दोनच राजे इथे गाजले, कोकण पुण्य भूमीवर | प्रतापसिंग दादा बोदडे | नागसेन दादा सावदेकर
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
- दोनच राजे इथे गाजले, कोकण पुण्य भूमीवर
शब्द : प्रतापसिंग दादा बोदडे
गायक : नागसेन दादा सावदेकर
दोनच राजे इथे गाजले,कोकण पुण्य भूमीवर
एक त्या रायगडावर, एक चवदार तळ्यावर
दोनच राजे इथे गाजले,कोकण पुण्यभूमीवर,
एक त्या रायगडावर,एक चवदार तळ्यावर |धृ|
रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला,
दलितांनी दलितांचा राजा महाडी घोषित केला.
असे नरमणी दोन शोभले दोन्ही वीर बहाद्दर.
एक त्या रायगडावर,एक चवदार तळ्यावर
शिवरायांच्या हातामध्ये तलवार भवानी होती,
त्याच भवानीपरी भीमाच्या हाती लेखणी होती.
निनादले दोघांच्या नावे कोकणातले डोंगर.
एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर
शिवरायाने रयतेचा जो न्यायनिवाडा केला
तोच निवाडा भीमरायाच्या घटनेमध्ये आला
प्रतापसिंगा परंपरेला दोन्ही मारती ठोकर,
एक त्या रायगडावर,एक चवदार तळ्यावर
दोनच राजे इथे गाजले, कोकण पुण्यभूमीवर,
एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर...
प्रतापसिंग दादा बोदडे
Follow me on :-
Facebook :-
/ blue-drop-10. .
Instagram :-
/ blue_drop_p. .
TH-cam :-
www.youtube.co....
JAY BHIM
Thank you...!!!
जय शिवराय!!सविनय जय भीम!!!!
आमच्या रक्तात महामानव महापुरुषांना गीत गायनाने घराघरात जिवंत ठेवण्याची कला आहे,आम्ही पूर्वी ही शूर होतो आज ही शूर आहोत,धन्यवाद !!आणि आभार सर्व कलावंतांचे
🙏💙
Dada (kaka) aapan aajhi kavya rupane aamchyat aahat,rahnar,
😂
Waa dada kya baat hai.
🙏💙
Very nice
🙏💙
Very good
🙏💙
Exllant
🙏💙
नागसेन दादांचा नंबर मिळेल का
जय भीम 💙