डहाणू || कांबळगाव सेंट्रलकिचनच्या विषारी भाजीने आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा, जिल्ह्यात खळबळ

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ก.ย. 2024
  • #dahanu #kasa #ashramshala #ashram #pnn #palgharnews #palgharnewsnetwork #foodpoisoning
    पालघर जिल्ह्यात आदिवासी आश्रम शाळांमध्ये विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांचा आकडा वाढला आहे.जवळपास अडीचशे पेक्षाही जास्त विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचे समोर आले आहे . डहाणू आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या अनेक आश्रम शाळांमधील विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. रणकोळ, नंडोरे , आंबेसरी सह आणखी काही आश्रम शाळांमधील विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची माहिती समोर आली आहे.
    आज सकाळी रणकोळ आश्रमशाळेतील 27 विद्यार्थिनींना विषबाधा झाल्याची घटना समोर आली होती यानंतर आता आंबेसरी आणि खंबाळे या आश्रम शाळांमधील विद्यार्थ्यांना देखील विषबाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. या सर्व विद्यार्थ्यांना मळमळ आणि उलट्यांचा त्रास होत असल्याची माहिती समोर आली आहे. सेंट्रल किचनमधील विषारी भाजी खाल्ल्याने रणकोळ, आंबेसरी, खंबाळे या तीन आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला आहे.
    काल श्रावणातील पहिला सोमवार होता रात्री या विद्यार्थिनींना नेहमीप्रमाणे जेवण देण्यात आले. त्यानंतर रणकोळ आश्रमशाळेतील सर्व विद्यार्थी झोपी गेले मात्र, मंगळवारी पहाटे आश्रमशाळेतील काही विद्यार्थिनींना मळमळ होऊ लागली. त्यानंतर 27 विद्यार्थिनींना उलट्या होऊ लागल्या. या सगळ्यांना तातडीने नजीकच्या कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरु असताना या विद्यार्थिनींना जेवणातून विषबाधा झाल्याचे निष्पन्न झाले. या विद्यार्थिनींची प्रकृती स्थिर असली तरी त्यांच्यावर सध्या कासा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. काही विद्यार्थिनींना रात्रीपासूनच त्रास जाणवत होता. त्यांना रुग्णालयात दाखल करुन तातडीने उपचार सुरु करण्यात आले होते. त्यापैकी आठ विद्यार्थिनींवर उपचार सुरू आहेत, तर 20 विद्यार्थिनींना प्राथमिक उपचार करून निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. तर 10 विद्यार्थिनींना ऐना येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर तेथे उपचार सुरू आहेत, अशी माहिती कासा उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. प्रदीप भोये यांनी दिली.
    आश्रशाळेतील या सर्व विद्यार्थिना विषबाधा कशामुळे झाली? याबद्दल धक्कादायक माहिती समोर आली ती अशी की
    डहाणू आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या कांबळगाव येथील सेंट्रल किचन मधून हा भोजन पुरवठा करण्यात येतो. हे सेंट्रल किचन शासन स्वतः चालवते. सोमवारी रात्रीच्या जेवणासाठी दुधी भोपळ्याची भाजी होती. या भाजीमधून ही विषबाधा झाली असल्याचा संशय आता व्यक्त करण्यात येत आहे. रणकोळ, आंबेसरी, एणा, नंडोरे, खंबाळे या आश्रम शाळांमधील जवळपास 250 हून अधिक विद्यार्थ्यांना विष बाधा झाल्याची माहिती मिळत असून आकडा वाढण्याची शक्यता आहे. रणकोळ आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना ऐना आणि कासा येथील शासकीय रुग्णालयात तर खंबाळे येथील विद्यार्थ्यांना वाणगाव आणि आंबेसरील येथील विद्यार्थ्यांना गंजाड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे . मात्र सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येत असून ह्या सर्व विद्यार्थ्यांना वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.

ความคิดเห็น • 17

  • @pratikbhadange8967
    @pratikbhadange8967 หลายเดือนก่อน +3

    आदिवासी विकास विभाग अंतर्गत येणारे सर्व आदिवासी आश्रम शाळा यांना सेंट्रल किचन मधुन जेवण पुरवला जातो आणि त्यांचे चुकीमुळे किंवा हालगर्जी पणामुळे आदिवासी मुलांचे आरोग्य धोक्यात येतं आहे हे सरास चुकीचे आहे. पूर्वी प्रमाणे शाळेतच स्वयंपाक बनवून द्याण्याची व्यवस्था करावी.

  • @nandkumarpatil3097
    @nandkumarpatil3097 หลายเดือนก่อน +5

    गोरगरिब विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळणा-या व सबंधित घटनेला जबाबदार अधिक्षक / निरीक्षक यांना निलंबित नव्हे तर बडतर्फ करण्यात यावे.

  • @rohann.x7
    @rohann.x7 หลายเดือนก่อน +9

    गुन्हेगारांना कडक शिक्षा झाली पाहिजे नाहीतर आपला डहाणू तालुका शांत बसणार नाही SOPORT KARA GUYS 👿🤲🏻

  • @diptimavchi3294
    @diptimavchi3294 หลายเดือนก่อน +3

    सेंट्रल किचन ही योजनाच चुकीची आहे ताजे अन्न देण्या ऐवजी लांब कुठेतरी बनवायचे व टिफीन द्वारे पोचवायचे मग अन्न विटून जाते हे साफ चुकीचे आहे

  • @vinodkokani2810
    @vinodkokani2810 หลายเดือนก่อน +1

    Central Kitchen बंद करायला पाहिजे

  • @sandeepsutar1099
    @sandeepsutar1099 หลายเดือนก่อน +7

    अधीक्षक आणि स्वयंपाकी फक्त पगारासाठी काम करतात. मी होतो आश्रम शाळेत.

    • @TravelleKD143
      @TravelleKD143 หลายเดือนก่อน

      काय फेकतो तू😂

  • @ravinhadal1534
    @ravinhadal1534 หลายเดือนก่อน +5

    2:22

  • @pranitp9403
    @pranitp9403 หลายเดือนก่อน +4

    Kahi ksrvai honar nahi... Doshi nvar

  • @dineshgaikwad3011
    @dineshgaikwad3011 หลายเดือนก่อน +1

    contrater ला पकडा .😊

  • @kalpananam9252
    @kalpananam9252 หลายเดือนก่อน +1

    सेंट्रल किचन बद करून शाळेत जेवणाची सोय करावी

  • @user-mu8lo2qs9v
    @user-mu8lo2qs9v หลายเดือนก่อน +1

    Ho nki bad kra

  • @suvarnachaudhari517
    @suvarnachaudhari517 หลายเดือนก่อน +1

    सेंट्रल किचन बंद करा

  • @vinodkokani2810
    @vinodkokani2810 หลายเดือนก่อน +1

    बंद करा