sc,st वर्गीकरणच्या आदेशा विरोधात भारत बंदला समर्थन 21/8/2024
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 ธ.ค. 2024
- अनुसूचित जाती अनुसूचित जमाती वर्गातील आरक्षणात वर्गीकरण करण्याचा माननिय सर्वोच्च न्यायालयाचे निर्णया विरोधात अनेक संघटने द्वारे पुकारलेल्या 21 ऑगस्ट रोजी भारत बंद ला समर्थन करीत कन्हान कांद्री येथील अनुसूचित जाती, जमाती व इतर संघटना तर्फे हाथात फलक, झंडे घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक कन्हान ते कांद्री परिसरात मोर्चा काढण्यात आले. भारत बंद ला जीवनआवश्यक दुकाने सोडून इतर दुकाने पूर्ण पणे बंद करून कन्हान कांद्री येथील दुकानदारांनी सहकार्य केले. तर संविधान वाचवा, आरक्षण वाचवा च्या घोषणा करण्यात आल्या. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतड्यावर माल्यार्पण करून याच चौकात तहसीलदार यांच्या द्वारे महामहीम राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात राज्यघटनेच्या अनुच्छेद ३४१ अंतर्गत अधिसूचित केलेल्या अनुसूचित जातीतील यादीत छेडछाड करू शकत नाहीत. राज्यांची कृती राज्यघटनेच्या कक्षेत असावी, हा निर्णय मनुवादी व्यवस्थेचे प्रतीक आहे. या निर्णयाच्या विरोधात आज 21 ऑगस्ट 2024 रोजीच्या भारत बंद ला समर्थन असल्याचे लिहिले असून प्रसंगी भिमशक्ती महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर भिमटे, वरिष्ठ समाजसेवक विनायक वाघघरे, भगवान नितनवरे, न.प उपाध्यक्ष योगेश रंगारी, नगरसेविका मोनिका पौनिकर, संगीता खोब्रागडे, राखी परते, अनिता पाटील, कल्पना नितनवरे, मनोज गोंडाने, चेतन मेश्राम, शैलेश दिवे, कैलास बोरकर, सतीश भसारकर, मनीष भिवगडे, अश्वामेघ पाटील, अभिजित चांदूरकर, गौतम नितनवरे, मैयूर माटे, नितीन मेश्राम, अखिलेश मेश्राम, राजेंद्र फुलझले, सुखलाल मळावी, संदीप परते सहित मोठ्या संख्येत नागरिक उपस्तिथ होते.
#bharatbandh
#aarakshan
#संविधान