रमारमण ची भाजी मंडई

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ม.ค. 2025
  • बाजार म्हणजे काय असतो. तेथे भाजीपाल्याची कशी विक्री केली जाते. बाजारातील पैशांचे व्यवहार कसे होतात. ग्राहकाला भाजीची विक्री कशा पध्दतीने करायची, याची माहिती अभ्यासा बरोबर शालेय जीवनापासून असावी या विचारातून रमारमण बालक मंदिर शाळेत भाजी मंडईचा उपक्रम राबविण्यात आला.बालवर्गातील मुले या उपक्रमात सहभागी झाले होते. बालगोपाळ विदयार्थी वांगी, मुळा, मेथी, गाजर, गवार, पालक, भेंडी, आले, मिरची, लिंबू असा विविध प्रकारचा भाजीपाला विकत होते. भाज्यांची ओळख मुलांना व्हावी हाही यामागील उद्देश होता. शाळेतील इतर विद्यार्थी या विद्यार्थ्यांकडून भाजी खरेदी करत होते. भाजीची किंमत, ती ग्राहकाला कशी विकावी याची माहिती शिक्षक विद्यार्थ्यांना करून देत होते. रमारमण भाजी मंडईत लहान मुले भाजी घ्या भाजी स्वस्त भाजी, ताजी ताजी भाजी अशी आरोळी ठोकून ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत होते. हा प्रकार पाहून ग्राहक म्हणून आलेल्या विद्यार्थी, शिक्षकांची हसून मुरकुंडी वळत होती. बाजारातील वातावरण शाळेच्या आवारात निर्माण करण्यात आले होते.
    #kidsactivities #playschoolactivities #bestpreschool #solapurcity #solapurnews #solapurnewschannel #vegetablemarketatschool #vegetablemarket #kidspreprimaryeducation #kidseducation #ramaramannurseryschool #solapurpreschool #nurseryschool

ความคิดเห็น •