LKSS.22 Pt Rupak Kulkarni - Bansuri

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ต.ค. 2024
  • शनिवारच्या 26th March 2022 सत्राची सांगता रूपक कुलकर्णी यांच्या बासरीवादनाने झाली. चंद्रकंस रागामध्ये सुरेल आलापी केल्यानंतर जोड-झाला अशा प्रकारे अर्धा तास रागाची मांडणी केली. प्रत्येक वाद्यवादकाने किमान पहिला अर्धा तास तबल्याशिवाय राग मांडणी करावी, ज्यामुळे श्रोत्यांच्या मनावर तो राग रुंजी घालत रहावा. रूपक कुलकर्णी यांनी जोड-झालापेक्षा अधिक वेळ आलापी करण्याकरिता दिला त्यामुळे त्यांचे बासरी वादन संस्मरणीय झाले. त्यानंतर गेली ४५ वर्षे बासरीवादन करणाऱ्या रूपक यांनी नऊ मात्रांच्या मत्त तालामध्ये एक गत सादर केली. मैहर घराण्याच्या मांज खमाज मधील २ बंदिशी रूपक यांनी रामदास पळसुले यांच्या समर्पक तबला साथीने बासरीवर सादर केल्या आणि शनिवारचे सत्र संपले. बऱ्याच कालावधीनंतर पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत दिवसाच्या प्रत्येक प्रहराचे रागसंगीत ऐकल्याची रसिकांची भावना होती.
    रसिकांनी एकत्र येऊन संगीत ऐकण्याला गेल्या २ वर्षात संगीत रसिक पारखे झाले होते. या पार्श्वभूमीवर ३ दिवस लोणावळ्यामध्ये निवास करून कलाकार आणि संगीत रसिक एकत्र येतात आणि संगीताचा आनंद मनमुराद घेतात ही मानसिक समाधान देणारी बाब होती हे खरेच, शिवाय कोणत्याही इतर व्यवधानांचा विचार न करता फक्त संगीतावरच लक्ष केंद्रित करून त्या कलेचा आनंद लुटणे हे केवळ निवासी संगीतामुळे शक्य झाले. २५-२६-२७ मार्च २०२२ रोजी मनःशक्ती केंद्र, लोणावळा येथे संपन्न

ความคิดเห็น • 7

  • @DattatrayAmbhoreflueteazyclass
    @DattatrayAmbhoreflueteazyclass ปีที่แล้ว +1

    गर्व आहे मराठी इन्स्ट्रुमेंट वादकाचा आणी व्यासपीठावर मराठीतून बोलण्याचा.....खुप सुंदर बासरीवादन सादरीकरण..

  • @जयभारतमाता-ह9ह
    @जयभारतमाता-ह9ह ปีที่แล้ว

    Devine very sweet and excellent 🙏🙏🙏Sir.

  • @vinodgajbe9822
    @vinodgajbe9822 7 หลายเดือนก่อน

    खुप छान ❤❤

  • @ArunSatheArchival
    @ArunSatheArchival 2 ปีที่แล้ว +1

    Excellent share.. अप्रतिम आलापी..

  • @amardeshmukh7807
    @amardeshmukh7807 ปีที่แล้ว

    🙏🙏

  • @gyaanijiflute88821
    @gyaanijiflute88821 2 ปีที่แล้ว +1

    🌹🌹🌹🙏🙏🌹🌹

  • @baijuthakar
    @baijuthakar ปีที่แล้ว +1

    Just Superb 💙💜👍