Adhyatma Vishesh
Adhyatma Vishesh
  • 100
  • 53 851
S2:E14 - पांडवांचे धर्माचरण | #marathipodcasts #krishna #mahabharat #hindugod #pandav #kauravas
S2:E14 - पांडवांचे धर्माचरण | Pandava's Righteousness
महाभारतातील अनेक प्रसंगांमध्ये पदोपदी पांडवांवर काय काय संकटे ओढावली, त्यांना कोण कोणत्या समस्यांना तोंड द्यावं लागलं, श्रीकृष्ण नेमका पांडवांच्या बाजूने का उभा राहिला असेल, या सारख्या अनेक प्रश्नांवरची अनुपम आणि अंबर यांच्यातील ही रंगतदार चर्चा ऐकूयात एपिसोड नंबर १४ मध्ये !
तुमच्या प्रतिक्रिया, विचार आणि अभिप्राय आम्हाला Comments मधून कळवायला विसरू नका !
Please Like, Share and Subscribe to @AdhyatmaVishesh
|| जय श्रीकृष्ण ||
तुम्ही आम्हांला Spotify अथवा TH-cam कुठेही ऐकू शकता,
त्यासाठी फक्त search मध्ये जाऊन type करा,
Adhyatma Vishesh Podcast
Instagram: adhyatmavishesh...
Facebook : profile.php?...
adhyatmik podcast , marathi podcast motivation , marathi katha , adhyatma yog , krishna advice , spiritual podcast , mahabharat katha
มุมมอง: 338

วีดีโอ

S2:E13 श्रीकृष्ण आणि वैदिक धर्म | Shri Krishna & Vedic Dharma #krishna #marathipodcast #mahabharat
มุมมอง 42814 วันที่ผ่านมา
S2:E13 - श्रीकृष्ण आणि वैदिक धर्म | Shri Krishna & Vedic Dharma श्रीकृष्णाने इंद्राचे वर्चस्व का आणि कसे कमी केले! चारही युगात परमात्मा प्राप्तीसाठीचा कोणता मार्ग सर्वात प्रशस्त असा होता! श्रीकृष्णाचे बाह्य रूप कसे होते, त्याची आयुर्मर्यादा नक्की किती होती या सारखे अनेक मुद्दे चर्चिले गेले आहेत एपिसोड नंबर १३ मध्ये. ऐकूयात Season 2, Episode 13 - श्रीकृष्ण आणि वैदिक धर्म ! तुमच्या प्रतिक्रिया, व...
S2:E12 - श्रीकृष्णाचा दृष्टीकोन | Shrikrishnacha Drishtikon #marathipodcast #krishna #mahabharata
มุมมอง 1K21 วันที่ผ่านมา
S2:E12 - श्रीकृष्णाचा दृष्टीकोन | Shrikrishnacha Drishtikon जन्माच्या पहिल्या क्षणापासून ते शेवटपर्यंत श्रीकृष्णांना विविध समस्यांना सामोरे जावे लागले, अनेक मोठ-मोठी संकटे त्यांच्यावर कोसळत राहिली, तरीही प्रत्येक समस्येला ते हसतमुखाने आणि चतुराईने सामोरे गेले. या एपिसोड मध्ये ऐकुयात श्रीकृष्णांच्या दृष्टीकोनाबद्दल! तुमच्या प्रतिक्रिया, विचार आणि अभिप्राय आम्हाला Comments मधून कळवायला विसरू नका ...
देवा तूचि गणेशू | #गणपती_विसर्जन #गणपती #मराठीपॉडकास्ट #गणपतीबाप्पामोरया #ganpativisarjan
มุมมอง 17928 วันที่ผ่านมา
गणपती बाप्पांचे आगमन झाले आणि बघता बघता दहा दिवस कसे सरले समजलेही नाही! बाप्पांच्या आगमनापासून ते त्यांच्या निरोपाच्या वेळेपर्यंतचा हा प्रवास! पंचातत्वांच्या साक्षीने सुरु झालेला हा प्रवास...त्यांच्यातच विलीन होताना पाहुयात ज्ञानोबा माऊलींच्या गणेश स्तवनाच्या पठणासोबत! गणपती बाप्पा मोरया! तुमच्या प्रतिक्रिया, विचार आणि अभिप्राय आम्हाला Comments मधून कळवायला विसरू नका ! Please Like, Share and Su...
गणपती अथर्वशीर्ष | Ganpati Atharvashirsha #ganpatibappamorya #atharvashirsha #अथर्वशीर्ष
มุมมอง 407หลายเดือนก่อน
अथर्वशीर्ष | Atharvashirsha गणपती बाप्पांच्या आगमनानंतर सर्वत्र आनंदी-आनंद पसरलेला आहे, रोज नवनवीन पद्धतीने आपण गणरायाला प्रसन्न करण्याच्या प्रयत्नात आहोत. त्याचाच एक भाग म्हणून आज ऐकूयात श्री गणपती अथर्वशीर्ष ! तुमच्या प्रतिक्रिया, विचार आणि अभिप्राय आम्हाला Comments मधून कळवायला विसरू नका ! Please Like, Share and Subscribe to @adhyatmavishesh || जय श्रीकृष्ण || तुम्ही आम्हांला Spotify अथवा TH...
|| कृष्णजन्माष्टमी विशेष || #krishnajanmashtami2024 #krishnajanmashtami #krishnajanmashtamispecial
มุมมอง 990หลายเดือนก่อน
कृष्णजन्माष्टमी विशेष श्रावणाचा पवित्र महिना, कृष्ण पक्ष आणि अष्टमीची तिथ, मध्यरात्री ठीक बारा वाजता रोहिणी नक्षत्रावर भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाला. इहलोकी अवतरण्याच्या पहिल्या क्षणापासून आपल्या अतीबलाचे आणि सामर्थ्याचे लीला प्रकटन करत, योगसामर्थ्याने संपूर्ण सृष्टीवर अधिराज्य गाजवणारा परमेश्वर स्वरूप योगयोगेश्वर कृष्ण आज अवतार घेता झाला ! || कृष्णजन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा || || जय श्रीक...
S2:E11 - Vrindavan and Beyond | #marathipodcast #vivekananda #ramkrishnaparamhansa #govardhanparvat
มุมมอง 4152 หลายเดือนก่อน
Season 2 : श्रीकृष्णार्पणमस्तु Episode No 11 : Vrindavan and Beyond स्वामी विवेकानंद आणि त्यांचे गुरुदेव रामकृष्ण परमहंस यांचे वृंदावनातील गोपिकांबद्दलचे मत काय होते ! रामकृष्ण परमहंस अचानक समाधीत कसे जायचे आणि भगवान श्रीकृष्णांच्या सोळा कलांपैकी काही कला यांच्या बद्दल ऐकूयात एपिसोड नंबर ११ मध्ये ! तुमच्या प्रतिक्रिया, विचार आणि अभिप्राय आम्हाला Comments मधून कळवायला विसरू नका ! Please Like, Sh...
S2:E10 - वृंदावनातील गोपिकांचे रहस्य - भाग २ | #vrindavandham #marathipodcast #brajdhaam #govardhan
มุมมอง 4302 หลายเดือนก่อน
S2:E10 - वृंदावनातील गोपिकांचे रहस्य - भाग २ | #vrindavandham #marathipodcast #brajdhaam #govardhan
S2:E9 - वृंदावनातील गोपिकांचे रहस्य - भाग 1 | #marathipodcast #vrundavan #brajdham #vrindavandham
มุมมอง 1.5K2 หลายเดือนก่อน
S2:E9 - वृंदावनातील गोपिकांचे रहस्य - भाग 1 | #marathipodcast #vrundavan #brajdham #vrindavandham
Haripath | हरिपाठ #haripath #हरिपाठ #vitthal #vithhal #ashadhiekadashispecial #abhangmarathi
มุมมอง 1K2 หลายเดือนก่อน
Haripath | हरिपाठ #haripath #हरिपाठ #vitthal #vithhal #ashadhiekadashispecial #abhangmarathi
S2:E8- टाइम ट्रॅव्हल आणि ब्रह्मलोक | Time Travel and Brahma Lok #marathipodcast #timetravel #bhagwat
มุมมอง 1.1K3 หลายเดือนก่อน
S2:E8- टाइम ट्रॅव्हल आणि ब्रह्मलोक | Time Travel and Brahma Lok #marathipodcast #timetravel #bhagwat
क्वांटम मेकॅनिक्स आणि उपनिषद | Quantum Mechanics and Upanishad #marathipodcast #upanishad #quantum
มุมมอง 6K3 หลายเดือนก่อน
क्वांटम मेकॅनिक्स आणि उपनिषद | Quantum Mechanics and Upanishad #marathipodcast #upanishad #quantum
S2:E6 - श्रीकृष्णाचे विश्वरूप | Shrikrishnache Vishwaroop
มุมมอง 5393 หลายเดือนก่อน
S2:E6 - श्रीकृष्णाचे विश्वरूप | Shrikrishnache Vishwaroop
S2:E5 - शरण मज येणे गा | Sharan Maz Yene Gaa #marathipodcast #mahabharat #adhyatma #krishna
มุมมอง 4074 หลายเดือนก่อน
S2:E5 - शरण मज येणे गा | Sharan Maz Yene Gaa #marathipodcast #mahabharat #adhyatma #krishna
S2:E4 - १६ कलांनी युक्त, पूर्णावतार श्रीकृष्ण | #marathipodcast #adhyatma #krishna #mahabharat
มุมมอง 1K4 หลายเดือนก่อน
S2:E4 - १६ कलांनी युक्त, पूर्णावतार श्रीकृष्ण | #marathipodcast #adhyatma #krishna #mahabharat
S2:E3 - ऐका | Aaika #krishna #mahabharat #marathipodcast
มุมมอง 8805 หลายเดือนก่อน
S2:E3 - ऐका | Aaika #krishna #mahabharat #marathipodcast
S2:E2 - श्रीकृष्ण, एक न संपणारा विषय | ShriKrishna, Ek Na Sampnara Vishay #marathipodcast #krishna
มุมมอง 8545 หลายเดือนก่อน
S2:E2 - श्रीकृष्ण, एक न संपणारा विषय | ShriKrishna, Ek Na Sampnara Vishay #marathipodcast #krishna
S2:E1 - श्रीकृष्ण आणि विवेकानंद | Shri Krishna and Vivekananda #marathipodcast #vivekananda #krishna
มุมมอง 1.4K5 หลายเดือนก่อน
S2:E1 - श्रीकृष्ण आणि विवेकानंद | Shri Krishna and Vivekananda #marathipodcast #vivekananda #krishna
Shri Ram Raksha Stotram | श्री रामरक्षा स्तोत्रम्
มุมมอง 9K8 หลายเดือนก่อน
Shri Ram Raksha Stotram | श्री रामरक्षा स्तोत्रम्
S1:E14 - श्रीकृष्णार्पणमस्तु | Shrikrishnarpanamastu #krishna #mahabharat #marathipodcast
มุมมอง 36410 หลายเดือนก่อน
S1:E14 - श्रीकृष्णार्पणमस्तु | Shrikrishnarpanamastu #krishna #mahabharat #marathipodcast
S1:E13 - श्रीकृष्ण स्मित करतो | Shrikrishna Smit Karto #krishna #mahabharat #podcast
มุมมอง 35411 หลายเดือนก่อน
S1:E13 - श्रीकृष्ण स्मित करतो | Shrikrishna Smit Karto #krishna #mahabharat #podcast
S1:E12 - श्रीकृष्ण आणि अखंड सावधानता | Shri Krishna ani Akhand Savdhanta #krishna #podcast #hindu
มุมมอง 420ปีที่แล้ว
S1:E12 - श्रीकृष्ण आणि अखंड सावधानता | Shri Krishna ani Akhand Savdhanta #krishna #podcast #hindu
S1:E11 - श्रीकृष्ण आणि योगी अरविंद | Shrikrishna and Yogi Aurobindo #krishna #mahabharat #podcasts
มุมมอง 681ปีที่แล้ว
S1:E11 - श्रीकृष्ण आणि योगी अरविंद | Shrikrishna and Yogi Aurobindo #krishna #mahabharat #podcasts
S1: E10 - 'अन् नवरस प्रगटले' | Ani Navras Pragatale
มุมมอง 235ปีที่แล้ว
S1: E10 - 'अन् नवरस प्रगटले' | Ani Navras Pragatale
S1:E9 : 'कहाणी जरासंध वधाची' | Kahani Jarasandh Vadhachi
มุมมอง 212ปีที่แล้ว
S1:E9 : 'कहाणी जरासंध वधाची' | Kahani Jarasandh Vadhachi
S1:E8 - 'राजधुरंधर श्रीकृष्ण' | Rajdhurandhar Shrikrishna
มุมมอง 255ปีที่แล้ว
S1:E8 - 'राजधुरंधर श्रीकृष्ण' | Rajdhurandhar Shrikrishna
S1:E7 : 'योगयोगेश्वर श्रीकृष्ण' | Yogyogeshwar Shri Krishna
มุมมอง 251ปีที่แล้ว
S1:E7 : 'योगयोगेश्वर श्रीकृष्ण' | Yogyogeshwar Shri Krishna
S1:E6 - 'श्रीकृष्ण जन्माचे रहस्य' | Shrikrishna Janmache Rahasya
มุมมอง 311ปีที่แล้ว
S1:E6 - 'श्रीकृष्ण जन्माचे रहस्य' | Shrikrishna Janmache Rahasya
S1:E5 - 'अवतरति इति अवतारः' | Avatarati Iti Avatarah
มุมมอง 335ปีที่แล้ว
S1:E5 - 'अवतरति इति अवतारः' | Avatarati Iti Avatarah
S1:E4 - 'सौंदर्याचे खरे स्वरूप' Soundaryache Khare Swarup
มุมมอง 415ปีที่แล้ว
S1:E4 - 'सौंदर्याचे खरे स्वरूप' Soundaryache Khare Swarup

ความคิดเห็น

  • @snehaldixit7493
    @snehaldixit7493 วันที่ผ่านมา

    Kay sundar charcha..... Vishay suchtatat kase itke sunder tumhala

    • @AdhyatmaVishesh
      @AdhyatmaVishesh 11 ชั่วโมงที่ผ่านมา

      नमस्कार, इतक्या सुंदर कमेंट साठी पाहिले तर खूप खूप धन्यवाद ! अगदी खरं सांगायचं तर योगेश्वर श्रीकृष्ण हा विषयच इतका मोठा आणि असीम आहे की त्यांच्या चारित्र्याच्या डोहात एकदा उडी घेतली की मग कितीही खोल शिरा पण तळ काही लागत नाही! श्रीकृष्ण ह्या नामाचा महिमाच असा आहे !! आपण असेच अभिप्राय आम्हाला नेहमी कळवत रहा !! जय श्रीकृष्ण - अंबर

  • @WokingAddict
    @WokingAddict 2 วันที่ผ่านมา

    जय श्रीकृष्ण

    • @AdhyatmaVishesh
      @AdhyatmaVishesh 11 ชั่วโมงที่ผ่านมา

      जय श्रीकृष्ण !!

  • @PradnyaJoshi-e2c
    @PradnyaJoshi-e2c 2 วันที่ผ่านมา

    Jay Shri Krishna 🙏🏻

    • @AdhyatmaVishesh
      @AdhyatmaVishesh 2 วันที่ผ่านมา

      जय श्रीकृष्ण 🙏🏻

  • @kanchanmande461
    @kanchanmande461 2 วันที่ผ่านมา

    श्रीरामकृष्णांचे अखेरचे शब्द - the one who came as Rama, the one who came as Krishna, oh Vivekananda, is standing before you as Ramakrishna. श्रीरामकृष्णांच्या 'Gospel'मध्ये हे नोंदलेले आहे. हे भारताचे ऐश्वर्य !

    • @AdhyatmaVishesh
      @AdhyatmaVishesh 2 วันที่ผ่านมา

      नमस्कार, क्या बात है !! अतिशय समर्पक आणि exact शब्दात मांडलेत तुम्ही !! मलाही हे वाचल्याचे आठवते! If I'm not wrong...रामकृष्ण परमहंसांच्या अखेरच्या क्षणात, जस्ट काही सेकंदांकरिता स्वामी विवेकनंदांच्या मनात असा विचार आला की हे खरेच देव आहेत का ? हे खरेच अवतारी पुरुष आहेत का, अगदी काही सेकंदच फक्त आणि तेवढ्यात, रामकृष्ण विवेकानंदांना उद्देशून म्हणाले की, ' अरे नरेन, अजूनही शंका घेतोस!! तेंव्हाचा तो राम आणि तो कृष्ण, तोच हा रामकृष्ण !! ' बरोबर का ?? आपणही हा प्रसंग वाचला आहात का ? माझ्या आठवणी ताज्या केल्याबद्दल आणि या अतिशय सुंदर कमेंट बद्दल तुमचे किती आभार मानावेत !! खरेच मनापासून धन्यवाद !! आपले अभिप्राय आणि विचार असेच वाचत राहायला आवडतील!! जय श्रीकृष्ण ! - अंबर

    • @AdhyatmaVishesh
      @AdhyatmaVishesh 2 วันที่ผ่านมา

      आणि आपण एकदमच योग्य म्हणालात, हे भारताचे खरे ऐश्वर्या !!

  • @kanchanmande461
    @kanchanmande461 2 วันที่ผ่านมา

    खूप छान संवाद साधलात. कृष्णा म्हणजे द्रौपदी हे अगदी योग्य.

    • @AdhyatmaVishesh
      @AdhyatmaVishesh 2 วันที่ผ่านมา

      खूप खूप धन्यवाद !! तुम्हाला एपिसोड आवडला हे जाणून आनंद झाला ! अभिप्राय दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद ! कृष्णा म्हणजे द्रौपदी 👌🏻 जय श्रीकृष्ण - अंबर

  • @sourabhnphadke
    @sourabhnphadke 7 วันที่ผ่านมา

    Dr Gauri Moghe has a fantastic video on Draupadi. At the time of Draupadivastraharan everyone talks stuff about Dharma. Dharma this, Dharma that. But ShriKrishna went through all this bullshit like a hot knife through butter and destroys their misconceptions about Dharma - through Gita and his own actions. तत्वांना, मूढ चालिरीतींना कवटाळत निष्पाप लोकांच छळ करण हा धर्म नव्हे!

    • @AdhyatmaVishesh
      @AdhyatmaVishesh 6 วันที่ผ่านมา

      नमस्कार, काय सुंदर कमेंट केली आहे आपण, अतिशय समर्पक, उत्तम आणि योग्य शब्दात मांडले आहे, मला फारच आवडले आपले म्हणणे! अगदीच खरं आहे, त्या भर सभेत प्रत्येक जण आपापल्या मनातील योग्य-अयोग्य काय याच्या परिसिमांना कवटाळून जे घडतंय ते मुकपणाने पहात राहिला पण त्यावर काहीही कृती करू शकला नाही! फक्त एकमेव योगेश्वर श्रीकृष्णाने तिथे हजर राहून आपल्या Actions ने धर्माचा अर्थ सार्थ केला... आणि हेच तो सबंध जीवनभर ही करत आला आहे, प्रत्येक क्षणी आपल्या कृतीने...आपल्या जगण्याने तो धर्म म्हणजे काय याचा खरा अर्थ उलगडत आला आहे, बाकीचे निव्वळ confusion स्थितीत मार्गक्रमण करीत राहिले !! - अंबर

    • @AdhyatmaVishesh
      @AdhyatmaVishesh 6 วันที่ผ่านมา

      Shrikrishna went through all this like a hot knife through butter... क्या बात है !! फारच सुंदर! इतक्या छान अभिप्रायासाठी आपले मनःपूर्वक धन्यवाद ! आमच्या इतर एपिसोड्सचे श्री कृष्णांच्याच जीवनावरील विषय आणि त्यावरच्या आपल्या प्रतिक्रीया ही आम्हाला जाणून घ्यायला खूप आवडतील !! जय श्रीकृष्ण - अंबर

    • @sourabhnphadke
      @sourabhnphadke 6 วันที่ผ่านมา

      @@AdhyatmaVishesh धन्यवाद! तुम्ही पुढचा विषय म्हणून प्रभू श्रीराम घ्याल का? त्यांच्या चरीत्राचा ऊहापोह तुम्हा दोन अभ्यासकांकडून ऐकायचाय

    • @AdhyatmaVishesh
      @AdhyatmaVishesh 6 วันที่ผ่านมา

      धन्यवाद, खूप छान सूचना आहे, आम्ही नक्कीच प्रयत्न करू 🙏🏻😇 - अंबर

  • @ashwinidaphal3009
    @ashwinidaphal3009 9 วันที่ผ่านมา

    या सिझनचा latest episode आज ऐकून झाला. कमाल काम करत आहात दोघेही. श्रीकृष्णाचे व्यक्तीमत्व बहिर्मुखी वाटत असले तरी त्याच्या बरोबर घडणारे प्रसंग आपल्याला अंतर्मुख करून जातात. वरकरणी ते स्वतः बहिर्मुख वाटत असले तरी ते अंतर्मुख व्यक्तीमत्व वाटतात मला. लहानपनापासूनच श्रीकृष्णाच्या मनावरही बरेच आघात झाले तरीही ते काही डगमगले नाही खडतर प्रवास करूनही आजूबाजूच्या व्यक्तींना सकारात्मक दृष्टिकोन, मार्गदर्शन देत राहिले. किती जबरदस्त positive aura असलेली व्यक्ती असेल श्रीकृष्ण. मला फार फार कौतुक वाटते त्यांचे सुरुवातीपासून शेवटपर्यंत द्रोपदीची साथ दिली तिचा प्रवासही खडतर आहे हे ते जाणून होते त्यामुळेच कदाचित पदोपदी सावलीसारखे तिच्याबरोबर होते. तुम्हा दोघांना अनेक शुभेच्छा पुढील वाटचालीस . आपण मी केलेल्या कमेंट्सना खूप छान छान सविस्तर रिप्लाय दिलेत, त्याबद्दल खूप खूप आभारी दोघांचीही 🙏 कमेंट्सरुपी दिर्घ चर्चा झाली अस म्हणू शकतो , म्हणजे आपण समोरासमोर चर्चा केली असे वाटून गेले 😀 पुढच्या भागाची प्रतिक्षा असेल.All the very best. दोघेही काळजी घ्या . जय श्री कृष्ण 😇🙏

  • @ashwinidaphal3009
    @ashwinidaphal3009 9 วันที่ผ่านมา

    छानच episode ✨👌👌 गोपिकाना रागही यायचा कान्हाने खोड्या केल्या की आणि यशोदामाताने त्याला ओरडा दिला की त्याची गोपी साईडही घ्यायला यायच्या ही ही एक लीलाच म्हणावी लागेल. सर्वांनाच हवाहवासा वाटणारा श्रीकृष्ण 😊 निधीवनाबद्दल ऐकून आहे इच्छाही आहे तिकडे जायची बघुयात कधी योग येतो ते..

  • @avinashkale1261
    @avinashkale1261 10 วันที่ผ่านมา

    फक्त दर्जा👌👌

    • @AdhyatmaVishesh
      @AdhyatmaVishesh 10 วันที่ผ่านมา

      नमस्कार, खूप खूप धन्यवाद! 🙏🏻 आपल्याला एपिसोड आवडला हे जाणून खूप आनंद झाला !! आपले अभिप्राय आम्हाला असेच कळवत रहा !! जय श्रीकृष्ण !! - अंबर

    • @avinashkale1261
      @avinashkale1261 10 วันที่ผ่านมา

      @@AdhyatmaVishesh जय श्रीकृष्ण!!!

  • @sourabhnphadke
    @sourabhnphadke 12 วันที่ผ่านมา

    मस्त आहात रे तुम्ही . गप्पा मारायला आवडेल तुमच्याबरोबर. काव्यशास्त्रविनोद करताच येत नाही.

    • @AdhyatmaVishesh
      @AdhyatmaVishesh 11 วันที่ผ่านมา

      खूप खूप धन्यवाद !! आम्हालाही खरेच आवडेल तुमच्याशी गप्पा मारायला!! जय श्रीकृष्ण 🙏🏻😇

  • @smitakolhapure9984
    @smitakolhapure9984 12 วันที่ผ่านมา

    खुप छान

    • @AdhyatmaVishesh
      @AdhyatmaVishesh 12 วันที่ผ่านมา

      नमस्कार, तुम्हाला एपिसोड आवडला हे जाणून खूप छान वाटले ! प्रतिक्रिया कळविल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻 जय श्रीकृष्ण !!

  • @ashwinidaphal3009
    @ashwinidaphal3009 13 วันที่ผ่านมา

    खूप छान झाला हा episode ✨👌👌 पूर्वी म्हणजे मी जेव्हा स्त्रीवादी विचारसरणीतून ते चित्र पाहिले होते की श्रीकृष्ण कसे त्यांचे कपडे लपवून ठेवतो वैगेरे तेव्हा मला ते अजिबात पटले नव्हते. तेव्हा मी श्रीकृष्ण भक्तही नव्हते.त्यामुळे तर काही वेगळ्याच अर्थाने ते चित्र ग्रास्प झाले होते जसे तुम्ही उल्लेख केला छेड काढल्यासारखे.आज त्यामागची गोष्ट समजली त्यामागे व्रत होते असेही नव्याने कळाले . श्रीकृष्णांचे जग खूप वेगळे आहे. प्रत्येक घटनेमागे काही अर्थ दडला आहे जो समजून घेण्यासाठी अध्यात्माच्या जगात यावेच लागते. पॉडकास्टमध्ये व्रताची गोष्ट सांगताना जसा उल्लेख केला खाण्याच्या बाबतीत लोकांचे चॉईसेस असतात की हे नाही आवडत किंवा ते नाही आवडत. कित्येकदा पाहण्यात येते की लोकांना अमुक एक पदार्थ आवडतो म्हणून पोटाचा विचार न करता जिभेचा विचार करतात. so हे मानवी मनावर ताबा नसल्याचे लक्षण असते तीच व्रतामागची संकल्पना असू शकते की मनावर कंट्रोल यावा सर्वर्थानेच. माझ्यासाठी वृंदावनातील गोपिकाविषयीची माहिती नवीनच होती, नवीन काहीतरी ऐकायला मिळाले. खूप खूप शुभेच्छा आणि आभार या episode करिता 😊 जय श्री कृष्ण 🙏

    • @AdhyatmaVishesh
      @AdhyatmaVishesh 13 วันที่ผ่านมา

      नमस्कार अश्विनीजी...वाह, काय सुंदर आणि in-detailed अभिप्राय दिला आहे तुम्ही! जशी तुम्हाला पुढचे एपिसोड्स ऐकायची उत्सुकता असते तसेच आता आम्हालाही प्रत्येक पुढच्या एपिसोड वर तुमचे इतके विचारपूर्वक, detailed आणि अभ्यासपूर्ण लिहिलेले अभिप्राय वाचायची उत्सुकता असते !! खूप खूप धन्यवाद !! श्रीकृष्णांच्या नावाचे गारूड असे की संपता संपत नाही ! अनुपमजिंना तुमच्या या कमेंटचा रिप्लाय द्यायला नक्की सांगतो. जय श्रीकृष्ण !! - अंबर

    • @ashwinidaphal3009
      @ashwinidaphal3009 12 วันที่ผ่านมา

      ​@@AdhyatmaVisheshनमस्कार आणि सुप्रभात अंबरजी 😊 काय छान positive रिप्लाय वाचायला मिळाला तुमचा, मस्तच! पोडकास्टच अर्थपूर्ण आणि माहितीपूर्ण असतात की मग आपसूक उत्सुकता लागून राहते.. अजून एक तुमच्या दोघात कमालीचे भारी ट्युनिंग आहे मग अजूनच भारी वाटते ऐकायला. दोघांचे आवाज युनिक आहेत I mean त्यात एक वेगळीच शांतता आहे. अजिबात घाई गडबड करत नाही दोघे बोलताना काय पोहचवायचे आहे श्रोत्यांपर्यंत ते अगदी सहजपणे सांगून जाता. नक्की अनुपमजींनी रिप्लाय दिला तरी भारी वाटेल , तेही रिप्लाय उदाहरणासहित देतात त्यामुळे वाचायला आणखी छान वाटते योगेश्वर श्री कृष्ण महाराज की जय!!

    • @AdhyatmaVishesh
      @AdhyatmaVishesh 10 วันที่ผ่านมา

      @@ashwinidaphal3009 हे अगदी बरोबर बोललात. आपण आज इतक्या स्थूल बुद्धीचे झालेलो आहोत, (आपण सगळेच बरंका) आजची सिस्टम च आपल्याला अजून स्थूल आणि समर्थांच्या शब्दात पढतमूर्ख बनवत आहे, की कृष्णाच्या लीलांकडे आपण विकल्पाशिवाय बघूच शकत नाही. पण आपलं कौतुक वाटलं, की आपण पहिल्यांदा पटलं नसलं तरीही ह्या लीलेमागील विचार, अर्थ समजून घेतलात. मला निश्चित वाटतं हा त्या भगवंताचाच आशीर्वाद आहे, की आपल्याला सद्बुद्धि होते. कात्यायनी व्रत काम्य भावाने गोपी करत असल्याने त्यांचा अहं भाव पूर्ण नष्ट करायचं काम कृष्णानी केलं. वरून, ह्या भागात आपण पाहिलं की हे सगळे गोपी पूर्व जन्मींचे ऋषि, तपस्वी होते. Male female are very shallow material constructs when we start thinking about stuff like केवल अद्वैत. स्त्री पुरुष, कमी ज्यास्ती, सुख दुःख हे सगळे भेद गळून पडतात... तेथे संग निःसंग दोन्ही न राहे!! हे खरच समजून आपण घेत आहात, आपल्याला 🙏🙏🌻 -अनुपम

    • @ashwinidaphal3009
      @ashwinidaphal3009 10 วันที่ผ่านมา

      @@AdhyatmaVishesh as usual अभ्यासपूर्ण रिप्लाय दिलात त्याबद्दल खूप खूप आभार आपले आणि सहमत आहे आपल्या मताशी🙏 कात्यायनि महामाये महायोगिन्यधीश्वरि । नन्द गोपसुतं देविपतिं मे कुरु ते नमः। असा हा मंत्र याच व्रताचा भाग असावा आजही विवाहेच्छुक तरुणींना सांगितला जातो. आणि हो कृष्णांची इच्छा म्हणूनच ही सर्व माहिती माझ्यासमोर आली त्यासाठी तुम्ही दोघेही माध्यम झालात अस वाटले🙂

    • @AdhyatmaVishesh
      @AdhyatmaVishesh 9 วันที่ผ่านมา

      Thank You So Much अश्विनीजी ! खूप छान वाटले तुमचे सगळेच responses वाचून! तुम्हाला पुढील प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा आणि All The Best !! जय श्रीकृष्ण 🙏🏻😇 - अंबर

  • @kanchanmande461
    @kanchanmande461 14 วันที่ผ่านมา

    खूप सुरेख कार्यक्रम. मनापासून करता हे जाणवते व छान वाटते. मनःपूर्वक शुभेच्छा. फक्त एक सुचवावेसे वाटते - पहिल्या सत्रातील 'श्रीकृष्ण स्मित करतो'या तेराव्या भागात सांगितलेली ओवी ज्ञानेश्वरीतील असून ती पुढीलप्रमाणे आहे - अगा जया जें विहित | तें ईश्वराचें मनोगत | म्हणौनि केलिया निभ्रांत | सांपडेचि तो ||ज्ञानेश्वरी - १८-९११|| 0:24

    • @AdhyatmaVishesh
      @AdhyatmaVishesh 13 วันที่ผ่านมา

      नमस्कार, तुम्हाला आमचे एपिसोड्स आवडताहेत हे जाणून फारच आनंद झाला, त्यासाठी मनःपूर्वक धन्यवाद ! आमचे इतरही एपिसोड्स तुम्हाला आवडतील अशी आशा आहे, तुमचे अभिप्राय असेच नक्की कळवत रहा, आम्ही त्यात आमच्या परीने सुधारणा करत राहण्याचा प्रयत्न करू !! ज्ञानेश्वरीतील इतकी सुंदर ओवी इथे नमूद केल्याबद्दल खूप खूप आभार! जय श्रीकृष्ण !! - अंबर

  • @ashwinidaphal3009
    @ashwinidaphal3009 14 วันที่ผ่านมา

    ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय हरी विठ्ठल हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे हरे राम हरे राम राम राम हरे हरे 🙏🌺

    • @AdhyatmaVishesh
      @AdhyatmaVishesh 13 วันที่ผ่านมา

      जय जय रामकृष्ण हरी! जय हरी विठ्ठल ! पंढरीनाथ महाराज की जय ! गोपाल कृष्ण भगवान की जय !

  • @ashwinidaphal3009
    @ashwinidaphal3009 15 วันที่ผ่านมา

    काय सुंदर एपिसोड होता हा..Amazing ✨👌

    • @AdhyatmaVishesh
      @AdhyatmaVishesh 15 วันที่ผ่านมา

      नमस्कार, अश्विनीजी खूप खूप आभार !! आपण आठव्या एपिसोड पर्यंत पोहोचलात सुद्धा...almost latest एपिसोड पर्यंत आलाच आता!! एपिसोड आवडला हे जाणून खूप छान वाटले ! जय श्रीकृष्ण 🙏🏻😇 - अंबर

    • @ashwinidaphal3009
      @ashwinidaphal3009 14 วันที่ผ่านมา

      ​​@@AdhyatmaVishesh नमस्ते 😊 होय almost latest episode पर्यंत आले. Hope परवा पर्यंत ऐकून होतील. आत्ता I guess 13 वा भाग रिलीज झाला आहे second season चा. ऐकते आता ते अनुपमजी फार छान श्रीकृष्णांना संबोधतात योगेश्वर श्रीकृष्ण महाराज की जय 😇🙏

    • @AdhyatmaVishesh
      @AdhyatmaVishesh 13 วันที่ผ่านมา

      @@ashwinidaphal3009 वाह, आपण एवढं catch up करताय म्हणजे आता आम्हाला धावायला सुरुवात केली पाहिजे वाटतं! 😄 खूप खूप धन्यवाद!!! योगेश्वर श्रीकृष्ण महाराज की ✊✊ -अनुपम

  • @ashwinidaphal3009
    @ashwinidaphal3009 16 วันที่ผ่านมา

    "जितके सूक्ष्म होत जाऊ तितके आपण व्यापक होत जातो" काय क्लास बोलून गेला आहात आपण पॉडकास्टच्या सुरवातीला.. भारीच 👌✨ जिथे काही नाही तिथे ब्रम्ह आहे हेही खूप डीप वाक्य.. Everything in the universe is within you. Ask all from yourself- असा हा रुमीचा कोट आठवला या पॉडकास्ट मधली चर्चा ऐकून. म्हणजे जे बाहेर आहे तेच आपल्या आतही आहे फार intresting वाटते हे मला. या पॉडकास्टचा टायटलही क्वांटम मॅकानिक्स आणि उपनिषदे हे पण किती इनट्रेस्टिंग आहे .Scientists ना शोध लागायच्या आधीपासूनच आपल्याकडे लिहून ठेवलेले आहे.कितीतरी शास्त्रज्ञ याचा reference घेताना दिसतात. अफाट आहे सगळ. भारी वाटला हा एपिसोड ऐकून too good 👌👌✨ तुमच्या दोघांचेही कौतुक कारण तुम्ही नुसतीच चर्चा नाही अभ्यासपूर्ण चर्चा करत आहात. माहितीपर चर्चा. मस्तच.

  • @WokingAddict
    @WokingAddict 16 วันที่ผ่านมา

    गोपाल कृष्ण भगवान की जय !

    • @AdhyatmaVishesh
      @AdhyatmaVishesh 16 วันที่ผ่านมา

      गोपाळ कृष्ण महाराज कि जय जय श्रीकृष्ण !!

  • @rajeshjangam7540
    @rajeshjangam7540 16 วันที่ผ่านมา

    उत्तम विवेचन ! धन्यवाद !

    • @AdhyatmaVishesh
      @AdhyatmaVishesh 16 วันที่ผ่านมา

      नमस्कार, तुम्हाला आमचा एपिसोड आवडला हे जाणून खूप छान वाटले, मनःपूर्वक धन्यवाद !! आमचे season १ आणि season २ चे इतरही एपिसोडस तुम्हाला आवडतील अशी अशा आहे. तुमच्या कंमेंट्सची प्रतीक्षा असेल जय श्रीकृष्ण ! - अंबर

  • @radhadeshpande1664
    @radhadeshpande1664 18 วันที่ผ่านมา

    Mazya 7 varshachya mulala tumche videos nakki dakhavnare ..faar changle sanskar hotil ...apratim vaani aahe tumchi

    • @AdhyatmaVishesh
      @AdhyatmaVishesh 13 วันที่ผ่านมา

      तुम्हाला एपिसोड आवडला हे जाणून फार आनंद झाला, तुमच्या मुलाला व्हिडिओज आवडतात का हे जाणून घ्यायला आम्हाला फार आवडेल! मनःपूर्वक धन्यवाद !! आमचे इतरही एपिसोड्स जरूर ऐका आणि आम्हाला अभिप्राय नक्की कळवत रहा ! जय श्रीकृष्ण !

  • @pratikshelake6341
    @pratikshelake6341 19 วันที่ผ่านมา

    khup mast....ek vegalya drushtine sangitla...mala phar aavdal...plz be continue.....aani me subscribe karat aahe...

    • @AdhyatmaVishesh
      @AdhyatmaVishesh 17 วันที่ผ่านมา

      नमस्कार, तुम्हाला आमचा एपिसोड आवडला हे जाणून खूप आनंद झाला....कमेंट केल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद, आमचे इतरही एपिसोड्स तुम्हाला ऐकायला आवडतील अशी आशा आहे !! तुमचे विचार आणि अभिप्राय ऐकायला आम्हाला खूप आवडतील. जय श्रीकृष्ण 🙏🏻 - अंबर

    • @AdhyatmaVishesh
      @AdhyatmaVishesh 14 วันที่ผ่านมา

      Khup khup dhanyavad! Tumhala avadla he aikun khup bara vatla! Tumhi tumchya olkhit adhyatma madhye interest aslele koni astil, tar tyanna hi avasshya pathva. Marathi lokanparyant, vishesh karun yuvaa paryant hi charcha pohochvaychi ahe, ani aplya madhye adhyatmik discussions suru vhavet ashi iccha ahe! ।। श्रोते तुम्ही महेशाची मूर्ती।। -Anupam

  • @kirtijoshi74
    @kirtijoshi74 21 วันที่ผ่านมา

    Mata Devaki la Shrikrishna parat kadhi bhetla hota ka? Devki Ani Vasudev yancha shevat kasa zala?

    • @AdhyatmaVishesh
      @AdhyatmaVishesh 14 วันที่ผ่านมา

      देवकी वासुदेवांना कृष्ण बलरामानी कंसाच्या तावडीतून सोडवलं, तेव्हा भेट झाली. 12-13 वर्षांनी. अवतारसमाप्ति चा अतिशय emotional प्रसंग आहे, वाचताना डोळ्यात पाणी येतं. वासुदेव आणि देवकी होते जेव्हा श्रीकृष्णाने देह ठेवला. ही वार्ता कळल्यावर अर्जुन तातडीने आला, शोक सुरू होता... आणि भगवंत, आपलं लेकरू वैष्णव तेजात विलीन झालं हे ऐकून वसुदेवांनीही देह ठेवला. सकाळी शोकाचा सागर उठला, आणि देवकी सकट त्यांच्या राण्या सती गेल्या. (महाभारत, मुसळ पर्व, अध्याय 2-6 मला वाटतं.) जय श्रीकृष्ण!!!! -अनुपम

  • @ashwinidaphal3009
    @ashwinidaphal3009 21 วันที่ผ่านมา

    अर्जुनाचे जशी स्थिती झाली होती तशीच त्या रणांगणात पितामह भीष्म यांचीही स्थिती पाहायला मिळते. म्हणजे कृष्ण जेव्हा पितामहांना सांगतात की मी कुणी यदुवंशी नाही, मानवही नाही. मी परब्रम्ह आहे त्यानंतर भिष्मांची जी काही स्थिती होते ती सुद्धा वेगळीच पाहायला मिळते. तिथेच त्यांचा अहं भाव जो असतो की ते धर्मच्या मार्गाने कसे जीवन जगलो तो गळून पडतो कारण श्रीकृष्णद्वारा सांगितले जाते प्रसंगी तुम्ही चुकलात ज्याला तुम्ही धर्म म्हणत होतात काही प्रसंगी मोठी व्यक्ती म्हणून एक स्टॅण्ड घ्यायला हवा होता अस काहीसे. बाकी श्रीकृष्ण सुरवाती पासुन ते शेवट पर्यंत द्रोपदीला साथ दिली आहे ते फार कमाल वाटते. हळवी व्यक्ती ते सारथी मार्गदर्शक अशा टोकाच्या भूमिका पेलवल्या श्रीकृष्णांनी यानेच मला थक्क व्हायला होते की काय उंचीची व्यक्तिम्त्व होते ते. As usual भारी होता episode ✨👌👌 जय श्री कृष्ण!

  • @eknathjadhav7364
    @eknathjadhav7364 21 วันที่ผ่านมา

    छान 🙏

    • @AdhyatmaVishesh
      @AdhyatmaVishesh 21 วันที่ผ่านมา

      मनःपूर्वक धन्यवाद !! जय श्रीकृष्ण !! 🙏🏻😇

  • @ashwinidaphal3009
    @ashwinidaphal3009 22 วันที่ผ่านมา

    भावनांचा तू भुकेला रे मुरारी भावभोळया भक्तिची ही एकतारी भावनांचा तू भुकेला रे मुरारी काजळी रात्रीस होसी तूच तारा वादळी नौकेस होसी तू किनारा मी तशी आले तुझ्या ही आज दारी भाबडी दासी जनी गाताच गाणी दाटुनी आले तुझ्या डोळ्यांत पाणी भक्तिचा भक्तिचा वेडा असा तू चक्रधारी ही लताजींनी गायलेली रचना इथे पॉडकास्ट ऐकून आठवली. अंबरजींनी ऑडियोमध्ये रामकृष्ण परमहंस यांचे उदाहरण दिले यात एक लक्षात येते जितके आपण त्या परमात्म्याप्रति भाव उत्कट करून त्याला शरण जातो किंवा surrender होतो तितके आपण त्याच्या जवळ जातो I mean एकदा का शरण गेलात की तो त्याचे रूप दाखवायला सुरुवात करतो. हा अनुभव अगदीच personal असू शकतो त्यामुळे myth वाटण्याचे कारण नाही.spiritual जगात भावनांना खूप महत्व आहे त्याशिवाय आपण त्या परमात्म्यापर्यंत पोहचू शकत नाही. आपली भक्ती त्याच्यापर्यंत पोहचली की त्यालाही आपला लळा लागल्याशिवाय राहत नाही. तो जो counciousnes असतो तिथंपर्यंत जाण्याचा प्रयत्न जरी केला ना तरी हा जन्म सार्थकी लागल्यासारखे होईल. बाकी पूर्वीचे संत मंडळी होते त्यांचा ऑरा जो होता अहंकारविरहित त्यामुळे त्यांना भगवंतापर्यंत पोहचता आले असे मला वाटते.

  • @mukundbhujbal8222
    @mukundbhujbal8222 23 วันที่ผ่านมา

    वा, सुंदर विवेचन !

    • @AdhyatmaVishesh
      @AdhyatmaVishesh 23 วันที่ผ่านมา

      मनःपूर्वक धन्यवाद!! जय श्रीकृष्ण 🙏🏻

    • @AdhyatmaVishesh
      @AdhyatmaVishesh 14 วันที่ผ่านมา

      खूप खूप धन्यवाद sir. जय श्री कृष्ण -अनुपम

  • @smitakolhapure9984
    @smitakolhapure9984 25 วันที่ผ่านมา

    खूप छान ...मंत्रमुग्ध..खूप प्रसन्न वाटले 😊

    • @AdhyatmaVishesh
      @AdhyatmaVishesh 24 วันที่ผ่านมา

      मनःपूर्वक धन्यवाद जय श्रीकृष्ण !!

  • @neelawalawalkar9889
    @neelawalawalkar9889 28 วันที่ผ่านมา

    अतिशय विलोभनीय दर्शन...तुझे स्तोत्र पठणही श्रवणीय ..प्रत्यक्ष दर्शन घडवलेस 🎉

    • @AdhyatmaVishesh
      @AdhyatmaVishesh 27 วันที่ผ่านมา

      खूप खूप धन्यवाद!! 🙏🙏

  • @ashwinidaphal3009
    @ashwinidaphal3009 หลายเดือนก่อน

    रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा ! गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा ! या सुरेश भटांच्या दोन ओळीसारखे होते श्रीकृष्ण जय श्री कृष्ण 🙏😇

    • @AdhyatmaVishesh
      @AdhyatmaVishesh 26 วันที่ผ่านมา

      नमस्कार,सुरेश भटांच्या ओळी खूपंच सुंदर आणि समर्पक आहेत! श्रीकृष्णांच्या जीवनाला त्या एकदम परफेक्ट जुळून येतात असे वाटते. तुम्ही खूप छान analogy जुळवलीत ! मला वाटतं श्रीकृष्ण ह्यांचे स्वतःचे जीवन म्हणजेही निष्काम कर्मयोगाचा एक प्रॅक्टिकलचा क्लासंच होता. त्यांनी समस्त जगातला, आपले उपदेश स्वतःच जागून दाखवले ! तुम्ही म्हणालात तसं, रंगात रंगुनी साऱ्या रंग माझा वेगळा!! सगळ्यात असूनंही कश्यातंच नाही ! हीच श्रीकृष्णांनी खासियत आणि वेगळेपण! जय श्रीकृष्ण!! तुम्ही तुमच्या वेळेनुसार आणि सवडीनुसार शांतपणे एक-एक एपिसोड लक्ष देऊन ऐकत आहात आणि अगदी समर्पक अश्या प्रतिक्रीया नोंदवत आहात त्या साठी तुमचे विशेष कौतुक आणि आभार ! - अंबर

    • @ashwinidaphal3009
      @ashwinidaphal3009 22 วันที่ผ่านมา

      @@AdhyatmaVishesh किती छान रिप्लाय दिला आहे अंबरजी. अगदी खरे म्हणालात श्रीकृष्णांनी निष्काम कर्मयोग जगुन दाखवला. तसेच गीतेतून सांगितलेले अध्याय श्लोक व्यक्तीच्या कुठल्याही समस्येचे सोल्युशन लगेच मिळूनही जाते. व्यक्ती कुठल्याही पिढीची असोत गीतेतले द्यान त्याच्या आयुष्याशी relate करू शकतो.. जय श्री कृष्ण!!

    • @AdhyatmaVishesh
      @AdhyatmaVishesh 16 วันที่ผ่านมา

      'व्यक्ती कुठल्याही पिढीची असोत गीतेतले द्यान त्याच्या आयुष्याशी relate करू शकतो'..... अतिशय उत्तम आणि खरे आहे तुमचे म्हणणे !! तुम्ही म्हणालात तसेच काहीसे मीही ऐकले होते, मी असे ऐकले आहे, पूर्वी असे म्हणायचे कि एखाद्याच्या आयुष्यात एखादी समस्या आली असेल आणि त्याला त्याचे समाधानकारक solution मिळत नसेल तर...त्याने सहज भगवद गीता उघडावी आणि जे पान समोर असेल तो श्लोक वाचावा...त्याच्या समस्येचे समाधान त्याला त्यात मिळतेच मिळते !! हे खरेच किती Amazing आहे ना !! जय श्रीकृष्ण ! - अंबर

  • @ashwinidaphal3009
    @ashwinidaphal3009 หลายเดือนก่อน

    चित्त सावधान असेल कीच कृष्ण भेटतो त्याला काय सांगायचे आहे हे आपल्याला कळून जाते. त्यामुळे भक्ताकडे ऐकण्याची कला असली पाहिजे. ते अध्यात्मात सांगितले जातेच ना की मी पणा सोडला तर भगवंत सापडतो अस काहीसे. थोडक्यात तुम्हीं यात जसे म्हणालात माझे हे माझे ते हा मटेरियल माईंडसेट सोडला तर आपल्याला साथ द्यायला श्रीकृष्ण तयारच असतात. श्री कृष्णांना काय सांगायचे आहे हे एकदा का समजले की माणसाचे आयुष्य next level ला जाऊ शकते.अस ग्रास्प होते आहे या क्लिपमधून.. जय श्री कृष्ण ✨😇🙏

    • @AdhyatmaVishesh
      @AdhyatmaVishesh หลายเดือนก่อน

      वाह!! तुमचा हा episode ऐकण्याचा perspective उत्तम आहे. खरंतर मी पणा आणि ऐकणे, ह्यावर किती चर्चा करण्यासारखी आहे!!! तुम्ही इतकं छान बोललात म्हणुन एक गोष्ट आठवली. आता श्रवण केलीयाचे फळ। क्रिया पालटे तात्काळ। तुटे संशयाचे मूळ। एकसरा।। (दासबोध समास 1) किवा, तुका म्हणे कानीं ऐकयेली मात। तोची झाला घात जीवपणां।। संत म्हणतात, असं ऐका, की ब्रह्म चे तात्काळ दर्शन झालं पाहिजे. तुम्ही म्हणलात तसं, आपण मी मी चा इतका मळ चिकटवून ठेवलाय, की असं ऐकणं घडतच नाही आपल्या कडून. त्यात social media influence मुळे नको तेच कानीं पडतय. पण आपल्या सारखे श्रोते अध्यात्म विशेष ला लाभले, खूप खूप आभार आहेत देवाचे. मराठी माणूस, विशेष करून तरुण आध्यात्मिक grounds वर एकत्र यावेत हा ह्या channel चा हेतु आहे. तो साध्य व्हावा अशी प्रार्थना. तुमचे comments अतिशय चोख आणि वर्मभेदक आहेत. असेच आम्हाला सपोर्ट करत रहा. श्रोते तुम्ही महेशाची मूर्ती!! -अनुपम ताथवडेकर

    • @ashwinidaphal3009
      @ashwinidaphal3009 หลายเดือนก่อน

      @@AdhyatmaVishesh किती सुरेख रिप्लाय दिलाय अनुपमजी 😊 आपल्या संतांनीही किती छान समजावून सांगितलेत श्रवणाचे महत्व, खूपच छान. कानसेन झाले पाहिजे माणसांनी. समोरच्या व्यक्तीला कान देऊन ऐकणे हा त्याला त्याच्या म्हणण्याला दिलेला आदर असतो. personaly मला समोरच्या व्यक्तीला ऐकायला आवडते. जसा वेळ मिळेल तसा पॉडकास्ट ऐकत असते. कारण हे सगळ कृष्णाबद्दल आहे. तुमचेही खूप खूप आभार तुम्ही बोलता जसे छान तसेच लिहिताही छान 😊 अजून एक उद्या 11 सप्टेंबर राधाअष्टमी आहे. राधे विषयी एक पॉडकास्ट ऐकायला मिळाला तर छान होईल. हरे कृष्ण 🙏

    • @AdhyatmaVishesh
      @AdhyatmaVishesh หลายเดือนก่อน

      @@ashwinidaphal3009 तुम्हाला समोरच्याचं ऐकायला आवडतं, ह्यातच खूप काही साधलं, असं मला वाटतं 🙏👌 होय राधाष्टमी आहे खरी, पण तब्येती आणि गणपती ची धावपळ असल्या मुळे काही होऊ शकलं नाही!! 🥺

    • @ashwinidaphal3009
      @ashwinidaphal3009 หลายเดือนก่อน

      @@AdhyatmaVishesh होय गणपतीची धावपळ आहे खरी, काळजी घ्या तब्येतीची लवकर ठणठणीत बरे व्हा 🙂

  • @ashwinidaphal3009
    @ashwinidaphal3009 หลายเดือนก่อน

    ओम गं गणपतये नमः 🙏🌺

    • @AdhyatmaVishesh
      @AdhyatmaVishesh หลายเดือนก่อน

      श्री गणेशाय नमः 🙏🏻😇 जय गणेश !!

    • @vishwapat3
      @vishwapat3 หลายเดือนก่อน

      🙏🙏😊

  • @ashwinidaphal3009
    @ashwinidaphal3009 หลายเดือนก่อน

    खुपच छान झालंय हा भाग. एकदम डीप संभाषण अस काहीसे.कृष्ण हा खरचच न संपणारा विषय आहे. अक्षरशः कृष्णाच्या जगात किंवा ती जी काही मिती आहे त्यात गुरफटून जायला होते कृष्णाचे नाव घेतले तरी .. जय श्री कृष्ण 🙏😇

    • @AdhyatmaVishesh
      @AdhyatmaVishesh หลายเดือนก่อน

      नमस्कार, आपण सीझन 2 ऐकायला सुरु केलात...खूप छान वाटले, आपल्या प्रतिक्रिया जाणून घ्यायची नेहमीच उत्सुकता असते ! तुमचे म्हणणे बरोबर आहे, actually सीझन 1 नंतर विषय आणखी खोलात घेऊन जाता आले आम्हालाही..त्यामुळे आणखीनच श्रीकृष्णाच्या अस्तित्वात हरवत गेल्याचे जाणवले. पुढच्या एपिसोड्सच्या प्रतिक्रिया ही जरूर कळवा ! जय श्रीकृष्ण 🙏🏻😇 - अंबर

    • @ashwinidaphal3009
      @ashwinidaphal3009 หลายเดือนก่อน

      @@AdhyatmaVishesh मलाही छान वाटले इतकी appreciate करणारी प्रतिक्रीया वाचून 😇🙏🏻 नक्की पाहणार सर्व episodes या सिझनचे.. तुम्हाला शुभेच्छा हा चॅनल बऱ्याच लोकांपर्यंत पोहचो म्हणजे अजून intresting overall अध्यात्माविषयी episodes ऐकायला मिळतील. बाकीचे episodes ऐकून प्रतिक्रीया जरूर कळवेन 😊

  • @vijayajoshi2879
    @vijayajoshi2879 หลายเดือนก่อน

    डोळयांसमोर श्रीकृष्ण जन्म साक्षात साकारला. सुंदर शब्दांकन.

    • @AdhyatmaVishesh
      @AdhyatmaVishesh หลายเดือนก่อน

      नमस्कार, मनःपूर्वक धन्यवाद !! तुम्हाला लेखन आवडले हे जाणून खूप छान वाटले! जय श्रीकृष्ण 🙏🏻✨

  • @ashwinidaphal3009
    @ashwinidaphal3009 หลายเดือนก่อน

    खूपच सुंदर ✨ ओम नमो भगवते वासुदेवाय नमः 🙏

    • @AdhyatmaVishesh
      @AdhyatmaVishesh หลายเดือนก่อน

      नमस्कार, खूप खूप धन्यवाद ! एपिसोड आवडला हे जाणून खूप आनंद झाला ! जय श्रीकृष्ण 🙏🏻😇

  • @WokingAddict
    @WokingAddict หลายเดือนก่อน

    श्रीकृष्ण चरित्र खऱ्या अर्थाने व्यापक आहे, त्याचा विस्तार इतका मोठा आहे की त्यात एकदा डुंबलो की पुनः बाहेर येण्याचा विषयच उरत नाही. भक्ती, ज्ञान, योग, कर्म, इतक्या विविध मार्गांनी कृष्ण आपल्याला भेटत रहातो की त्याला नक्की कोणकोणत्या रुपात पहावे तेच काळात नाही. मंत्रमुग्धपणे आपण भाळले जातो. एपिसोड सुंदर झाला आहे, कृष्ण जन्माची कथा खूपच रोचक आणि खिळवून ठेवते. एकदम योग्य दिवशी आणि योग्य वेळी ही कथा आणल्याबद्दल तुमचे कौतुक. कृष्णजन्माष्टमीच्या शुभेच्छा! जय श्रीकृष्ण महाराज !

    • @AdhyatmaVishesh
      @AdhyatmaVishesh หลายเดือนก่อน

      मनःपूर्वक धन्यवाद, इतक्या detail कमेंट बद्दल मनापासून धन्यवाद !! कृष्णजन्माष्टमीच्या शुभेच्छा! जय श्रीकृष्ण!

  • @aratilale595
    @aratilale595 หลายเดือนก่อน

    सगळी कथा माहित असूनही एकत राहून संपूच नये असे वाटत होते *जय श्री कृष्ण*🙏🙏

    • @AdhyatmaVishesh
      @AdhyatmaVishesh หลายเดือนก่อน

      नमस्कार, खूप खूप मनःपुर्वक धन्यवाद यात आमचे काहीच नाही, मुळात श्रीकृष्णांची कथाच इतकी जबरदस्त आहे की कितीही वेळा ऐकली तरीही पुनः ऐकविशी वाटते! कृष्णजन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा! जय श्रीकृष्ण! - अंबर

  • @seematambakhe6965
    @seematambakhe6965 หลายเดือนก่อน

    हरे राम हरे राम राम राम हरे हरे हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे👏👏😇🌿🌹💐जय राधेश्याम💐💐जयमाखणचोर 💐 💐जय गिरीधर💐जय योग योगेश्वर 💐जय मुरलीधर 💐गोपालकृष्ण भगवानकी जय 👏👏😇🚩🌿🌹💐

    • @AdhyatmaVishesh
      @AdhyatmaVishesh หลายเดือนก่อน

      कृष्णजन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा! जय जय श्रीकृष्ण! जय राधे श्याम 🙏🏻

  • @kundasupekar5265
    @kundasupekar5265 หลายเดือนก่อน

    जयगुरूदेव नमस्कारव जयश्रीरामवश्रीकृष्णशरणागतभावपूर्णवंदन चरणस्पर्शकरत लीनतापुर्वकवंदनकरून क्षमस्व माझ्याकडूननियमितजपह होऊशकेलतर चैतन्य निर्माणहोऊशकेल तरछानच चैतन्यनिर्माण करून घेत आहातवंदन वक्रुतदन्यताच कुंदा🎉❤

    • @AdhyatmaVishesh
      @AdhyatmaVishesh หลายเดือนก่อน

      कृष्णजन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा! जय श्रीकृष्ण! 🙏🏻🌺

  • @vaidehianey4624
    @vaidehianey4624 หลายเดือนก่อน

    श्रीकृष्ण चरित्रच श्रवणीय ,वाचनीय तसेच छान ऐकविले. प्रसंगानुसार मागील फोटोग्राफी उत्तम डोळ्यासमोर सारे उभे राहावे इतके अप्रतिम❤

    • @AdhyatmaVishesh
      @AdhyatmaVishesh หลายเดือนก่อน

      नमस्कार, अगदीच खरे बोललात तुम्ही, मूळ श्रीकृष्णाचे चारित्रच इतके सुंदर आणि व्यापक आहे की कितीही वेळा त्याबद्दल ऐकले, बोलले, वाचले तरीही पुनः ऐकावेसे, वाचावेसे वाटते. तुम्हाला चित्र आवडली, सादरीकरण आवडलं हे जाणून मनापासून आनंद झाला, जन्माष्टमी छान झाली आमची !! खूप खूप मनापासून धन्यवाद 🙏🏻😇 कृष्णजन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा! जय श्रीकृष्ण! - अंबर

  • @hansakulkarni4372
    @hansakulkarni4372 หลายเดือนก่อน

    अनंत कोटी ब्रम्हांडनायक माया चक्रचालक मायाधीपती वसुदेव देवकी नंदन नंद यशोदा आनंदवर्धन राधिका नाथ रुक्मिणी कांत भक्त प्रतिपालक राजाधिराज योगीराज जगद्गुरु यदु कुलभूषण द्वारिकाधीश पांडवप्रतिपालक गोविंद भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय🙏🙏🙏🙏

    • @AdhyatmaVishesh
      @AdhyatmaVishesh หลายเดือนก่อน

      खूप सुंदर,योगेश्वर भगवान श्रीकृष्ण महाराज की जय !! कृष्णजन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा! जय श्रीकृष्ण! 🙏🏻🌺

  • @wagleaniket
    @wagleaniket หลายเดือนก่อน

    माहिती असलेली कथा पुन्हा शेवट पर्यंत ऐकत रहवीशी वाटली. ओघवती भाषा आणि शेवटचा सारांश खूप छान वाटला. ऐकता ऐकता कृष्ण भेटावा.. अनेक जन्मानंतर मीरे ला भेटला तसा.. कृष्ण सखा प्रत्येक जन्मी भेटावा..

    • @AdhyatmaVishesh
      @AdhyatmaVishesh หลายเดือนก่อน

      क्या बात है, खूप खूप मनापासून धन्यवाद !! अनेक जन्मानंतर मिरेला भेटला तसा ! सुंदर ❤️ जय श्रीकृष्ण 🙏🏻

  • @anjaliapastamb9275
    @anjaliapastamb9275 หลายเดือนก่อน

    अप्रतिम

    • @AdhyatmaVishesh
      @AdhyatmaVishesh หลายเดือนก่อน

      खूप खूप मनापासून धन्यवाद !! जय श्रीकृष्ण 🙏🏻

  • @hansakulkarni4372
    @hansakulkarni4372 หลายเดือนก่อน

    जय श्रीकृष्ण,जय योगेश्वर

    • @AdhyatmaVishesh
      @AdhyatmaVishesh หลายเดือนก่อน

      जय श्रीकृष्ण!! जय योगेश्वर 🙏🏻✨

  • @varshadeshpande2006
    @varshadeshpande2006 หลายเดือนก่อน

    ऐकता ऐकता नकळत आपणही मथुरा ते गोकुळ असा नवजात कृष्णा सह प्रवास करत होतो, अंगावर अक्षरश: काटा आला, वर्णन आणि निवेदन आणि कृष्ण जन्म सारेच, अलौकिक. जय श्री कृष्ण, जय योगेश्वर🙏🙏🙏

    • @AdhyatmaVishesh
      @AdhyatmaVishesh หลายเดือนก่อน

      बापरे ! Thank You So So Much !! आमच्या या छोट्याश्या प्रयत्नातून तुम्हाला अशी जाणीव होत आहे हे वाचून प्रचंड आनंद वाटत आहे ! खूप खूप मनापासून धन्यवाद !! जय श्रीकृष्ण जय योगेश्वर🙏🙏🙏

  • @PradnyaJoshi-e2c
    @PradnyaJoshi-e2c หลายเดือนก่อน

    अप्रतिम, निव्वळ अप्रतिम. श्रीकृष्णांचा जन्म कसा झाला, याबद्दलच्या गोष्टी खरंतर आपण प्रत्येकजण पाळण्यात खेळण्याच्या वयात असतो तेव्हापासून ऐकत आलो आहोत. पण तुमच्या ह्या एपिसोड मध्ये तेच सर्व ऐकताना याआधी आपण हे कधीच ऐकले नव्हते, अशी जाणीव प्रत्येक क्षणाला होत होती. तुम्ही ज्या शब्दांमध्ये सर्व प्रसंगाचे वर्णन केले आहे ते ऐकताना अक्षरशः रोमांच उभे राहिले अंगावर. संपूर्ण प्रसंग अगदी एखाद्या चलचित्राप्रमाणे डोळ्यांसमोरून गेला. आजचा एपिसोड संपूच नये असे वाटत होते सारखे. आणि सर्वात सुखद धक्का हा होता की तुम्ही कालगणनेप्रमाने ही घटना कधी घडली ह्याचाही न विसरता उल्लेख केला आहेत.आपल्या इतिहासाला इतिहास म्हणून समोर आणणाऱ्या तुमच्यासारख्या गुणी लोकांची खरंतर आज खूप गरज आहे. तुमचा हा उपक्रम घरोघरी पोहचो हीच श्रीकृष्णांच्या चरणी प्रार्थना ! आणि आपणां दोघांस खूप सदिच्छा! ।। जय श्रीकृष्ण ।।

    • @AdhyatmaVishesh
      @AdhyatmaVishesh หลายเดือนก่อน

      बापरे.... काय बोलला आहेत तुम्ही !! आमच्या या छोट्याश्या प्रयत्नातून तुम्हाला अशी जाणीव होत आहे हे वाचून प्रचंड आनंद वाटत आहे ! खूप खूप मनापासून धन्यवाद !! श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा जय श्रीकृष्ण !!

  • @arvindjoshi1953
    @arvindjoshi1953 หลายเดือนก่อน

    अतिशय ओघवत्या भाषेत श्रीकृष्ण जन्मापूर्वीची परिस्थिती वर्णन व वेगवेगळया नावाने ओळख असलेल्या योगयोगेश्वर श्रीकृष्ण यांचे जन्माच यथार्थ वर्णन.श्रीकष्ण जन्माष्टमी निमित्त हार्दिक शुभेच्छा.

    • @AdhyatmaVishesh
      @AdhyatmaVishesh หลายเดือนก่อน

      खूप खूप मनापासून धन्यवाद तुमच्या सदैव मिळणाऱ्या सपोर्ट साठी खूप आभार श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा जय श्रीकृष्ण !!

  • @udaykulkarni8899
    @udaykulkarni8899 หลายเดือนก่อน

    जय श्री कृष्ण 🙏🙏 खूप छान माहिती सांगितली🙏🙏

    • @AdhyatmaVishesh
      @AdhyatmaVishesh หลายเดือนก่อน

      खूप खूप मनापासून धन्यवाद तुमच्या सदैव मिळणाऱ्या सपोर्ट साठी खूप आभार श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा जय श्रीकृष्ण !!

  • @suhasjoshi5037
    @suhasjoshi5037 หลายเดือนก่อน

    अतिशय सुरेख आणि हृदयस्प्रर्शी... 🙏🏻🙏🏻

    • @AdhyatmaVishesh
      @AdhyatmaVishesh หลายเดือนก่อน

      मनःपूर्वक धन्यवाद ! जय जय श्रीकृष्ण 🙏🏻✨

  • @madhurajoshi8702
    @madhurajoshi8702 หลายเดือนก่อน

    श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या आपणा सर्वांना खूप सार्‍या शुभेच्छा !

    • @AdhyatmaVishesh
      @AdhyatmaVishesh หลายเดือนก่อน

      जय श्रीकृष्ण 🙏🏻✨😇

  • @madhurajoshi8702
    @madhurajoshi8702 หลายเดือนก่อน

    श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या आपणा सर्वांना खूप सार्‍या शुभेच्छा !

    • @AdhyatmaVishesh
      @AdhyatmaVishesh หลายเดือนก่อน

      मनःपूर्वक धन्यवाद ! जय जय श्रीकृष्ण 🙏🏻✨

  • @manjushajoshi2778
    @manjushajoshi2778 หลายเดือนก่อน

    श्रीकृष्णजन्माष्टमीच्या आपणांस देखील अनेक शुभेच्छा! 🙏🏵️ || जय श्रीकृष्ण ||

    • @AdhyatmaVishesh
      @AdhyatmaVishesh หลายเดือนก่อน

      मनःपूर्वक धन्यवाद ! जय जय श्रीकृष्ण 🙏🏻✨