कोकणातील सुपारीच्या झाडांची बाग----दाभोळ
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
- सुपारी हा विड्याचे पानात टाकावयाचा एक पदार्थ. सुपारी भोजनानंतर तशीच फोडूनही खातात. सुपारी कातरण्यासाठी अडकित्ता वापरला जातो. सुपारीचे भरडा सुपारी, चिकणी, निमचिक्कणी, रोठा, ढप आदी अनेक प्रकारही आहेत. हे प्रकार सुपारीच्या फळांवर केलेल्या विविध प्रक्रियांवर अवलंबून असतात. पोफळीची लागवड बिया रुजवूनच केली जाते. फळे धरण्याचा काळ १५ ते ४० वर्षांचा असतो. दर दहा वर्षांनी झाडाची उपज करून वृद्ध झालेल्या झाडाची कमतरता भरून काढावी लागते.त्यामुळेच सुपारीच्या बागेत झाडांची गर्दी झाल्यासारखी दिसून येते. समुद्रकिनाऱ्याच्या प्रदेशात संपूर्ण कोकणच्या किनाऱ्यावर सुपारीच्या विपुल बागा आढळतात. केरळमध्ये कालिकत येथे भारत सरकारने यावरील संशोधनासाठी विशेष केंद्रे उभारली आहेत. सुपारीत भरपूर प्रमाणात टॅनिन असल्यामुळे कित्येक ठिकाणी त्याचा वापर कापसाचे कपडे रंगविण्यासाठी केला जातो. खासी पर्वतातील एका जमातीत एका ठिकाणापासून दुसरे लांबचे ठिकाण किती लांब आहे हे सांगण्यासाठी तिथवर पोहचायला किती सुपाऱ्या चघळाव्या लागतात याच्या मोजमापात सांगतात.
Nice
Thanks
Keep posting more 🙏🏾
@@y-ash1hunned133 Nakki 😊 🙏
Jaam Bharee ra😊
@@harishgovekar3274 Thank you