आमच्या शिक्षण संस्थेत सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींचा अवतरण दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ต.ค. 2024
  • महानुभाव...महानता अध्यात्माची,भक्तीची ,वैराग्याची! ✍️🙏दिनांक ०५/९/२०२३ वार गुरुवार रोजी आमच्या श्रीचक्रधर परमानंद शिक्षण संस्थेत सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींचा अवतरण दिन सोहळा विद्यार्थी आणि पालक यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सुरेख रांगोळी,सुंदर छान फलकलेखन ,स्वामींचे गोड अभंग अशा भक्तीमय वातावरणात सकाळी श्रीचक्रधर स्वामींच्या चरणी श्रीफळ,विडा ठेवून स्वामींची मोठ्या उत्साहात पालखीतून मिरवणूक काढण्यात आली.त्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून श्रीचक्रधर स्वामींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. महानुभाव पंथाच्या श्वेत ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.स्वामींची प्रार्थना घेऊन सर्वजण स्वामींच्या चरणी नतमस्तक झाले. विद्यार्थ्यांची भाषणे झाली.भजने झाली. प्रवचन झाले.तदनंतर संस्थेकडून बालवाडी ते बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांना सुग्रास असा महाप्रसाद देण्यात आला. सर्व विद्यार्थ्यांनी, प्रमुख पाहुण्यांनी ,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी या सुग्रास भोजनाचा लाभ घेतला.
    या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प.पू. ई. सुनिलराज राहेरकर महानुभाव,नगरसेविका मा.सौ. स्मिताताई कोंढरे,जनहित विकास मंचाचे संस्थापक अध्यक्ष मा श्री. सुधीरबापू कोंढरे,सामाजिक कार्यकर्ते , संस्था अध्यक्ष मा.श्री.महेंद्रदादा संजय कोंढरे, संस्था सदस्या सौ. सुवर्णाताई कोंढरे, संस्था प्रतिनिधी सौ.मोनालीताई मयूरनाना कोंढरे, संस्था प्रतिनिधी सौ. कोमलताई सुरेंद्रभाऊ कोंढरे,मुख्याध्यापक मा.श्री. विश्वास कोचळे सर, प्राचार्य मा.श्री.घोलप सर, सेवाज्येष्ठ शिक्षक मा.श्री. गोरख निकत सर, झगडे मॅडम,म्हस्के मॅडम,पाटील मॅडम तसेच सर्व विभागांचे सर्व सहकारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, सर्व वर्गांचे विद्यार्थी व पालक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा.श्री.जरे सर यांनी केले तसेच आभार प्रदर्शन मस्के मॅडम यांनी केले.
    अशाप्रकारे भक्तीमय वातावरणात सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींचा अवतरण दिन पार पडला.
    🙏🌹 *दंडवत प्रणाम*🌹🙏

ความคิดเห็น • 3

  • @KushalJaat-mq7ye
    @KushalJaat-mq7ye หลายเดือนก่อน +4

    ❤❤❤❤

  • @suhasvarode6508
    @suhasvarode6508 หลายเดือนก่อน +4

    🙏 श्री चक्रधर स्वामी यांना प्रणाम 🙏

  • @kasturicommunication475
    @kasturicommunication475 หลายเดือนก่อน +1

    दंडवत प्रणाम.....
    ज्ञाना बरोबर आपण आध्यत्मिक ज्ञान ही विद्यार्थी ना आपली संस्था देत आहात,श्री चक्रधर स्वामी हे बाराव्या शतकातील परमेश्वर अवतार आहेत आणि महानुभाव पंथाचे संस्थापक आहेत. ते महानुभाव पंथाच्या तत्त्वज्ञानानुसार ईश्वराच्या पंचावतारांपैकी पाचवा अवतार आहेत. लीळाचरित्र या मराठीतील पहिला चरित्रग्रंथ लीळाचरित्र श्री चक्रधर स्वामी यांनी लिहिला,