सायखेडा येथील जनता इंग्लिश स्कूलमध्ये पालक सहविचार सभेत श्रीमती प्रतीक्षा शिंदे मार्गदर्शन करताना

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ธ.ค. 2024
  • जनता इंग्लिश स्कूल मध्ये पालक सहविचार सभा
    पालक शिक्षक संघ व माता पालक संघाची स्थापना
    सायखेडा :- ```येथील मविप्रसंचलित जनता इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात पालक शिक्षक सहविचार सभा खेळमेळीच्या वातावरणात संपन्न झाली कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष घनश्याम जोंधळे हे होते. प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले .या कार्यक्रमासाठी जि प सदस्य व शालेय समितीचे अध्यक्ष सुरेश कमानकर, शालेय समिती सदस्य अशपाक शेख, दत्तात्रेय कारे, राजेंद्र कुटे ,सुधीर शिंदे, सोनाली गुजराथी,रामदास शिंदे ,शाम सोनवणे, नितीन खालकर ,शर्मिला बोडके, प्राचार्य श्री नवनाथ निकम, उपप्राचार्य श्री वसंत शिंदे, पर्यवेक्षक श्री डी के शिंदे उपस्थित होते. याप्रसंगी विद्यालयाचे उपप्राचार्य श्री.वसंत शिंदे यांनी प्रास्ताविक सादर केले, त्यांनी आपल्या प्रास्ताविकात शैक्षणिक प्रगती व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास याविषयी आपले विचार व्यक्त केले .यावेळी उपस्थित पालक वर्गातून पालक शिक्षक संघ व माता-पालक संघाची स्थापना करण्यात आली. याप्रसंगी पालक शिक्षक संघाच्या पदसिद्ध अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक श्री नवनाथ निकम यांची तर उपाध्यक्ष म्हणून सुरेश खैरनार व सहसचिव म्हणून विजय खालकर सचिव पदी अशोक टरले तर माता पालक संघाच्या उपाध्यक्षपदी श्रीमती शीतल खारके व सहसचिव पदी उर्मिला गाडे तर सचिव पदी श्रीमती गांगुर्डे यांची नियुक्ती करण्यात आली. नूतन कार्यकारिणीचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला .याप्रसंगी आलेल्या काही पालकांनी आपले मनोगत व्यक्त केले श्रीमती प्रतिक्षा शिंदे यांनी पालकांनी पाल्याच्या संदर्भात घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले प्राचार्य श्री नवनाथ निकम यांनी सर्वांगीण विकासासंदर्भात आपले विचार व्यक्त केले. तसेच विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती व पालकांनी विचारलेल्या शंकांचे समाधान यावेळेस सरांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री अशोक टर्ले यांनी केले तर आभार पर्यवेक्षक श्री डी के शिंदे यांनी मानले कार्यक्रमास बहुसंख्य पालक बंधू भगिनी शिक्षक बंधू भगिनी शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते```

ความคิดเห็น •