वर्णे आबापुरी यात्रा उत्साहात साजरी चांगभल्याचा गजर करत गुलाल खोबऱ्याची उधळण

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ต.ค. 2024
  • वर्णे आबापुरी यात्रा उत्साहात संपन्न चांगभले च्या गजरात काळभैरवनाथ व जोगेश्वरी देवीचा विवाह सोहळा संपन्न..
    वडूज / प्रतिनिधी - विक्रमसिंह काळे
    चांगभले च्या गजरात श्री काळभैरवनाथ व जोगेश्वरी यांचा विवाह सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये व गुलाल खोबऱ्याची उधळण करत लाखो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाला. सातारा जिल्ह्यातील मोठ्या यात्रे पैकी असणारी वर्णे - अबापुरी यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. चालत आलेल्या परंपरेनुसार ही यात्रा चार दिवस भरते . चालू वर्षी ३ , ४ ,५ ,६ एप्रिल हे यात्रेचे मुख्य दिवस होते. या मध्ये बुधवारी म्हणजेच ३ एप्रिल रोजी रात्री १२ वाजता हरीजागराने यात्रेचा प्रारंभ झाला. देवाचे सेवेकरी डवरी, घडशी, गुरव,यांच्या सुमधुर वाद्यांने हरीजागर कार्यक्रमाची सुरुवात केली यावेळी देवाचा जागर गोंधळ होतो. वेळी सर्व मानकरी देवाच्या सेवेत तल्लीन होऊन आनंदाने देवासमोर नाच गाण्यांचे कार्यक्रम करतात. रात्री २ वाजता श्री देवस्थानाचे विश्वस्त व मठाधिपती श्री. प्रकाश कुलकर्णी ( नाना ) यांच्या पाया मध्ये खडावा परिधान करून देवाजींना गजावरती उभे केले जाते.व आलेल्या भक्तांची कोडी व समस्या यांचे निवारण केले जाते. असा हा हरी जागराचा कार्यक्रम रात्री उशीर पर्यंत सुरू असतो. यात्रेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच ४ एप्रिल हा यात्रेचा मुख्य दिवस असून वर्णे ग्रामस्थांच्या वतीने श्रींचा छबिना दुपारच्या बारा वाजता डोंगरावरील मुख्य मंदिरात नेहला जातो. तिथली पुजा झाल्यानंतर हा छबीना खाली असणार्‍या मंदीरात ध्येय आणला जातो व नंतर सायंकाळी पाच वाजता वाजत गाजत पालखी, छबिना जानाई भवानी माता यांच्या भेटीसाठी गावात नेहला जातो.शुक्रवार दिनांक ५ एप्रिल रोजी पहाटे ५.१ मिटाने श्री काळभैरवनाथ व जोगेश्वरी देवी यांचा विवाह सोहळा साजरा करण्यात आला. या यात्रेसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात भावीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या देवाचे वैशिष्ट्य म्हणजे नवसाला पावणारा हा देव असल्याने या भक्तांचा नवस पूर्ण होतो असे भक्त या ठिकाणी मोठ्या संख्येने गुलाल खोबऱ्याची उधळण करत असतात. या देवाचे मानकरी म्हणून सुर्वे ,वाघमोडे ,हांडे, वाणी, इंदलकर यांना मानसून हे सर्वच मानकरी मोठ्या उत्साहाने या यात्रेसाठी उपस्थित राहतात. व या देवाची सेवा करण्यासाठी सेवेकरी म्हणून गुरव ,गडशी ,माळी, डवरी ,बुवा यांचा मान असतो.
    सध्या या देवस्थानचे मठाधिपती म्हणून श्री प्रकाश कुलकर्णी (नाना ) हे असून त्यांना देवनाना असेही संबोधले जाते. अशा पद्धतीने यात्रा सलग तीन ते चार दिवस चालते या यात्रेत मोठ्या प्रमाणावर मिठाई वाले, हॉटेल व्यवसाय, गृह उपयोगी वस्तू यांची दुकाने, सौंदर्यप्रसाधने यांची दुकाने ,रसवंती गृह यांची मोठी रेलचेल असते. या यात्रेची शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी सातारा जिल्हा पोलीस प्रशासनाकडून मोठा फौज फाटा तैनात करण्यात आला होता.
    खटाव तालुका प्रतिनिधी - विक्रमसिंह काळे, वडूज

ความคิดเห็น • 3

  • @sharadghutugade7608
    @sharadghutugade7608 6 หลายเดือนก่อน

    ओम श्री काळभैरव नाथाय नमः

  • @ajayshete7258
    @ajayshete7258 6 หลายเดือนก่อน +1

    Jay Shri kalbhairav jogubai .

  • @mandeshnews7098
    @mandeshnews7098 6 หลายเดือนก่อน

    नाथ साहेबाच्या नावानं चांगभलं