१४-संदीप खरे-गुरु ठाकूर-किशोर कदम-एकत्र | Sandip Khare, Guru Thakur, Kishor Kadam Marathi Poetry

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ส.ค. 2024
  • २०११ साली (पहिल्यांदाच आणि एकदाच) ३ प्रतिभावान कवी, १ अप्रतिम गायक आणि एक तुफान लोकप्रिय निवेदक - मुलाखतकार एकाच व्यासपीठावर 'कवी आणि निसर्ग' या मराठी कवितांच्या मैफिलीसाठी एकत्र आले होते. संदीप खरे, गुरु ठाकूर, किशोर कदम (सौमित्र), गायक मिलिंद इंगळे आणि मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध करुन सोडले होते. संकल्पना अभिजीत टिळक यांची होती आणि 'अरण्यवाक्' या संस्थेसोबत हा कार्यक्रम सादर झाला. तब्बल साडेतीन तास चाललेल्या या मैफिलीतील काही भाग आम्ही चोखंदळ मराठी रसिकांसाठी खुला करीत आहोत. रेकॉर्डिंग जुने असल्याने तुलनेने हलक्या व्हिडिओ क्वालिटीकरिता आम्हांस माफ करावे ही नम्र विनंती.

ความคิดเห็น • 6

  • @vaijayantithakar9520
    @vaijayantithakar9520 ปีที่แล้ว +3

    तुम्ही सगळेच ग्रेट आहात. खूप संवेदनशील आहात. आणि निसर्गाविषयीच्या तुमच्या भावना ऐकून अस वाटल की लोकांनी फक्त तुमचे शब्द सुर एवढेच ऐकू नये तर तुमची ही संवेदनशीलता सुध्दा आत्मसात करावी. प्रेम करावे स्वतः वर, सृष्टीवर आणि कलेवर सुध्दा. तुम्हा सर्वांचे मनापासून आभार.

  • @sarojjoshi9771
    @sarojjoshi9771 ปีที่แล้ว +1

    खुपच मनाला उभारी, आनंद झाला. सुंदर कार्यक्रम

  • @deepakshedge8519
    @deepakshedge8519 4 หลายเดือนก่อน +1

    Nice

  • @-vedhmedia3223
    @-vedhmedia3223 5 หลายเดือนก่อน +2

    वरील प्रश्नाला उत्तर म्हणून...
    धुके आहे की धुळ हे सकाळी कळत नाही
    उगवतो सुर्य की मावळतो चंद्र कळत नाही
    आक्रसून मूळे भोवती झाडे उभी कशीबशी
    प्राणवायू कसला त्यांस मिळतो कळत नाही
    ~शिवाजी सांगळे

  • @atharvajadhav7470
    @atharvajadhav7470 ปีที่แล้ว +2

    I want to thank TH-cam algorithm for suggesting me this, I miss my hometown ❤️

  • @sujatanazarkar1230
    @sujatanazarkar1230 ปีที่แล้ว +1

    Nice