शिवथर घळ दासबोधाची जन्मभूमी !! वालन कुंड श्री क्षेत्र वरदायीनी माता !!

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ก.ย. 2024
  • शिवथरघळ
    शिवथरघळ ही रायगड जिल्ह्यात येणारी घळ आहे. ती महाडपासून तीस किमी अंतरावर आहे. याच्या सर्व बाजूंनी उंच पर्वत असून वाघजई दरीच्या कुशीत हे ठिकाण आहे. काळ नदीचा उगम याच परिसरात होत असून, पुढे ही नदी सावित्री नदीला जाऊन मिळते. काळच्याया काठावर कुंभे कसबे, व आंबे अशा तीन शिवथर वस्त्या आहेत. चहूबाजूंनी वेढलेल्या हिरव्यागार झाडाझाडोऱ्याने झाकून टाकलेल्या डोंगराच्या पोटात शिवथर घळ आहे. या घळीला समर्थ रामदास स्वामी ’सुंदर मठ’ म्हणत असत.
    शिवथरघळीला जाण्यासाठी पायथ्यापर्यंत चांगला गाडी रस्ता आहे. पुढे १०० पायऱ्या चढून गेल्यावर आपण घळीपाशी पोहोचतो. मुंबई-गोवा महामार्गावर महाडच्या पुढे एक नदीवरील पूल लागतो. त्याच्या पुढे डाव्या बाजूला भोरकडे जाणारा वरंध घाटाचा फाटा लागतो. या रस्त्याने भोरच्या दिशेला जातांना बारस गाव आहे. येथे
    शिवथरकडे अशी पाटी लावली आहे. येथून पुढे साधारण ३० किमी अंतर पार केल्यावर आपण शिवथरघळीच्या पायथ्याशी पोहोचतो. वाटेत कुंभे शिवथर, कसबे शिवथर, अंबे शिवथर ही गावे लागतात.
    २) दुसरा मार्ग जरा अवघड आहे. पुण्याहून निघून राजगड-भुतोंडे-बेळवंडी नदी, कुंबळ्याचा डोंगर, गोप्याघाट, कसबे शिवथर मार्गे घळीत पोहोचता येते. हा मार्ग तसा अवघड आणि वेळ खाणारा आहे.
    अनोख्या वैशिष्टय़ाने आणि दैवी आख्यायिकेने समृद्ध असूनही बव्हंशी अपरिचित असलेले स्थळ म्हणजे महाडजवळील ‘वाळणकोंड’. पूर्वेला सह्यद्रीमधील अतिरौद्र आग्याची नाळ, सिंगापूर नाळ आणि बोराटय़ाची नाळ या त्रिनाळी. बाजूलाच शिविलगाच्या आकाराचा ससखा किल्ले लिंगाणा. पश्चिमेला स्वराज्याची राजधानी शिवतीर्थ रायगड, दक्षिणेला महाड नगरी आणि उत्तरेला पाने गावाची वस्ती आशा भौगोलिक परिघात वसलेलं वाळणकुंड काळ नदीच्या गर्भकोशात अगदी मुख्य पात्रातच, दापोली आणि पंधेरी या दोन गावांच्या पश्चिमेला अगदी मध्यावर वसलेले
    वालन कुंड
    आहे. नदीच्या मध्यावरील खोल डोह आणि त्यातील मत्स्य यांभोवती पुराण काळापासून एकवटलेली या स्थळाची आख्यायिकाही मोठी रंजक आहे.
    FOLLOW ON
    Facebook Page / storywridersanil
    Instagram ...

ความคิดเห็น • 10