गजकर्ण,खरूज आणि नायटा ह्यामुळे त्रस्त आहात?| What is Ringworm?Fungal Infection Causes and Treatment

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ก.ย. 2024
  • नायटा / गजकर्ण
    Fungal infection
    आजचा विषय आहे गजकर्ण. हा विषय घेण्याचं कारण म्हणजे खूप जणांनी request केली या topic साठी. आणि तसंही (फंगल इन्फेक्शन) नायटा ही खूप सर्रासपणे आढळणारी समस्या आहे.
    गजकर्ण म्हणजे नक्की काय??
    ज्या व्यक्तींना सतत घाम येतो आणि आणि शरीराचा ठराविक भाग हा ओलसर राहतो अशा व्यक्तींना गजकर्ण होऊ शकते.
    Microsporum trichophyton आणि epidermo trichophyton यांच्यामुळे गजकर्ण होत.
    सुरुवात कशी होते??
    जिथे घामामुळे सतत ओलसरपणा असतो तिथे सुरुवातीला एक किंवा दोन फोड येतात आणि त्याला खाज येते आणि मग गोल चट्टा तयार होतो.
    म्हणजेच ते ringworm सारख दिसत. त्याचा त्याला व्यवस्थित बॉर्डर असते आणि खाजवल्या नंतर तिथल्या त्वचेचे पापुद्रे निघतात. आणि खूप खाज येते आणि आग होते अशाप्रकारे तो चट्टा पसरत जातो.
    गजकर्ण कुठे कुठे होते??
    १. गळ्यावर, पाठीवर येणारा सुरमा हा देखील गजकर्णाचाच प्रकार आहे.
    २. गजकर्ण सर्रासपणे पोट, कंबर, पाठ, जांघांमध्ये, buttocks, काखेत ,छातीवर (breast च्या खाली) आढळून येते त्याला Tinea corporis असं म्हणतात.
    ३. कमरेखाली गुप्तांगाजवळ होणारे गजकर्ण म्हणजे Tinea cruris.
    ४. याव्यतिरिक्त गजकर्ण हाताच्या बोटांना , नखांना,पायाच्या बोटांना होऊ शकते.
    ५. डोक्याला केसांमध्ये देखील गजकर्ण होते त्याला Tinea capitis असे म्हणतात.
    पुन्हा पुन्हा होणारे आणि अजिबात बरे न होणारे गजकर्ण?
    सध्या गजकर्ण पुन्हा पुन्हा होणे
    म्हणजेच रेझिस्टन्स केसेस हा हा सर्वात मोठा प्रश्न आहे असं होण्याचं कारण म्हणजे गजकर्ण झाल्यानंतर टीव्हीमधील जाहिरात पाहून अथवा मित्रांच्या सल्ल्यानुसार परस्पर मेडिकलमध्ये जाऊन क्रीम्स घेतल्या जातात आणि त्या वापरल्या जातात बऱ्याचदा या क्रीम चुकीच्या असतात ज्यामुळे गजकर्ण बरा होण्या ऐवजी अजून पसरू लागते काही क्रीम्स (स्टेरॉईड) वापरल्यानंतर खाज कमी येते, चट्टा कमी झाल्या सारखा वाटतो, मात्र क्रीम थांबवली की पुन्हा गजकर्ण होत. म्हणून पेशंट कायम ती क्रीम वापरतात यामुळे अतिवापरामुळे तिथल्या भागाची त्वचा जास्त संवेदनशील होऊन लाल होते आणि कालांतराने तेथे skin atrophy म्हणजे त्वचा पातळ होते. Skin atrophy ला कोणताही इलाज नाही त्यामुळे परस्पर मेडिकल मधून क्रीम आणून वापरू नयेत.
    हे सगळं वापरून झाल्यावर मग पेशंट डॉक्टरांकडे जातात आणि फरक पडत नाही अशी तक्रार करतात. आणि मग एका डॉक्टर कडून दुसऱ्या डॉक्टर कडे असे फिरत राहतात. गजकर्णला फरक पडत नाही. कारण आधी चुकीच्या क्रीम्स वापरल्यामुळे गजकर्ण जास्त पसरलेल असत.यासाठी वेळीच डॉक्टरांकडे जाऊन योग्य उपचार चालू केले तर रेजिस्टन्स केसेस होणार नाहीत.
    गजकर्ण होऊ नये म्हणून.......
    गजकर्ण होऊ नये म्हणून खालील उपाय आपण करू शकतो.
    १. ज्यांना सतत घाम येतो त्यांनी सैल आणि सुती कपडे वापरावेत.
    २. शक्यतो जीन्स , लेगिन (leggings)वापरू नये कॉटन ट्राऊझर्स, सलवार वापराव्यात.
    ३. घाम आल्यास तो सुती कापडाने टिपून घ्यावा.
    ४. घाम निथळत ठेवू नये.
    ५. शक्य झाल्यास दोन वेळा आंघोळ करावी आणि कपडे बदलावेत.
    ६. सर्वात महत्त्वाचं खाज आल्यास तिथे नखांनी खाजवू नये अन्यथा गजकर्ण पसरत जाईल.
    ७. शक्यतो जाड लोकांना घाम जास्त येतो, त्यामुळे वजन कमी करण्यासाठी व्यायाम करावा.
    ८. ज्यांना पाण्यात काम करावं लागत त्यांनी काम झाल्यावर हात कोरडे करावेत.
    ९. स्वतःच्या मनाने, परस्पर मेडिकल मध्ये जाऊन क्रीम वापरू नये.
    Homoeopathic medicine
    होमिओपॅथी औषध
    Sulphur, meserium, bacilinum या सारखी औषध गजकर्णवर छान काम करतात.
    अर्थात ही औषध देखील तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावीत.
    गजकर्ण झाल्यावर काय करायचं यापेक्षा आधीच गजकर्ण होऊ नये म्हणून काळजी घेणं फायदेशीर आहे....
    डॉ. अमृता कदम
    MD
    कोथरुड, पुणे

ความคิดเห็น • 81