।। नमो गुरवे वासुदेवाय ।। 🚩 श्री वासुदेव कुटीर आश्रम 🚩 संयोजित 💧108 घोरकष्टोद्धारण पाठ💧 प.प.श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामीमहाराज यांनी सर्व दत्तभक्तांचे घोर कष्ट नष्ट करण्यासाठी अघोरकष्टोद्धारण स्तोत्राची निर्मिती केली आहे।या स्तोत्राच्या नित्य पठणाने बऱ्याच दत्तभक्तांच्या कष्टाचे,अडचणींचे निवारण झाल्याचा अनुभव आहे। अशा ह्या स्तोत्राचे 108 पाठ केल्यामुळे त्या स्तोत्राची दुप्पट शक्ती आपल्याला प्राप्त होते।असा हा पाठ आपण प.पू.श्री विष्णूगिरी स्वामीमहाराज ,श्री वासुदेव कुटीर आश्रम,तिलकवाडा, गुजरात यांच्या प्रमुख उपस्थितीत करत आहोत।सदर पाठा साठी आपण सर्व दत्तभक्त सादर निमंत्रित आहात। तरी आपण सर्वांनी या 108 पाठात उपस्थित राहून आम्हाला उपकृत करावे। *कार्यक्रमाचे स्वरूप* ~ पाठ - दुपारी 4-30 दिनांक - 14-5-18 वार - सोमवार स्थळ - श्री रामानंद बिडकर महाराज मठ,शनिवार पेठ, पुणे श्री विष्णुगिरी स्वामी श्री वासुदेव कुटीर आश्रम तिलकवाड़ा 🙏🏼🙏🏼अवधूत चिंतन श्रीगुरुदेवदत्त🙏🏼🙏🏼
श्रीगुरूदेव दत्त! मीं मुकुंद देशपांडे, मीं छ. संभाजीनगर येथे वास्तव्यास आहे. मीं पू. श्री. पुंड महाराज ह्यांचेकडून शक्तिपात योगाची दीक्षा घेतली आहे. माझा साष्टांग नमस्कार स्वीकार करावा, ही प्रार्थना!
वासुदेवानंद सरस्वती श्री टेंबे स्वामी यांच्या जीवनावर आधारित चित्रपट th-cam.com/channels/M6I1Q_BbJjtlGKRbnfW6vg.html m.th-cam.com/channels/M6I1Q_BbJjtlGKRbnfW6vg.html
शुक्रचायांचां संजीवनी मंत्र शट कर्णी झाल्याने फुटला. परंतु स्त्रियांना मंत्र सांगू नये असा नियम नाही. शुक्राचार्य तपस्येत असताना त्यांच्या आईने मंत्रांनी राक्षसांचे रक्षण केले. देवी भागवत. स्त्रियांना पतीचे अर्ध पुण्य आपोआप मिळत असल्याने स्त्रिया वेद म्हणत नव्हत्या
मैत्रेयी प्रख्यात विदुषी आहे आणि तिचे मंत्र प्रसिद्ध आहेत. ती स्त्रीचं होती आणि देवी भागवता प्रमाणे देवी भागवता प्रमाणे ब्रम्हांडात, सर्व देवात मा भगवती सर्व श्रेष्ठ आहे.
गुरु चरित्रामध्ये पस्तिसाव्या अध्यायात सांगितले आहे की, स्त्रिया केवी मंत्रहीन । शुक्राचार्या कैसे झाले ॥८॥ विस्तारोनि आम्हासी । सांगा स्वामी कृपेसी । म्हणोनि लागली चरणासी । करुणावचनेकरोनिया ॥९॥ श्रीगुरु सांगती तियेसी । पूर्वकथा आहे ऐसी । आणि पुढे शुक्राचार्य, दमयंती आणि बृहस्पती पुत्र कच याची मंत्र षटकर्णी कसा केला ही गोष्ट आली आहे. श्रीगुरुचरित्र हा ग्रंथ वेदांइतकाच मान्यता पावलेला आहे. स्त्रींयानी गुरूचरीत्राचे पारायण करू नये असे म्हणतात. पारायणासाठी ज्या गोष्टींचे पालन करायला लागते त्याचे पालनात स्त्रीधर्मामुळे खंड पडण्याची शक्यता असते. संकल्प-पूर्तीसाठी श्रीगुरुचरित्र-वाचनाची विवक्षित पद्धती आहे. पण एक सांगा, जे करू नये तेच का आपल्याला करायचे असते. स्त्रियांनी स्त्रीधर्म पाळावा, पुरुषांनी पुरुष धर्म पाळावा, ते सोडून भलतीकडेच विषय नेण्याची सवय मात्र चांगली नव्हे. स्त्रियांवर मौंजी बंधन संस्कार, शास्त्राध्ययन अधिकार प्राप्ती झालेली नसते. त्यांच्या शरीरात असलेल्या अंड कोशाला बीज मंत्रांनी, मंत्राच्या सामर्थ्याने, उच्चारवाने आघात होवू शकतो. स्त्रियांना मंत्राधिकार नसतात, संध्यावन्दनाचा अधिकार नसतो, मग संकल्प कसा सोडणार. यापूर्वी मी एकदा गुरुचरित्र वाचण्यापूर्वी सोडण्याचा संकल्प पोस्ट केला होता, तो वाचला की आपल्याला कळेल. त्यांनी गुरुचरित्र ऐकावे, वाचू नये. तसेच सप्तशती देखील वाचू नये. शिवाय गुरुचरित्रातले काही अध्याय (२६ वेदरचना, ३६ कर्ममार्ग) हे अध्याय त्यांनी ऐकू देखील नये. त्यात काही बंध, मुद्रा, वैदिक बीजमंत्र आलेले आहेत. स्त्रियांना बीजात्मक मंत्र सिद्ध करण्याचे अधिकार आणि सामर्थ्य नसते. पूर्वीच्या वैदिक स्त्रियांचे दाखले आजच्या कलियुगात चालत नाही, त्यांनी स्वत:ला सिद्ध केले होते. वैदिक काळात गार्गी, मैत्रेयी आदी स्त्रियांनी शास्त्रार्थामधील चर्चेत पुरुषांना देखील लाजविले होते. अध्ययन, सहशीक्षा या गोष्टीला वैदिक काळात प्रोत्साहन दिले जाण्याचेच हे दाखले आहेत. हरित संहिताच्या अनुसार महिला दोन प्रकारच्या असतात, ब्रह्मवादिनी आणि सद्योवाह. यातल्या ब्रह्मवादिनी प्रकारच्या स्त्रियांनी शास्त्रानुसार सारे संस्कार काराबून त्या वेदाध्ययन करण्यास पत्र होत्या, त्या आजन्म ब्रह्मचारिणी राहिल्या होत्या. सद्योवाह स्त्रिया या गृहस्थाश्रमात राहून अनुरूप कर्मे करत होत्या. विशेष म्हणजे ब्रह्मवादिनी स्त्रियां शाम्भावोपाय दिक्षाधिकारी या पात्रतेतील होत्या. काव्य रचना, त्याग, त[अस्य द्वारा त्यांनी ऋषी भाव प्राप्त केलेला होता. त्यांना मंत्राचा साक्षात्कार झालेला होता. त्यांनी ऋग्वेदातील अनेक सुक्त सिद्ध केले होते, साक्षात्कृत केले होते. उदाहरणार्थ, ऋग्वेद दशम मंडळातले ३९, ४० वे सुक्त तपस्विनी ब्रह्मवादिनी घोषा यांचे आहे. ऋग्वेदातील १.२७.७ वा मंत्र ऋषिका रोमशा यांचा आहे. १.५.२९ वा मंत्र ऋषिका विश्वारा यांचा आहे. १.१०.४५ व मंत्र दृष्टा इंद्राणी यांचा आहे. १.१०१५९ व मंत्र ऋषिका अपाला यांचा आहे. तसेच सूर्या नावाची देखील एक ब्रह्मवादिनी ऋषिका होती. अगस्त्य ऋषी पत्नी लोपामुद्रा सती यांनी देखील आपल्या पती बरोबर सूक्तांचे दर्शन केले होते. या वैदिक काळातील स्त्रियांनी यज्ञोपवीत संस्कार केले होते, त्या वेद, उपनिषद जनात होत्या. शास्त्रोक्त संध्या वंदनादी विधी करून त्या त्या देवता प्रसन्न करवून घेतल्या होत्या. जेव्हा हवे तेव्हा या स्त्रिया हव्या त्या देवतांना आवाहन करीत आणि देवता देखील क्षणाचाही विलंब न करता त्यांच्या सेवेत तत्पर असत, एवढा अधिकार त्यांनी मिळवला होता. वेद काळातील अदिती, उषा, इंद्राणी, इला, सिनीवाली, प्रश्नि या सुप्रसिद्ध देवस्त्री, ब्रह्मर्षी, ऋषिका होत्या. यात अदिती या नावाचा उल्लेख सर्वाधिक झालेला आहे. या साऱ्या सर्वशक्तीमती, विश्वहितैषीणी तथा मंगलकारिणी देवी मानल्या गेल्या. यांच्या शिवाय दिति, सीता, सूर्या, वाक, सरस्वती यांचे देखील स्तवन होते. निष्कर्ष: जर आजच्या काळात या अधिकारापर्यंत पोचण्याची क्षमता आणि शास्त्रसंमत विधिवत ज्ञानपिपासा असलेल्या अधिकारी स्त्रियांनी वेदशास्त्र अध्ययन करण्यास, गुरुचरित्र वाचण्यास, सप्तशती वाचण्यास काहीच हरकत नाही. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त यावर आपले मत नोंदवा
दीक्षित स्वामी महाराजांनी तयार केलेली थोरल्या महाराजांची प्रश्नावली म्हणजे दत्त महाराजांची कृपा संपादित करून आपले मनोवांच्छित पूर्ण करण्याचा एक मार्ग . दीक्षित स्वामी महाराज हे याचे कर्ते असले तरी याला थोरल्या महाराजांची प्रश्नावली म्हणण्याचे कारण म्हणजे यातील सर्व उत्तरे हि थोरल्या महाराजांनी केलेल्या दत्त महाराजांच्या साहित्यावर आधारित आहेत . मनात असलेले सर्व काही दत्त महाराज देण्यास सिद्ध आहेत मात्र याकरिता साधन काय करावे ते या प्रश्नावलीद्वारे कळून येते . प्रश्नावली हा प्रकार काही आजचा नाही. अगदी अनादी काळापासून अनेक प्रश्नावल्या अनेक साधु संतांकडून तयार केल्या गेल्या आणि त्याचा उपयोग आपल्या समस्यांचे निराकरण करण्याकरिता झाला . पण मग थेट साधू संतांचे मार्गदर्शन न घेता या प्रश्नावलीच्या निर्मितीमागचा काय उद्देश असावा ? प्रारब्ध योगे साधुसंतांची भेट होईलच असे नाही खेरीज पूर्वी प्रवास हा एक मोठा खडतर प्रकार होता .साधू संतांचा नित्य वेगवेगळ्या जागी मुक्काम असे आणि तिथपर्यंत जाऊन पोहोचणे अनेकदा शक्य नसे . पेक्षा हाताशी असे काही साधन असल्यास एखाद्या उपासनेने मनातील प्रश्न सुटल्यास उत्तम या विचाराने या प्रश्नावलींची निर्मिती झाली . नेहेमी या प्रश्नावलीत काही साधन सांगितले असेलच असे नाही ,काही प्रश्नावलीत मनात इच्छिलेले कार्य होईल अथवा न होईल या अर्थी देखील उत्तर मिळत असे . प्राचीन प्रश्नावली पाहता तुलसीदासांच्या रामचरित मानस या ग्रंथावर आधारित एक प्रश्नावली आहे त्याला राम शलाका असे म्हटले जाते . यात प्रश्न पाहताना आलेल्या अक्षरापासून नववे अक्षर उत्तरादाखल घेतले जाते . यातील एखादे उत्तर पाहता -- सुनु सिय सत्य असीस हमारी। पूजिहि मन कामना तुम्हारी। रामचरित मानसाच्या बालकांडात सीतामाईला पार्वतीने दिलेला हा आशीर्वाद आहे अर्थात आशीर्वादपर चौपाई आहे . आता आलेल्या उत्तराचा अर्थ पाहू जाता ,मनात धरलेल्या प्रश्नाचे कार्य सिद्धीस जाईल असे उत्तर मिळते . आता प्राचीन काळातील अनेक प्रश्नावल्या आणि थोरल्या महाराजांच्या प्रश्नावलीचा तुलनात्मक अभ्यास करता एक गोष्ट ठळकपणे लक्ष्यात येते . कोणती , तर दत्त महाराज हे मनातील कोणत्याही कामनेला नाही म्हणत नाहीत . इतर प्रश्नावलींप्रमाणे मनातील इच्छा पूर्ण होईल अथवा नाही हा प्रश्नच यात नाहीये . जे जे मनी इच्छावे ते ते भगवद्कृपे पावावे या वचनानुसार सर्व काही मिळणार आहे . मात्र त्याकरिता सांगितलेल्या उपासनेनंतर . या थोरल्या महाराजांच्या प्रश्नावलीत एकंदर अठरा उपासना रुपी उत्तरे सांगितली आहेत . अवश्य अनुभव घेऊन पाहावा . श्रीगुरुदेव दत्त !!!--- अभय आचार्य
जय गुरुदेव दत्त, मी सुहास कुलकर्णी पंढरपूर, श्री मामा देशपांडे यांचा अनुगृहीत साधक आहे, छान आहे 🏵️🏵️
खूप प्रसन्न वाटते ऐकून.
Shri guru sharanam 🙏
Shri sharanam.
🙏🙏🙏🌼💐👏
।। नमो गुरवे वासुदेवाय ।।
🚩 श्री वासुदेव कुटीर आश्रम 🚩
संयोजित
💧108 घोरकष्टोद्धारण पाठ💧
प.प.श्रीमद वासुदेवानंद सरस्वती
स्वामीमहाराज यांनी सर्व दत्तभक्तांचे घोर कष्ट नष्ट करण्यासाठी अघोरकष्टोद्धारण स्तोत्राची निर्मिती केली आहे।या स्तोत्राच्या नित्य पठणाने बऱ्याच दत्तभक्तांच्या कष्टाचे,अडचणींचे निवारण झाल्याचा अनुभव आहे।
अशा ह्या स्तोत्राचे 108 पाठ केल्यामुळे त्या स्तोत्राची दुप्पट शक्ती आपल्याला प्राप्त होते।असा हा पाठ आपण प.पू.श्री विष्णूगिरी स्वामीमहाराज ,श्री वासुदेव कुटीर आश्रम,तिलकवाडा, गुजरात यांच्या प्रमुख उपस्थितीत करत आहोत।सदर पाठा साठी आपण सर्व दत्तभक्त सादर निमंत्रित आहात। तरी आपण सर्वांनी या 108 पाठात उपस्थित राहून आम्हाला उपकृत करावे।
*कार्यक्रमाचे स्वरूप* ~
पाठ - दुपारी 4-30
दिनांक - 14-5-18
वार - सोमवार
स्थळ - श्री रामानंद बिडकर
महाराज मठ,शनिवार पेठ,
पुणे
श्री विष्णुगिरी स्वामी
श्री वासुदेव कुटीर आश्रम
तिलकवाड़ा
🙏🏼🙏🏼अवधूत चिंतन श्रीगुरुदेवदत्त🙏🏼🙏🏼
श्रीगुरूदेव दत्त! मीं मुकुंद देशपांडे, मीं छ. संभाजीनगर येथे वास्तव्यास आहे. मीं पू. श्री. पुंड महाराज ह्यांचेकडून शक्तिपात योगाची दीक्षा घेतली आहे. माझा साष्टांग नमस्कार स्वीकार करावा, ही प्रार्थना!
Avadoot chintan Shri Gurudev Datta 🙏 🙏
Guru maharaj ki jay🙏🙏
🙏🙏
Shri Guru Sharanam
🙏🙏🙏🙏🙏🕉🔱💐🌹⚘🌿🌴🍀🍁🚩🚩🚩🚩🚩🍁
Plz address asel kona jawal.tar daya
गूगल वर शोधा
काका अजून येता का दर्शन घ्यायला
abhar,gurunche darshan zale aj,man bharun ale
सद्गुरू चरणी साष्टांग नमस्कार.
ओंम श्री.वासुदेवा नंद सरस्वती नमो
Jay gurudev datta
श्री गुरुदेव दत्त
no words...maan bharun alle
Thank you for sharing Guru's life
Prashavali
@@shamravkarandikar5209 इ
@@shamravkarandikar5209 आइ
@@shamravkarandikar5209 गघा
@@shamravkarandikar5209 आआअआआआग्
नमो नमः 🙏👌
नमस्कारम् सद्गुरु
Shri guru dev datta
मला वॉट्सएप्प ग्रूप मधे सामिल करावे
Thanks for sharing it.
श्री गुरुदेव दत्त...
Jai shree guru Datt..
Shree gurudev datta
वासुदेव निवासाचा पत्ता काय आहे
Google वर आहे
Vasu devanand nivas kute aha please addres deta ka
वासुदेवानंद सरस्वती श्री टेंबे स्वामी यांच्या जीवनावर आधारित चित्रपट
th-cam.com/channels/M6I1Q_BbJjtlGKRbnfW6vg.html
m.th-cam.com/channels/M6I1Q_BbJjtlGKRbnfW6vg.html
वेदमंत्र स्त्रियांनी उच्च्चारु नयेत ,
यावरील वैज्ञानिक दृष्टीकोनातून संशोधन सिद्धांत असल्यास कृपया त्वरीत कळवावे.
शुक्रचायांचां संजीवनी मंत्र शट कर्णी झाल्याने फुटला. परंतु स्त्रियांना मंत्र सांगू नये असा नियम नाही. शुक्राचार्य तपस्येत असताना त्यांच्या आईने मंत्रांनी राक्षसांचे रक्षण केले. देवी भागवत. स्त्रियांना पतीचे अर्ध पुण्य आपोआप मिळत असल्याने स्त्रिया वेद म्हणत नव्हत्या
कृपया यांचे सविस्तर शास्त्रीय पुराव्यासह माहिती द्यावी...
yogeshdada.2016@gmail.com
मैत्रेयी प्रख्यात विदुषी आहे आणि तिचे मंत्र प्रसिद्ध आहेत. ती स्त्रीचं होती आणि देवी भागवता प्रमाणे देवी भागवता प्रमाणे ब्रम्हांडात, सर्व देवात मा भगवती सर्व श्रेष्ठ आहे.
गुरु चरित्रामध्ये पस्तिसाव्या अध्यायात सांगितले आहे की,
स्त्रिया केवी मंत्रहीन । शुक्राचार्या कैसे झाले ॥८॥
विस्तारोनि आम्हासी । सांगा स्वामी कृपेसी ।
म्हणोनि लागली चरणासी । करुणावचनेकरोनिया ॥९॥
श्रीगुरु सांगती तियेसी । पूर्वकथा आहे ऐसी ।
आणि पुढे शुक्राचार्य, दमयंती आणि बृहस्पती पुत्र कच याची मंत्र षटकर्णी कसा केला ही गोष्ट आली आहे.
श्रीगुरुचरित्र हा ग्रंथ वेदांइतकाच मान्यता पावलेला आहे. स्त्रींयानी गुरूचरीत्राचे पारायण करू नये असे म्हणतात. पारायणासाठी ज्या गोष्टींचे पालन करायला लागते त्याचे पालनात स्त्रीधर्मामुळे खंड पडण्याची शक्यता असते. संकल्प-पूर्तीसाठी श्रीगुरुचरित्र-वाचनाची विवक्षित पद्धती आहे.
पण एक सांगा, जे करू नये तेच का आपल्याला करायचे असते. स्त्रियांनी स्त्रीधर्म पाळावा, पुरुषांनी पुरुष धर्म पाळावा, ते सोडून भलतीकडेच विषय नेण्याची सवय मात्र चांगली नव्हे. स्त्रियांवर मौंजी बंधन संस्कार, शास्त्राध्ययन अधिकार प्राप्ती झालेली नसते. त्यांच्या शरीरात असलेल्या अंड कोशाला बीज मंत्रांनी, मंत्राच्या सामर्थ्याने, उच्चारवाने आघात होवू शकतो.
स्त्रियांना मंत्राधिकार नसतात, संध्यावन्दनाचा अधिकार नसतो, मग संकल्प कसा सोडणार. यापूर्वी मी एकदा गुरुचरित्र वाचण्यापूर्वी सोडण्याचा संकल्प पोस्ट केला होता, तो वाचला की आपल्याला कळेल.
त्यांनी गुरुचरित्र ऐकावे, वाचू नये. तसेच सप्तशती देखील वाचू नये. शिवाय गुरुचरित्रातले काही अध्याय (२६ वेदरचना, ३६ कर्ममार्ग) हे अध्याय त्यांनी ऐकू देखील नये. त्यात काही बंध, मुद्रा, वैदिक बीजमंत्र आलेले आहेत.
स्त्रियांना बीजात्मक मंत्र सिद्ध करण्याचे अधिकार आणि सामर्थ्य नसते. पूर्वीच्या वैदिक स्त्रियांचे दाखले आजच्या कलियुगात चालत नाही, त्यांनी स्वत:ला सिद्ध केले होते. वैदिक काळात गार्गी, मैत्रेयी आदी स्त्रियांनी शास्त्रार्थामधील चर्चेत पुरुषांना देखील लाजविले होते. अध्ययन, सहशीक्षा या गोष्टीला वैदिक काळात प्रोत्साहन दिले जाण्याचेच हे दाखले आहेत.
हरित संहिताच्या अनुसार महिला दोन प्रकारच्या असतात, ब्रह्मवादिनी आणि सद्योवाह. यातल्या ब्रह्मवादिनी प्रकारच्या स्त्रियांनी शास्त्रानुसार सारे संस्कार काराबून त्या वेदाध्ययन करण्यास पत्र होत्या, त्या आजन्म ब्रह्मचारिणी राहिल्या होत्या. सद्योवाह स्त्रिया या गृहस्थाश्रमात राहून अनुरूप कर्मे करत होत्या. विशेष म्हणजे ब्रह्मवादिनी स्त्रियां शाम्भावोपाय दिक्षाधिकारी या पात्रतेतील होत्या. काव्य रचना, त्याग, त[अस्य द्वारा त्यांनी ऋषी भाव प्राप्त केलेला होता. त्यांना मंत्राचा साक्षात्कार झालेला होता.
त्यांनी ऋग्वेदातील अनेक सुक्त सिद्ध केले होते, साक्षात्कृत केले होते. उदाहरणार्थ,
ऋग्वेद दशम मंडळातले ३९, ४० वे सुक्त तपस्विनी ब्रह्मवादिनी घोषा यांचे आहे.
ऋग्वेदातील १.२७.७ वा मंत्र ऋषिका रोमशा यांचा आहे.
१.५.२९ वा मंत्र ऋषिका विश्वारा यांचा आहे.
१.१०.४५ व मंत्र दृष्टा इंद्राणी यांचा आहे.
१.१०१५९ व मंत्र ऋषिका अपाला यांचा आहे.
तसेच सूर्या नावाची देखील एक ब्रह्मवादिनी ऋषिका होती.
अगस्त्य ऋषी पत्नी लोपामुद्रा सती यांनी देखील आपल्या पती बरोबर सूक्तांचे दर्शन केले होते.
या वैदिक काळातील स्त्रियांनी यज्ञोपवीत संस्कार केले होते, त्या वेद, उपनिषद जनात होत्या. शास्त्रोक्त संध्या वंदनादी विधी करून त्या त्या देवता प्रसन्न करवून घेतल्या होत्या. जेव्हा हवे तेव्हा या स्त्रिया हव्या त्या देवतांना आवाहन करीत आणि देवता देखील क्षणाचाही विलंब न करता त्यांच्या सेवेत तत्पर असत, एवढा अधिकार त्यांनी मिळवला होता.
वेद काळातील अदिती, उषा, इंद्राणी, इला, सिनीवाली, प्रश्नि या सुप्रसिद्ध देवस्त्री, ब्रह्मर्षी, ऋषिका होत्या. यात अदिती या नावाचा उल्लेख सर्वाधिक झालेला आहे. या साऱ्या सर्वशक्तीमती, विश्वहितैषीणी तथा मंगलकारिणी देवी मानल्या गेल्या. यांच्या शिवाय दिति, सीता, सूर्या, वाक, सरस्वती यांचे देखील स्तवन होते.
निष्कर्ष: जर आजच्या काळात या अधिकारापर्यंत पोचण्याची क्षमता आणि शास्त्रसंमत विधिवत ज्ञानपिपासा असलेल्या अधिकारी स्त्रियांनी वेदशास्त्र अध्ययन करण्यास, गुरुचरित्र वाचण्यास, सप्तशती वाचण्यास काहीच हरकत नाही.
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
यावर आपले मत नोंदवा
मैत्रेयी महर्षी यज्ञावाल कल्य यांची पत्नी
दीक्षित स्वामी महाराजांनी तयार केलेली थोरल्या महाराजांची प्रश्नावली म्हणजे दत्त महाराजांची कृपा संपादित करून आपले मनोवांच्छित पूर्ण करण्याचा एक मार्ग . दीक्षित स्वामी महाराज हे याचे कर्ते असले तरी याला थोरल्या महाराजांची प्रश्नावली म्हणण्याचे कारण म्हणजे यातील सर्व उत्तरे हि थोरल्या महाराजांनी केलेल्या दत्त महाराजांच्या साहित्यावर आधारित आहेत . मनात असलेले सर्व काही दत्त महाराज देण्यास सिद्ध आहेत मात्र याकरिता साधन काय करावे ते या प्रश्नावलीद्वारे कळून येते .
प्रश्नावली हा प्रकार काही आजचा नाही. अगदी अनादी काळापासून अनेक प्रश्नावल्या अनेक साधु संतांकडून तयार केल्या गेल्या आणि त्याचा उपयोग आपल्या समस्यांचे निराकरण करण्याकरिता झाला . पण मग थेट साधू संतांचे मार्गदर्शन न घेता या प्रश्नावलीच्या निर्मितीमागचा काय उद्देश असावा ? प्रारब्ध योगे साधुसंतांची भेट होईलच असे नाही खेरीज पूर्वी प्रवास हा एक मोठा खडतर प्रकार होता .साधू संतांचा नित्य वेगवेगळ्या जागी मुक्काम असे आणि तिथपर्यंत जाऊन पोहोचणे अनेकदा शक्य नसे . पेक्षा हाताशी असे काही साधन असल्यास एखाद्या उपासनेने मनातील प्रश्न सुटल्यास उत्तम या विचाराने या प्रश्नावलींची निर्मिती झाली .
नेहेमी या प्रश्नावलीत काही साधन सांगितले असेलच असे नाही ,काही प्रश्नावलीत मनात इच्छिलेले कार्य होईल अथवा न होईल या अर्थी देखील उत्तर मिळत असे . प्राचीन प्रश्नावली पाहता तुलसीदासांच्या रामचरित मानस या ग्रंथावर आधारित एक प्रश्नावली आहे त्याला राम शलाका असे म्हटले जाते . यात प्रश्न पाहताना आलेल्या अक्षरापासून नववे अक्षर उत्तरादाखल घेतले जाते . यातील एखादे उत्तर पाहता -- सुनु सिय सत्य असीस हमारी। पूजिहि मन कामना तुम्हारी। रामचरित मानसाच्या बालकांडात सीतामाईला पार्वतीने दिलेला हा आशीर्वाद आहे अर्थात आशीर्वादपर चौपाई आहे . आता आलेल्या उत्तराचा अर्थ पाहू जाता ,मनात धरलेल्या प्रश्नाचे कार्य सिद्धीस जाईल असे उत्तर मिळते .
आता प्राचीन काळातील अनेक प्रश्नावल्या आणि थोरल्या महाराजांच्या प्रश्नावलीचा तुलनात्मक अभ्यास करता एक गोष्ट ठळकपणे लक्ष्यात येते . कोणती , तर दत्त महाराज हे मनातील कोणत्याही कामनेला नाही म्हणत नाहीत . इतर प्रश्नावलींप्रमाणे मनातील इच्छा पूर्ण होईल अथवा नाही हा प्रश्नच यात नाहीये . जे जे मनी इच्छावे ते ते भगवद्कृपे पावावे या वचनानुसार सर्व काही मिळणार आहे . मात्र त्याकरिता सांगितलेल्या उपासनेनंतर . या थोरल्या महाराजांच्या प्रश्नावलीत एकंदर अठरा उपासना रुपी उत्तरे सांगितली आहेत . अवश्य अनुभव घेऊन पाहावा . श्रीगुरुदेव दत्त !!!--- अभय आचार्य
Only business buss..
ADDRESS PLS
श्री गुरुदेव दत्त