अमिताची भगवद् गीता पुष्पांजली | अध्याय ९

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ก.ย. 2024
  • एक अनोखा ठेवा आठवणींचा
    अमिता! माझी सख्खी बहिण होतीस तरी आपलं मैत्री च नातं अधिक होत. आज तुझा वाढदिवस ,पण आज तु आमच्याबरोबर नाहीस ..
    गुरु मंजिरी ताई फडके यांच्याकडे तु भगवद्गीता शिकलीस ..त्यात एवढं प्राविण्य मिळवलंस कि, गीता शिकवण्याचे वर्ग‌ घेऊ लागलीस व निरुपण हि करु लागलीस.
    तुझी मैत्रीण सुप्रिया आठवले हिने तुझे रेकॉर्ड केलेले भगवद्गीतेचे सर्व अध्याय व इतर श्लोक मला दिले..तुझे सर्व सहकारी आणि प्रतिक गोखले... ज्याने हे You Tube वर upload करायला खुप मदत केली..
    या सगळ्यांची मी मनापासुन आभारी आहे.. आवाजाच्या माध्यमातून का होईना तु कायमच आमच्या सोबत असणार आहेस हा दिलासा आहे.भगवद् गीता जास्तित जास्त लोकांपर्यंत पोहोचावी ही तुझी इच्छा पुर्ण करण्याचा हा अल्पसा प्रयत्न आहे...
    श्री कृष्णार्पणमस्तु🙏
    ( वरील व्हिडिओ माझ्या बहिणीला श्रध्दांजली म्हणून अर्पण केला आहे.
    यात काही कमतरता असू शकते त्याबद्दल क्षमस्व.)

ความคิดเห็น •