पुण्यात Alphonso mango EMI वर मिळत असला, तरी आजही गावरान रायवळ आंब्याची सर कशालाच नाही I Bol Bhidu

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ก.ย. 2024
  • #BolBhidu #RaywalAmba #alphonsomango
    पुण्यातल्या एका आंबा विक्रेत्यानं देवगड हापूसची पेटी विकत घ्यायची असेल, तर ईएमआयचा ऑप्शन ठेवलाय. आता या पेटीचा दर आहे ५००० च्या पुढं. जी संपणार डोक्यावरुन पाणी आठवडाभरात, पण लोकं आवडीपायी म्हणा किंवा घायीपायी म्हणा हप्ते भरायलाही तयार होतातच. हापूस, पायरी, तोतापुरी हे पार मॉलपासून रस्त्याच्या कडेलाही विकायला दिसत असले, तरी खरे शौकीन लोक ऐन हापूसच्या सिझनमध्येही थोडी कळ काढतात, कारण त्यानंतर मार्केटमध्ये येतो खरा बादशहा... रायवळ आंबा. या जगात फार कमी गोष्टी अशा राहिल्यात ज्या आपला आवडीचा भूतकाळ डोळ्यांसमोर आणू शकतात. रायवळ आंबा हा त्यातलाच एक विषय. याला हापूससारखा रॉयल फील नसेल, पायरीसारखी चव किंवा तोतापुरीचा आकार नसेल, पण रायवळ आंबा म्हणजे ‘माहोल’ बनवणारं फळ. या रायवळ आंब्याची वैशिष्ट्य, त्याचं महत्त्व आणि कमी झालेलं उत्पादन याबद्दल या व्हिडीओमधून जाणून घेऊ.
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 368

  • @raps9858
    @raps9858 ปีที่แล้ว +121

    काय दिवस जगलो राव ... दिवसभर बोंबलत उन्हातान्हात क्रिकेट खेळायचो, सुरपारंबा खेळायचो, झाडावरून डिंक काढायचो , बोरं-पेरू पाडायचो , मनसोक्त पोहायचो कितीतरी गोष्टी सांगता येतील... 90s kid❤️

    • @swapnilsuryawanshi5991
      @swapnilsuryawanshi5991 ปีที่แล้ว +6

      गेले रे ते दिवस... लई भारी जिंदगी होती ती...पैसा नाही.पण सुख खूप होत...miss 90s day forever

    • @dipakgavali8161
      @dipakgavali8161 ปีที่แล้ว +1

      Ha yaar 😰😰

    • @rajeshgaikwad3658
      @rajeshgaikwad3658 ปีที่แล้ว +3

      मस्त बिनधास्त सोनेरी दिवस

  • @swapnilkhapne4462
    @swapnilkhapne4462 ปีที่แล้ว +144

    ऑलिम्पिक लेव्हलच्या शूटरला तात्पुरती टफ देणारी जनता🤩
    भावाची बोलण्याची पद्धत मंजे एकदम फाडू...

    • @vaibhavkurumkar1924
      @vaibhavkurumkar1924 ปีที่แล้ว +3

      As fhakt Chinmay ch Bolu Shakto

    • @anishapawar5548
      @anishapawar5548 ปีที่แล้ว +1

      😂😂😂

    • @swapnilkhapne4462
      @swapnilkhapne4462 ปีที่แล้ว +2

      @@vaibhavkurumkar1924 गावातल्या माणसांचा विषयच हार्ड असतो😇

    • @vaibhavkurumkar1924
      @vaibhavkurumkar1924 ปีที่แล้ว +1

      @@swapnilkhapne4462 ❣️💯👌🏻🤗

  • @user-wb8gp7mt4d
    @user-wb8gp7mt4d ปีที่แล้ว +110

    रायवळ आंबे हजारो जाती असतील. पण आज हेच आरोग्यदायी आंबे दुर्दैवाने गावठी, आंबट म्हणून लोक तोडत आहेत.😢

    • @siddheshmodak4662
      @siddheshmodak4662 ปีที่แล้ว +1

      Amba khalyach feel ala 😂

    • @rajeshgaikwad3658
      @rajeshgaikwad3658 ปีที่แล้ว +5

      चोखून ओरपून संपवायचा तर रायवळ आंबाच

    • @user-vz9tn7wn1l
      @user-vz9tn7wn1l 4 หลายเดือนก่อน +2

      आमच्या वेंगुर्ल्यात कितीतरी रायवळ आंबे हापुससारखी चव आणि स्वाद असलेले आहेत.

    • @jitua394
      @jitua394 3 หลายเดือนก่อน

      ज्यांना त्याची चव माहीत नाही तेच त्याला आंबट म्हणतात 😊

  • @srsofts7885
    @srsofts7885 ปีที่แล้ว +78

    एकदम बरोबर भिडू ..खुप लहान पण चव एकदम महान...ह्याची चव खुई कमी लोकणा माहीत असेल ..तीन वर्षा ला एकदा येत असतो अंबा

    • @aniketshinde7025
      @aniketshinde7025 ปีที่แล้ว +4

      काहीच्या काही दर वर्षी येतो आंबा आमच्याकडे आहेत झाडे.

    • @Allinone-ht2ko
      @Allinone-ht2ko ปีที่แล้ว +2

      Ho bryach thikani darvarshi yetat aambe

    • @Goodvibesonly276
      @Goodvibesonly276 4 หลายเดือนก่อน

      😊ho

  • @hemantpatade5304
    @hemantpatade5304 ปีที่แล้ว +44

    रायवळ आंबा मध्ये रासायनिक घटक नसतात. शरीराला एकदम छान 😊

  • @RioTheTrader
    @RioTheTrader ปีที่แล้ว +44

    भावा content पेक्ष्या Content Writing la 10/10 ❤ अप्रतिम..👌

  • @rupalipatwardhan7789
    @rupalipatwardhan7789 ปีที่แล้ว +22

    Writing. 100% also presentation...100%.
    Hats off... रायवळ हाच खरा राजा

  • @Sagar-ch4sd
    @Sagar-ch4sd ปีที่แล้ว +63

    चिन्मय भावा.... पार मार्केट हलवून टाकलास तुझ्या स्टाइल ने😂😂👍👍

  • @ddmaharashtra1459
    @ddmaharashtra1459 ปีที่แล้ว +59

    भाऊ तु बोलला की मजाच येते .जुन्या आठवणी आज ताज्या झाल्या. 😂

  • @psacademy3475
    @psacademy3475 ปีที่แล้ว +16

    रायवळ आंबा...
    अपाल्या भाषेत अनेक नावं..........
    गावरान आंबा, नाक्या, शोप्या, गोटि, लाल्या...... नाव अनेक पण चव मात्र ती स्पेशल.......
    भुसारात किंवा पाचटात आढी टाकून पिकवले म्हणजे चवी साथी स्वर्गच...
    सकाळी सकाळी जर झाडाखाली पिकलेली शाक सापडली म्हंजे दिवसाची उत्तम सुरुवात 😍😍😍

  • @rupeshbhosle3272
    @rupeshbhosle3272 ปีที่แล้ว +14

    सह्याजी शिंदे च काम खूप चांगल आहे!!निसर्ग सावर्धन आणि सर्वच चित्रपटा त पण
    👍👍👍👍👍
    👌👌👌👌👌

  • @rsp151
    @rsp151 ปีที่แล้ว +33

    परीक्षा झाली की एकच काम ....वारा सुटला की आंब्याच्या झाडाखाली धावत सुटायचं....लहानपण आठवल भावा.... हापूस खात असलो तरी मित्रासोबत आंबा मिळवण्यासाठी केलेली धडपड ती मजा आता नाही

  • @anantpatil2173
    @anantpatil2173 ปีที่แล้ว +19

    खूप छान विश्लेषण, लहानपणी च्या सर्व आठवणी जाग्या झाल्या. धन्यवाद

  • @Letscooksomethingspecial26
    @Letscooksomethingspecial26 ปีที่แล้ว +14

    माझ्या आजोळी धाराशिव ला आमची आमराई आहे.50 झाडें आहेत सध्या. हा आंबा आमच्या कडे आहे, शेपू आंबा ही आहे 🥰

    • @Aj-jp7tw
      @Aj-jp7tw ปีที่แล้ว +1

      🤩

    • @shivajiraotayde4114
      @shivajiraotayde4114 4 หลายเดือนก่อน

      मला रायवळ आंबे लावायची आहेत दोन एकर कृपया आपला नंबर द्या

    • @ameetk4587
      @ameetk4587 4 หลายเดือนก่อน

      Mama kadhun aai cha hissa ghya

    • @Absolutetalk.
      @Absolutetalk. 4 หลายเดือนก่อน

  • @sandeeppatil5442
    @sandeeppatil5442 ปีที่แล้ว +16

    दादा तुम्ही पूर्ण बालपण समोर उभे केलेत, हि आंबे, फणस, करवंद, जांभूळ इत्यादी बाबी समवेत पूर्ण गावाकडल्या आठवणी झाल्या

  • @shivrajkolekar0405
    @shivrajkolekar0405 ปีที่แล้ว +48

    The royal star of Bolbhidu Chinmay Dada❤️💥

  • @abhaybhope172
    @abhaybhope172 ปีที่แล้ว +19

    🙏... जिंकलस भावा,सगळे चित्र कसे प्रत्यक्षात डोळ्यासमोर आणलेस....😇

  • @shrikantbhadale7606
    @shrikantbhadale7606 ปีที่แล้ว +4

    पार भुमिकेत शिरतोस भावा... ऐकणारा भुतकाळात हरवून जाणारच...

  • @ganeshjadhav-ls9zy
    @ganeshjadhav-ls9zy ปีที่แล้ว +26

    आमच्या मामाच्या गावी केळी,लोणची,शेपू, पांढरी खोबरी, काळी खोबारी, गोटि,मोघ्या अशी आंब्याची मोठी मोठी झाडे होतीत,आम्ही सुट्टीत दिवसभर तिथेच असायचो,आत्ता एकही झाड नाही.

    • @vijaysathe9510
      @vijaysathe9510 ปีที่แล้ว

      Kuthe
      Geli

    • @ganeshjadhav-ls9zy
      @ganeshjadhav-ls9zy ปีที่แล้ว

      @@vijaysathe9510 तोडली

    • @shailesh4297
      @shailesh4297 3 หลายเดือนก่อน +1

      रान पडतंय म्हणून तोडली भावकीन एक दिवस याच आंब्यासाठी अमेरिकन लोक भारतात येतील

  • @darshanshinde8034
    @darshanshinde8034 ปีที่แล้ว +12

    बाकी चिन्मय शेठ विश्लेषण खूप छान करता तुम्ही...!!❤ बोल भिडुला पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा🎉💐

  • @rupeshrahate1
    @rupeshrahate1 ปีที่แล้ว +27

    मित्रा विडिओ पाहताना बालपण नजरेवरून गेलं आणि टचकन डोळ्यात पाणी तरळलं 😢

  • @yoyopanda9029
    @yoyopanda9029 ปีที่แล้ว +16

    प्रत्येक झाडाचा आंबा वेगळा, आणि प्रत्येक आंब्याची चव वेगळी. झाडावरून काढून दिवसभर खायचो. 🤤

  • @vedikaarjunwad9906
    @vedikaarjunwad9906 ปีที่แล้ว +3

    फार सुंदर असा रायवळ आंबा ,आता मात्र दिसतच नाही.पूर्वी आंबे हे शेकड्यातच मिळत. भोर व परिसरात अनेक प्रकारचे सुरेख चवीचे रायवळ आंबे भरपूर मिळत.आतासारखा तेव्हा हापूसचा बोलबाला नव्हता.सढळ हाताने लोक स्वतः खाऊन ,दुसर्याला खाऊ घालत.

    • @dipakgavali8161
      @dipakgavali8161 ปีที่แล้ว

      Yes bhor la pn khup aahet zade aani aamchya kokanat khup ch❤❤❤

  • @ranjit_kolekar_03
    @ranjit_kolekar_03 ปีที่แล้ว +32

    Chinmay Dada ❤ very interesting way of explaining any topic.

  • @avinashautade2646
    @avinashautade2646 ปีที่แล้ว +19

    ❤ तुझ बोलण ऐकून गावी आलोय की काय असा भास झाला😂

  • @satishbandkar7553
    @satishbandkar7553 ปีที่แล้ว +3

    छान गावरान जंगली रायवळ आंब्याची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद लहानपणी आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे रायवळ आंबे खाल्ले ले आहेत त्याची चव तर अफलातून वास सुंगधीत दरवाळणारा आंबे टोपलीत पिकण्यासाठी भातीयान गवताच्या आढीत ठेवलेले त्यावर सुरकुत्या पडल्यावर खायला छान लागतात नुसते तोंडात पिळून स्वाद घ्यावा लागतो ते आंबे चोखू चोखू त्याचा स्वाद घ्यायला फारच मजा येते बाट साफ रस निघेपर्यंत,त्यात कच्चे आंब्यात डिंक जास्त असतो, त्याचे लोणचे तयार केले तर ते जास्त दिवस ठिकते,

  • @mdlion3374
    @mdlion3374 ปีที่แล้ว +12

    एकदम बरोबर, हा आंबा सांगलीतील आमच्या गावी होता मामा कडे हापूस याच्या समोर धूळ पण नाही. मधासारखा गोड

  • @yuvrajmane9989
    @yuvrajmane9989 ปีที่แล้ว +4

    चिन्मय भाऊ जाम भारी विषय निवडला आज👌काय ते दिवस होते , गावात नुसता आंब्याचा घमघमाट सुटायचा,जांभळं ,करवंद,आंब खाण्यात जी मज्जा होती ती आजच्या पिझ्झा ,बर्गर मध्ये नाय!!!एक सांगायचं राहीलच की राव!!तो आंब्याचा चीक तोंडावर पडला की विषयच झाला ना भाऊ ,डाग महिनाभर काय जात न्हवते☺️☺️☺️☺️

  • @ganeshkandke6174
    @ganeshkandke6174 ปีที่แล้ว +3

    एकेका आंब्याचा थाटच निराळा असतो . गावरान आंबा आला की इतरांचे मार्केट डाऊन .

  • @rahulmore1831
    @rahulmore1831 ปีที่แล้ว +18

    खूप छान भाऊ जुनी आठवण करुन दिल्याबद्दल धन्यवाद..

  • @surajkale5683
    @surajkale5683 ปีที่แล้ว +42

    आमच्या हीकड याला गोटि आंबा म्हणतात.....

    • @01epictraveler
      @01epictraveler ปีที่แล้ว

      😂

    • @aniketshinde7025
      @aniketshinde7025 ปีที่แล้ว +1

      रायवळ अनेक प्रकारचा असतो. गोटी आंबा असलेले झाड अस्ताव्यस्त पसरलेले असते. आणि मजबूत आणि उंच सुद्धा असते ते.
      साधारण रायवळ म्हणजे ज्याला खरंच रायवळ म्हणून ओळखतात ते झाड गोल आणि डेरेदार असते.
      गोटी आंबा पावसाळ्याच्या सुरुवातीला खूप मोठ्या प्रमाणात खातात. कारण तेव्हाच तू प्रॉपर पिकतो. गोटी आंबा बारीक आणि एकदम रसाळ नुसता वरपायचा.

  • @saurabhpatil5487
    @saurabhpatil5487 ปีที่แล้ว +7

    बाजारात कितीही चविष्ट आंबे आले तरी झाडावर पिकवून पडलेल्या आंब्याची चव भारीचं !!

  • @khalatesBelgiummalinois
    @khalatesBelgiummalinois ปีที่แล้ว +7

    सुट्टी आणी गावठी पाडा चे आंबे, ग्रेट दिवस होते ते

  • @sahilpatil7010
    @sahilpatil7010 ปีที่แล้ว +4

    आमच्या येथे खोबरा आंबा हा रायवळ असुन हापूस पेक्षा चवीष्ट आहे......म्हणूनच आम्ही हापूस आंब्यावर खोबरा आंबा कलम केलं आहे

    • @user-vz9tn7wn1l
      @user-vz9tn7wn1l 4 หลายเดือนก่อน

      विनोद चांगला आहे.

  • @shashikantghorpade5960
    @shashikantghorpade5960 11 หลายเดือนก่อน +1

    रायवल आंबा ची लागवड झाली पाहिजे,कारण जीन्स साठी खायला पाहिजे.खूप खुप धन्यवाद/आभार

  • @adarshgamare481
    @adarshgamare481 ปีที่แล้ว +6

    Nahi koknat ghara gharat ahet re❤ ekdam chotya rayval la bitki boltat amchya kde Laal bhadak ratamba pn varchya bhagala lal Asto ratamba ajun godamba khup nav ahe 😍

  • @jeevanpatil8021
    @jeevanpatil8021 ปีที่แล้ว +3

    दादा तुम्ही जी माहिती सांगता ती लय भारी असतेच,☺️ पण ज्या पद्धतीने, ज्या शब्दात सांगता ना ती भाषा त्याहून जास्त भारी असते, आपली वाटते.👍🤗

  • @vijaywathore5162
    @vijaywathore5162 ปีที่แล้ว +10

    सूर्यफूला विषयी एखादा विडिओ बनवा भाऊ...
    आता ते पीक बऱ्याच ठिकाणी दिसत नाही..

    • @dnyaneshwarpisal9823
      @dnyaneshwarpisal9823 ปีที่แล้ว

      भाऊ सूर्य फुल आता पुन्हा लागवड सुरू झाली आहे.

  • @mendgudlisdaughter1871
    @mendgudlisdaughter1871 ปีที่แล้ว +4

    मला रायवळ आंबा खूप आवडतो. तो टिकला पाहिजे.

  • @Vikram18396
    @Vikram18396 ปีที่แล้ว +17

    आपली निम्मी जनता बाद कॅटेगरीत येणारी❤😂

  • @RT20750
    @RT20750 ปีที่แล้ว +7

    आमच्या रायवळ आंब्याला दरवर्षी एका झाडाला दहा बारा हजार आंबा निघतो

  • @anishapawar5548
    @anishapawar5548 ปีที่แล้ว +2

    जुन महिना सुरू झालाय आणि पाऊस पडतो आहे त्यावेळी रायवळ आंबा खायचा तो आनंद खुप छान असतो.

  • @pankajpatil1098
    @pankajpatil1098 ปีที่แล้ว +6

    रायव्हल आंब्यात आळी पडत नाही हापूस मध्ये भरपूर आळी पडते आमची आमरली आहे

    • @user-vz9tn7wn1l
      @user-vz9tn7wn1l 4 หลายเดือนก่อน

      अळी कोणत्याही आंब्यात पडु शकते.

  • @ravipatil9880
    @ravipatil9880 3 หลายเดือนก่อน

    भावा या narration Sathi Tula ऑस्कर च काय त्या पेक्षा एखादा मोठा पुरस्काराचा मानकरी ठरतोय तु.... खूप खूप प्रेम आणि असेच जुन्या आठवणींना उजाळा देत रहा❤

  • @ajitbhapkar09
    @ajitbhapkar09 ปีที่แล้ว +3

    कडक असतो हा आंबा. याची तोड कोणालाच नाही.

  • @nareshjadhav835
    @nareshjadhav835 ปีที่แล้ว +1

    मी कोंकण मधील आहे पण मला हापूस पेक्षा रयवली अंबा खूप आवडतो कारण या आंब्याची वेगवेगळ्या चवी असतात आणि त्या खूप आवडतात

  • @amolchoudhari3501
    @amolchoudhari3501 ปีที่แล้ว +2

    विषय मांडण्याची पद्धत आणि मार्मिक भाषा यामुळे व्हिडिओ पुन्हा बघितल्या शिवाय राहवत नाही.

  • @dattatrayachavan8458
    @dattatrayachavan8458 4 หลายเดือนก่อน +1

    फक्त माहिती म्हणून - मी अनेक लोकांशी चर्चा केली तेव्हा सर्वांच्या मते एकमताने सर्व तज्ञांनी सांगितले की रायवळ च्या कोया लावा आणि नंतर त्यावर कलम करा. खुप शोधल्या नंतर मावळात, सातारा जिल्ह्यात आणि कर्नाटक मधे काही झाडे मिळाली आहेत आणि कोया साठी आंबे गोळा करणे चालू आहे.

    • @user-ct1zg5tp3j
      @user-ct1zg5tp3j 3 หลายเดือนก่อน

      मला गावरान आंब्याची कलम पाहिजेत

  • @sujit_rj_maharashtra363
    @sujit_rj_maharashtra363 ปีที่แล้ว +2

    लयभारी भाऊ जुनी आठवण आली दिवस भर पाडण्यात जायचं पोहायला गेलावर...नुस्त मजा असायची...... गुटी आंबे😂😂😂

  • @vijaytambe7482
    @vijaytambe7482 ปีที่แล้ว +6

    रायवळ आंबा महोत्सव करायला हरकत नाही!

  • @Kokanatle_chavan
    @Kokanatle_chavan ปีที่แล้ว +2

    रायवळ आंब्याची झाडे मोठया प्रमाणात तोड होत आहे आणि संकरीत लागवड होत आहे, रायवळ झाडचे जतन आणि लागवड झाली पाहिजे

    • @user-vz9tn7wn1l
      @user-vz9tn7wn1l 4 หลายเดือนก่อน

      रायवळ आंबा विना संकर असतो?

  • @jjoshi7573
    @jjoshi7573 ปีที่แล้ว +3

    Chinmay you are great !!! Evdha manapasun represent kartos... Tuzasarkha tuch. Uttam vishay Ani mandani !😊

  • @rupeshwansinge1267
    @rupeshwansinge1267 ปีที่แล้ว +2

    दादा तुमचा आवाज, तुमची सांगायची स्कील आणि त्या ही पेक्षा तुमी देत असलेले उदाहरण ,सर्वच अफलातून आहे।।

  • @rahuldate155
    @rahuldate155 ปีที่แล้ว +1

    रायवळ अंब्यासोबत आईच महात्म्य पण सांगितले. Great ❤️

  • @sushilbalapure5770
    @sushilbalapure5770 ปีที่แล้ว +3

    चिन्मय भाऊ काय विश्लेशन केले भाऊ...खुपच छान

  • @swapnilbodamwad9780
    @swapnilbodamwad9780 ปีที่แล้ว +1

    खतर्नाक रिपोर्टिंग..वाक्यप्रचार एवढी सुंदर जोडलेत ना आपण....एक नंबर सर

  • @shivrajmore1490
    @shivrajmore1490 3 หลายเดือนก่อน +1

    रायवळ आंबा म्हणजे खरा आंबा आमच्या शेतात खूप झाडे आहेत या जाती ची उंच बुटकी आम्ही त्यांची नावे ठेवली आहे गोटि आंबा, पुंगशी आंबा, मोठा आंबा , थोरला आंबा, धाकला आंबा इतर खूप नावे आहेत ❤❤❤❤❤😊😊😊

  • @gaurishankarkshirsagar8893
    @gaurishankarkshirsagar8893 ปีที่แล้ว +19

    Chinmay dada voice god gift

  • @nknnnn4977
    @nknnnn4977 ปีที่แล้ว +4

    औषधी गुणधर्म रायवळ मध्येच आहेत. हापूस म्हणजे जर्सी आहे बिनकामाचा 😂😂😂

    • @user-vz9tn7wn1l
      @user-vz9tn7wn1l 4 หลายเดือนก่อน

      हा निराधार जावईशोध आहे.

  • @sahebasale6123
    @sahebasale6123 ปีที่แล้ว +2

    मित्रा तुझं बोलणं फार स्टाईलबाज हे राव

  • @pramodbayaskar4043
    @pramodbayaskar4043 ปีที่แล้ว +3

    एकदम लहानपणच आठवून गेलं, काय मस्त स्टोरी पोस्ट केली, तोडच नाही.

  • @OmkarZanje
    @OmkarZanje ปีที่แล้ว +8

    आज व्हिडिओ बॅकग्राऊंड पण स्पेशल 😄

  • @Keshav1992
    @Keshav1992 ปีที่แล้ว +12

    Thumbnail बघुनच मी guess करतो की चिन्मय असणार! आणि अंदाज १० पैकी ९ वेळा बरोबर असतो. चिन्मय ने विषय निवडावा त्यावर खास आपल्या शैलीत स्टोरी करावी आणि विषय एंड करावा! चिन्मय Rocks!!

  • @anujakelshikar4401
    @anujakelshikar4401 4 หลายเดือนก่อน

    Wah.. Khup chan mahiti. Aani nivedan ekdumm Rasal.. Rayval ambyasarkhach... Chan.

  • @saurabhkadam1801
    @saurabhkadam1801 ปีที่แล้ว +8

    रायवळ आंबा कोकणकर आम्ही खूप खातो

  • @rahulmaindarge2097
    @rahulmaindarge2097 ปีที่แล้ว +2

    पाडं कोण कोण खाल्ली
    आंबा म्हणजे स्वर्गात् ही मिळणार नाही अशी चव

  • @viragrrokde1
    @viragrrokde1 ปีที่แล้ว +1

    तुझ्यावर बंदी आणली पाहिजे, एक तर आम्ही इथे कॅनडा मध्ये, त्यात आज 12 एप्रिल असूनही थोडीही गर्मी नाही, संध्याकाळी तर बर्फवृष्टी झाली. आणि त्यात तुझा हा व्हिडिओ ❤❤❤
    आमच्या आजीच्या शेतात गावरान रायवळची बाग होती.. मस्त मोठल्या डाल भरून आंबे असायचे, माजघरात आंबे पिकवला ठेवली असायची. दुपारी उन्हात भटकून आल्यावर मस्त गार पाण्यात 10-12 आंबे टाकायचे, हाताने माचावयचे आणि वरपायचे. थोड्या वेळाने आई च्या पदराला तोंड पुसले की पुन्हा घराबाहेर धूम ठोकायची
    काय दिवस होते.. तुझा व्हिडिओ ऐकून इथे तोंडाला पाणी सुटले राव.

  • @DNYANVARDHINI
    @DNYANVARDHINI ปีที่แล้ว +2

    रायवळ आंब्याच्या varieties बघायच्या असतील तर कोकणातच यायला हवे तुम्हांला....

  • @SK-of8fm
    @SK-of8fm ปีที่แล้ว +1

    कोकणातल्या माझ्या गावी आंबा खात हा व्हिडिओ बघतोय.

  • @shakuntalarane4322
    @shakuntalarane4322 ปีที่แล้ว +6

    रायवळ आंब्याची सर हापूसला नाही

    • @user-vz9tn7wn1l
      @user-vz9tn7wn1l 4 หลายเดือนก่อน

      कोल्ह्याला द्राक्षे आंबट.

  • @prashantkhandagale8029
    @prashantkhandagale8029 ปีที่แล้ว +2

    रायवळचा नाद करायचा नाय.....

  • @madhuradongre591
    @madhuradongre591 ปีที่แล้ว +2

    लय भारी भाऊ....लहानपण आठवल रे ...

  • @mohandhongade4179
    @mohandhongade4179 4 หลายเดือนก่อน

    बालपण आठवले, चिन्मय भाऊ, तुमची story म्हणजे जबरदस्तच

  • @ganeshveer.494
    @ganeshveer.494 ปีที่แล้ว

    खुप छान दादा . पूर्ण बालपण डोळ्या समोर आणलं गावा कडचे लहानपणीचे घालवलेले दिवस आठवले.
    मना पासून धन्यवाद दादा❤️🙌👌😊💯

  • @superlicious1775
    @superlicious1775 ปีที่แล้ว +4

    पूर्वी शेकडा ,टोपली असा मिळायचा.पैसे देऊन पण रायवळ शहरात येत नाही. आवडतो पण मिळत नाही.
    अति डोक्यावर घ्यायचं मग हापूस असो किंवा आणखी काही.
    माहिती खूप छान सांगितली
    मनापासून आभार🙏🙏👍

  • @LetsBuildRobot
    @LetsBuildRobot ปีที่แล้ว +1

    शब्द रचना एक नंबर

  • @rajjadhav3211
    @rajjadhav3211 ปีที่แล้ว +2

    भाई खूप वाट बघितली या व्हिडिओची धन्यवाद

  • @kailashgorde715
    @kailashgorde715 ปีที่แล้ว +2

    पण काही म्हणा केशर अंबा नंबर एक आहे.. पन लोणच्यासाठी रायवळ कैरीला चालैंज नाही

  • @digambarjagdale3428
    @digambarjagdale3428 ปีที่แล้ว +8

    वरपायचा 😂

  • @shwetamahadik3714
    @shwetamahadik3714 ปีที่แล้ว +1

    Aamchya raigad madhe aamchya gavi raivali aamba mito....superb

  • @ballubear7709
    @ballubear7709 ปีที่แล้ว +1

    गोटी आंबा म्हणतात आमच्याकडे याला.......चव तर हापूस पेक्षा पण भरी असते.

  • @apekshit2612
    @apekshit2612 ปีที่แล้ว +1

    राजकारण सोडून ...मस्त विषय घेतोस राव तू😍

  • @wheels6930
    @wheels6930 ปีที่แล้ว +1

    लोकांनी शेतात सावली पडते म्हणून शेकडो वर्षे जुनी गावरान आंब्याची झाडे तोडली , असे गावरान आंबे आता शोधून नाही सापडणार 😢

    • @amolkadam1672
      @amolkadam1672 ปีที่แล้ว

      बरोबर आहे भावा

    • @kavishwarmokal124
      @kavishwarmokal124 ปีที่แล้ว

      तोडण्या पेक्षा दर वर्षी झाडांची व्यवस्थित छाटणी (trimming) केली तर वाढ अस्ताव्यस्त होत नाही, परिणामी शेतात दाट सावली पडणार नाही.

  • @abk2260
    @abk2260 ปีที่แล้ว +4

    डान्स मध्ये गौतमीचा आणि अॕन्करींग मध्ये चिन्मय चा ......नाद करायचा नाय ...😃

  • @bipingaikwad9872
    @bipingaikwad9872 ปีที่แล้ว

    एकच नंबर आठवण जागी केलीस भिडू....लय भारी माहिती

  • @shivajishinde4284
    @shivajishinde4284 4 หลายเดือนก่อน

    चिन्मय तुमची बोलण्याची लखब विलक्षण आहे भाऊ.

  • @TheMilinddhoke
    @TheMilinddhoke ปีที่แล้ว +1

    कोकणात हापूस च्या बागेत एकतरी रायवळ च झाड ठेवतातच

  • @dipakgavali8161
    @dipakgavali8161 ปีที่แล้ว +1

    Aata khup shiklo paisa khup kamawala pn ti gavachi majja , te gachya diwanasa kothe सर् yenar nahi😰😰😰❤❤

  • @Sushz12
    @Sushz12 4 หลายเดือนก่อน +1

    आज रोजी लुप्त होत चाललेल्या रायवड आंबा आणि आंबाच्या जाती सर्व आमच्या कडे आहेत.सर्व प्रकारच्या आंब्याचे कलम मिळतात.120 प्रकारचे जातीचे रायवड आंबे खायला गोड फळ आणि चटकदार कलर पूर्ण न्याचरल पद्धतीने पिकवलेला तर तुम्ही सुद्धा संपर्क करा आणि घ्या राववळ ची चव बुकिंग सुरू आहे

    • @user-ct1zg5tp3j
      @user-ct1zg5tp3j 3 หลายเดือนก่อน

      सर मला गावरान आंब्याची कलम पाहिजेत

    • @Sushz12
      @Sushz12 2 หลายเดือนก่อน

      किती कलमे पाहिजे

  • @Aniket66784
    @Aniket66784 ปีที่แล้ว +1

    भाई एकदम फिल आला नुसते येकूण

  • @abhaytarange
    @abhaytarange ปีที่แล้ว +1

    लहानपणी आमच्या वाड्यात आंब्याची अढी लावली जायची . मी आणि माझी चुलत भावंडे पोटभर रायवळ आंबे खायचो . शर्ट काढूनच खायला बसावं लागायचं 😂. संध्याकाळी जेवणात पुन्हा रस पोळी असायची .

  • @pram003
    @pram003 ปีที่แล้ว +1

    भावा लगा लय भारी बोलतुयास तू...नुसता बंबात जाळ।।

  • @ramakantdeshmukh7942
    @ramakantdeshmukh7942 ปีที่แล้ว +1

    Kya baat hai ? Baachpan ki yad diladi thx!!

  • @sushantwarekarvlogs1868
    @sushantwarekarvlogs1868 ปีที่แล้ว +1

    चिन्मय भावा तोंडाला पाणी सुटले राव ❤

  • @ashtakala3715
    @ashtakala3715 ปีที่แล้ว +5

    हापूस हापूस हापूस एकदम बकवास... रायवल एक नंबर

    • @kavishwarmokal124
      @kavishwarmokal124 ปีที่แล้ว

      खरी गोष्ट आहे, हापुस कच्चा असताना पडलेला असेल किंवा मार लागलेला असेल तर पिकल्या नंतर बाहेरुन चांगला दिसतो पण कापल्या नंतर आतून खराब निघतो, रायवळ चे तसे नाही.
      हापुस विकत घेणे हे रिस्कीच असते.

  • @amoltilekar3007
    @amoltilekar3007 ปีที่แล้ว +2

    भाऊ ड्रॅगन फ्रुट चे फायदे तोटे विषयी माहिती दया

  • @riaztamboli995
    @riaztamboli995 ปีที่แล้ว +2

    Yes raiwal de king of mango in taste. ...we do have a raiwal mango tree....it tastes 2good n aamras of it ekdam mast.

  • @wasimattar3943
    @wasimattar3943 ปีที่แล้ว +1

    चिन्मय भिडू एक दम झकास

  • @sushantpatil5980
    @sushantpatil5980 ปีที่แล้ว +2

    आमच्यात आहे रायवळ गोटी आंबा

  • @sandeepbhere1129
    @sandeepbhere1129 ปีที่แล้ว +3

    Bhava Tula Oscar dila pahije... Changla explain kartos balpan athavile