव / जातेगाव प्रतिनिधी :
    आपल्या जीवनात भगवान श्रीकृष्णाच्या जीवनमूल्यांचा आदर्श घेतल्यास जीवन कृतार्थ होईल तसेच ज्ञान व भक्तीतूनच सुसंस्कृत समाज घडून येईल असे ह.भ.प.श्रावण महाराज जगताप यांनी आपल्या काल्याच्या सुश्राव्य किर्तनातून उपस्थितांना उपदेश केला.ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याची सांगता जातेगाव येथे मोठ्या उत्साहात करण्यात आली.
    नांदगाव तालुक्यातील जातेगांव येथील श्रीविठ्ठल- रुक्मिणी मंदिर प्रांगणात नित्य हरिपाठ किर्तन मासिकवारीनिमित्ताने ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.दि.२७ डिसेंबर पासून ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला प्रारंभ झाला. दररोज काकड आरती भजन,ज्ञानेश्वरी पारायण,प्रवचन,हरिपाठ,किर्तन आदींचे आयोजन करण्यात आले.महाराष्ट्रातील नामवंत किर्तनकार व प्रवचनकारांच्या ज्ञानामृताचा लाभ उपस्थित भाविकांनी घेतला.तसेच अन्नदान व महाप्रसादाचे आयोजन या सप्ताह प्रसंगी करण्यात आले.सोमवार दि.२ रोजी ह.भ.प. श्री.रामप्रकाशानंदगिरीजी महाराज यांच्या उपस्थितीत भव्यदिंडी सोहळा आयोजित करण्यात आला.टाळ-मृदुंगाच्या गजरात संपूर्ण गावात ग्रंथ व संतांची मिरवणूक काढण्यात आली. मंगळवार दि.३ जानेवारी रोजी ह.भ.प.श्रावण महाराज जगताप विसापूरकर यांच्या काल्याच्या किर्तनाने अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याची थाटात सांगता करण्यात आली.ह.भ.प.श्रावण महाराज यांनी, भगवान परमात्मा श्रीकृष्णाच्या विविध बाललीलांचे वर्णन करुन भगवतनामाचा महिमा विशद केला."पाहातां गोवळी,खाय त्यांची उष्टावळी,करिती नामाचें चिंतन,गडी कान्होबाचें ध्यान" याचे स्पष्टीकरण देताना सांगितले की,परमात्मा भगवान श्रीकृष्णाच्या जीवन चरित्रातूनच अनेक आदर्श जीवनमूल्यांचे दर्शन घडून येते.आपल्या जीवनात भगवान श्रीकृष्णाच्या जीवनमूल्यांचा आदर्श घेतल्यास जीवन कृतार्थ होईल तसेच ज्ञान व भक्तीतूनच सुसंस्कृत समाज घडून येईल.यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.या सप्ताह सोहळ्यासाठी अमूल्य योगदान देणार्‍या गायक,वादक,सेवेकरी व अन्नदाते आदींचा सप्ताह सोहळा समितीकडून यथोचित सन्मान करण्यात आला.यावेळी ह.भ.प.स्वामी संपूर्णानंद सरस्वती महाराज, कुर्‍हाडे बाबा निपाणीकर,नवनाथ महाराज,मनेगांव रावसाहेब महाराज पठाडे,गोरख महाराज,भास्कर महाराज वळण,ज्ञानेश्वर महाराज,वैभव महाराज दत्ताश्रम, परशूराम महाराज, तसेच परिसरातील वारकरी भजनी मंडळ, आजी -माजी सैनिक तथा ग्रामस्थ भाविक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ความคิดเห็น •