आनंददायी शनिवार उपक्रमांतर्गत क्षेत्रभेट

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ต.ค. 2024
  • आज दिनांक 21 सप्टेंबर 2024 रोज शनिवारला रेखाताई राष्ट्रीय विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय वाशिम यांची राष्ट्रीय विद्यालय वसारी ला क्षेत्रभेट देण्यात आली.
    महाविद्यालयामध्ये प्रवेश केल्यानंतर पंचशील विद्यालंकार शिक्षण संस्थेच्या सचिव, शिक्षक, मॅडम व सर्व विद्यार्थ्यांचे शब्दसुमनाने स्वागत करून विद्यार्थ्यांना सर्वप्रथम पोहे व जिलेबी चा नाष्टा देण्यात आला. त्यानंतर रितसरपणे पंचशील विद्यालंकार शिक्षण संस्था वाशिम च्या सचिव कु. लुंबिनी ताई कांबळे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांनी तयार केलेले विविध विषयाचे मॉडेल व तसेच हस्तलिखित प्रतिकृती च्या खोलीचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले त्यानंतर विद्यार्थ्यांनी तयार केलेले मॉडेल व प्रतिकृती यांची पाहणी केली. त्यानंतर खोली क्रमांक दोन यामध्ये विज्ञान व गणित विषयाचे विविध मॉडेल व प्रतिकृती या खोलीचे रेखाताई राष्ट्रीय विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री आरु यांच्या हस्ते फित कापून रीतसरपणे उद्घाटन करण्यात आले व त्यानंतर विज्ञान व गणित खोलीचे व विद्यार्थिनी तयार केलेल्या प्रतिकृती व मॉडेलचे पाहणी करून विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. रेखाताई राष्ट्रीय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलींनी नृत्य मधून पाढे पाठ करणे ही कला सर्व मान्यवरांच्या समोर दाखविली. त्यांचे सुद्धा महाविद्यालयाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. त्यानंतर प्रमुख पाहुणे श्री आरु सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून शालेय निसर्गरम्य परिसराची माहिती विद्यार्थ्यांना दिली तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणातून श्री बकाल सर यांनी सर्व रेखाताई राष्ट्रीय विद्यालयाच्या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन केले त्यानंतर त्यांनी आम्ही आमच्या महाविद्यालयामध्ये विशेष शनिवार अंतर्गत विविध कौशल्य विकसित करण्याकरता विविध कार्यक्रम व उपक्रम राबवत असतो त्यामध्ये विद्यार्थ्यांनी विविध प्रतिकृती व मॉडेल तयार केले आहेत तसेच सर्व आपापले वर्ग सुद्धा विद्यार्थ्यांनी हस्तलिखित विविध विषयांचे चार्ट वर्ग खोल्यात लावले आहेत. अशा प्रकारची माहिती उपस्थित मान्यवरांना व विद्यार्थ्यांना दिली आहे. त्यानंतर कु. लुबिनीताई कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयामध्ये वृक्षारोपण केले. त्यानंतर रेखाताई राष्ट्रीय विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वाशिम चे प्राचार्य व सर्व शिक्षक यांनी राष्ट्रीय विद्यालय वसारीच्या विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवण्याकरिता अभिनंदन व कौतुक केले
    त्यानंतर रेखाताई राष्ट्रीय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना शिरपूर येथील जैन मंदिर व जानगीर महाराज मंदिर दाखवण्यात आले.
    Message

ความคิดเห็น •