Padmini Kolhapurkar | LAVANI MAHOTSAV 2014 | Sharad Krida Va Sanskrutik Pratishthan | Pune

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ธ.ค. 2020
  • शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे
    पुणे लावणी महोत्सव
    महाराष्ट्रात लावणी नृत्याला लोकाश्रय आणि राजाश्रय लाभला आहे. नृत्य, गीत आणि अदाकारी यांचा त्रिवेणी संगम म्हणजे लावणी होय. लावणीचा वारसा जपण्यासाठी आणि कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रतिष्ठानतर्फे पुणे लावणी महोत्सव स्पर्धा आयोजित केली जाते. विजेत्यांना चांदीच्या घुंगरासह रोख रकमेची पारितोषिके देऊन गौरविण्यात येते.
    ढोलकीच्या जोरकस ठेक्यावर हे नृत्य सादर केले जाते. पठ्ठे बापूराव, शाहीर प्रभाकर, होनाजी बाळा, रामजोशी आणि इतरांच्या आशयपूर्ण लावण्या प्रसिद्ध होत्या. अशा या लावणीचा वारसा कायम रहावा, त्यातील आशय कायम रहावा आणि कलाकारांना ग्रामीण भागाबरोबरच शहरातही मानाचे स्थान असावे, या हेतूने महोत्सव आयोजित केला जातो. महोत्सवात पुणेकरांना पारंपारिक लावण्यांचे कलाविष्कार पाहण्याची संधी मिळते.
    निर्गुणी लावणी, शृंगारी लावणी, बैठकीची लावणी आणि फडाची लावणी, असे लावणीचे विविध प्रकार आहेत. या प्रकारच्या लावण्यांना नंतर तमाशाचे स्वरूप आले. नृत्यांगनांच्या अदाकारीत आणि शब्दरचनांमध्ये उथळपणा शिरला. मात्र, लावणीचा वारसा कायम रहावा आणि नवीन कवी, लेखक, नृत्यांगना, वादक यांना जत्रेतून, बाजारातून शहरातील नाट्यगृहात आणले. त्यांना कलेसाठी नवे व्यासपीठ निर्माण करून दिले. विशेष म्हणजे सभ्य स्त्री प्रेक्षकही येतील, असे उचित वातावरण महोत्सवामुळे निर्माण झाले, हेच प्रतिष्ठानचे यश होय.
    पहिल्या महोत्सवाचे उद्घाटन (२०१४)
    पहिला लावणी महोत्सव २०१४ मध्ये आयोजित केला होता. बालगंधर्व रंगमंदिरात ९ ते ११ डिसेंबर असा तीन दिवस हा महोत्सव सुरु होता. महोत्सवाचे उद्घाटन लावणीसम्राज्ञी यमुनाबाई वाईकर यांच्या हस्ते झाले. या वेळी महापौर दत्तात्रय धनकवडे, उपमहापौर आबा बागुल, अंकुश काकडे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया उपस्थित होते. मुंबई विद्यापीठाच्या धर्तीवर पुणे, कोल्हापूर विद्यापीठात वाईकर यांच्या जीवनचरित्रावर अभ्यासक्रम सुरु करण्याची मागणी यमुनाबाई वाईकर यांचे भाचे शशिकांत जावळकर यांनी या वेळी केली. अंतिम स्पर्धा आणि बक्षीस वितरण १२ डिसेंबर रोजी दुपारी १२ ते ८ दरम्यान बालगंधर्व रंगमंदिरात झाले. अभिनेते नागेश भोसले यांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले. महापौर दत्तात्रय धनकवडे, उपमहापौर आबा बागुल, मिस्टर युनिव्हर्स सम्राट चौगुले उपस्थित होते,
    विजेते संघ
    • प्रथम क्रमांक आर्यभूषण थिएटर कला केंद्राने पटकाविला. दोन किलो चांदीचे घुंगरू, ५१ हजार रुपये रोख आणि सन्मानचिन्ह बक्षीस म्हणून देण्यात आले.
    • दुसरा क्रमांक करवीरच्या पद्मिनी कोल्हापूरकर कला केंद्राने पटकाविला. ३१ हजार रुपये रोख आणि सन्मानचिन्ह बक्षीस म्हणून देण्यात आले.
    • तिसरा क्रमांक सोलापूरच्या वैशाली वाफळेकर कला केंद्राने पटकाविला. त्यांना २१ हजार रुपये आणि
    सन्मानचिन्ह देण्यात आले.
    * उत्कृष्ठ ढोलकीवादक पुरस्कार शेखर डावाळकर यांना देण्यात आला. १५ हजार रुपये रोख , सन्मानचिन्ह
    * उत्कृष्ठ नृत्यांगना पुरस्कार पद्मिनी पाटील आणि पूजा वाईकर यांना आणि उत्कृष्ट गायिका पुरस्कार
    मंगला जावळे यांना दिला. पाच हजार रुपये रोख आणि सन्मानचिन्ह, असे पुरस्काराचे स्वरूप होते.
  • เพลง

ความคิดเห็น • 14

  • @user-nf3gy4ki3m
    @user-nf3gy4ki3m 2 ปีที่แล้ว +3

    छान कलावंत सर्व

  • @subhashsalve9593
    @subhashsalve9593 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan lavani sadar kilo 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹💯

  • @baluavhad4071
    @baluavhad4071 2 ปีที่แล้ว +4

    छान आहेस सर्व कलाकारांनी मस्त केले

  • @chandramohan6502
    @chandramohan6502 ปีที่แล้ว

    GROUP OF 9 YARD NAVARI QUEEN BEAUTY MY 100 NAMASKARAMS

  • @sureshdhondage8459
    @sureshdhondage8459 ปีที่แล้ว +1

    Nice

  • @dnyeshwaraurgand3508
    @dnyeshwaraurgand3508 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान 👌👍🤝

  • @arunmagdum8828
    @arunmagdum8828 3 ปีที่แล้ว +1

    Nad khula

  • @prakashgadle950
    @prakashgadle950 3 ปีที่แล้ว +2

    • @ramchandrasanap1028
      @ramchandrasanap1028 2 ปีที่แล้ว +1

      नाही तरी पद्मिनीकोल्हापुरे यांचा फड प्रसिध्द आहे.

    • @ramchandrasanap1028
      @ramchandrasanap1028 2 ปีที่แล้ว

      इश्काची इंगळी डसलई गित व अभिनय या वरच हे गाण उत्तम आहे.

    • @ramchandrasanap1028
      @ramchandrasanap1028 2 ปีที่แล้ว

      ढोलकी,नव्हे,नाल म्हनतात आमच्याकडून हि वाजली की अंगात वार अल्यासारख होतं.त्यालाच थिरकन,म्हनतात

  • @fhdjhxhbdvbcsj
    @fhdjhxhbdvbcsj 3 ปีที่แล้ว +1

    P