गावठी कोंबड्यांचे कुकूट पालन | पालघरच्या तरुणाची यशोगाथा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
  • गावठी कोंबड्यांचे कुकूट पालन | पालघरच्या तरुणाची यशोगाथा @miborivalikar4843
    आज भेटूया एका अश्या तरुणाला ज्यानी आपली मुंबईमधील मोठ्या पगाराची नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय करायचा म्हणून पालघर जिल्ह्यातील, केव या छोट्याश्या गावामधील असलेल्या आपल्या 23 गुंठे जमिनीमध्ये गावठी कोंबड्यांचे कुकूटपालनाचा व्यवसाय करायचे असे ठरवले. कुटुंबियांची साथ आणि स्वबळावर काहीतरी करून दाखवायच ह्या जिद्दीचे यश म्हणजे द्वित फार्म हे आपण आज या व्हिडीओच्या माध्यमातून पाहणार आहोत.
    ही गोष्ट आहे उमेश पाटील या तरुणाची, जो स्वतः पदवी धारक असून त्यानी फॅशन डिझाईनींगचा डिप्लोमा देखील केला आहे. अगदी 8 गावठी कोंबड्यान पासूनच्या खडतर प्रवासाची सुरुवात करून आजच्या तारखेला त्याच्याकडे 2000 पेक्षा अधिक पक्षी आहेत. माउस विक्री, पिल्ले विक्री आणि अंडी विक्रीचा व्यवसाय गेली साडेचार वर्षे हा तरुण अगदी यशस्वीपणे चालवत आहे. त्याच्या यशाचे एक छोटेसे उदाहरण म्हणायला गेलं तर दर रविवारी या तरुणाकडे ट्रेनिंग घेण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भरपुरसारे शेतकरी प्रशिक्षण घेण्यासाठी येत असतात.
    द्वित फार्म असे नाव असलेल्या या गावठी / गावरान कोंबड्यांच्या फार्म मध्ये आपल्याला अगदी खात्रीशीर गावठी / गावरान कोंबड्या व त्यांची अंडी मिळतील हे तुम्हाला ह्या व्हिडिओ मध्ये देखील समजेल.
    मुंबई, ठाणे, पालघर या जिल्ह्यानंमध्ये द्वित फार्म मधील गावठी / गावरान कोंबड्यांची, त्यांच्या अंड्यांची व त्यांच्या पिल्लांची प्रचंड मागणी आहे. त्याचे कारण असेकी या तरुणानी आपल्या ग्राहकांचा विश्वास निरंतर रितेने जपला आहे.
    मुक्त संचाराच्या सानिध्यात असलेल्या कोंबड्या तुम्हाला पाहायच्या असतील, त्यांचे संगोपन कसे करायचे, त्यांच्या आजारावर नियंत्रण कसे ठेवायचे व गावठी / गावरान कोंबड्यांच्या व्यवसायाला सुरुवात कशी करायची या बद्दल प्रशिक्षण घेण्यासाठी आपण द्वित फार्म, केव, ता. विक्रमगड, जि. पालघर. (भ्रमणध्वनी क्र. 9226466497) इथे नक्की भेट द्या व गावरान कोंबड्यांच्या व्यवसायाला चालना द्या ही आपणास नम्र विनंती.
    संबंधित व्हिडिओ साठी पहा
    वसईचा ऑरगॅनिक भाजीचा बाजार
    • वसईचा ऑरगॅनिक भाजीचा ब...
    कोकणातील कृषिपर्यटन केंद्र, काजू फॅक्टरी, होमस्टे | Agrotourism Konkan, Cashew फॅक्टरी
    • कोकणातील कृषिपर्यटन के...
    कोकणातील काजुची बाग - भाग 1
    • कोकणातील काजूची बाग । ...
    कोकणातील काजुची बाग - भाग 2
    • कोकणातील काजूची बाग भा...
    घराचे अड चढावले
    • घराचे आडं चढवले । कळंब...
    #countrychickenfarming
    #farmingvideos
    #chickenfarming
    #agribusiness
    #poultryfarming
    #kukutpalan
    #chickenfarmer
    #poultrytreatment
    #poultrytradingapp
    #chickenfeed
    #poultryshed
    #krushi_samrudhi
    #satbara
    #kaverikombdi

ความคิดเห็น • 147