Granthyatra
Granthyatra
  • 208
  • 288 201
ग्रंथयात्रा भाग १०२ - कॉलेज - छाया महाजन - कादंबरी (मराठी) College - Chhaya Mahajan - Novel
'कॉलेज' ही सध्याच्या महाविद्यालयीन वातावरणातील मूल्यहीनतेचा सर्वंकष आलेख मांडणारी एक महत्वाची कादंबरी आहे. शिक्षणाच्या क्षेत्रात जेव्हा नकारात्मक गुणांचा शिरकाव होते तेव्हा त्याचे काय परिणाम होतात त्याचा ही कादंबरी मागोवा घेते. या कादंबरीला महाराष्ट्र राज्य शासनाचा 'वि. स. खांडेकर पुरस्कार' (२००७) आणि स्वातंत्र्यसैनिक 'श्री विनायकराव चारठाणकर पुरस्कार' मिळाला आहे.
छाया महाजन यांनी साहित्य अकादमीच्या लिटररी डिक्शनरी साठी काम केले आहे आणि लोक अदालतसाठी त्या हाय कोर्टात मेंबर होत्या. वाराणसी विद्यापीठात त्या मेंबर ऑफ लॉर्ड्स होत्या.
#कॉलेज #आधुनिकमराठीकादंबरी #छायामहाजन #मराठवाडाविद्यापीठ #विद्यार्थी #प्राचार्य #शिक्षणक्षेत्र #महाविद्यालय #सुमतिसुखटणकर #आशावाकडे #रीमा #मराठीसाहित्य #मराठीपुस्तकं #ग्रंथयात्रा #ग्रंथमाला #हेवाचलंत? #अर्चनामिरजकर
Facebook: ArushiSinghMemorialTrust
Twitter: Archana_Mirajka
มุมมอง: 627

วีดีโอ

वृक्षवल्ली आम्हा सोयरी!
มุมมอง 1096 หลายเดือนก่อน
शिमल्याला गेल्यावर मॉलरोड, गव्हर्नर हाऊस, जाखो हिल या ठिकाणी तर सगळेच पर्यटक जातात. पण तुम्हाला जर निसर्गाच्या सान्निध्यात काही काल घालवायचा असेल, तर या स्थळाला नक्की भेट द्या. #शिमला #WaterCatchmentWildlifeSanctuary #निसर्ग
ग्रंथयात्रा भाग १०१ - माझा प्रवास - विष्णुभट गोडसे वरसईकर - रसग्रहण
มุมมอง 1.9K7 หลายเดือนก่อน
अठराशे सत्तावन्न साली एका साधारण परिस्थितीतील भिक्षुकाने केलेला प्रवास, त्या काळची समाज व्यवस्था, लोकांचे जीवनमान, त्या काळचा निसर्ग आणि भारताच्या पहिल्या स्वातंत्र्य लढ्याचा जवळून घेतलेला अनुभव यांचं मिश्रण या पुस्तकात आहे. त्या धुमश्चक्रीत सापडलेल्या सामान्य माणसाच्या जीवनाचं प्रतिबिंब म्हणून हे पुस्तक कसं महत्वाचं आहे ते पहा या व्हिडिओमध्ये. गोडसे गुरुजींचे वंशज मुकुंद गोडसे यांच्याकडून ऐका ...
ग्रंथयात्रा - एक झलक
มุมมอง 2208 หลายเดือนก่อน
कसे आहेत ग्रंथयात्रेचे व्हिडिओ? त्यात कोणत्या पुस्तकांबद्दल विवेचन आहे? कोणते तज्ञ त्यांत बोलले आहेत? तुम्हाला उत्सुकता आहे? पहा तर मग या छोट्याश्या व्हीडिओत या मालिकेची एक झलक! #ग्रंथयात्रा #मराठीसाहित्य #मराठीपुस्तकं #१००पुस्तकं #अर्चनामिरजकर Facebook: ArushiSinghMemorialTrust Twitter: Archana_Mirajka
भूतान - हिमालयाच्या कुशीत वसलेला देश
มุมมอง 838 หลายเดือนก่อน
सृष्टिसौंदर्याने नटलेला, बौद्ध धर्माचा आध्यात्मिक वारसा जपणारा आणि संस्कृतिक परंपरांना जोपासणारा देश असं भूतान या देशाचं वर्णन करता येईल. या देशातील भ्रमंतीची काही क्षणचित्रे आणि तिथे भेटलेल्या एका वादकाची छोटी मुलाखत. #येताजाता #भूतान #निसर्ग #तत्क्संगलखांग #टायगर्सनेस्ट #पुनाखा #पारो #थिंफू #भ्रमंती #प्रवास #संगीत #नृत्य
ग्रंथयात्रा शताब्दीपूर्ती सोहळा
มุมมอง 2179 หลายเดือนก่อน
ग्रंथयात्रा मालिकेचे १०० भाग पूर्ण झाल्याच्या निमित्ताने प्रसिद्ध लेखक आणि भारताचे माजी राजदूत ज्ञानेश्वर मुळे यांनी ग्रंथयात्रेच्या सादरकर्त्या आणि लेखिका अर्चना मिरजकर यांची १२ एप्रिल २०२४ रोजी घेतलेली मुलाखत. मराठी साहित्याच्या ग्रंथयात्रेच्या माध्यमातून केलेल्या या प्रवासात आलेले विविध अनुभव मिरजकर यांनी या मुलाखतीत संगितले. #ग्रंथयात्रा #मराठीसाहित्य #मराठीपुस्तकं #१००पुस्तकं #ग्रंथमाला #अ...
Granthyatra Episode 100 - Udya - A novel by Nanda Khare (English)
มุมมอง 1589 หลายเดือนก่อน
This novel explores the rapid pace of technological developments , their effects on the lives of humans and the changes that it brings about in the value systems. At the same time, it also peers into the future and warns the humanity about the possible dangers that it could face. Watch this video to know how the writer provides the readers with a glimpse of the power play between those who will...
ग्रंथयात्रा भाग १०० - उद्या - नंदा खरे - कादंबरी Udya - novel by Nanda Khare (मराठी)
มุมมอง 9349 หลายเดือนก่อน
नंदा खरे यांची 'उद्या' ही कादंबरी प्रचंड वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाचा आणि त्यामुळे मूल्य संस्कृतीत होणाऱ्या परिवर्तनाचा वेध घेते. त्याचबरोबर भविष्यात डोकावून धोक्याचा इशाराही देते. ज्याच्या हातात तंत्रज्ञानाची किल्ली असेल ती व्यक्ति किंवा समूह इतर माणसांवर कशी सत्ता गाजवेल याची एक झलक लेखक या कादंबरीत कशी प्रस्तुत करतात ते पहा या व्हिडिओमध्ये. प्राध्यापक मोना चिमोटे यांच्याकडून ऐका 'उद्या' या...
Granthyatra episode 99 - Ashi vel - collection of short stories by Sania - an appreciation (English)
มุมมอง 24610 หลายเดือนก่อน
Sania’s stories feature patriarchal family structures prevalent in our society and women who oppose this structure and advocate women’s empowerment. Watch this video to learn how protagonists in these stories think of themselves as individuals, Listen to Dr. Vandana Bokil Kulkarni to understand how the writer portrays these themes with sensitivity. #Sania #AshiVel #ShortStories #ModernMarathiSh...
ग्रंथयात्रा भाग ९९ - अशी वेळ - सानिया - कथासंग्रह - रसग्रहण Ashi vel - short stories - Sania (मराठी)
มุมมอง 52510 หลายเดือนก่อน
सानिया यांच्या कथांमध्ये विषमतेवर आधारित पुरुषसत्ताक कुटुंबरचना आणि त्याविरुद्ध स्त्रीस्वातंत्र्याचा विचार अधोरेखित करणार्‍या स्त्रियांचे चित्रण दिसते. त्यांच्या कथांच्या नायिका स्वतःबद्दल एक व्यक्ति म्हणून कसा विचार करतात ते पहा या व्हिडिओमध्ये. डॉक्टर वंदना बोकील कुलकर्णी यांच्याकडून ऐका त्यांच्या संवेदनशील लेखनाची वैशिष्ट्ये. #सानिया #अशीवेळ #कथासंग्रह #आधुनिकमराठीकथा #मराठीसाहित्य #प्रेमाचं...
नवी दिल्ली जागतिक पुस्तक प्रदर्शन २०२४
มุมมอง 7910 หลายเดือนก่อน
फेब्रुवारी २०२४मध्ये भरलेल्या नवी दिल्ली जागतिक पुस्तक प्रदर्शनाची एक झलक. #पुस्तकप्रदर्शन #worldbookfair2024 #Books #Readers #AuthorsCorner
उद्यानातील संगीत
มุมมอง 7210 หลายเดือนก่อน
दिल्लीच्या नेहरू उद्यानात फिरताना ऐकलेले स्वर्गीय संगीत - पंडित नित्यानंद हल्दिपुर यांचे बासरी वादन आणि उस्ताद शाहिद परवेझ यांचे सतार वादन. #NehruPark #Delhi #MusicInThePark #spicmacay #flute #NityanandHaldipur #Sitar #ShahidParvez
Granthyatra Episode 98 - Aarpaar layeet pranantik - Pradnya Daya Pawar - An appreciation
มุมมอง 13210 หลายเดือนก่อน
This poem is an ode to artist Vithabai Bhau Mang Narayangawkar. It explores the tradition of social inequality, the lives of Dalit women and life itself through the life struggles of this artist. Watch this video to understand how the poet explains through this poem why the tragedy in the life of Vithabai was not just her personal tragedy but a consequence of the caste system, the class system ...
ग्रंथयात्रा भाग ९८ - आरपार लयीत प्राणांतिक - प्रज्ञा पवार - रसग्रहण Aarpaar layeet pranantik (मराठी)
มุมมอง 50710 หลายเดือนก่อน
ही दीर्घ कविता विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर नावाच्या कलावतीला उद्देशून लिहिलेली आहे. त्यांच्या आयुष्यातील संघर्षाच्या आधारे सामाजिक विषमतेच्या परंपरांचा, दलित स्त्रियांच्या जीवनाचा आणि त्याद्वारे एकूणच मानवी जीवनाचा मागोवा घेणारी ही कविता आहे. या कलावतीच्या आयुष्याची शोकांतिका ही केवळ एक व्यक्तिगत शोकांतिका नाही तर त्यासाठी जातिव्यवस्था, वर्गव्यवस्था आणि पुरुषसत्ताक परंपरा कारणीभूत आहे हे सत्य ...
Granthyatra Episode 97 - Marwa - short stories by Asha Bage - an appreciation (English)
มุมมอง 13711 หลายเดือนก่อน
Stories in the book 'Marwa' deftly capture fleeting emotions or irrational feelings of its characters and especially, reflections of women’s minds. Watch this video to understand how writer Asha Bage depicts experiences that go beyond the frames of cliched plots. Listen to Prof. Madan Kulkarni to understand the innovative use of musical references in these stories. #Marwa #AshaBage #ModernShort...
ग्रंथयात्रा भाग ९७ - मारवा - आशा बगे यांचा कथासंग्रह - रसग्रहण (मराठी) Marwa by Asha Bage
มุมมอง 66611 หลายเดือนก่อน
ग्रंथयात्रा भाग ९७ - मारवा - आशा बगे यांचा कथासंग्रह - रसग्रहण (मराठी) Marwa by Asha Bage
Granthyatra Episode 96 - Chitralipi - Poetry by Vasant Abaji Dahake
มุมมอง 153ปีที่แล้ว
Granthyatra Episode 96 - Chitralipi - Poetry by Vasant Abaji Dahake
ग्रंथयात्रा भाग ९६ - चित्रलिपी - वसंत आबाजी डहाके (मराठी) Chitralipi by Vasant Abaji Dahake
มุมมอง 709ปีที่แล้ว
ग्रंथयात्रा भाग ९६ - चित्रलिपी - वसंत आबाजी डहाके (मराठी) Chitralipi by Vasant Abaji Dahake
Granthyatra Episode 95 - Gahire Pani - Ratnakar Matkari (English)
มุมมอง 198ปีที่แล้ว
Granthyatra Episode 95 - Gahire Pani - Ratnakar Matkari (English)
ग्रंथयात्रा भाग ९५ - गहिरे पाणी - रत्नाकर मतकरी (मराठी) - Gahire Pani - Ratnakar Matkari (Marathi)
มุมมอง 721ปีที่แล้ว
ग्रंथयात्रा भाग ९५ - गहिरे पाणी - रत्नाकर मतकरी (मराठी) - Gahire Pani - Ratnakar Matkari (Marathi)
Granthyatra Episode 94 - Zadazadati - A novel by Vishwas Patil - An appreciation (English)
มุมมอง 478ปีที่แล้ว
Granthyatra Episode 94 - Zadazadati - A novel by Vishwas Patil - An appreciation (English)
ग्रंथयात्रा भाग ९४ - झाडाझडती - विश्वास पाटील-कादंबरी - रसग्रहण (मराठी) Zadazadati - Vishwas Patil
มุมมอง 3Kปีที่แล้ว
ग्रंथयात्रा भाग ९४ - झाडाझडती - विश्वास पाटील-कादंबरी - रसग्रहण (मराठी) Zadazadati - Vishwas Patil
Granthyatra Episode 93 - Samagra Streesukta - Ashwini Dhongde - An appreciation
มุมมอง 133ปีที่แล้ว
Granthyatra Episode 93 - Samagra Streesukta - Ashwini Dhongde - An appreciation
ग्रंथयात्रा भाग ९३ - समग्र स्त्रीसूक्त - अश्विनी धोंगडे - रसग्रहण Samgra Streesukta - (Marathi)
มุมมอง 667ปีที่แล้ว
ग्रंथयात्रा भाग ९३ - समग्र स्त्रीसूक्त - अश्विनी धोंगडे - रसग्रहण Samgra Streesukta - (Marathi)
Granthyatra Episode 92 - Chaundaka - A novel by Rajan Gawas - An appreciation
มุมมอง 131ปีที่แล้ว
Granthyatra Episode 92 - Chaundaka - A novel by Rajan Gawas - An appreciation
ग्रंथयात्रा भाग ९२ - चौंडकं - राजन गवस-कादंबरी - रसग्रहण (मराठी) Chaundaka by Rajan Gawas (Marathi)
มุมมอง 800ปีที่แล้ว
ग्रंथयात्रा भाग ९२ - चौंडकं - राजन गवस-कादंबरी - रसग्रहण (मराठी) Chaundaka by Rajan Gawas (Marathi)
Granthyatra Episode 91 - Elgar - Gazals by Suresh Bhat - An appreciation
มุมมอง 165ปีที่แล้ว
Granthyatra Episode 91 - Elgar - Gazals by Suresh Bhat - An appreciation
ग्रंथयात्रा भाग ९१ - एल्गार - सुरेश भट यांची गझल - रसग्रहण (मराठी) Elgar - Gazals by Suresh Bhat
มุมมอง 665ปีที่แล้ว
ग्रंथयात्रा भाग ९१ - एल्गार - सुरेश भट यांची गझल - रसग्रहण (मराठी) Elgar - Gazals by Suresh Bhat
ग्रंथयात्रा भाग ९० - घर हरवलेली माणसं - व पु काळे - रसग्रहण Ghar haravaleli manasa Va Pu Kale मराठी
มุมมอง 969ปีที่แล้ว
ग्रंथयात्रा भाग ९० - घर हरवलेली माणसं - व पु काळे - रसग्रहण Ghar haravaleli manasa Va Pu Kale मराठी
Granthyatra Episode 90 - Ghar haravaleli manasa - V P Kale - an appreciation (English)
มุมมอง 247ปีที่แล้ว
Granthyatra Episode 90 - Ghar haravaleli manasa - V P Kale - an appreciation (English)

ความคิดเห็น

  • @somnathparsekar
    @somnathparsekar 6 วันที่ผ่านมา

    अभ्यासपूर्ण निवेदन🎉🎉

  • @AannataMagar
    @AannataMagar 22 วันที่ผ่านมา

    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👌👌👌

  • @1915164
    @1915164 26 วันที่ผ่านมา

    धन्यवाद , दोन वेळा हे नाटक बघितले तरी समजले नव्हते , अनेकांना विचारले थीम बद्द्ल तरी कुणी उत्तर देत नव्हते , आता कळू लागले नाटक ,धन्यवाद

  • @ajitjoshi4415
    @ajitjoshi4415 29 วันที่ผ่านมา

    अर्चनाताई, अतिशय समर्पक विवेचनातून महत्वांच्या ग्रंथांची ओळख करून देणारा आपला हा उपक्रम अंत्यत स्तुत्य आहे. मनापासून धन्यवाद. मी आपण प्रस्तुत केलेले सगळे भाग अवश्य ऐकेल आणि इतरांनाही त्याबद्दल नक्कीच सुचवेल.

  • @mendgudlisdaughter1871
    @mendgudlisdaughter1871 29 วันที่ผ่านมา

    खूप छान कविता ऐकवल्या. मला आमच्या ११वीच्या मराठीच्या तासाची ाठवण झाली. एका कवितेसाठी आमच्या बाईंनी अख्खे मर्ढेकर शिकवले होते. १९७५. तेव्हापासून मी मर्ढेकरांची फॅन. क्षमा मागते. पण पोरसवदा चा उच्चार : पोर-सवदा असा करायचा. पोरस-वदा नाही. आणखीही एकदोन उच्चार आहेत पुन्हा ऐकताना सांगीन.

  • @surajmahajan5418
    @surajmahajan5418 หลายเดือนก่อน

    अभिराम भडकामकर यांची असा बालगंधर्व ह्या चरित्र कादंबरी ची समीक्षा करा

  • @narendrasalunke646
    @narendrasalunke646 หลายเดือนก่อน

    अत्यंत सुंदर माहिती 🙏🌹

  • @narendrasalunke646
    @narendrasalunke646 หลายเดือนก่อน

    खूपच छान 👌🌹 'म्हाइंभटी शिक्षापण' असा एक पाठ होता आम्हाला शिकायला.

  • @narendrasalunke646
    @narendrasalunke646 หลายเดือนก่อน

    खूप छान 👌🌹

  • @jayashreepol3835
    @jayashreepol3835 หลายเดือนก่อน

    खुप छान मर्ढेकरांच्या कविता मलाही अतिशय आवडतात अजुन येतो वास फुलांना..

  • @vishwanathsutar5670
    @vishwanathsutar5670 หลายเดือนก่อน

    सुंदर...

  • @shaileshpkem80
    @shaileshpkem80 หลายเดือนก่อน

    इतिहासातील ( महाभारतातील) "खलनायकाला" नायक बनवण्याचे कसब या कादंबरीने केले आहे....हजारो लोकांना भ्रमित केले आहे...

  • @rahulwakti4248
    @rahulwakti4248 2 หลายเดือนก่อน

    Nice explanation ❤

  • @jayashreepol3835
    @jayashreepol3835 2 หลายเดือนก่อน

    खुप छान पद्मा गोळे व इंदिरा संत यांचे काव्यसंग्रह मला B.A ला अभ्यासास होते 😊

  • @ashishdesai5790
    @ashishdesai5790 2 หลายเดือนก่อน

    मला कादंबरी 1 ल्या भागापासून ऐकायची आहे.🎉

  • @dnihits4284
    @dnihits4284 2 หลายเดือนก่อน

    अप्रतिम

  • @Meetwa11
    @Meetwa11 2 หลายเดือนก่อน

    मॅडम "दुस्तर हा घाट आणि थांग " व "मुक्काम " या कादंबऱ्यांचे सखोल विश्लेषण करा प्लीज.

  • @nileshshingade3576
    @nileshshingade3576 2 หลายเดือนก่อน

    ययाति पसायदान तुकाराम गाथा एकनाथी भागवत उत्कृष्ट विचार मानवी जीवन जगण्याचे मार्गदर्शन या श्रेष्ठ लोकांनी नुसतेच आपल्या महाराष्ट्र ल दिशा श्रीमंती दिली नाहि तर सर्व मानव जातीला दिशा दिली आहे हिच आपली महाराष्ट्र माती ची शिकवण सद्गुण सदाचार चांगुलपणा ज्ञान दृष्टी विवेक बुद्धि विचार शक्ती

  • @nitinmirajkar828
    @nitinmirajkar828 3 หลายเดือนก่อน

    अतिशय सुंदर विवेचन.

  • @pratikpatil4641
    @pratikpatil4641 3 หลายเดือนก่อน

    Editing level 🙌🏻

  • @vilasmane3581
    @vilasmane3581 3 หลายเดือนก่อน

    Very nice

  • @dr.navnathgore2900
    @dr.navnathgore2900 3 หลายเดือนก่อน

    खूप छान सादरीकरण , आशयसूत्र , भाषाशैली , कथानक , पात्रांची स्वभाव व भावविश्वाची जाणीव... समकालीन वैश्विक राजकीय , सामाजिक तसेच सांस्कृतिक पर्यावरण यांची मूलभूत चर्चा... विवेचनामुळे वाचकांची उत्कटता निश्चितच वाढीस लागते..... अभिनंदन.....!!!

  • @padmajakulkarni1968
    @padmajakulkarni1968 3 หลายเดือนก่อน

    Kavita chanaahet

  • @NitinHajare-u4r
    @NitinHajare-u4r 3 หลายเดือนก่อน

    Khup chan apratim v pudhil kryas shubhechha

  • @dipaliainapure6406
    @dipaliainapure6406 3 หลายเดือนก่อน

    हे इनामदार, मिरजकर, रेलेकर यांचे पुस्तक आहे का?

  • @ravindrachangan6428
    @ravindrachangan6428 3 หลายเดือนก่อน

    कॉलेज काळात ही कादंबरी वाचावयास मिळाली असती तर जीवन नक्कीच बदलून गेले असते परंतु ही कादंबरी उशिरा हातात आली नंतर वाचतच राहिलो सतत वाचत राहील मेवाड यांचे सर्व कादंबऱ्या आधाशी पानान वाचून काढल्या अतिशय ग्रेट

    • @Granthyatra
      @Granthyatra 3 หลายเดือนก่อน

      उत्तम साहित्याचा नमुना म्हणून गाजलेली कादंबरी. अनेकांना त्यात स्वतःच्या जीवनाचे प्रतिबिंब जाणवले आहे.

  • @ravindrachangan6428
    @ravindrachangan6428 3 หลายเดือนก่อน

    कॉलेज काळात

  • @jyotikamble5841
    @jyotikamble5841 3 หลายเดือนก่อน

    22,23 वर्षापूर्वी वाचलेल पुस्तक आजून चांगल लक्षात आहे पुस्तकात आणखीन बरच आहे पुस्तकात छोटस एक तर्फी प्रेम तुतारीतून 😂शिव्या घालणे कळतनकळत वाचताना डोळ्यात पाणी येत हे पुस्तक वाचल्यावर तुम्ही विसरणार नाही नेहमी लक्षात राहील

  • @uttara.kulkarni6790
    @uttara.kulkarni6790 3 หลายเดือนก่อน

    खूप खूप अभिनंदन

  • @krantikasvankar2382
    @krantikasvankar2382 3 หลายเดือนก่อน

    शतकपूर्ती बद्द्ल खूप खूप शुभेच्छा 💐

    • @Granthyatra
      @Granthyatra 3 หลายเดือนก่อน

      धन्यवाद

  • @bharatmahaan2991
    @bharatmahaan2991 3 หลายเดือนก่อน

    Uttam.

  • @engineer3447
    @engineer3447 3 หลายเดือนก่อน

    Video starts @2:30

  • @bharatmahaan2991
    @bharatmahaan2991 4 หลายเดือนก่อน

    गडकरी ते गडकरीच... एकच प्याला या नाटकाचं मी अनेकदा सस्वर वाचन केलं आणि प्रत्येक वेळी त्यातून काहीतरी नवीन शिकायला मिळालं...

  • @2m561
    @2m561 4 หลายเดือนก่อน

    खुपच छान

  • @bharatmahaan2991
    @bharatmahaan2991 4 หลายเดือนก่อน

    उत्तम

  • @peregrineauto1094
    @peregrineauto1094 4 หลายเดือนก่อน

    मर्ढेकर नवकवितेचे जनक कसे? केशवसुत हे नवकवितेचे जनक मी ऐकले वाचले होते. प्लिज सांगावे.

    • @Granthyatra
      @Granthyatra 4 หลายเดือนก่อน

      केशवसुत हे नवकवितेचे जनक आहेतच. म्हणजे मध्ययुगीन मराठी कवितेचे त्यांनी आधुनिकीकरण केले. कवितेला आत्मनिष्ठ, नव्या अनुभवांची आणि नव्या भावनांची साक्षी केले. परंतु त्यानंतरच्या, विशेषतः दुसर्‍या जागतिक महायुद्धानंतरच्या काळात माणसाला जे उध्वस्त जगणे अनुभवाला येत होते, जीवनातील मूल्ये हरवल्याने जो यांत्रिकिपणा आला होता, त्याची अभिव्यक्ती करणारी आधुनिक कविता मर्ढेकरांनी लिहीली. म्हणजे केशवसुतांनी मराठी कवितेचे पहिले आधुनिकीकरण केले तर मर्ढेकरांनी काही दशकांनंतर दुसरे आधुनिकीकरण केले असे म्हणता येईल.

  • @kamalakarpisolkar7007
    @kamalakarpisolkar7007 4 หลายเดือนก่อน

    गोडसे भटजींचे माझा प्रवास मी वाचले आहे. त्या काळात वाहनांची सोय नसतांना, लांबचा प्रवास केला, हे खूप खूप अभिनंदनीय आहे. त्यावर श्री.मुकुंद गोडसेंनी भाष्य चांगले केले आहे. त्यांचेही अभिनंदन.

  • @kedardandekar5794
    @kedardandekar5794 4 หลายเดือนก่อน

    Very nice video. Plz also rasagrahan of natak amaldar

  • @ramwshwarghatol1704
    @ramwshwarghatol1704 4 หลายเดือนก่อน

    छान सुंदर सुरेख हे आमचे भाग्य आम्हाला आपण ऐकायला मिळालात ❤️

  • @ramwshwarghatol1704
    @ramwshwarghatol1704 4 หลายเดือนก่อน

    खूप सुरेख निवेदन मराठी भाषेचा अभिमान वाटावा अशी वाणी ❤❤❤❤😊

  • @ramwshwarghatol1704
    @ramwshwarghatol1704 4 หลายเดือนก่อน

    अप्रतिम सादरीकरण ❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @parabsainath
    @parabsainath 4 หลายเดือนก่อน

    book that changed my life.

  • @amareshveerapur2715
    @amareshveerapur2715 4 หลายเดือนก่อน

    Many imformation informed. Thank you mam.

  • @ruturajranpise2930
    @ruturajranpise2930 4 หลายเดือนก่อน

    Ma'am you should do audiobook, I'm just crying 😅

  • @meghachandorkar2611
    @meghachandorkar2611 4 หลายเดือนก่อน

    खूप आवडेल कथा ऐकायला प्राचीन कथा❤❤❤❤

  • @SuperDakshata
    @SuperDakshata 4 หลายเดือนก่อน

    दोन ध्रुव वि. स. खांडेकर सामिक्ष करावी

  • @jyotikadu6278
    @jyotikadu6278 4 หลายเดือนก่อน

    खूप छान विषयावर आज माहिती ऐकायला मिळाली .धन्यवाद अर्चना ताई❤🙏

  • @MadhavNimkar-w4x
    @MadhavNimkar-w4x 4 หลายเดือนก่อน

    शुद्ध स्वच्छ स्वर ऐकायला खूप आनंद मिळतो

  • @vinayakyadav3241
    @vinayakyadav3241 4 หลายเดือนก่อน

    th-cam.com/video/_SlMX4wFMD4/w-d-xo.htmlsi=7l3ziqADqby3uFOD

  • @vinayakyadav3241
    @vinayakyadav3241 4 หลายเดือนก่อน

    th-cam.com/video/_SlMX4wFMD4/w-d-xo.htmlsi=7l3ziqADqby3uFOD