Tuzya Pirticha Vinchu chavla Lyrics | Ajay Gogawale | Ajay - Atul | Fandry Lyrical Song

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ก.ย. 2020
  • / @takatakmarathi07
    👆🏻वर दिलेल्या लिंकवर जाऊन आपल्या टकाटक मराठी या नवीन चॅनेल ला SUBSCRIBE + BELL ICON दाबा..
    या चॅनेल वर नवीन येणारे चित्रपट, गाणी, वेबसिरीज याची माहिती लवकर भेटते..
    या गप्पा मारुयात :
    / yogeshpitekar07
    Song Credits :
    Film - Fandry
    Singer - Ajay Gogawale
    Music - Ajay - Atul
    A Film By - Nagraj Popatrao Munjule
    Lyrics:
    गीत : तूझ्या पिरतीचा हा इंचु मला चावला
    गायक : अजय गोगावले
    संगीत : अजय - अतुल
    जीव झाला येडापीसा रात रात जागनं
    पुरं दिसभर तूझ्या फिरतो माग मागनं
    जीव झाला येडापीसा रात रात जागनं
    पुरं दिसभर तूझ्या फिरतो माग मागनं
    जादु मंतरली कुनी सपनात जागंपनी
    नशीबी भोग असा दावला
    तुझ्या पिरतीचा हा इंचु मला चावला
    तुझ्या पिरतीचा हा इंचु मला चावला
    माग पळुन पळुन वाट माझी लागली
    अन तू वळुन बी माहझ्याकडं पाहयाना
    हे भीरभीर मनाला या घालु कसा बांध ग
    अवसची रात मी अन पुनवचा तु चांद गं
    हे भीरभीर मनाला या घालु कसा बांध ग
    अवसची रात मी अन पुनवचा तु चांद गं
    नजरतं मावतीया तरी दूर धावतीया
    मनीचा ठाव तूला मीळना
    आता तोंडाम्होर घास तरी गीळना
    गेला जळुन जळुन जीवं प्रीत जुळना
    सारी इस्कटून जिंदगी मी पाहिली
    तरी झाली कुटं चूक मला कळना
    सांदी कोपऱ्यात उभा येकला कधीचा
    लाज ना कशाची तकरार न्हाई
    भास वाटतोय हये खरं का सपानं
    सुखाच्या या सपनाला दार न्हाई
    सांदी कोपऱ्यात उभा येकला कधीचा
    लाज ना कशाची तकरार न्हाई
    भास वाटतोय हये खरं का सपानं
    सुखाच्या या सपनाला दार न्हाई
    राखं झाली जगन्याची हाय तरी जीता
    भोळं प्रेयम माझं अन भाबडी कथा
    बग जगूतय कसं , साऱ्या जन्माच हस
    जीव चिमटीत असा घावला
    तुझ्या पिरतीचा हा इंचु मला चावला
    तुझ्या पिरतीचा हा इंचु मला चावला
    माग पळुन पळुन वाट माझी लागली
    अन तू वळुन बी माहझ्याकडं पाहयाना
    हे खरकटया ताटावर रेघोटयाची झालरं
    हातावर पोट , बिदागीची झुनका भाकरं
    हे खरकटया ताटावर रेघोटयाची झालरं
    हातावर पोट , बिदागीची झुनका भाकरं
    उन्हातान्हात भुका , घसा पडलाय सुका
    डोळ्यातलं पानी तरी खळना
    आता तोंडाम्होर घास तरी गीळना
    गेला जळुन जळुन जीवं प्रीत जुळना
    सारी इस्कटून जिंदगी मी पाहिली
    तरी झाली कुटं चूक मला कळना
    Thanks For Watching
  • เพลง

ความคิดเห็น • 1.2K

  • @aniketraut5063
    @aniketraut5063 5 หลายเดือนก่อน +238

    2024 मधे हे साँग कोणाला कोणाला ऐका वाटतंय........❤

    • @ganeshmudde6997
      @ganeshmudde6997 3 หลายเดือนก่อน +5

      मला वाटते

    • @akashhatkar1768
      @akashhatkar1768 3 หลายเดือนก่อน +4

      Mala

    • @rahuldhanwate9356
      @rahuldhanwate9356 3 หลายเดือนก่อน +3

      ए तुम्हाला सगळीकडे तीच तीच कंमेंट करून आणि त्याच त्या कंमेंट ला like करून बोर नाही होत का??

    • @user-fe4fm2yy3i
      @user-fe4fm2yy3i 3 หลายเดือนก่อน +1

      Mala

    • @AniketDeshmukh-ox7yb
      @AniketDeshmukh-ox7yb 3 หลายเดือนก่อน

      Wztttffrwww ​@@akashhatkar1768

  • @rajd1781
    @rajd1781 2 ปีที่แล้ว +545

    मराठी फिल्म मधून हे गाणं आयुष्य भरासाठी १ नंबर वर असेल कारण जब्याच आयुष्य आणि त्याच्या भावना इतक्या अचूक, अप्रतिम पद्धतीने ग्रामीण शब्दातून संगीतमय झाला आहे. धन्यवाद नागराज आण्णा, अजय अतुल, टीम फॅंड्री 🙏

  • @user-xf1xm2oc3l
    @user-xf1xm2oc3l ปีที่แล้ว +109

    एक तर्फी प्रेमच फक्त खरे...मिळाले ते प्रेम कसले🙏

    • @kunalkhairnar6227
      @kunalkhairnar6227 ปีที่แล้ว +13

      Pan dada milale nahi te pn prem kasale.... jichyavar jivapeksha prem kele tich life madhe nahi tar... tar ti life ch kasali

  • @radheshyamkarpe
    @radheshyamkarpe ปีที่แล้ว +67

    आपल्या प्रत्येकाला हे गाणं रिलेट करतं. कारण, आपल्या प्रत्येकात एक जब्या लपलेला आहे व आपल्या प्रत्येकाची कुणी न कुणी शालू असतेच. आपण आपल्या मनातील भावना बाहेर नाही काढत एवढंच...

    • @hrishikeshjadhav5143
      @hrishikeshjadhav5143 ปีที่แล้ว +3

      Khar ahe

    • @sachiiendallall8493
      @sachiiendallall8493 4 หลายเดือนก่อน +1

      Exactly ,,,बरीच नाती जपण्यासाठी आपण आपल्या मनाला आणि आपल्याच ठार मारतो ,,,आणि ज्यांच्यासाठी आपण हे करतो त्यांना काहीच फरक पडत नसतो ,,,उलट आपल्याला हवं तसं जगावं ,,,,की जगाला आवडेल तसे जगावे ,,हाच सगळ्यात मोठा प्रश्न आयुष्यभर जीवना समोर उभा राहतो ...!!!❤

    • @pravinwaikar5831
      @pravinwaikar5831 2 หลายเดือนก่อน

      Maza past ashch hota

  • @siddharthv.kamble6063
    @siddharthv.kamble6063 2 ปีที่แล้ว +319

    Evergreen song. काळीज फाडून हातात देणारं गाणं, कधीच संपणार नाही... हे lyrics हे music आणि तो तळतळीचा आवाज....... हृदयाला भिडणार नाही हृदयात घुसून त्याला खडबडून जाग करणार..... अप्रतिम.... सुपर्रर्रर्रर्र

  • @brotherofcrazylovers7410
    @brotherofcrazylovers7410 ปีที่แล้ว +201

    Favorite line : सांधी कोपर्‍यात उभा एकला कधीचा लाज na कशाची तक्रार नाही......🥰❤️‍🩹

  • @chandrakantmaske5398
    @chandrakantmaske5398 2 ปีที่แล้ว +58

    गाण्यातील भाव संगीताची चाल,मनाला शांती देते.दुख सुद्धा तालाने गावे,सोसावे ही शिकवन या गारण्यातून मिळते.

  • @punamwasnik9537
    @punamwasnik9537 ปีที่แล้ว +14

    खर तर हे गाणं म्हणजे माझ्या heart la स्पर्श करून जाणार आहे.अगणित वेळा जरी मी आयकल तरी मी मी पहिल्यांदाच इकल्यासारख वाटत.i love song

  • @Neeta12316
    @Neeta12316 2 ปีที่แล้ว +261

    ग्रामीण शब्दांची नव्याने ओळख झाली 😀
    सारी इस्कटून जिंदगी मी पाहिली
    तरी झाली कुट चूक मला कळना

    • @kiranmagar8211
      @kiranmagar8211 2 ปีที่แล้ว +1

      🙂

    • @beinghindu2371
      @beinghindu2371 2 ปีที่แล้ว +1

      Tai tumala avde supe shbdh mahit nahit manlyavar tumi khupach Aashikshit ahat

    • @Neeta12316
      @Neeta12316 2 ปีที่แล้ว +10

      @@beinghindu2371 तुम्ही आहात ना शिक्षित मग तुमचं ज्ञान तुमच्या जवळ ठेवा 🙂

    • @lifelone077
      @lifelone077 2 ปีที่แล้ว +5

      आम्ही सुद्धा ग्रामीण भागात राहतो पण काही जुने शब्द आता एवढे कानावर पडत नाहीत...
      जुने जाणते लोकं सोडुन बाकीच्यांना बोलायची लाज वाटते..

    • @beinghindu2371
      @beinghindu2371 2 ปีที่แล้ว +3

      Amch ज्ञान amchaya pashich tevtu pn tumchya sarkhya लोकांन साठी ते dyav lagt tud natr tumche ज्ञान कस वाडनार

  • @subhashthaware3720
    @subhashthaware3720 2 ปีที่แล้ว +262

    आता तोंडाम्होर घास तरी गीळना, गेला जळुन जळुन जीवं प्रीत जुळना,सारी इस्कटून जिदगी मी पाहिली, तरी झाली कुट चूक मला कळना.👌👌

  • @mitaalitherebel3509
    @mitaalitherebel3509 ปีที่แล้ว +18

    मूवी निगला तेवा पासून न जाने किती वेला हे गीत पहिले आनी एकले 😘
    बेस्ट सॉन्ग 👍

  • @aashajadhav1504
    @aashajadhav1504 11 หลายเดือนก่อน +29

    गाण्याची चाल आणि शब्दही अगदी मनाला भाऊन टाकणारे आहेत
    Salute to writing and composing this mind blowing song अजय अतुल दादा

  • @rajendrashelar1550
    @rajendrashelar1550 6 หลายเดือนก่อน +7

    प्रत्येकाच्या जीवनात एकदा तरी जब्या आलेला असतोच,सुपर हिट गाणे

  • @vishalgore8
    @vishalgore8 ปีที่แล้ว +59

    OMG
    What a lyrics
    What a composition
    What a emotion
    What a feel
    Amazing
    Hats off to Ajay Atul sir❤

  • @rajesharpel
    @rajesharpel 2 ปีที่แล้ว +58

    मी, आम्ही ऐकतो ...फारच सुंदर गायलंय तितकाच छान छायाचित्रित झालय...👌👌👌

  • @akshaygaikwad-qm3gf
    @akshaygaikwad-qm3gf 9 หลายเดือนก่อน +219

    2023 मधे हे साँग कोणाला कोणाला ऐका वाटतंय❤

    • @adventuretrail9260
      @adventuretrail9260 7 หลายเดือนก่อน +3

      👍🏻

    • @vsp5893
      @vsp5893 7 หลายเดือนก่อน +2

      Mi😂

    • @NitinBhabad8010
      @NitinBhabad8010 6 หลายเดือนก่อน +3

      Mla

    • @SanjayHabbu
      @SanjayHabbu 6 หลายเดือนก่อน

      ​@@adventuretrail9260qwawwwww2222ww2sdfvfb.
      ZEw12A1ws11q1drdd1¹1DD1212⁴³³2deeeŕ11ŕ1eeseehď3df221qq255689🐈🐈🐈🥲🥲🐃🐎🐕🎂🎂👍🤜🤜🏃‍♀️🏃‍♀️🏃‍♀️🏃‍♀️🎂🐷🎂👍👍👍👍🐥🥱

    • @__rudra__1808
      @__rudra__1808 6 หลายเดือนก่อน +2

      Me❤❤

  • @sanketadate
    @sanketadate 2 ปีที่แล้ว +1768

    2022 मध्ये कोण कोण ऐकत हे सॉंग.👌

  • @Suxcess_AI
    @Suxcess_AI ปีที่แล้ว +11

    जब्या च्या प्रेमाच्या भावना एकाच गाण्यात मांडल्या काय मस्त आहे खरंच माझी पण कहाणी या जब्या सारखी च आहे,hats off to अजय अतुल सर माझी आवडत वाक्य म्हणजे अमावास्येची रात मी अन पूनवचा तू चांद ग

    • @chandrashilwadhave9652
      @chandrashilwadhave9652 7 หลายเดือนก่อน +1

      Asa ka mantos bhawa..you can achieve great things in your life...

    • @Suxcess_AI
      @Suxcess_AI 7 หลายเดือนก่อน

      @@chandrashilwadhave9652 👍👍

  • @MoreRoyal-fo7km
    @MoreRoyal-fo7km 3 หลายเดือนก่อน +6

    2024 मध्ये हे मराठी गान कोनाला ऐका वाटतंय 👌❤️💝😍

  • @arunshingare7039
    @arunshingare7039 ปีที่แล้ว +8

    हे गाणे ह्रदयाला हेलाऊन टाकत.गाण्याचे बोल व भाषा अतिशय गोड आहे, संगीत सुध्दा अप्रतिम,अजय अतुल व मंजुळे सरांना या निर्मिती बद्दल खुप खुप धन्यवाद व भावी आयुष्यासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉🎉

  • @jayshriraut4136
    @jayshriraut4136 ปีที่แล้ว +3

    Saturday working.... Kanat headphones... High volume.. An tujhya pirticha inchu mla chavala..👌🏻👌🏻👌🏻.. Kya bat kya bay kya bat

  • @sanjaymodhave8307
    @sanjaymodhave8307 ปีที่แล้ว +65

    They took marathi music to new height.Salute to both Ajay-Atul.

  • @sonawaghmare1129
    @sonawaghmare1129 9 หลายเดือนก่อน +2

    ह्या गाण्याचे एक एक शब्द काळजाला लागतात what a lovely, great song 👏😍😍👏🔥🔥🔥🔥 असा चित्रपट आणि हे गाणं परत कधी च होणार नाहीं mastrepice 😍😍👏🔥

  • @pinkypatil396
    @pinkypatil396 2 ปีที่แล้ว +42

    सारी इसकटुन जिन्दगी मी पहिली
    तरी झाली कूट चूक मला कळना

  • @star555vitekar3
    @star555vitekar3 2 ปีที่แล้ว +48

    नागराज, आण्णानीं नुसता जाबुंवंत सादर केला नाही तर प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी हा प्रंसंग आला आहे हे ठामपणे सांगतो,,ईंचू,,

  • @sachinbuktare9824
    @sachinbuktare9824 2 ปีที่แล้ว +36

    दिवसातून दोन- तिन वेळा हे गान ऎकल्या शिवाय मन नाही लागत😍

  • @savitabhalerao2932
    @savitabhalerao2932 18 วันที่ผ่านมา +1

    Hi i am Omkar from Pune want to say this Masterpiece Made by Ajay And Atul sir❤ i here it everyday in my car at night drive its music gives goosebumps and lyrics remember someones memories i am blessed that we got this gem artists in our Marathi industry 🎉

  • @salmanshaikh2088
    @salmanshaikh2088 2 หลายเดือนก่อน +2

    हे गाण ऐकल्यावर मला प्रमाचे जुने दिवस आठवते i love you song👌👌😘

  • @anilgaikwad8104
    @anilgaikwad8104 ปีที่แล้ว +10

    खूप छान किती ही वेळेस ऐकलं तरी मन भरत नाही.खरच खूप भावनिक गीत आहे

  • @shakilspecialstatus1862
    @shakilspecialstatus1862 4 หลายเดือนก่อน +9

    2024 मध्ये हे साँग कोणाला कोणाला ऐका वाटतेय ❤

  • @user-uj5jl3kp7b
    @user-uj5jl3kp7b 26 วันที่ผ่านมา +1

    ❤जसा हा पिक्चर😊 निगला हाय तस ये गाण माझ
    फेवरेट आहे ❤❤❤❤

  • @alokaher920
    @alokaher920 3 ปีที่แล้ว +163

    अजय-अतुल यांना मानाचा मुजरा

    • @hashtagvideoofasre5374
      @hashtagvideoofasre5374 2 ปีที่แล้ว +4

      🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌👌👏👏👏👏👏

    • @hashtagvideoofasre5374
      @hashtagvideoofasre5374 2 ปีที่แล้ว +3

      🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @nandkumargordepatil999
      @nandkumargordepatil999 2 ปีที่แล้ว +1

      👌👌👌👌🙏🙏

    • @aviwagh3102
      @aviwagh3102 2 ปีที่แล้ว +1

      मुजरा फक्त छत्र. शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना 🚩🙏

    • @shrikrishnaghule7757
      @shrikrishnaghule7757 2 ปีที่แล้ว

      @@aviwagh3102 tyana tar aahech re
      Mujara navala mahatvach rajenmul aahe

  • @pavitrakekare6821
    @pavitrakekare6821 ปีที่แล้ว +6

    केव्हांहि हे गाणे ऐका मजा येते कंटाळा वाटत नाहि संगित एकदम भारी

  • @hemlatanikam8106
    @hemlatanikam8106 2 ปีที่แล้ว +13

    शब्द शब्द खरा आहे😢😢👍🏻👍🏻

  • @nitinsonawane9981
    @nitinsonawane9981 10 หลายเดือนก่อน +2

    ईश्वरी संदेश घेऊन असा आवाज जन्माला येतो यश नको जीवांचे सार्थक व्हावे मानवी वेदनांचे आर्त फक्त इशवरपुढे सांगावे

  • @madhuritade5079
    @madhuritade5079 ปีที่แล้ว +5

    अप्रतिम हृदय हेलावुन जात आणि अंगार काटे येतात हे ऐकताना। सुंदर

  • @wintersoldier1998
    @wintersoldier1998 ปีที่แล้ว +5

    काहींना हे गाणं नाचण्या साठी भारी वाटत असेल, पण जेहनवही हे गाणं ऐकतो अश्रू आल्या शिवाय राहत नाहीत.
    सारी ईस्कटून जिंदगी मी पहिली तरी झाली कुठे चूक मला कळना।

    • @shyamk8896
      @shyamk8896 ปีที่แล้ว +1

      Jyala hya song che lyrics samjle toch khara

  • @darshan12399
    @darshan12399 2 ปีที่แล้ว +9

    2015 या वर्षाच्या दोन सुंदर आठवणी... iPhone 6S aani he song... Donhi Pn Aaj hi Majhya जवळ आहेत....

  • @shourya6789
    @shourya6789 ปีที่แล้ว +5

    मनात जागा बनवली या गाण्यांनी. ..... मस्त

  • @saikumarnalla7723
    @saikumarnalla7723 ปีที่แล้ว +8

    काळजाला भिडणारा गान आहे ❤❤❤❤

  • @StudyBoy-by7wp
    @StudyBoy-by7wp 2 ปีที่แล้ว +19

    लय मनाला लागल गाण 😁

  • @prajwalkamble6580
    @prajwalkamble6580 ปีที่แล้ว +9

    अप्रतिम गान....😍

  • @harshalmanmode1045
    @harshalmanmode1045 2 ปีที่แล้ว +6

    किती मुस्त बोल शब्द आहे समजून घेण्या सरका आहे वाओ खुओ मस्त

  • @jarvishappy8122
    @jarvishappy8122 ปีที่แล้ว +27

    Lyrics तर खूपच छान आहेत , मला लयी आवडलंय...आणि अजय अतुल सरांनी जो आवाज दिलाय तो तर एकदमच भारी आहे...(ʘᴗʘ✿)

  • @alwaystruereality3753
    @alwaystruereality3753 2 ปีที่แล้ว +94

    World class award winning song.

  • @aishwaryalad7873
    @aishwaryalad7873 ปีที่แล้ว +32

    Oh my god the line....
    jeev chimtith asa ghaavla....
    Got a goose bumps...
    This song always blows my mind the time when I listen to it...

  • @sachiiendallall8493
    @sachiiendallall8493 4 หลายเดือนก่อน +2

    भास वाटतोय हाय खरं का सपान ...सुखाच्या या सपनाला दार नाही ..राख झाली जगण्याची हाय तरी जीता ,,, भोळ प्रेम अन् भाबडी कथा ,,,...!!!❤😅

  • @neerajk1140
    @neerajk1140 2 ปีที่แล้ว +25

    माझ्या बाबतीत असेच झाले आहे 😅😅😅❤️❤️

  • @saloniangolkar1075
    @saloniangolkar1075 8 หลายเดือนก่อน +6

    Really love this song yaar ❤ !!! Amazing in 2023

  • @gajananwaghmode5601
    @gajananwaghmode5601 ปีที่แล้ว +5

    खुप खुप छान अजय अतुल सर ❤️🔥🔥👌👌❤️❤️

  • @prajaktagaikwad4701
    @prajaktagaikwad4701 2 ปีที่แล้ว +11

    Ata tondamohr ghas tri gilna
    Gela jalun jalun jiv prit julna
    Sari esktun zindgi me pahili
    Tri zali kuth chuk mala kalana
    Thus lines are awesome ...
    Such a best song and singers also

  • @gokuljadhav9903
    @gokuljadhav9903 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान गाणं आहे मला कधी पण अपसेट वाटत ना तर हे गाणं आयकतो ❤😘😘

  • @kiranjadhav3337
    @kiranjadhav3337 2 ปีที่แล้ว +4

    खूप छान वाटल मी ही गायनाचा आनंद घेतला.

  • @kalpanapatil653
    @kalpanapatil653 2 ปีที่แล้ว +18

    अति सुंदर आवाज 👌

  • @MarathiBhaktigit
    @MarathiBhaktigit หลายเดือนก่อน +1

    राख झाली जगण्याची हाय तरी जिता, भोळे प्रेम माझं आण भाबडी कथा

  • @tejasbankar1910
    @tejasbankar1910 3 หลายเดือนก่อน +2

    तुम्हाला पन हे गान ऐकुन तिचि आठवन एते का??🥰🥺🥺🥺🥺💫💫

  • @pravinsuryawanshi9167
    @pravinsuryawanshi9167 ปีที่แล้ว +3

    अस्सल गावठी आणि रांगड,निरागस प्रेम कशा प्रकारे असत या गाण्यातून प्रखरतेने दिसून येते....

  • @prachi5899
    @prachi5899 2 ปีที่แล้ว +64

    This rendition elelivates to another dimension.... sooo soo beautiful 😍

    • @krishnagaherao7664
      @krishnagaherao7664 2 ปีที่แล้ว +1

      Song manla ved lavanare ahe

    • @yuvrajsali2318
      @yuvrajsali2318 2 ปีที่แล้ว +2

      @@krishnagaherao7664 Br👍

    • @inusmansuri3104
      @inusmansuri3104 ปีที่แล้ว

      @@krishnagaherao7664 nsvbagaavsabvagwsssvsvfvvbbvvvvbggbvbbnvbnbbbbbbvbwsafyvv

  • @spicy2602
    @spicy2602 ปีที่แล้ว +2

    2023 मध्ये कोण कोण ऐकतय हे दिलखुलास गाणं ❤

  • @TheSweetcorn
    @TheSweetcorn 2 ปีที่แล้ว +50

    Lots of love stories ended in the storm of caste discrimination... Yet counting, just at present caste discrimination has now become food discrimination...

  • @aryanalurkar4766
    @aryanalurkar4766 ปีที่แล้ว +12

    This song has super energy to motivate ⚡🔥

  • @may_short_video
    @may_short_video 2 ปีที่แล้ว +6

    माय फेवरेट् सोंग 😊आजय आतुल सर सुपर सिंंगर 👌👏

  • @nitinsonawane9981
    @nitinsonawane9981 10 หลายเดือนก่อน +1

    ईशवरीय स्वर आहेत हे,

  • @sharadawasare2597
    @sharadawasare2597 9 หลายเดือนก่อน

    शब्द किती समर्पक आहेत... खूप छान... मी सिनेमा बघितला आणि हे गाणे आवडीने खूप वेळा ऐकले आहे... आज नव्याने आनंद घेतला..👍👌

  • @UMAKANTGAMINGYT
    @UMAKANTGAMINGYT 2 ปีที่แล้ว +30

    Kon kon 2022 made aaikt aahe like kara

  • @rajnikam8448
    @rajnikam8448 หลายเดือนก่อน +5

    आहे का कोणी २०२४ मध्ये हे सॉंग ❤

  • @yogeshpitekarofficial2406
    @yogeshpitekarofficial2406  2 ปีที่แล้ว +2

    th-cam.com/channels/gczoJy5OhN7xZgk_-0O1Lg.html
    👆🏻वर दिलेल्या लिंकवर जाऊन आपल्या टकाटक मराठी या नवीन चॅनेल ला SUBSCRIBE + BELL ICON दाबा..
    या चॅनेल वर नवीन येणारे चित्रपट, गाणी, वेबसिरीज याची माहिती लवकर भेटते..

  • @yashbagadevines9942
    @yashbagadevines9942 หลายเดือนก่อน +5

    2024 kon kon sun rsha hai

  • @sureshgaikwad9563
    @sureshgaikwad9563 2 ปีที่แล้ว +12

    खूप छान गाणं मला आवडलं खरंच😍☺️❤️👌👌

  • @ETLKVK
    @ETLKVK ปีที่แล้ว +5

    My most most fav marathi songs.

  • @manojsinghbisht5979
    @manojsinghbisht5979 หลายเดือนก่อน

    2024 me kon kaha se sun rha h me uttarakhand se me rhta Maharashtra me rhta hu love this Marathi song and manus❤🎉

  • @nileshrambhaumore9315
    @nileshrambhaumore9315 2 ปีที่แล้ว +14

    Nagraj...Ajay Atul ...mind blowing

  • @sanghkarajamdhade5959
    @sanghkarajamdhade5959 8 หลายเดือนก่อน +9

    Proud of dr Babasaheb Ambedkar 💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙

  • @nashikkavlogger
    @nashikkavlogger 3 หลายเดือนก่อน +3

    2024 मधे हे Song कोना कोनाला ऐकावा वाटतय ❤️

  • @vedantwadhai40
    @vedantwadhai40 ปีที่แล้ว +1

    Lyrics bro .
    💥💥💥💥💥💥 Ajay atullll mmaassssss ....lahanpani feel nahi zal pn atta jat hotay ...

  • @fardinjamadar8593
    @fardinjamadar8593 ปีที่แล้ว +1

    गाणं हे माणसाच्या आयुश्यातील वेदना, भावना, विचार आणि परिस्थिती आहे. हे गाणं ऐकल्यावर माणसाच्या जुन्या आठवणी जाग्या होतात.

  • @irnavale8220
    @irnavale8220 2 ปีที่แล้ว +25

    रचना छान आहे...भारीच
    आणि
    संगीत अप्रतिमच..

  • @Karan-5731
    @Karan-5731 2 ปีที่แล้ว +6

    Background music khup chaan aahe
    Dhol Tasha mix........

  • @Ipl_4k
    @Ipl_4k ปีที่แล้ว +2

    2050 year Aal tri pn he song number 1 asnar 💥

  • @Radhekrishna33373
    @Radhekrishna33373 ปีที่แล้ว +2

    खरं प्रेम ❤️❤️ करणाऱ्या ग्रामीण भागातील मुलाची कथा❤️❤️❤️❤️

  • @mrraifx21
    @mrraifx21 ปีที่แล้ว +28

    What a masterpiece 🗿

  • @Prachiankita1421
    @Prachiankita1421 2 ปีที่แล้ว +22

    All Time favourite ☺️❤️

  • @prk-gamer974
    @prk-gamer974 9 หลายเดือนก่อน +2

    Favourite song जोतिबाच्या नावानं चांगभलं very nice song ❤❤

  • @bharatipujari3172
    @bharatipujari3172 ปีที่แล้ว +2

    Mala khupacha avdele he gana I like it song 😍❤️❤️❤️❤️❤️

  • @mohansutar7174
    @mohansutar7174 2 ปีที่แล้ว +10

    लाजवाब प्रस्तुती! 👌👌👌

  • @vidyamase931
    @vidyamase931 11 หลายเดือนก่อน +3

    Who is listening this masterpiece in 2023 👇👇

  • @skt6749
    @skt6749 2 ปีที่แล้ว +12

    Best song by Ajay Atul👌👌👌

  • @sureshdolzae0099
    @sureshdolzae0099 7 หลายเดือนก่อน +1

    लय भारी

  • @ajaysking
    @ajaysking 11 หลายเดือนก่อน +18

    Only ultra legends will understand the true meaning of the lyrics 😢

    • @samrat4932
      @samrat4932 2 หลายเดือนก่อน

      💯

  • @sumitkokate7814
    @sumitkokate7814 2 ปีที่แล้ว +4

    2:21 माझं favrite line इत पासून ❤️❤️❤️

  • @yashbhalavi8601
    @yashbhalavi8601 9 หลายเดือนก่อน +2

    २०२३ मध्ये कोण कोण हे गाण आवढिनेे आयकत आहात (like kara) ❤😍

  • @hansrajjadhav230
    @hansrajjadhav230 ปีที่แล้ว +2

    The line 'जाई इस्कुटून जिन्दगी' 🥺

  • @abhijitgaikwad583
    @abhijitgaikwad583 2 ปีที่แล้ว +5

    Superhit marathi song

  • @priteshbhagat9683
    @priteshbhagat9683 ปีที่แล้ว +3

    This is a sad song but not just a sad song
    This is a dance song but not just a dance song 😍😍😍

  • @swarajfilms1212
    @swarajfilms1212 ปีที่แล้ว +2

    2023 मध्ये कोण कोण हे सोंग ऐकत

  • @ridewithraghav
    @ridewithraghav 9 หลายเดือนก่อน +1

    Bhai marathi nhi aati, lekin ye song mera fac hai ❤🔥

  • @vijayshinde2887
    @vijayshinde2887 2 ปีที่แล้ว +6

    Ajay Atul Nagraj, Great

  • @mangeshbalsaraf9335
    @mangeshbalsaraf9335 2 ปีที่แล้ว +5

    एक नंबर भावा नाद खुळा 👌👌❤❤

  • @maheshwarpillai5268
    @maheshwarpillai5268 2 หลายเดือนก่อน

    I am tamil ! Music is awesome for music I love this song ❤❤❤❤

  • @shravani_chavan_6403
    @shravani_chavan_6403 6 หลายเดือนก่อน +2

    2024 madhe kon kon he song aaikat aahe❤️