घरनिकीची आण-बाण-शान । घरनिकीचा राजा, छब्या, डस्टर, शंभू, मथुर, शायर, नाग्या

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ต.ค. 2024
  • नमस्कार, मी समाधान कदम
    आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ते म्हणजे माझं स्वतःचं गाव जे गाव सांगली जिल्ह्यातील, आटपाडी तालुका आणि आटपाडी तालुक्याच्या शेवटचं, चारीबाजूनी डोंगर आणि मधोमध वसलेलं असं छोटंसं माझं घरनिकी गावं आणि या माझ्या गावामध्ये असलेले बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर नाव गाजवत असलेले नामवंत बैल तसेच या आमच्या गावाची बैलगाडा शर्यतीची असलेली परंपरा आणि एकंदरीतच या क्षेत्राशी निगडित माझ्या गावाचा असलेला वसा मी माझ्या माहितीप्रमाणे तुमच्यापर्यन्त सांगण्याचा प्रयत्न करत आहे.
    "घरनिकी हे तसं विविधतेतून एकतेच प्रतीक असलेलं गावं" आहे आणि या माझ्या गावाची तालुक्यात तसेच जिल्ह्यात एक वेगळीच ओळख होती. पण आता गावातल्या बैलगाडा शर्यतीने आणि गावातल्या नामचीन बैलांमुळे या आमच्या गावाचा संपूर्ण महाराष्ट्रभर एक वेगळा ठसा उमटून दिलेला आहे.
    हा विडिओ बनवण्यामागचा उद्देश हाच आहे कि, जसा फेम या महाराष्ट्रामध्ये काही नामचीन बैलांनी मिळवला आहे तसाच पळ आणि तेवढ्याच ताकतीची बैलं हि आमच्या या छोट्याश्या गावात आहेत आणि ती आज महाराष्ट्रभर नाव कमवत आहेत. आणि त्या सर्व बैलांची - त्यांच्या मालकांची आपण थोडक्यात घेतलेली मुलाखत, त्यांची माहिती आपल्यासमोर सादर करत आहोत.
    घरनिकीचा राजा, घरनिकीचा छब्या, घरनिकीचा डस्टर, घरनिकीचा उगवता मथुर, घरनिकीचा शाहीर, घरनिकीचा शंभू, घरनिकीचा नाग्या, अशी ही अनेक नामचीन बैलं आमच्या गावामध्ये तयार होत आहेत.
    त्याचबरोबर गावातल्या आणि परिसरातल्या बैलगाडा शर्यतीच्या सुरवातीच्या काळापासून झेंडा पाडण्याचं काम अखंड पार पाडलेले आमच्या गावाचे जेष्ठ नागरिक श्री. आनंद (दादा) माने. त्यांनी आमच्या गावात किंवा आसपासच्या परिसरात कुठं हि बैलगाड्या शर्यती असल्या कि आनंद दादा वेळेत तिथं हजर राहणार आणि त्यांचा तो मानंच. त्यांच्याशिवाय शर्यतीचा झेंडा कोणी हातात घेतलाच नाही. त्यांची अखंड सेवा आमच्या गावाला लाभलेली आहे. आम्ही खरंच खूप खूप आभारी आहोत. त्यांनी सुद्धा त्यांच्या काही जुन्या आठवणी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितल्या आहेत.
    आमच्या गावाच्या बैलगाड्या शर्यतीला खऱ्या अर्थानं जर जोर कोणी लावला असेल तर आमचे बंडांनाना. गावातलं एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आणि दावणीला त्या सुरुवातीच्या काळात ४ पळावं बैल असलेला परिवार म्हणजे बंडांनानाचा परिवार. स्वतः बैलगाडी ड्रायव्हर, सोबत पाच पन्नास पोरं सोबत. आणि तो काळ गाजवलेला एकमेव खिलाडी म्हटलं तर हरकत नाही. बंडांनाना नी सुद्धा त्यांच्या काही आठवणी आपल्याला या व्हिडिओमध्ये सांगितल्या आहेत.
    बैलगाडा शर्यतीला जर सोन्याचे दिवस खऱ्या अर्थाने कोणी आणले असतील तर ते म्हणजे "महाराष्ट्राचे तरुण तडफदार नेते, महाराष्ट्र विधान परिषद सदस्य सन्माननीय गोपीनाथ पडळकर साहेब" यांनी. गावातल्या विविध विकासकामांच्या उदघाटनप्रसंगी गावात हजर असता त्यांनी या शर्यतींबद्दल आणि आमच्या गावातल्या तसेच परिसरातल्या बैलगाड्यांबद्दल त्यांचे विचार मांडलेले आहेत. ते सुध्दा आपल्याला या व्हिडिओ मध्ये बघायला मिळणार आहे.
    एकंदरीत सर्व समावेशक असा व्हिडिओ बैलगाड्या शर्यती शौकीन तसेच लहान-थोर, मिञ परिवार, या सर्वांना पाहण्यासाठी एक अफलातून नजराणा घेवून येत आहोत.
    आपण सर्वांनी आजपर्यंत जसे माझ्यावर आणि माझ्या कलेवर प्रेम केलात तसचं प्रेम माझ्या या सुध्दा कलाकृतीवर कराल अशी मला आशा आहे.
    आपल्या सर्वांच्या सहकार्याबद्दल तसेच आपण माझ्या कलेला दिलेली दाद, प्रेम याबद्दल मी आपणा सर्वांचा शतशः ऋणी आहे.
    असंच सहकार्य करत रहा. मी आपल्यासाठी नवनवीन कलाकृती घेवुन येत जाइन.
    धन्यवाद.
    समाधान कदम
    घरनिकी, आटपाडी, सांगली
    +91 90042 16704

ความคิดเห็น • 54

  • @subhashsule9917
    @subhashsule9917 ปีที่แล้ว +1

    Ek number video banavla shet mast❤

  • @dattatrayjadhav8814
    @dattatrayjadhav8814 2 หลายเดือนก่อน +1

    घनिकीचा राजा अभिनंदन संर

  • @kunalkhairmode5479
    @kunalkhairmode5479 ปีที่แล้ว +1

    Nice Video ❤

  • @akshayrajmane9124
    @akshayrajmane9124 ปีที่แล้ว +1

    खूप छान

  • @vishnukolekar1097
    @vishnukolekar1097 3 หลายเดือนก่อน +1

    गरीबाचा पैलवान घरनिकी चा राजा 9950❤️👑

  • @ajajkurshi4814
    @ajajkurshi4814 ปีที่แล้ว +1

    घरनीकीची साज पळवा या,, छ.,

  • @traveltorecovery2808
    @traveltorecovery2808 ปีที่แล้ว +2

    Superb

  • @abhishekmagdum842
    @abhishekmagdum842 ปีที่แล้ว +18

    गरीबाचा सगळयांना घाम फोडनार असा वेगसम्राट राजा ..big fan raja

  • @ravirajkamble4930
    @ravirajkamble4930 ปีที่แล้ว +1

    एक नंबर समाधान

  • @kishorpawar8157
    @kishorpawar8157 ปีที่แล้ว +1

    gavcha saj palala pahije

  • @marutimane9778
    @marutimane9778 ปีที่แล้ว +1

    Khup chhan

  • @ramchandramane1792
    @ramchandramane1792 29 วันที่ผ่านมา

    Raja dhngrach raja ahe mi pan ek dgngar ahe mi yenar ahe raja la bhtay dhngar dhnach dhngar she nad nahi karycha dhngarch❤

  • @arunakulkarni598
    @arunakulkarni598 ปีที่แล้ว +1

    Ek number kadam

  • @sanjaykadam3172
    @sanjaykadam3172 ปีที่แล้ว +1

    खूपच छान समाधान 👍

  • @vishnukolekar7194
    @vishnukolekar7194 ปีที่แล้ว +1

    खूप छान विडिओ तयार केल्याबदद्ल अभिनंदन समाधान👍🏼👍🏼

  • @vibhuteprasad988
    @vibhuteprasad988 ปีที่แล้ว +2

    Bandu pawar yancha ladakya bail khup prasiddha hota

  • @tusharkolekar30
    @tusharkolekar30 ปีที่แล้ว +1

    Chan❤❤

  • @Khadadshubham
    @Khadadshubham ปีที่แล้ว +1

    एक नंबर 🔥

  • @abasoshendage6114
    @abasoshendage6114 ปีที่แล้ว +1

    Chan ahe

  • @ashachavan1143
    @ashachavan1143 ปีที่แล้ว +2

    Khup chan

  • @vaishalidesai-ri3sj
    @vaishalidesai-ri3sj ปีที่แล้ว +2

    Khup chan...

  • @sandipmadane349
    @sandipmadane349 ปีที่แล้ว +1

    Raja❤

  • @nitinnaniskar5998
    @nitinnaniskar5998 ปีที่แล้ว +2

    छान...समाधान भावा.💐🚩🙏

  • @medical5317
    @medical5317 ปีที่แล้ว +2

    एकादी शॉर्ट फिल्म पण बनव समाधान बेस्ट ऑफ लक🎉🎉

  • @satishjadhav303
    @satishjadhav303 ปีที่แล้ว +1

    No 1 bail
    Raja

  • @ramchandramane1792
    @ramchandramane1792 29 วันที่ผ่านมา

    5:05

  • @surajmadne5545
    @surajmadne5545 ปีที่แล้ว +2

    🔥🔥🔥🔥

  • @maheshmistri6590
    @maheshmistri6590 ปีที่แล้ว +4

    Atta khara video ala nahitar TH-cam wale sagle manage asalyasakhe mulakhat ghyayla jatat tyach tyach bailmalkanchi

  • @NileshSuryavanshi-nx6wi
    @NileshSuryavanshi-nx6wi ปีที่แล้ว +5

    घरनिकीच गाव आणि त्याच्या परंपरा नेहमीच तुझ्या युट्युब चॅनल च्या माध्यमातून सर्वांसमोर सादर करतोयस त्याबद्दल आभार , आनी अमीर खान प्रमाणे एकच प्रोजेक्ट पूर्ण ताकतीने करतोस त्याला तर तोडच नाही, निःपक्षपाती पणाने केलेलं सादरीकरण हेही स्वतःच वेगळेपण तू यातून दाखवून दिलंस. .. पुनःस्य नवीन प्रोजेक्टसाठी आभार ....

  • @rajeshbandagale1991
    @rajeshbandagale1991 ปีที่แล้ว +2

    👍👍

  • @Rubabdar_kokan
    @Rubabdar_kokan ปีที่แล้ว +4

    नांद खुळा माहिती सगितली तुम्हीं आज वर आशी कोनी सगितली नाहीं

  • @munnarajput3109
    @munnarajput3109 ปีที่แล้ว +17

    समाधान कदम तुमच खरच जेवढे आभार मानावेत तेवढे कमीच आहेत... आज तुम्ही गोरगरीबांचा बैलांची माहिती अखंड महाराष्ट्र बर आपल्या विडिओचा माध्यमातून दाखवून देत एक चांगला आदर्श निर्माण केला आहे.. असेच चांगल्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवत जावा.. हीच शुभेच्छा...