हा हा हा...😄👍 आजचं गाणं फक्त श्रवणीय नाही तर प्रेक्षणीय झालंय ☺️ आपल्या सुप्रसिद्ध गायक बाबाच्या मांडीवर बसून लेक चक्क जांभई देतेय. किती निरागस! तुमचं गाणं कधी बेसूर होऊच शकत नाही राहुलजी, कारण प्रत्येक गाणं तुम्ही बाळाला जेवढ्या वात्सल्याने जोजवतात तसंच गातात अगदी. खळे काकांचं हे गाणं आणि स्वर तुमचा, अहाहा...!👌
तुमचं गाणं ऐकल्याशिवाय माझा दिवस जात नाही. पण आज अजून एका गोष्टीचा खूप आनंद झाला ती म्हणजे तुम्ही वा. रा. कांत ह्यांचं नाव परत लोकांना सांगितलंत. आपल्या मराठीत असे किती मोठे कवी होऊन गेले आहेत..की ज्यांनी अशी सुंदर काव्यं लिहिली आहेत.. पण बरेच वेळा लोकांना गाणं माहिती असतं पण तो कवी अनेकदा लोकांना अज्ञात राहातो. खरंतर कवी, संगीतकार, गायक आणि वादक चौघेही तितकेच महत्वाचे आहेत.
फारच अप्रतिम😊 आणि मंत्रमुग्ध😇 करणारी झाली ही संगीत साधना...आपल्या मुलांना अश्या अभिजात संगीताचा वारसा पुढे न्यायला शिकवणे,ते ही या वयात या सारखे दुसरे संस्कार नाहीत. खूप खूप धन्यवाद आणि तुमच्या राजकन्येला तिच्या भावी संगीतमय प्रवासासाठी अनेक शुभाशीर्वाद.😊🙏
हे गाणे म्हणजे कवी, संगीतकार आणि गायक यांच्या प्रतिभेचा कळस आहे. लिहिलेला प्रत्येक शब्द म्हणजे स्वत:च एक जादूची पोतडी आहे. वसंतरावांचा स्वर त्या शब्दांचा वेध घेत राहतो. मनकवडा ह्या शब्दाच्या फेकीवर अनेकांचे जीव अजूनही अडकलेले आहेत. आज तुम्ही इतक्या तरलतेने हे गाणे साकार केलेत. विशेषत: "भेट आपुली स्मरशी" वर केलेला विस्तार खास आहे. त्याच्या मनातली ती आर्जवी इच्छा इतकी सुंदर व्यक्त झाली आहे. अविस्मरणीय! धन्यवाद!
धन्यवाद दादा.. हे गाणे तू ETv वर १०-१२ वर्षापूर्वी गायला होतास आणि याच गाण्यामुळे माझी नाट्यगीत आणि classical music ची आवड निर्माण झाली.. I am confident that like me, many of the youngsters like me started listening to classical music thru such songs.. RESPECT 🙏❤️
Absolutely. I am in your league. Mag Vasantotsav , Savitribai Phule la Rotary club sathi zaleli maifal ani jithe jithe sandhi milel tithe tithe. Ata tar maza 6 varsh acha mulaga suddha aikto.
आतापर्यंत नुसते मन भरून (न बघता) ऐकले तरी समाधान, सात्विक आनंद मिळत होता तुमच्या आवाजाने, गाण्याने, बोलण्याने! ....... परंतु आज ते नाही जमले... व्हिडिओ न बघता नुसते ऐकणे जमलेच नाही.... लोभस, निरागस, cuteness overloaded पाहणे कसे miss करणार :-)...... आणि गाण्याबद्दल काय बोलू, लहानपणी कायम रेडिओवर न चुकता कानावर पडणारे हे शब्द! बोल, अर्थ, ताल काही कळत नव्हते तेव्हा. आताही तितके समजते असे नाही पण फक्त आनंद लुटतो- भरभरून! Thank you!
Maza khup awadata gana ....aatun ekdam shant vatla..tuza gana eikun asa vatta dada ki Roj tuza gana eikanaryala kuthlach aajar honar nhi ....shantata ekdam thakava nighun jato kay Hawa ajun 😊
अमृताने भरलेला कुंभ किती प्यावा असे वाटते राहुलजी . तुम्ही गोंदवलेकर महाराज ऊत्सवामधे कडेगाव येथे गायलेले आधी बीज एकले हे गाणे आजही माझ्या मनात मी साठवून ठेवले आहे. 'विद्या ददाती विनयम'. म्हणजेच ज्ञानाने विनम्रता येते. हे तुम्हाला तंतोतंत लागू पडते.
Me vat pahat hote ,Karan mazya gharajavlun roj sandhyakali padhreshubra bagle aplya ghartyat jatat.etke sunder drushya aste ki roj he Geet naklat mukhi yete.god bless you &your kannya.
काय गोड पिल्लू आहे. किती सुंदर स्वरसंस्कार होत आहेत तिच्यावर. I Wish लौकरच मी पुन्हा गाणं सुरू करेन, आणि माझ्या पिल्लू ला असंच ऐकवेन. धन्यवाद राहुल सर. ह्या सुंदर व्हिडीओ साठी.
Is the daughter (occasionally preventing the playing of chords, sometimes yawning with a 6-year-old's attention span) a distraction? Yes. Nonetheless, the warmth and intimacy it adds to the rendition is Oh-so-endearing! One can also imagine, in one's mind's eye, her growing up remembering these moments on बाबा's lap, remembering every microtone, every श्रुति that बाबा ever dwelt on -- and BUILDING on all that to create a reputation all her own. Like a Kaushiki Chakraborty! And like her बाबा carving out his own reputation after his grandfather!
I have been listening to you over 10 years now, and vouch for your incremental, definite and mesmerizing depth over the years. You are a rare talent, a gift to this era, and your voice is a solace to the scorched.
वा. रा. कांत लिखीत सुंदर रचना अतिशय सुंदर रीत्या पंडित वसंतरावजी देशपांडे यांनी गायली आणि त्याच सुंदरतेची आज पुनरावृत्ती झाली👌👌👌👌🙏🙏🙏💐💐💐 खुप खुप धन्यवाद राहुल दादा
🙏🙏🙏 खुपचं छान.संगितातलं काही कळत नसलं तरीही चांगलं ऐकल्यावर मनाला भावतंच.भलेही राग, ठेका न कळो पण प्रत्येक जण ज्यांनी हे ऐकलं त्यांनी क्षणभर ती माळ उडताना अनुभवली असेल.👌👌👌👌 मला वाटतं हे सर्वांचंच आवडतं गाणं आहे. ज्यांनी पहिल्यांदाच ऐकलं त्यांच्याही आवडत्या गाण्याच्या यादीत समाविष्ट होणार आहे. शब्दरचना, संगीत, आवाज हे सगळंच इतकं छान आहे की तुम्ही शेवटी जे मत मांडलं ते अगदी मनापासून पटलं.
फार गोड गाणं आहे. 'बगळ्यांची माळ फुले' ऐकलं नाही आणि 'गाई पाण्यावर' ही कविता येत नाही त्या मराठी माणसाचा जन्म वाया गेला असं माझे बाबा म्हणायचे. कान तृप्त झाले.
खरंच अप्रतिम गीत आणि संगीतही ,पंडित वसंतराव देशपांडे यांच्या बद्दल वेगळीच आत्मीयता आहे..त्यांची legacyइतकी अप्रतिम रित्या तुम्ही आमच्या पर्यंत पोहोचविता त्यात तुमचा वेगळेपणा जाणवतो ...रेणुका..गोडुली..मनीमाऊ खुप खुप शुभेच्छा आणि आशिर्वाद तुम्हां तिघांनाही..
Rahul ji, kalat नाही आहे की आपल्या gayki chi स्तुति करू की रेणुका च्या cuteness chi तारीफ करू. You are simply lucky. Lots of blessings to रेणुका! आणि तुम्ही तर jewel of our community आहात. We are lucky to have you ! मराठी samajachi प्रतिष्ठा तुम्ही unchavali.
थेंब पावसाचे....ओळीवर कॉफीचा कप ओठांना लागला... शाळेत जाताना खरच बगळ्यांची माळ आकाशात दिसायची...आणि आता ती स्पर्शून गेली तुमच्या गाण्यातून....पण आज कौतुक रेणुका/रोझी च ती किती तन्मयतेने शांत बसलीय😘😘😘😘😘 आमचं जगण गोड करायला गात रहा... खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏
अतिशय तरल शब्द असलेली आयकोनिक रचना. वसंतरावजींची सिग्नेचर असलेली जागोजागी. Who can better do it than you😊 अतिशय धन्यवाद. Hats off to Renuka who sat silently through out.
अतिशय सुरेख दादा वसंत उत्सव कार्यक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा दादा तुमच्या गाण्याने आम्हाला स्वर्गिय आनंद तर मिळतोच तुमचं गाणं ऐकण म्हणजे आमच्या साठी अविस्मरणीय असा सोहळाच असतो 🙏🙏
आज मोठी पर्वणी आहे...अवीट गोडी आहे गाण्यात आणि तुमचा हृदयाला स्पर्श करणारा आवाज.....वसंतराव, खळे आणि कांत यांना शतशः प्रणाम....रेणुकेच्या मनावर जे तुम्ही संस्कार करत आहात त्यासाठी धन्यवाद...पुढची गणारी आणि ऐकणारी पिढी तुम्ही तयार करता आहात...तुम्हाला अनेक अनेक शुभेच्छा आणि धन्यवाद...
सकाळी सकाळी असे सूर कानात साठवले की फार उत्साहात दिवस जातो आधी शास्त्रीय संगीत शिकले नाही पण तुमचे ऐकून त्यातील सर्व बारकावे समजावून सांगत असता त्यामुळं खूप छान माहिती होते. ऐकायचे कान तयार होत आहेत Gr888
Kalibhor shant ratra...gaar hava....rahul Deshpande hyancha aavaj Ani bagalyanchi maal phule he gaan....bestttttt combination... can't explain in words how good u r...🥺🥺❤️❤️
राहुल जी ..... हे गाणे मी आपल्या आवाजात अनेकदा ऐकले आहे .... पण आजचा अनुभव थोडा वेगळा होता ... ते असे की कान तुमच्या अवाजाकडे होते व माझे लक्ष आपल्या सुपुत्री कडे .... आपला आवाज स्वर्गीय आहेच पण आज रेणुकाचे हावभाव व मंत्रमुग्ध होणे व तिला तसे बघणे फार फार आनंद देउन गेले ....
Thanks Rahul Da....for making this Saturday a Soulful Saturday...🙏... I have listened to this Song of Shri Vasanraoji Despande almost everyday...i just love to listen to this song even being a malayali...MUSIC IS THIS....NO BOUNDARIES..thanks to my wife for being Maharashtrian and bringing this song to me😁...today as I am playing your version....she is almost in tears...she says, she used to play this song in her school and college days for her grandmother....and how they both used to be in a different world all together listening to this extremely soulful rendition....🙏....thanks a lot once again.....🙏
राहुलजी आज आमचे वडील कविवर्य वा रा कांत असते तर ते खूप आनंदीत झाले असते. गाता गाता राखणारी किती सहजपणे तुम्ही उलगडून, सोपी करुन दाखवली आहे, खुप खुप आभार आणि धन्यवाद, आपले सदैव शुभक्षेम असो. मु. वा. कांत.
राहुलजी या आधी प्रतिक्रिया लिहितांना रागदारी हा शब्द चुकीचा होता, क्षमस्व ! शिवाय आपल्या सोबत मग्न होउन बसलेल्या आपल्या शांत "परी"चं कौतूक लिहायचं राहूनच गेलं, एवढा कठीण राग लेकरु निमूट बसून ऐकत होतं, ही पण गुरूकडून मिळालेली शिकवण आहे. कविवर्य कांतांना आपण जो आदरभाव दखविला त्या साठी आभार ! हे भावगीत रेकॉर्ड होत असतांना मी खळेकाका यांच्या सोबत होतो हे माझे परम भाग्यच. खळेकाका वसंतराव काकांची ती भेट हा माझा जीवनातला अनमोल खजिना आहे, धन्यवाद !!
@@mukundkant839 केवळ एक काव्य / कविता लिहून एखादा कवी चिरंजीव होऊ शकतो हे वा. रा. कांत यांनी दाखवून दिलंय. मला एक genuine प्रश्न पडला होता when I heard this song I was too young (at १५-१६ age) आणि तेव्हा मी आजोळी असायचो बराच काळ. तर मला माझे आजी आजोबा त्यांच्या अंगणात जी बरीच झाडे होती त्यात नारळाची देखील ३ झाडे होती. पण कधी मला ते नारळीच्या झाडांखाली थांबू देत नव्हते. म्हणायचे "नारळ पडतील डोक्यात. नको थांबू त्यांच्या खाली..." तर इथे वा. रा. कांत यांनी "...नारळीच्या खाली... पौर्णिमा च तव नयनी भर दिवसा झाली" असे का लिहिले आहे? कारण प्रेयसी सोबत आपण स्वतः नारळीच्या झाडांखाली बसलो आहोत हे अधोरेखित होतंय! नारळ पडायची भिती नसेल का हो वाटली?
सकाळची सु रे ल सुरवात. तुमचा आवाज एक जादू करतो. मंतरलेली चोविस मिनिटे. सगळयात महत्त्वाचे म्हणजे एक "अशक्य" गोष्ट तुम्ही "शक्य" करुन दाखविली आहे. आज तुमच्या आजोबांच्या "छायेतून" वेगळे होऊन तुमची शैली, तुमचा आवाज तयार झालेला आहे. वा! नेहमीप्रमाणेच तुम्हाला ऐकणे हा एक छान, सुखद अनुभव असतो.
अतिशय तरल रचना- शब्द,चाल आणी गायकीदृष्ट्याही...काव्याची समग्र,सखोल अनुभूती आली....एकेक स्वर अगदी शुभ्र आणी लख्ख लागलेला....राहुलदा,आपले हे विडीओज म्हणजे पर्वणी आहे...संगीताची सुरेल ताकद दर्शविणारी..आपणाला एक विनंती आहे की किशोरकुमार यांच्या गाण्यांचे आणी गायकीचे असेच सुरेल रसग्रहणाचे विडीओज आपण करावेत...धन्यवाद !🙏🏻🙏🏻⚘🌷🌹🌺
"हलू नको" किती सुरात होतं ते....❤️❤️❤️❤️
हा हा हा...😄👍 आजचं गाणं फक्त श्रवणीय नाही तर प्रेक्षणीय झालंय ☺️ आपल्या सुप्रसिद्ध गायक बाबाच्या मांडीवर बसून लेक चक्क जांभई देतेय. किती निरागस! तुमचं गाणं कधी बेसूर होऊच शकत नाही राहुलजी, कारण प्रत्येक गाणं तुम्ही बाळाला जेवढ्या वात्सल्याने जोजवतात तसंच गातात अगदी. खळे काकांचं हे गाणं आणि स्वर तुमचा, अहाहा...!👌
❤
❤
This is what students need with a cup of tea before online lectures!🤗
☺️🤗
💯
👌Certainly, The process to enrich!💐
waah
true 👍
तुमचं गाणं ऐकल्याशिवाय माझा दिवस जात नाही. पण आज अजून एका गोष्टीचा खूप आनंद झाला ती म्हणजे तुम्ही वा. रा. कांत ह्यांचं नाव परत लोकांना सांगितलंत. आपल्या मराठीत असे किती मोठे कवी होऊन गेले आहेत..की ज्यांनी अशी सुंदर काव्यं लिहिली आहेत.. पण बरेच वेळा लोकांना गाणं माहिती असतं पण तो कवी अनेकदा लोकांना अज्ञात राहातो. खरंतर कवी, संगीतकार, गायक आणि वादक चौघेही तितकेच महत्वाचे आहेत.
कै. वा.रा. कांत
कै. श्रीनिवास खळे
कै. वसंतराव देशपांडे
त्रिवेणी संगम. अनमोल ठेवा.
🙏🙏🙏
💐
Based on which raag
माझा सकाळचा एक तास तुमचे गाणे ऐकून सुरु होतो... thnx Rahul ji
फारच अप्रतिम😊 आणि मंत्रमुग्ध😇 करणारी झाली ही संगीत साधना...आपल्या मुलांना अश्या अभिजात संगीताचा वारसा पुढे न्यायला शिकवणे,ते ही या वयात या सारखे दुसरे संस्कार नाहीत. खूप खूप धन्यवाद आणि तुमच्या राजकन्येला तिच्या भावी संगीतमय प्रवासासाठी अनेक शुभाशीर्वाद.😊🙏
I am 14 but i like classical music! I love this song!!!!
हे गाणे म्हणजे कवी, संगीतकार आणि गायक यांच्या प्रतिभेचा कळस आहे. लिहिलेला प्रत्येक शब्द म्हणजे स्वत:च एक जादूची पोतडी आहे. वसंतरावांचा स्वर त्या शब्दांचा वेध घेत राहतो. मनकवडा ह्या शब्दाच्या फेकीवर अनेकांचे जीव अजूनही अडकलेले आहेत. आज तुम्ही इतक्या तरलतेने हे गाणे साकार केलेत. विशेषत: "भेट आपुली स्मरशी" वर केलेला विस्तार खास आहे. त्याच्या मनातली ती आर्जवी इच्छा इतकी सुंदर व्यक्त झाली आहे. अविस्मरणीय! धन्यवाद!
Anek dhanyawad 🙂
Sir tumch gan eklyawar man khupch prasnn houn jate
धन्यवाद दादा..
हे गाणे तू ETv वर १०-१२ वर्षापूर्वी गायला होतास आणि याच गाण्यामुळे माझी नाट्यगीत आणि classical music ची आवड निर्माण झाली.. I am confident that like me, many of the youngsters like me started listening to classical music thru such songs..
RESPECT 🙏❤️
Absolutely. I am in your league.
Mag Vasantotsav , Savitribai Phule la Rotary club sathi zaleli maifal ani jithe jithe sandhi milel tithe tithe.
Ata tar maza 6 varsh acha mulaga suddha aikto.
Based on which raag?
आतापर्यंत नुसते मन भरून (न बघता) ऐकले तरी समाधान, सात्विक आनंद मिळत होता तुमच्या आवाजाने, गाण्याने, बोलण्याने! ....... परंतु आज ते नाही जमले... व्हिडिओ न बघता नुसते ऐकणे जमलेच नाही.... लोभस, निरागस, cuteness overloaded पाहणे कसे miss करणार :-)...... आणि गाण्याबद्दल काय बोलू, लहानपणी कायम रेडिओवर न चुकता कानावर पडणारे हे शब्द! बोल, अर्थ, ताल काही कळत नव्हते तेव्हा. आताही तितके समजते असे नाही पण फक्त आनंद लुटतो- भरभरून! Thank you!
🙏🏼☺️
Maza khup awadata gana ....aatun ekdam shant vatla..tuza gana eikun asa vatta dada ki Roj tuza gana eikanaryala kuthlach aajar honar nhi ....shantata ekdam thakava nighun jato kay Hawa ajun 😊
वा खूप छान.या गाण्याची वाटच पहात होते मी.धन्यवाद
रेणुका ने जांभई दिली तरी, वाह वाह!♥️
खूपच छान।
Kiti goad Baal aahe😘😘 babani sangitlyavar shaant basli n halta . Khoop cute .
Goosebumps -Renuka listening to her Great grandfather’s song sung by her father
वा राहुल,
माहोल बना दिया.
सकाळची वेळ, हातात वाफाळलेला चहाचा कप आणि कानांवर " बगळ्यांची माळ ...."
स्वर्ग स्वर्ग तो हाच असावा.
तुला खूप खूप आशीर्वाद .
Great voice. Classic song.
Tumhala kalalelch tumhi kiti punya ch kaam kartayet....khup khup dhanyawad🙏
Khupach sumder. Alhadadayak song ahe.
अमृताने भरलेला कुंभ किती प्यावा असे वाटते राहुलजी . तुम्ही गोंदवलेकर महाराज ऊत्सवामधे कडेगाव येथे गायलेले आधी बीज एकले हे गाणे आजही माझ्या मनात मी साठवून ठेवले आहे. 'विद्या ददाती विनयम'. म्हणजेच ज्ञानाने विनम्रता येते. हे तुम्हाला तंतोतंत लागू पडते.
Me vat pahat hote ,Karan mazya gharajavlun roj sandhyakali padhreshubra bagle aplya ghartyat jatat.etke sunder drushya aste ki roj he Geet naklat mukhi yete.god bless you &your kannya.
Khupch sundar. dislis tu fulale hrutu he gana tumchya avajaat aikayla avdel
अप्रतिम . वसंतोत्सव साठी शुभेच्छा . बगळ्यांची माळ फुले खूप छान. रेणुका खूप गोड.
विमल प्रतिभेतून संस्कारक्षम को वळा, नवथर स्वर. आनंदघन. सहज तन्मय होणे. केवळ वंदन करावे लागेल.
व्वा छानच अहाहा आज तर रेणुका पण कीती गोड शहाणे बाळ शांतपणे ऐकत आहे हे गाणं
सकाळची अप्रतिम सुरुवात करून दिल्याबद्दल धन्यवाद
The Sargam at the 9th minute is just fabulous ... And listening to the फ in गुंफताना is an absolute phonetic pleasure! Khup Maja ....
🤗
काय गोड पिल्लू आहे. किती सुंदर स्वरसंस्कार होत आहेत तिच्यावर. I Wish लौकरच मी पुन्हा गाणं सुरू करेन, आणि माझ्या पिल्लू ला असंच ऐकवेन.
धन्यवाद राहुल सर. ह्या सुंदर व्हिडीओ साठी.
अहाहा सुंदर सकाळ! खूप छान वाटले तुमचे गाणे ऐकून!!!
Is the daughter (occasionally preventing the playing of chords, sometimes yawning with a 6-year-old's attention span) a distraction? Yes. Nonetheless, the warmth and intimacy it adds to the rendition is Oh-so-endearing!
One can also imagine, in one's mind's eye, her growing up remembering these moments on बाबा's lap, remembering every microtone, every श्रुति that बाबा ever dwelt on -- and BUILDING on all that to create a reputation all her own. Like a Kaushiki Chakraborty! And like her बाबा carving out his own reputation after his grandfather!
🙏🏼☺️☺️
Kaka u r reading bit too much into this. Spare it all and enjoy with a clear heart
राहुल जी हे गाणं माझ अतिशय आवडणार आहे खूपच सुंदर गाता तुम्ही असेच गात रहा
I have been listening to you over 10 years now, and vouch for your incremental, definite and mesmerizing depth over the years. You are a rare talent, a gift to this era, and your voice is a solace to the scorched.
Thank you so much ☺️
Ajit Barbade - Sir, A link to Oxford dictionary would prove handy. :)
तापाने अंग फनफनतय आत्ता पण तुमचा आवाज ऐकून इतकं बर वाटतंय दादा😊😊खरंच खुप धन्यवाद👍
Kalji ghya lavkar bare vha
Waa dada tumchya kanthat saraswati mata virajman aahet. aani renu tar khupach god aahe 😘😘
Sundar... Rahul ji jamlyas 'Abeer gulal..' sadar karave hi vinanti
Ur daughter is very sweet ❤️❤️ तुमचा वारसा तिने पुढे चालवावा हीच प्रार्थना
अत्यंत जिव्हाळ्याच गाण....लेकीच, माझ आणि लेकाच....अप्रतिम!!...हलू नकोsssssss...so sweet!!...thank you !
अप्रतिम रचना आणी आवाज काय ऐकतच राहावं.
वा. रा. कांत लिखीत सुंदर रचना अतिशय सुंदर रीत्या पंडित वसंतरावजी देशपांडे यांनी गायली आणि त्याच सुंदरतेची आज पुनरावृत्ती झाली👌👌👌👌🙏🙏🙏💐💐💐 खुप खुप धन्यवाद राहुल दादा
आताच निवांतपणे ऐकले ! खुपच छान ❤️
सुंदर... अप्रतिम... अनुपम... 🙏
'हे सुरांनो चंद्र व्हा' हे गाणं ऐकायचय तुमच्या आवाजात... जमेल तेव्हा... विनंती 🙏
I am Gujarati but like the sur. That's why without knowing the meaning or wordings and compositions attract me. your ladli is also so cute.
खूपच सुंदर वाटत तुमचा गाणं ऐकून..मनाला खूप भावला गाणं...खूपच छान
Dear Rahul sir devachi khup krupa aahe tumachavar, tumcha swar khup khup god aahe. 🙏🤲🙏🤲🙏
He gane ekat lahanachi mothi jhalo. 45 varshananter gaane tarun aahe ani amhi mhatare hou lagalot. Jadu aahe sangitacha. ✨✨✨✨
Ranuka pillu khup god aahe 🥰🥰🥰
अप्रतीम नेहमी सारखे. आम्ही पुण्यात असतो तर नक्की आलो असतो.
🙏🙏🙏
खुपचं छान.संगितातलं काही कळत नसलं तरीही चांगलं ऐकल्यावर मनाला भावतंच.भलेही राग, ठेका न कळो पण प्रत्येक जण ज्यांनी हे ऐकलं त्यांनी क्षणभर ती माळ उडताना अनुभवली असेल.👌👌👌👌
मला वाटतं हे सर्वांचंच आवडतं गाणं आहे. ज्यांनी पहिल्यांदाच ऐकलं त्यांच्याही आवडत्या गाण्याच्या यादीत समाविष्ट होणार आहे.
शब्दरचना, संगीत, आवाज हे सगळंच इतकं छान आहे की तुम्ही शेवटी जे मत मांडलं ते अगदी मनापासून पटलं.
वाह बुवा ह्या पेक्षा चांगला weekend असूच शकत नाही, खूपच छान
मन शांत होते तुमचा आवाज ऐकून ❤️❤️
खूप छान, खूप दिवसांनी ऐकल लहानपणी आकाशवाणी वर सकाळी सकाळी बहुतेक रोज ऐकायचे, जुन्या आठवणी जाग्या झाल्या.
आणि रेणुका चे गोड दर्शन 😘
मन तृप्त झाले... आणि रेणुका मातेच दर्शन झाले. 🙏
पं. राहूलजी, हे गाणं मनात कायम कोरलं गेलय. खूप सुंदर
तुमच्या आवाजात 'रुणाणुबंधाच्या' ऐकायचय.
ह्याच सारखे unplugged version
खुप छान माझं आवडतं गाणं धन्यवाद सर🙏🙏
खरोखरच "अमृत रिमझिमते" याची अनुभूती आली.
Nkki yeu renu amhi.. 👍🏻😘😘🥰🍬🍭🥰गोड बाळ..
गाणे अप्रतिम👍 🙏🏻🙏🏻
Wahhh...apratim..gr8 ...ani tumchi lek far avadte ho amhala......
सर, अहो काय हा आनंद! ही गाणी कधी वाटलं नव्हतं आजची पिढी ऐकेल. तुम्ही परत जिवंत केलत या अजरामर कलाकृतींना. आभार तरी कसे मानायचे 🙏🏻
"ओठात बोबडीच्या संगीत जागविले.........."
काय बाळकडू.....
वाह! वाह!! राहुलजी.....👌🏻👌🏻👏🏻👏🏻👏🏻🙏
Apratim !! tumcha swatacha exploration tar Daaivi!! aaikun zala tari kanat wajat rahate... keep sharing...
फार गोड गाणं आहे. 'बगळ्यांची माळ फुले' ऐकलं नाही आणि 'गाई पाण्यावर' ही कविता येत नाही त्या मराठी माणसाचा जन्म वाया गेला असं माझे बाबा म्हणायचे. कान तृप्त झाले.
काय उपमा आहे ओ! खरच
👍
खरंच अप्रतिम गीत आणि संगीतही ,पंडित वसंतराव देशपांडे यांच्या बद्दल वेगळीच आत्मीयता आहे..त्यांची legacyइतकी अप्रतिम रित्या तुम्ही आमच्या पर्यंत पोहोचविता त्यात तुमचा वेगळेपणा जाणवतो ...रेणुका..गोडुली..मनीमाऊ खुप खुप शुभेच्छा आणि आशिर्वाद तुम्हां तिघांनाही..
🙏🏼☺️
👌Living &loving legend playing for us💐💐💐thank you sir!!!👍
Listening from the extremely cold Minneapolis and your voice bought the much needed warmth. Thank you.
बगळ्यांची माळ.....सुंदर गाण धन्यवाद ऐकवल्याबद्दल
अमृताहूनी गोड आवाज तुमचा आहे सर
त्यात हे अमरगीत
आत्मा तृप्त केलात तुम्ही
रेणुका चा आवाज ऐकवा खुप दिवस झाले ऐकून
खूप छान अप्रतिम!! काय बोलू शब्दच नाही..
अप्रतिम!!!! काय बोलावं? शब्दच अपुरे...
मंत्रमुग्ध कर देने वाला स्वर तुम्हें प्रभु ने दिया है राहुल..ऐसे ही स्वर लहरियाँ बिखेरते रहना....सदा ! शुभाशीर्वाद ! 🤚🏼🤚🏼
Khup Chan sir tumachi mulgi khup ch sweet ahe mala he gan khup aawdte👌👌
Rahul ji, kalat नाही आहे की आपल्या gayki chi स्तुति करू की रेणुका च्या cuteness chi तारीफ करू. You are simply lucky. Lots of blessings to रेणुका! आणि तुम्ही तर jewel of our community आहात. We are lucky to have you ! मराठी samajachi प्रतिष्ठा तुम्ही unchavali.
वा! उत्कृष्ट! तुमच्या आजोबांची आठवण करून दिलीत. खूपच छान. अजून काय बोलणार. सुंदर.
👍
दादा कान तृप्त झाले आज, स्वर्गीय अनुभव..
माळ म्हणताना मा आणि ळ ह्या दोघांमधील जो सूर आहे तो तर अप्रतिम 🙏🙏🙏
थेंब पावसाचे....ओळीवर कॉफीचा कप ओठांना लागला...
शाळेत जाताना खरच बगळ्यांची माळ आकाशात दिसायची...आणि आता ती स्पर्शून गेली तुमच्या गाण्यातून....पण आज कौतुक रेणुका/रोझी च ती किती तन्मयतेने शांत बसलीय😘😘😘😘😘
आमचं जगण गोड करायला गात रहा... खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏
🙏🏼☺️
🙏🏻🙏🏻👌🏻👍🏻
अतिशय तरल शब्द असलेली आयकोनिक रचना. वसंतरावजींची सिग्नेचर असलेली जागोजागी. Who can better do it than you😊 अतिशय धन्यवाद. Hats off to Renuka who sat silently through out.
🙏🏼☺️
अतिशय सुरेख दादा वसंत उत्सव कार्यक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा दादा तुमच्या गाण्याने आम्हाला स्वर्गिय आनंद तर मिळतोच तुमचं गाणं ऐकण म्हणजे आमच्या साठी अविस्मरणीय असा सोहळाच असतो 🙏🙏
❤wah sir... किती sweetness आहे!! भारीच.❤
Waaahhh kiti divsanpasun aikachi echha Hoti 🤩🤩😊
खुपच सुंदर !! सगळ्यांच फार आवडत गाण, पहिल्या ओळी नंतर आपोआप डोक्यात तबला सुरू होतो. वसंतोत्सववासाठी खूप खुप शुभेच्छा.
राहुलह्या गण्याची खूप वाट बघत होते...... कान तृप्त केलेस.... असाच गाता रहा...,...
Khupach sundar. It's also amazing to see you bond with your daughter ❤️
आज मोठी पर्वणी आहे...अवीट गोडी आहे गाण्यात आणि तुमचा हृदयाला स्पर्श करणारा आवाज.....वसंतराव, खळे आणि कांत यांना शतशः प्रणाम....रेणुकेच्या मनावर जे तुम्ही संस्कार करत आहात त्यासाठी धन्यवाद...पुढची गणारी आणि ऐकणारी पिढी तुम्ही तयार करता आहात...तुम्हाला अनेक अनेक शुभेच्छा आणि धन्यवाद...
🙏🏼☺️
👍 true that
सकाळी सकाळी असे सूर कानात साठवले की फार उत्साहात दिवस जातो आधी शास्त्रीय संगीत शिकले नाही पण तुमचे ऐकून त्यातील सर्व बारकावे समजावून सांगत असता त्यामुळं खूप छान माहिती होते. ऐकायचे कान तयार होत आहेत Gr888
🙏🏼☺️
वसंत खॉं, तुमचे आशिर्वाद म्हणून आम्हाला हा पुर्नप्रत्यय मिळत आहे.
शतशः नमन!!
लहानपणापासून हे गाणे ऐकत आलो आहे. त्याचे हे नवीन स्वरूप मला आवडले.
माझं अतिशय सुंदर 👌 खूप आवडीचे गाणं 🙏🏼🙏🏼
Kalibhor shant ratra...gaar hava....rahul Deshpande hyancha aavaj Ani bagalyanchi maal phule he gaan....bestttttt combination... can't explain in words how good u r...🥺🥺❤️❤️
🙏🏼☺️
Hello Our cutie angel 😘 khup khush aahe tula baghun god bless you dear ❤️😘❤️
राहुल जी ..... हे गाणे मी आपल्या आवाजात अनेकदा ऐकले आहे .... पण आजचा अनुभव थोडा वेगळा होता ... ते असे की कान तुमच्या अवाजाकडे होते व माझे लक्ष आपल्या सुपुत्री कडे .... आपला आवाज स्वर्गीय आहेच पण आज रेणुकाचे हावभाव व मंत्रमुग्ध होणे व तिला तसे बघणे फार फार आनंद देउन गेले ....
Tumhala aikun asa watte jasa swargatun ek Pure Awaz Yetoy ❤. Thank you Rahul sir for these amazing videos 🙏💫
दादासाहेब एक मन शांत करण्याची साधना....म्हणजे आपलं संगीत... ज्ञानेश्वरी पारायण वारकरी चॅनल कडून आपले मनापासून अभिनंदन...
अतिशय श्रवणीय. खूप छान
Thanks Rahul Da....for making this Saturday a Soulful Saturday...🙏...
I have listened to this Song of Shri Vasanraoji Despande almost everyday...i just love to listen to this song even being a malayali...MUSIC IS THIS....NO BOUNDARIES..thanks to my wife for being Maharashtrian and bringing this song to me😁...today as I am playing your version....she is almost in tears...she says, she used to play this song in her school and college days for her grandmother....and how they both used to be in a different world all together listening to this extremely soulful rendition....🙏....thanks a lot once again.....🙏
Thank you so much ☺️
राहुलजी आज आमचे वडील कविवर्य वा रा कांत असते तर ते खूप आनंदीत झाले असते. गाता गाता राखणारी किती सहजपणे तुम्ही उलगडून, सोपी करुन दाखवली आहे, खुप खुप आभार आणि धन्यवाद,
आपले सदैव शुभक्षेम असो.
मु. वा. कांत.
@@mukundkant839 Apalya vadilanchya pratibhela sadar naman.
राहुलजी या आधी प्रतिक्रिया लिहितांना रागदारी हा शब्द चुकीचा होता, क्षमस्व !
शिवाय आपल्या सोबत मग्न होउन बसलेल्या आपल्या शांत "परी"चं कौतूक लिहायचं राहूनच गेलं, एवढा कठीण राग लेकरु निमूट बसून ऐकत होतं, ही पण गुरूकडून मिळालेली शिकवण आहे.
कविवर्य कांतांना आपण जो आदरभाव दखविला त्या साठी आभार ! हे भावगीत रेकॉर्ड होत असतांना मी खळेकाका यांच्या सोबत होतो हे माझे परम भाग्यच. खळेकाका वसंतराव काकांची ती भेट हा माझा जीवनातला अनमोल खजिना आहे,
धन्यवाद !!
@@mukundkant839
केवळ एक काव्य / कविता लिहून एखादा कवी चिरंजीव होऊ शकतो हे वा. रा. कांत यांनी दाखवून दिलंय.
मला एक genuine
प्रश्न पडला होता when I heard this song I was too young (at १५-१६ age)
आणि तेव्हा मी आजोळी असायचो बराच काळ. तर मला माझे आजी आजोबा त्यांच्या अंगणात जी बरीच झाडे होती त्यात नारळाची देखील ३ झाडे होती. पण कधी मला ते नारळीच्या झाडांखाली थांबू देत नव्हते.
म्हणायचे "नारळ पडतील डोक्यात. नको थांबू त्यांच्या खाली..."
तर इथे वा. रा. कांत यांनी
"...नारळीच्या खाली... पौर्णिमा च तव नयनी भर दिवसा झाली"
असे का लिहिले आहे?
कारण प्रेयसी सोबत आपण स्वतः नारळीच्या झाडांखाली बसलो आहोत हे अधोरेखित होतंय!
नारळ पडायची भिती नसेल का हो वाटली?
सकाळची सु रे ल सुरवात.
तुमचा आवाज एक जादू करतो.
मंतरलेली चोविस मिनिटे.
सगळयात महत्त्वाचे म्हणजे एक "अशक्य" गोष्ट तुम्ही "शक्य" करुन दाखविली आहे. आज तुमच्या आजोबांच्या "छायेतून" वेगळे होऊन तुमची शैली, तुमचा आवाज तयार झालेला आहे. वा!
नेहमीप्रमाणेच तुम्हाला ऐकणे हा एक छान, सुखद अनुभव असतो.
Dhanyawad !
Majha khuuuup laaadka gana...thank uuu...ajun aikale nahi..aikun kalawte😊
Tumche gane tar chhanach. Aamchi tai khupach god.te hoti mhanun te ekayla aankhin aavdle.
रेणुकाला मस्ती करायची आहे बाबासोबत .. बाबा गातायत म्हणून बाबाच्या मांडीवर गुपचूप बसली...
अतिशय तरल रचना- शब्द,चाल आणी गायकीदृष्ट्याही...काव्याची समग्र,सखोल अनुभूती आली....एकेक स्वर अगदी शुभ्र आणी लख्ख लागलेला....राहुलदा,आपले हे विडीओज म्हणजे पर्वणी आहे...संगीताची सुरेल ताकद दर्शविणारी..आपणाला एक विनंती आहे की किशोरकुमार यांच्या गाण्यांचे आणी गायकीचे असेच सुरेल रसग्रहणाचे विडीओज आपण करावेत...धन्यवाद !🙏🏻🙏🏻⚘🌷🌹🌺
Legend of baglyanchi maal fule song Sir rahulji LEVEL INFINITY👌👌
Rahul Dada❤️ Wonderful..and Renu😘khup goad
खूप खूप छान. मनःपूर्वक शुभेच्छा
Wow sir Very Very nice...
अप्रतिम बगळ्यांची माळ फुले ऐकून मन प्रसन्न झालं खूप गोड आवाज गुरुजी