निघालो घेऊन दत्ताची पालखी-दत्त गीत|NIGHALO GHEUN DATTACHI PAALKHI BHAJAN|AJEET KADKADE

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 1.1K

  • @masteradityavlog
    @masteradityavlog 2 หลายเดือนก่อน +30

    मी अजित कडकडे यांचे हे गीत 1983 पासून ऐकत आहे आज आज माझे वय 44 आहे तरी आज ही हे गीत आवडी ने ऐकत असतो .खूप खूप अविस्मरणीय आठवण आहे .

  • @MaheshHasbe
    @MaheshHasbe 2 หลายเดือนก่อน +23

    कोणाकोणाला वाटतं की दत्तगूूरू आमच्या पाठीशी आहे लाइक व रिप्लाय करा

    • @BalajiDurgam
      @BalajiDurgam หลายเดือนก่อน +1

      श्री स्वामी समर्थ दत्त गुरु देव महाराज 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @rdxrd9046
    @rdxrd9046 ปีที่แล้ว +83

    बालपण ते यौवन आले तरी हे सुंदर दत्त गीत अजूनपण डोळ्यात पाणी आणते ! या अजित दादांच्या आवाजातील गोडवा अतुलनीय आहे❤ .

  • @PradipYogi-pu1ng
    @PradipYogi-pu1ng 10 หลายเดือนก่อน +46

    धर्म हा एक जगण्याचा संस्कार आहे वेगळी वाट आहे परंतु ईश्वराला जाणण्यासाठी लागतं ते अंतकरण तुमचं आणि आमचे एकच आहे

  • @VaidikGyanMarathi
    @VaidikGyanMarathi ปีที่แล้ว +44

    अप्रतिम दत्त भक्तीगीत ऐकुन मन प्रसन्न होते.श्रीगुरुदेव दत्त.

  • @vishwastoraskar
    @vishwastoraskar ปีที่แล้ว +14

    आम्ही गणपतिनिमित्त कोकणातील गावात जमा झालो की, त्या दिवसात विविध भक्तिगीते टेपवर वाजवली जायची! त्यात अजित कडकडे यांची बहुतेक गाणी असत. ती गाणी ऐकत ऐकत आम्ही भावंडे मोठे झालो. माझ्या धाकट्या काकांना भक्तिगीतांची फार आवड होती! ते स्वतः फार गाणे गात. त्यांचा आवाजही फार भारदस्त होता! ते दत्तगुरूंचे भक्त होते आणि हे गाणे आवडीने ऐकत व गात! आज ते या जगात नाही मात्र हे गाणं ऐकतांना त्यांची कायम आठवण येते! खरंच पं. अजित कडकडे यांच्या गाण्यात जादू आहे! ऐकताना मनाची समाधी लागते!!❤

  • @kalpananaik5156
    @kalpananaik5156 3 ปีที่แล้ว +103

    श्री गुरुदेव दत्त, प्रविण दवणेंची रचना, नंदू होनप यांच संगीत, अजित कडकडे यांचा स्वर.. किती सुंदर भक्तीगीत ऐकायला मिळणं, दत्तजयंतीनिमित्त सगळ्यांचे मनापासून आभार..🙏🌹

    • @santoshkakade4208
      @santoshkakade4208 2 ปีที่แล้ว +1

      🌹श्री गुरुदेव दत्त 🌹🙏🙏🙏

    • @kishornirhali3994
      @kishornirhali3994 2 ปีที่แล้ว

      रचना खूप
      फुले गोड ओली

    • @pramiladabholkar830
      @pramiladabholkar830 9 หลายเดือนก่อน

  • @TheMilind7
    @TheMilind7 3 ปีที่แล้ว +138

    लहानपणी अशी गाणी कानावर ऐकायला यायची, आज त्या गाण्यांचा खरा अर्थ समजत आहे, पण आज अशी गाणी क्वचित ऐकायला मिळतात.
    परमात्मा👌

    • @madhurisurve5837
      @madhurisurve5837 2 ปีที่แล้ว +3

      अगदी खरं दादा 🙏 श्री गुरुदेव दत्त 💐

    • @kishorvelhal3772
      @kishorvelhal3772 2 ปีที่แล้ว +3

      Lokanchi.abhiruchi.khup.badali dada

    • @prasadshinde3418
      @prasadshinde3418 9 หลายเดือนก่อน +1

      Khar ahe Dada Atta arth kalat ahe

    • @dhanashreejoshi174
      @dhanashreejoshi174 6 หลายเดือนก่อน +1

      बरोबर आता महती आणि भाव कळतात

    • @smitatimase9484
      @smitatimase9484 6 หลายเดือนก่อน +1

      😊😊😊

  • @suhaskaranjikar3097
    @suhaskaranjikar3097 2 ปีที่แล้ว +124

    श्री अजित कडकडे यांनी गायलेले सुमधुर गीत बरेच वेळा ऐकूनही तृप्ती होत नाही बहुदा रोज ऐकतो त्यांची इतरही खूप गाणी सुंदरच आहेत आवाज अतिशय गोड

    • @monikathite7375
      @monikathite7375 4 วันที่ผ่านมา

      अति सुन्दर ❤❤❤❤❤

  • @paranjgu
    @paranjgu ปีที่แล้ว +52

    कितीही थकवा असुदे,मन विचलित असुदे,पण एकदा का हे भक्तीगीत ऐकलं की सार काही पळून जात,मन दिगंबरांच्या भक्तीत विलीन होऊन जातं,एकरूप होऊन जातं अगदी🙏मी रोज म्हणजे अगदी न चुकता दिवसातून एकदा तरी ऐकतेच🙏

    • @asavaridekhane7845
      @asavaridekhane7845 หลายเดือนก่อน

      Khupch sunder apritam gane आवाज tar uttamch.thaklele असताना eikale ki urja milte.tartari yete.rojch eikate.dhnywad.abhari आहे.

  • @ravindrapund8727
    @ravindrapund8727 3 ปีที่แล้ว +549

    अजित कडकडे यांचे हे गीत मी माझ्या लहानपणी १९८५ सालापासून ऐकतो परंतू आज ३५ वर्षे उलटले तरी दत्ताची पालखी दिसली तरी हे गाणे ओठांवर सहजपणे येते. आवाजात कमालीची दत्ता विषयी भावना जागृत होऊन जातात. 🙏

  • @YogeshPatil-ts2qh
    @YogeshPatil-ts2qh 8 หลายเดือนก่อน +46

    कोकणामध्ये हे मंदिरा मध्ये आणि जिथे कुठे पूजा असेल तेथे हे भक्ती गीत अजित कडकडे यांच्या आवाजात ऐकायला मिळते , श्री गुरुदेव दत्त

  • @maabharati7911
    @maabharati7911 2 ปีที่แล้ว +979

    मी हा अभंग ऐकूणच लहानाचा मोठा झालो..... आजही तितकाच गोडवा आहे ऐकण्यात, मी मुस्लिम आहे, पण अभंग खरंच मनाला जडतात ❤🙏

    • @vishwasrathod4247
      @vishwasrathod4247 ปีที่แล้ว +91

      मुस्लीम कोनी नाही
      सगले ईश्वर पुत्र आहोत

    • @maabharati7911
      @maabharati7911 ปีที่แล้ว +24

      @@vishwasrathod4247 🙏🙏सत्य बोललात !

    • @madhukardurgvale9046
      @madhukardurgvale9046 ปีที่แล้ว +6

      9

    • @nehakulkarni7522
      @nehakulkarni7522 ปีที่แล้ว +46

      देव एकच आहे...नावे वेगळी आहेत..कोणी राम म्हणते कोणी अल्ला...तुम्ही आमचे भाऊच आहेत..

    • @maabharati7911
      @maabharati7911 ปีที่แล้ว +9

      @@nehakulkarni7522 सत्य वचन ताई !

  • @vitthalbharatiofficial3406
    @vitthalbharatiofficial3406 2 หลายเดือนก่อน +8

    मनाला शांती देणार हे दत्तगुरुंचं पालखीचं भक्ती गीत आहे. 🙏

  • @dineshkasle1720
    @dineshkasle1720 3 ปีที่แล้ว +93

    सदाबहार संगीत, सुमधुर, श्रवणीय, ही ऐकल्यावर गावची आठवण येते, गावी सण असो वा कोणताही मंगलकार्य दिवसाची पहाट पंडित अजित कडकडे यांच्या गाण्यानेच होते🙏👌💐

    • @ashokpathrabe6098
      @ashokpathrabe6098 2 ปีที่แล้ว +1

      Bopok

    • @pallvipanchal7996
      @pallvipanchal7996 2 ปีที่แล้ว +1

      Right

    • @pallvipanchal7996
      @pallvipanchal7996 2 ปีที่แล้ว +2

      Mi lhanpnasun iktey, toch godwa,tech madhury,

    • @vikramvharambale8992
      @vikramvharambale8992 2 ปีที่แล้ว +2

      🙏दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏

  • @prajtarapurkar9712
    @prajtarapurkar9712 2 ปีที่แล้ว +13

    आज २३ ऑक्टोबर ला हडपसर, पुणे येथे दिवाळी पहाट कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमात हे गीत एकले.... मन अगदी प्रसन्न झाले...त्यांनी सांगितले की दत्ताचे भक्त आहेत....आणि ते खूप वेळा वाडीला गेलेत....

  • @manishkarnik4212
    @manishkarnik4212 9 หลายเดือนก่อน +24

    अवधुत चिंतन श्री गुरूदेव दत्त.. खूपच प्रासादिक मधूर असे हे भजन आहे.. हे भक्तीगीत रचयिता प्राध्यापक श्री. प्रवीण दवणे सर , संगीतातुन शब्दांना मंगल धून देणारे पंडित श्री. नंदूजी होनप सर आणि आपल्या सुश्राव्य भक्तिरसाने भक्तांना नित्य सुस्नात करणारे पंडित श्री. अजितराव कडकडे सर असे महानुभाव जेथे असतात तेथे मंगल पवित्र निर्मिती उदयास येते..या दिग्गज्जांचे मनापासून आभार..! अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.......!💐💐💐💐💐💐💐

  • @sudhirburde3444
    @sudhirburde3444 3 ปีที่แล้ว +153

    आम्ही सगळेच भाग्यवान झालो जेव्हा पंडित अजित कडकडेनी हे भजन गायलं. अनमोल अजितजी.

  • @rahulmetkari5974
    @rahulmetkari5974 ปีที่แล้ว +11

    हे गाणं ऐकलं की मला पिठापूरचे श्रीदत्तात्रेय मालक ते मंदिर तेथे असणारे सर्व पुजारी व भक्त मंडळी आठवतात आयुष्यातली सर्वांत सुंदर भेट दिली धन्यवाद महाराज

  • @Mayurebhoir123
    @Mayurebhoir123 หลายเดือนก่อน +3

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. जय श्री गुरुदेव दत्त. ॐ साईराम ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः ॐ नमः शिवाय. जय श्री राम. पवनपुत्र हनुमान की जय

  • @prithvirajsakat9157
    @prithvirajsakat9157 7 หลายเดือนก่อน +3

    संथ जळणाऱ्या दिव्या सारखा एकाग्र स्वर , आणि अप्रतिम लकब , आणि आवाजाची योग्य मांडणी , म्हणजे अजित कडकडे!!
    सुरेश वाडकर , अजित कडकडे, अनुराधा पौडवाल , यांच्या सारख्या प्रख्यात गायकांनी सामान्य ईश्वर भक्तांची सकाळ आणि संध्याकाळ ईश्वरमय करून टाकली ,, माझे लहानपण आणि तरुणपणात देखील या दिव्य भजनांनी एक योग्य दिशा दिली ,,
    या महान गायकांना शत शत प्रणाम 🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @madhavithakoor9973
    @madhavithakoor9973 2 หลายเดือนก่อน +4

    हे गीत खूप सुंदर आहे.श्री.अजित
    कडकडे यांनी ते छान गायलं आहे.
    त्यामुळे ते पुन्हा पुन्हा ऐकावस वाटत

  • @vijaykhamkar9835
    @vijaykhamkar9835 2 หลายเดือนก่อน +5

    अतिशय सुंदर भक्ती गीत. प्रत्याक्षा त महराज्याच दर्शन झाल्याचं भास होतो.

  • @amitlondhe8009
    @amitlondhe8009 2 ปีที่แล้ว +21

    आकाशवाणी सांगली केंद्र व कोल्हापूर केंद्र वरून पहाटे उठून हि भक्तीगीत ऐकण्याची मजा वेगळीच असते.अजित कडकडे आवाज खूप गोड आहे

  • @sagarjagtap6907
    @sagarjagtap6907 ปีที่แล้ว +22

    मला ही हे दत्तांचे भजन मनापासून खूप आवडते, या भजनात अतिशय मनमोहक भाव भक्ती आहे जो कोणी ये भजन शांत चित्ताने श्रवण केले तर या भजनाची क्रेज समजेल, एक एक शब्द असे उतरले आहेत, या भजनात माणसाला एकदम प्रसन्नता मनाला शांती मिळते, आणि शेवटी तर डोळ्यातू अश्रू आल्याशिवाय राहत नाही, आपली काळजी आणि चिंता सतत असते जगद्गुरू जनार्दनाला...🙏📿 📿🙏अवधूत चिंतन श्री श्रीपाद वल्लभ दिगंबरा..🙏📿

  • @NitinMore-y3o
    @NitinMore-y3o 2 หลายเดือนก่อน +4

    मी तर रोजचं रात्री घरी जाताना ट्रेन मध्ये ऐकत असतो
    या गीतांमध्ये गोडवा आहे अस म्हणण्यापेक्षा ह्रदयाला भिडत❤जय श्री राम जय श्री स्वामी समर्थ जय श्री गुरुदेव दत्त

  • @rameshgavade2893
    @rameshgavade2893 6 หลายเดือนก่อน +9

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा...खूप छान गाणे आणि आवाज आहे... मन तृप्त होऊन जाते...🙏🙏

  • @vijaykumarbhurke8948
    @vijaykumarbhurke8948 ปีที่แล้ว +6

    आम्ही दररोज सकाळी देवाची गाणे ऐकतो,पण खास करून माझ्या 3 वर्षाच्या मुलाला हे गाणे सारखे ऐकतो, व बोलतो...सुंदर आवाज, सुंदर गाणे... 🙏🙏🙏🙏

  • @madhurirane1603
    @madhurirane1603 8 หลายเดือนก่อน +9

    ह्या मंत्राने माझ्या माहेरची सकाळ व्हायची माझ्या बाबांच आवडता मंत्र अजून हि मी ऐकत माझे बाबा माझ्या सोबत असल्याचा भास होतो ❤

  • @vijandradixit2393
    @vijandradixit2393 6 หลายเดือนก่อน +4

    हे गाणे माझे खुप आवडते आहे आणि माझ्या लहानपणी ची आठवण करून देते लहान पणी मी महालक्ष्मी सणाला गावाकडे गेलो की मंदिरात हे गाणं सकाळी ऐकू येत होते. आणि मी आभारी आहे शिवसेना खासदार हेमंत पाटील यांचा दे नांदेड ला आषाढी महोत्सव साजरा करतात आणि दरवर्षी अलग अलग गायका ची लाईव्ह संगीत मेजवानी देतात एकदा अजित कडकडे यांचा पण कार्यक्रम नांदेड जिल्ह्यात ठेवला होता प्रत्यक्ष अजित कडकडे यांना आपल्या डोळ्यासमोर हे गाणे म्हणताना मी पाहिले आहे.

  • @parmeshwarsukne8838
    @parmeshwarsukne8838 4 ปีที่แล้ว +74

    गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः

  • @rajendradeobhankar4069
    @rajendradeobhankar4069 4 ปีที่แล้ว +213

    या दत्त भजनामधे पंडित अजित कड़े यांच्या आवाजातून भक्ति रस साक्षात ओसंडून वाहतोय,आणि सोबत जो कोरस आहे तो ही अत्यंत साजेलसा असल्याने से दत्त भजन वारंवार ऐकत रहावेसे वास्ते, संगीत नंदू होनप यांचे आहें वह गीत प्रवीण दवणे यांचे आहे।पण दर्जेदार आहे। शत-शत नमन या कलावंताना।

  • @SatishKulkarni-g5y
    @SatishKulkarni-g5y หลายเดือนก่อน +3

    सर्वांचं कौतुक व अभिनंदन
    Spirituality...gives inner strength and freshness of mind.
    खुप छान अभंग

  • @reemacoondapur9596
    @reemacoondapur9596 3 ปีที่แล้ว +91

    ब्रम्हानंदी टाळी लागते हे भजन ऐकताना. खूप सुंदर गायले आहे अजित कडकडेनी. 🙏

  • @bharatpatil860
    @bharatpatil860 3 ปีที่แล้ว +48

    ।। अवधुत चिंतन श्रीगुरुदेव दत्त ।।

  • @Sagarkumbhar3494
    @Sagarkumbhar3494 2 ปีที่แล้ว +22

    मी आपणास विनंती करतो की जर हे भक्ती गीत पुन्हा आताच्या रेकॉर्डिंग technology करावे.....हे माझ आणि माझ्या सारख्या खूप भक्तांच आवडत गीत आहे. मी रोज सकाळी उठल्यावर हेच गीत लावतो

    • @PradipYogi-pu1ng
      @PradipYogi-pu1ng 8 หลายเดือนก่อน +3

      जुन्या संगीतामध्ये जे पावित्र्य आहे ते आताच्या संगीतामध्ये नाही आताच्या गायकांमध्ये ही नाही

    • @techedu.polytechnicdiploma4745
      @techedu.polytechnicdiploma4745 7 หลายเดือนก่อน +1

      ​@@PradipYogi-pu1ng
      सत्य आहे साहेब...श्री गुरुदेव दत्त

  • @padmapattihal1287
    @padmapattihal1287 2 ปีที่แล้ว +37

    🙏🙏🙏🥭🌹अतिशय सुंदर , भावपूर्ण, सुमधुर सादरीकरण. मन तल्लीन
    होऊन गेलं ऐकतांना।खूप खूप धन्यवाद अजित जी!🌹

  • @deepakshindikar5219
    @deepakshindikar5219 3 ปีที่แล้ว +21

    अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय

  • @ratnakarbhalerao4482
    @ratnakarbhalerao4482 2 ปีที่แล้ว +88

    श्री नृसिंहसरस्वती स्वामी महाराजांच अविस्मरणीय पद व अजीत कडकडेंचा स्वर. भक्तीरसात चिंब झालो. 🙏🙏🙏🙏🙏

  • @CoolBhushan3
    @CoolBhushan3 ปีที่แล้ว +2

    अतिशय सुमधूर असे गीत .. दत्त अस नाव जरी घेतले तरी मन शांत होत आपोआप.. डोळ्यासमोर उभी राहती ती शांत, प्रसन्न आणि हसमुख दत्त मूर्ती. 🙏🌺. देव आहे हे मान्य करायला व त्याची गोडी लागायला ही पूर्व जन्मीची पुण्याई लागते..🌹 श्री गुरुदेव दत्त ❤🙏🤗

  • @KailasPardeshi-c4z
    @KailasPardeshi-c4z 6 หลายเดือนก่อน +3

    MYSELF,WITH FAMILY AND MAMA VISITED INDRAYANI,SWIMMING IN THE REVER DAM AT DEHU ,DONE DEVOTIONALPOOJAN AT TEMPLE ,Great samadhan ,satisfaction got,ALL faces with Bhaktipurnana Nayantara paratlo.namaste to all my AIRTEL Sarvana namaste.

  • @Yours_harshhh_71
    @Yours_harshhh_71 2 ปีที่แล้ว +10

    श्री गुरुदेव दत्त हे अख्या विश्वाचे मालक आहेत♥️🌍🙏🚩

  • @pranaynaik6992
    @pranaynaik6992 3 ปีที่แล้ว +3

    आम्ही भाग्यवान समजतो कारण पंडित अजित कडकडे यांचा ७ जलमचा पुण्याईने आम्हाला हे मधुर स्वर ऐकता येतात.

  • @RajkumarBagal-d3k
    @RajkumarBagal-d3k หลายเดือนก่อน

    !!अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त!!❤

  • @jayshreemore1727
    @jayshreemore1727 หลายเดือนก่อน +3

    दत्त. जयंती. च्या. शुभेच्छा

  • @vishwanathpardeshi3190
    @vishwanathpardeshi3190 3 ปีที่แล้ว +34

    अवधुत चिंतन श्री गुरूदेव दत्त दत्त दत्त 🙏 खूपच सुदंर सादरीकरण केलंय अजित कडकडे यांनी..अप्रतिम आवाज 🌹👌

  • @maheshchitnis6176
    @maheshchitnis6176 2 ปีที่แล้ว +62

    Very excellent voice, truly this song takes us near Datta Charani..🙏🙌👏 Shree Gurudev Datta 🙏

  • @dadyadabhole8641
    @dadyadabhole8641 3 ปีที่แล้ว +67

    हे गीत ऐकल्यावर मन प्रसन्न होतं 😊🙏🙏👌👌

    • @pavanjankar2939
      @pavanjankar2939 2 ปีที่แล้ว +1

      जय श्री गुरुदेव दत्त सदा सहाय रहे

  • @vijaykumarsharma8700
    @vijaykumarsharma8700 2 ปีที่แล้ว +25

    सत्य भक्ति की राह पर चलनेवाले एक महान कलाकार पंडित जी श्री अजित जी खरच आपणांस विष्णु महेश चा वरदहस्त आहे किती सहज भाव वाहवाह आपणांस कोटी कोटी नमन🙏

  • @madhurisurve5837
    @madhurisurve5837 2 ปีที่แล้ว +57

    पराडकर सर आणि अजितजी यांची दत्तभक्ती वर अविस्मरणीय गाणी 💐 कधीही जुनी वाटत नाही, ऐकताना भान विसरायला होते .
    श्री गुरुदेव दत्त 💐🙏

  • @chaitaligardi
    @chaitaligardi ปีที่แล้ว +12

    माझे favorite भजन,आणि त्यात अजित कडकडे यांचा आवाज मस्तच... खूप छान वाटते ऐकायला... 🙏🙏🙏🙏

    • @namdevsable2188
      @namdevsable2188 ปีที่แล้ว

      नक्कीच ऐकायला श्रवणीय असे हे भजन आहे.💐

    • @anjalideshmukh7065
      @anjalideshmukh7065 ปีที่แล้ว

      श्रीगुरू दत्तात्रयांची मूर्ती पण खूपच सुंदर आहेत.,

  • @SarikaRenuse-h1g
    @SarikaRenuse-h1g 2 หลายเดือนก่อน +9

    Aamhi khup nashibvan aahot.Ajit sir tumchi gani aikto aahot.

  • @gribyoutuberff2378
    @gribyoutuberff2378 3 ปีที่แล้ว +44

    मन अगदी तल्लीन होऊन जाते ,गुरु देव दत्त चरणी 🙏🙏🙏🙏🙏🙏जय श्री गुरुदेव दत्त 🙏

    • @gajananhugewad4142
      @gajananhugewad4142 2 ปีที่แล้ว +2

      खूप सुंदर गीत... मन प्रसन्न होतं ऐकून 🙏🏻🙏🏻

  • @SadashivChavan-j6x
    @SadashivChavan-j6x หลายเดือนก่อน +1

    हा अभंग मनाला भावतो श्री गुरुदेव दत्त❤🙏

  • @vikasshinde5616
    @vikasshinde5616 2 ปีที่แล้ว +20

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🙏🏼

  • @Ravikumar.rajshekhar.gandage
    @Ravikumar.rajshekhar.gandage 7 วันที่ผ่านมา +1

    जय. Gurudev. Datta. Parasan.

  • @atulkhandagale9289
    @atulkhandagale9289 2 ปีที่แล้ว +43

    हे गुरुदत्त महाराज आमचे 7 जन्मांचे पाप नाहीसे झाले तुमच्या चरणांच्या दर्शनाने🙏🙏🙏🙏🙏

  • @milindbhoir4926
    @milindbhoir4926 ปีที่แล้ว +35

    अवधूत चिंतन श्री गुरू देव दत्त 🙏🏻🌺

  • @vishwajeetpatil4099
    @vishwajeetpatil4099 ปีที่แล้ว +7

    आयुष्यातील सर्वात भक्तिमय गीत 🙏

  • @dasharathbhagat3680
    @dasharathbhagat3680 หลายเดือนก่อน +2

    🌹श्री शनिदेवाय नमः!🌹श्री शनिदेवाय नमः!🌹श्री शनिदेवाय नमः!🌹श्री शनिदेवाय नमः!🌹श्री शनिदेवाय नमः!🌹🙏🙏🙏🙏🙏🌹

  • @sagardeore1645
    @sagardeore1645 2 ปีที่แล้ว +9

    हे गीत ऐकल्यावर माणूस भक्तिरसात चिंब भिजून निघतो🙏

  • @nandamane9215
    @nandamane9215 2 ปีที่แล้ว +6

    फारच सुंदर आणि सतत ऐकत रहावे असे हे दत्तगीत आहे👌👌👌👌👌

  • @Sageetadeshpande
    @Sageetadeshpande 7 วันที่ผ่านมา

    🎉🎉🎉❤ अजित कडकडे हे दत्त संप्रदायातील अत्यंत श्रेष्ठ गायक आहेत अत्यंत श्रेष्ठ गायक होत आहेत

  • @JpWorldGaminG
    @JpWorldGaminG หลายเดือนก่อน +7

    आज कोन कोन ऐकत आहे 😇

  • @RohanPatil-rz3sy
    @RohanPatil-rz3sy หลายเดือนก่อน +2

    सर्वांना दत्त जयंती निमित्त खूप खूप शुभेच्छा

  • @ranjanakanse9064
    @ranjanakanse9064 3 ปีที่แล้ว +26

    मला हे गाणे खूप आवडते. रोज सकाळी ऐकते. छान वाटते.

  • @anaghazantye
    @anaghazantye 7 หลายเดือนก่อน +3

    Swami mazya mulache Ghar ghyche swapna Purna kara hi tumala vinanti aani prathana ❤
    Shri Swami samarth Jai Jai Swami samarth ❤

  • @anilmahurkar7608
    @anilmahurkar7608 9 หลายเดือนก่อน +1

    में इस सुंदर भजन को हजारों हजार बार लगातार सुन सकता हु, वाह कड़कड़े साहब,अभिनंदन।💐🙏

  • @rameshnarvekar8622
    @rameshnarvekar8622 3 ปีที่แล้ว +29

    I really wonder how people can make negative comments on these sweet bhajjans and melodious voice that has been trying to console our ears for so many years.

  • @umeshshendage9075
    @umeshshendage9075 2 ปีที่แล้ว +2

    खुपच छान आहे गाणे

  • @sonaldeshmukh1753
    @sonaldeshmukh1753 3 ปีที่แล้ว +18

    🙏🙏 Digambara Digambara Shreepad Vallabh Digambara 🙏🙏

  • @EarthLifevlog
    @EarthLifevlog 3 ปีที่แล้ว +6

    मी काय बोलणार नतमस्तक💐💐👍साक्षात देव शुद्ध अवतरेन

  • @pratikwadikar2435
    @pratikwadikar2435 3 ปีที่แล้ว +4

    माज़े वय अत्ता 27 वर्ष आहे मि 7 वर्षाचा होतो तेव्हा पासून हे गान ऐकत आहे आज 20 वर्षे जाली तरी मि हे गान आजुन आवडिने ऐकतो नाद नाही करायचा श्री गुरुदेव दत्त.🙏🙏🙏💐💐💐

  • @surekhadeshmukh9580
    @surekhadeshmukh9580 ปีที่แล้ว +1

    ज्येय श्री गुरुदेव दत्त प्रसन्न श्री स्वामी समर्थ प्रसन्न जेय जेय शिव राम क्रुष्ण हारि प्रसन्न राम क्रुष्ण हारि प्रसन्न जेय राधा देवी प्रसन्न जेय श्री क्रुष्ण प्रसन्न 👏🏿👨‍👩‍👧😍🎶🔔🌏🏡😎🥁🎵😭👏🙏😎

  • @gauravshinde93
    @gauravshinde93 2 ปีที่แล้ว +8

    🙏🙏 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏

  • @shivsagarkamble2575
    @shivsagarkamble2575 2 ปีที่แล้ว +1

    . 🙏. 🙏।। अवधुत चिंतन श्रीगुरुदेव दत्त ।।. 🙏. 🙏

  • @anjalineelshahakar6825
    @anjalineelshahakar6825 3 ปีที่แล้ว +56

    Whenever I listen to this devotional song, I experience purity and divine bliss and tears roll down. Thanks to entire team including chorus from the bottom of my heart for this divine creation 🙏🙏🙏 भक्ती रसात मन न्हाऊन निघते. विशुद्ध् अनुभूती .

    • @avinashkulkarni7750
      @avinashkulkarni7750 2 ปีที่แล้ว +1

      ,ड

    • @tusharsonje8948
      @tusharsonje8948 2 ปีที่แล้ว

      श्री स्वामी समर्थ... श्री गुरू देव दत्त 🌹🌹

  • @neeladeodhar7237
    @neeladeodhar7237 หลายเดือนก่อน

    Khup sunder palakhi.Ajit kadkade sunder gayli ahe🎉

  • @SachinPatil-vg8fw
    @SachinPatil-vg8fw 4 ปีที่แล้ว +11

    अप्रतिम शब्द, जबरदस्त गायन

  • @rdchf
    @rdchf 3 ปีที่แล้ว +19

    श्री गुरुदेव दत्त जय 🌺🙏🌷🙌🔥🌷🌹🙏🌷🙌🔥🌷🌹🙏

    • @ashokmataghare272
      @ashokmataghare272 2 ปีที่แล้ว

      श्री Awaduta गुरू दत्त 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @rohinipakhale5235
      @rohinipakhale5235 2 ปีที่แล้ว

      @@ashokmataghare272 hvyxyzyfxccgx ch c

  • @poonampawar4168
    @poonampawar4168 2 ปีที่แล้ว +1

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वलभ दिगंबरा वा अजित दादा क्या बात है खुप छान

  • @maheshgiri2524
    @maheshgiri2524 3 ปีที่แล้ว +7

    Giri
    ..... गोसावी समाजाचे कुलदैवत

  • @rameshpanchal4272
    @rameshpanchal4272 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan mavuli🙏🙏🙏🙏

  • @rajesaheblondhe1780
    @rajesaheblondhe1780 2 ปีที่แล้ว +13

    फुले गोड ओली,......
    कोवळी झुळूक,......
    शांत माया मूर्ती .....पहाटेसारखी
    खूपच सुंदर रचना...
    त्यावर पंडित अजित जी चा ब्रह्मानंदी टाळी लावणारा स्वर ......
    1000 वेळा ऐकले तरी मन भरत नाही
    गीतकार, गायक व संगीतकार याना शतशः नमन

  • @Krishna-d8n-n8n
    @Krishna-d8n-n8n 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम

  • @mohanayare
    @mohanayare 2 ปีที่แล้ว +5

    अजित कडकडे = भावपूर्ण भक्तीगीतगायन 😍💐

  • @ravithakur-mb5ne
    @ravithakur-mb5ne 2 ปีที่แล้ว +1

    सुमधुर व मनाला तल्लीन करणारा आवाज आहे .गाण्याची रचनापण खुप छान. गेली कित्येकवर्पापासुन ऐकत असुन सकाळी कानावर आवज पडताच तरतरी येते.आजच गायले आहे असे होते

  • @vilaspatrudkar3614
    @vilaspatrudkar3614 2 ปีที่แล้ว +5

    याभजनाचे रचनाकार प्रवीण दवणे यांना पहिला अरुण दाते पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन.

  • @klbrohit5305
    @klbrohit5305 หลายเดือนก่อน +1

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏🌹🙏🚩

  • @amolthorat9204
    @amolthorat9204 ปีที่แล้ว +1

    माझ्या आयुष्यातील महाराजांचे सर्वात सुंदर गाणे

  • @hareshpalkhe6639
    @hareshpalkhe6639 3 ปีที่แล้ว +8

    Khupach sundar ❤️

  • @kishoralekar5868
    @kishoralekar5868 หลายเดือนก่อน

    हे आणि अशीच सर्व दत्त गीते ऐकायला मिळणे म्हणजे आपण फार भाग्यवान आहोत.
    🙏🌹🙏

  • @jayshreechoudhari8297
    @jayshreechoudhari8297 3 ปีที่แล้ว +5

    अजीतजी काकडे यांच्या आवाजानी कमालीची दत्तगुरूंनी विषयी भावना जागृत होते ... अगदी नरसोबाच्या वाडीला गेल्याचा भास होतो 🙏🙏

  • @rangnathparchure4133
    @rangnathparchure4133 3 ปีที่แล้ว +1

    श्री अजीत कड कडे यान्हा खुब खुब अभिनन्द्न गीत भजन दत्ता चे एकुन मन ak

  • @ramakantkadu7469
    @ramakantkadu7469 2 ปีที่แล้ว +3

    अभंग असा आहे की फक्त ऐकतच राहावे सुंदर आवाज 🙏🙏🙏🙏🙏

  • @jayshreemore1727
    @jayshreemore1727 หลายเดือนก่อน

    किती. सुंदर. गात आहे. असे. वाट्ते आहे
    दत्त. आपल्या. समोर आहे.

  • @mr_Prathamesh_96.k
    @mr_Prathamesh_96.k ปีที่แล้ว +7

    अप्रतिम ! स्वर्गीय स्वर !!!

  • @RevaHujband
    @RevaHujband 7 หลายเดือนก่อน +1

    Amazing 🙏🙏🌹

  • @tarapatil1421
    @tarapatil1421 ปีที่แล้ว +3

    , सकाळी मन प्रसन्न करणारी भक्ती गीत ऐकून मनाला शांती

  • @27bhaveshumbarkar44
    @27bhaveshumbarkar44 11 หลายเดือนก่อน +1

    🚩🌺॥ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॥🌺🚩