माती परीक्षण /Soil testing

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ต.ค. 2024
  • अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे पिकांवर दिसणारी लक्षणे व त्यावरील उपाय
    ➖ नत्र ➖
    *अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे -* झाडांची खालची पाने पिवळी होतात. मुळांची व झाडांची वाढ थांबते.
    *उपाय -* १ % युरियाची फवारणी करावी. (१०० ग्रॅम युरिया १० लि. पाण्यात घेऊन फवारावे).
    ➖ स्फुरद ➖
    *अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे -* पाने हिरवट, लांबट होऊन वाढ खुंटते. पानांची मागील बाजू जांभळट होते.
    *उपाय -* १ % डाय अमोनियम फॉस्फेट ची फवारणी करावी. (१०० ग्रॅम D-AP १० लि. पाण्यात घेऊन फवारावे).
    ➖ पालाश ➖
    *अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे -* पानांच्या कडा तांबटसर होऊन पानांवर तांबडे व पिवळे ठिपके पडतात. खोड आखूड होऊन शेंडे गळून पडतात.
    *उपाय -* ०.५ % सल्फेट ऑफ पोटॅश ची फवारणी करावी. (५० ग्रॅम SOP १० लि. पाण्यात घेऊन फवारावे).
    ➖ गंधक ➖
    *अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे -* झाडांच्या पानांचा मुळचा रंग कमी कमी होतो व नंतर पाने पूर्ण पिवळी पडतात.
    *उपाय -* ०.२ % फेरस सल्फेट ची फवारणी करावी. (२० ग्रॅम फेरस सल्फेट १० लि. पाण्यात घेऊन फवारावे)
    ➖ लोह ➖
    *अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे -* शेंडयाकडील पानांच्या शिरांमधील भाग पिवळा होतो व झाडांची वाढ खुंटते.
    *उपाय -* ०.२ % चिलेटेड लोहाची फवारणी करावी. (२० ग्रॅम चिलेटेड लोह १० लि. पाण्यात घेऊन फवारावे)
    ➖ जस्त ➖
    *अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे -* पाने लहान होऊन शिरांमधील भाग पिवळा होतो व पाने ठिकठिकाणी वाळलेली दिसतात.
    *उपाय -* ०.२ % चिलेटेड झिंक ची फवारणी करावी. (२० ग्रॅम चिलेटेड झिंक १० लि. पाण्यात घेऊन फवारावे.
    _*शेती विषयक माहितीची व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर टच करा
    नारळ लागवड
    • नारळ लागवड -भाग - 2 ना...
    आंबा लागवड
    • आंबा लागवड भाग -2 आंबा...
    काजू लागवड 1
    • काजू लागवड भाग 2 काजू ...
    जायफळ लागवड
    • जायफळ लागवड/Nutmeg pla...
    काजू लागवड 2
    • काजु लागवड भाग - 1/Cas...
    मिरी लागवड
    • काळी मिरी लागवड/Black ...
    सुपारी लागवड
    • सुपारी लागवड/Areca nut...
    काजू लागवड 3
    • काजूचे आयुष्य 20 वर्षा...
    आंबा छाटणी
    • आंबा पुनर्जीवन/आंबा छा...
    मसाला पीक लागवड
    • नारळ बागेत मसाला पिकां...
    बुश पेपर लागवड
    • बुश पेपर(काळी मिरी)लाग...
    काजूचे आयुष्य वाढवणे
    • काजूचे आयुष्य 20 वर्षा...
    कोकोपीठ वापर - 1
    • नारळ पावडर(कोकोपीट)use...
    कोकोपीठ महत्व
    • कोकोपीट- महत्व,फायदे c...
    गो कृपा अमृतम चा वापर
    • गो कृपा अमृतम उत्तम बॅ...
    **********************************
    नारळ खोडातून औषध देणे भाग 1
    • नारळ झाडाला खोडातून औष...
    नारळ फळघळ करणे व उपाय
    • नारळ अकाली फळगळ होण्या...
    नारळ सोंड्या भुंगा नियंत्रक सापळा
    • नारळावरील कामगंध सापळ्...
    नारळास इंजेक्शन मधून औषधे देणे
    • नारळाच्या झाडास इंजेक्...
    नारळ पीक शेतीशाळा
    • नारळ पीक शेतीशाळा आदुर...
    ➖ मंगल ➖
    *अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे -* पानांच्या शिरा हिरव्या व शिरांमधील भाग क्रमाक्रमाने पिवळा होतो व नंतर पांढरट व करडा होतो, संपूर्ण पर्ण फिक्कट होऊन गळते. *उपाय -* ०.२ % चिलेटेड मंगल ची फवारणी करावी. (२० ग्रॅम चिलेटेड मंगल १० लि. पाण्यात घेऊन फवारावे)
    ➖ तांबे ➖
    *अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे -* झाडांच्या शेंड्यांची वाढ खुंटते. खोडांची वाढ कमी होते, पाने गळतात.
    *उपाय -* ०.४ % मोरचूदची फवारणी करावी. (४० ग्रॅम मोरचूद १० लि. पाण्यात घेऊन फवारावे)
    ➖ बोरॉन ➖
    *अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे -* झाडांचा शेंडा व कोवळी पाने पांढरट होऊन मरतात. फुलगळ होते व फळांना तडे जातात.
    *उपाय -* ०.२ ते ०.३ % बोरिक ऍसीड पावडरची फवारणी करावी. (२० ते ३० ग्रॅम बोरिक ऍसीड १० लि. पाण्यात घेऊन फवारावे)
    ➖ मोलाब्द ➖
    *अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे -* पाने पिवळी होऊन त्यावर तपकिरी ठिपके पडतात, पानांच्या मागच्या बाजूने तपकिरी डिंकासारखा द्रव स्रवतो.
    *उपाय -* ०.०१ % सोडियम। मॉलीब्डेट ची फवारणी करावी. (०.५ ते १.० ग्रॅम सोडियम मॉलीब्डेट १० लि. पाण्यात घेऊन फवारावे).
    🌱 _*शेती विषयक मार्गदर्शन व सल्ला
    प्रा विनायक ठाकूर

ความคิดเห็น • 11

  • @avadhutvaidya7757
    @avadhutvaidya7757 3 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर, उपयुक्त असे माती परिक्षणाचे रिपोर्ट स्वामी लँब मधून मिळाले. चेतनजी, ठाकूर सर धन्यवाद.

  • @krishnakantkakade8014
    @krishnakantkakade8014 2 ปีที่แล้ว

    Very very nice

  • @Rahul5226
    @Rahul5226 4 ปีที่แล้ว +2

    sir plz ek multi cropping (combination) cha chart banava.. kontya mahinyat konat pik ghetal pahije.. kiti mahine te pik chalat etc.. kokan area

  • @rupeshdeshmukh5661
    @rupeshdeshmukh5661 3 ปีที่แล้ว +1

    आंबा बागेसाठी कातळ जमिनीचे कसे परीक्षण करतात

  • @rp...386
    @rp...386 4 ปีที่แล้ว +1

    Sir... Supari bddl Mahiti sanga...
    Kuthchi jat Changli... Fertilizer konti vapravi... Tya bddl Mahiti sanaga...

  • @charisurendra
    @charisurendra 4 ปีที่แล้ว +1

    एका नमुन्याच्या tests साठी किती खर्च येतो?

  • @rpk-2469
    @rpk-2469 4 ปีที่แล้ว

    Nice information sir

  • @mukeshchandan6342
    @mukeshchandan6342 3 ปีที่แล้ว

    Wrong information it’s not precise

  • @mukeshchandan6342
    @mukeshchandan6342 3 ปีที่แล้ว

    Please don’t fool people

  • @prashantbute4987
    @prashantbute4987 4 ปีที่แล้ว

    Not agree

    • @dilipjamale7389
      @dilipjamale7389 4 ปีที่แล้ว +1

      sir, mati-parikshan la kiti rupaye lagatat reply