Aai Baba Jag He Sundar Pahu Dya Mala | Bhajan Spardha 2011 | Sharad Krida Va Sanskrutik Pratishthan
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 2 พ.ย. 2024
- जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज
राज्यस्तरीय महाकरंडक अभंग व भजन स्पर्धा
तिसरी राज्यस्तरीय स्पर्धा 2011 मध्ये घेण्यात आली. स्त्री भ्रूणहत्येविरोधात जनजागृतीसाठी ही स्पर्धा घेण्यात आली.
स्त्री भ्रूणहत्या थांबवणे म्हणजे मानवजात वाचविणे, मुले आणि मुली यांची संख्या समसामान ठेवणे. कुटुंबात मुलगाच पाहिजे, ही अपेक्षा गैरच. पण, त्या हट्टापायी मुलीचा गर्भ नष्ट करणे हे अतिशय चुकीचे आहे. मुलींना मुलांइतकेच समर्थ बनविणे काळाची गरज आहे, म्हणूनच स्त्री गर्भास जन्म द्यावा आणि सर्वांनी स्त्री जन्माचे स्वागत करावे, या सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतुन स्पर्धेचे आयोजन केले होते.
खुला (पुरुष आणि महिला ) आणि बाल गटांत ही स्पर्धा झाली. खुल्या गटात प्रथम पुरस्कार मिळविणाऱ्या संघाला डॉ. आनंदीबाई जोशी महाकरंडक तर बाल गटात प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या संघाला सावित्रीबाई फुले महाकरंडक देण्यात आला. महाअंतिम स्पर्धा पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात झाली,
महाअंतिम स्पर्धेचे बक्षीस वितरण देहू येथील श्री तुकाराम महाराज संस्थांचे अध्यक्ष हभप सोनबा (अप्पा) दामोदर मोरे, आळंदी देवाची येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्था कमिटीचे प्रमुख विश्वस्त हभप शामसुंदर मुळे यांच्या हस्ते झाले, अध्यक्षस्थानी अस्थिरोगतज्ज्ञ, पद्मश्री के, एच. संचेती होते. हभप बापूसाहेब मोरे, श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्था कमिटीचे विश्वस्त हभप सुधीर पिंपळे, अखिल भारतीय वारकरी मंडळाचे अध्यक्ष प्रकाश महाराज बोधले, मकरंद अनासपुरे, उदय सामंत, निलम शिर्के उपस्थित होते. नंदू बंड यांनी आभार मानले.