I रायगड I Sambhaji Raje I शिवभक्त I राजसदर I

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ธ.ค. 2024
  • काल रायगडास भेट दिली असता स्वतः लक्ष घालून राजसदरेवरील बँरिकेटस् हटवले.
    राजसदरेवर जाऊन महाराजांपुढे नतमस्तक होता यावे, यासाठी सदरेवरील बँरिकेटस् काढावेत, अशी मागणी शिवभक्तांनी अनेक दिवसांपासून केली होती. काल रायगडला भेट दिली असता, तात्काळ निर्णय घेत सोबत उपस्थित पुरातत्त्व अधिकाऱ्यांच्या सहमतीने हे बँरिकेटस् हटवले. यामुळे राजसदरेवर जाऊन शिवभक्तांना आता महाराजांचे दर्शन घेता येणार आहे. मात्र सदरेवर जात असताना शिवभक्तांनी त्या जागेचे पावित्र्य जपण्यासाठी काही शिष्टाचारांचे पालन करणे गरजेचे आहे. जसे की डाव्या बाजूने सदरेवर जाऊन उजव्या बाजूने उतरणे, महाराजांच्या तख्ताच्या जागेपर्यंत न जाणे, सेल्फी न काढणे, सदरेवर शांतता राखणे या गोष्टी प्रामुख्याने पाळल्या पाहिजेत.
    तूर्तास सदरेवरील बँरिकेट्स तख्ताच्या बाजूने लावले आहेत, मात्र लवकरच या बँरिकेटस् चे स्वरूप बदलून ऐतिहासिक धाटणीची संरचना करण्यात येईल.
    #raigad
    See less

ความคิดเห็น •