ความคิดเห็น •

  • @prakul3444
    @prakul3444 ปีที่แล้ว +103

    बापरे, एवढी अद्भुत मुलाखत मी आतापर्यंतच्या जीवनात कधीच पहिली नव्हती.. चितमपल्ली सर हे एक अद्भुत, विलक्षण, असामान्य, असाधारण व्यक्तिमत्त्व आहे.. त्यांचे या क्षेत्रातले आणि मराठी भाषेसाठी मोलाचे योगदान आहे.. त्यांचा साधेपणा, अभ्यास, ज्ञान, मन जिंकून घेते..

    • @sayalimanjarekar664
      @sayalimanjarekar664 11 หลายเดือนก่อน +1

      Same here..hats off 😊🙏💯

    • @devidaskadam7956art
      @devidaskadam7956art 10 หลายเดือนก่อน +2

    • @devidaskadam7956art
      @devidaskadam7956art 10 หลายเดือนก่อน +1

      Tumche vykteechitra karayche aahe

    • @sangeetachaudhari5553
      @sangeetachaudhari5553 8 หลายเดือนก่อน

      सरांचे चकवा चांदन आत्मचरित्र वाचा खुप अप्रतिम आहे

  • @Shivoham21
    @Shivoham21 ปีที่แล้ว +51

    खऱ्या अर्थाने अध्यात्मिक माणूस.....निसर्गाशी एकरूप झालेला.....धन्यवाद सर.

  • @pushkarkulkarni3855
    @pushkarkulkarni3855 10 หลายเดือนก่อน +4

    ऋषितुल्य आसामी. अशा व्यक्तींच्या सहवासात राहून जगावे...

  • @mbjamadar3541
    @mbjamadar3541 2 ปีที่แล้ว +45

    Maruti चितमपल्ली यांच्या सारख्या असामान्य ,निर्मळ,aloukik,लेखखाच्या भेटीचा योग आणला खूप खूप धन्यवाद,अप्रतिम काम

  • @sandeepjoshi6556
    @sandeepjoshi6556 ปีที่แล้ว +25

    लहानपणी धड्यात अभ्यास केलेला देव....आज मला वन देवांचे दर्शन झाले... त्यांचा निसर्ग मी वाचला आहे ..आज देव वाणी
    एकली... धन्य झालो... सर्व अद्भुत ....देवा ...तुमचे जंगलावर मानवावर खूप उपकार आहेत ..

  • @namratazemse5748
    @namratazemse5748 ปีที่แล้ว +10

    शाळेच्या मराठी च्या पुस्तकात चितमपल्ली साहेबांची ओळख झाली. मन अस्थिर झालं की त्यांचं एखादं पुस्तक मी वाचते आणि आव्हानं स्वीकारायला सज्ज होते.

  • @SanjayYadav-lk8lr
    @SanjayYadav-lk8lr ปีที่แล้ว +21

    सरांंचे समाजावर खूप ऊपकार आहे अस म्हटलतर
    वावग ठरु नये
    सर आपल्या तपश्चर्याला दिलसे सलाम
    संजय (शाहुवाडी ,कोल्हापूर )

  • @surekhadeshpande3813
    @surekhadeshpande3813 ปีที่แล้ว +10

    यज्ञेश्वर शात्री कस्तुरे हे माझ्या मैत्रिणीचे आजोबा होते
    फार मोठे कार्य आहे त्यांचे ते सर्व मुलांना गुरुकुल पद्धतीने विनामूल्य शिक्षण द्यायचे आजही तो यज्ञ अखंड चालू आहे

  • @asg2602
    @asg2602 ปีที่แล้ว +26

    ऋषितुल्य व्यक्तिमत्व .../\...
    या प्रदीर्घ मुलाखतीसाठी राष्ट्र सेवक टीम चे मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा.

    • @RaashtraSevak
      @RaashtraSevak ปีที่แล้ว +2

      एकूण ५ भाग आहेत, सगळे पहा, आपणांस नक्कीच आवडतील !

  • @gaurikasralikar4198
    @gaurikasralikar4198 8 หลายเดือนก่อน +3

    तुमचं चॅनल आणि सगळे विषय फार छान आहेत .

  • @eartheducation1748
    @eartheducation1748 7 วันที่ผ่านมา +1

    अदभुत मुलाखत डोळ्यात अश्रू उभे राहिले खूप खूप आभार देवमाणूस आहे हा तर प्रणाम

  • @vanitatewari390
    @vanitatewari390 11 หลายเดือนก่อน +6

    काय साधे, सरळ, नैसर्गीक, विलक्षण, प्रेमळ व्यक्तिमत्त्व. डाॅ सलिम अलीं वरचे प्रेम आणी दोघांची आवड व आदर त्यांच्या डोळ्यातून पाझरणे. खरोखर खुपच छान मुलाकात.

  • @tkva463
    @tkva463 ปีที่แล้ว +6

    खूप दिवसांनी प्रतिक्षेत होतो! कोणीतरी घेऊन जाईल का मला त्या घनदाट जंगलात! ह्या कोलाहलातून दोन क्षण शांततेत घालण्यासाठी,त्या पाखरांचा किलबिलाट, त्या ओढ्याचा मंजुळ खळखळाट ऐकण्यासाठी! रानवाटा पायाखाली घालण्यासाठी! नक्कीच ! आपण सुरू केलेल्या ह्या नविन उपक्रमास आमच्या अनंत शुभेच्छा!

  • @ravindrabhagwat6257
    @ravindrabhagwat6257 ปีที่แล้ว +17

    प्रत्येक निसर्गवेड्या ने पाहिलीच पाहिजे अशी अप्रतिम मुलाखत.

  • @gaurideshpande9700
    @gaurideshpande9700 11 หลายเดือนก่อน +2

    खरच अद्भुत! अरण्यऋषी नाव शब्दशः खरे आहे.

  • @rammahasaheb3274
    @rammahasaheb3274 11 หลายเดือนก่อน +7

    सर मी राम महा साहेब माझी भेट आपली भेट 1970 ला नवेगाव बांध च्या जंगलात झाली होती आम्ही बीएससी सेकंड इयर मध्ये शिकत असताना आम्ही टूरवर आलो होतो आपली भेट सकाळी झाली होती आपण आम्हाला बिलोना फिश मायग्रेशन बद्दल माहिती सांगितली होती दिवस हिवाळ्याचे होते सर मी आपली संपूर्ण पुस्तके वाचलेली आहेत

    • @mayursangrame9876
      @mayursangrame9876 4 หลายเดือนก่อน

      Tumhi nntr navegaon la aale ka

    • @mayursangrame9876
      @mayursangrame9876 4 หลายเดือนก่อน

      1970 aani aatache farak kiti aahe

  • @suparnagirgune-ns4cq
    @suparnagirgune-ns4cq ปีที่แล้ว +5

    चित्तमपल्लीसर तेवढेच महान आहेत जेवढे सलीम अली सर मी तर म्हणेन त्यांच्या पेक्षाही महान,असा ऋषीतुल्य माणूस पुन्हा होऊ शकत नाही, भारतरत्न आहेत.

  • @milindsohani5262
    @milindsohani5262 ปีที่แล้ว +13

    👍 धन्यवाद. प्रचंड अनुभवातून झालेल्या लेखन प्रमाणे, जंगलाच्या गोष्टी सांगण्याची हातोटी पण खूपच छान आहे.
    - चकोर, चातक आणि हंसा बद्दलची अद्भुत माहिती मिळाली. अरण्य ऋषी हा शब्द सार्थ आहे. 🙏🙏🙏

  • @shridhargore85
    @shridhargore85 วันที่ผ่านมา

    मला कॉलेज जीवनात श्री मारुती चित्तमपल्ली सरांचा सहवास लाभला आहे.. त्यांच्यासोबत मी दोन दिवस पक्षी निरीक्षणासाठी गेलो होतो...❤

  • @aadeshkulkarni6896
    @aadeshkulkarni6896 11 หลายเดือนก่อน +3

    चित्तमपल्ली सर चालते बोलते ज्ञान भांडार आहे,जंगल वेडा पक्षी वेडा,माणूस वेडा,ज्ञान वेडा अशी माणसे इतिहास घडवतात,हेच खरंतर आपल्या देशाचे धन आहे.ते एकेक शब्द बोलताना आपण खरंच जंगलात हरवून जातो .अशी माणसे पुन्हा होणे नाही . सरांना मनापासून सलाम

  • @gunwantikhar4272
    @gunwantikhar4272 9 วันที่ผ่านมา +1

    अप्रतिम संशोधकीय व्यक्तीमत्व

  • @sunxcom3160
    @sunxcom3160 ปีที่แล้ว +12

    ऋषितुल्य अरण्यऋषी श्री मारुती चित्तमपल्ली सर यांनी त्यांचे गुरु आदरणीय श्री डाॅ. सलीम अली सर यांना दिलेला शब्द हेच खरे जीवन आहे.....
    देवेन्द सूर्यवंशी
    वारजे,पुणे.

  • @aniketdeorukhkar3301
    @aniketdeorukhkar3301 11 หลายเดือนก่อน +5

    किती सुंदर मन असलेला माणूस 🙏🏼🙌🏼 आपण घेतलेल्या श्रमांबद्दल एक अक्षर न काढता .. आपल्या गुरु आणि हितकर्त्यांबद्दल ओली कृतज्ञता ठेवून असेलला माणूस महान असायचाच 🙏🏼… मुलाखकारांचे आभार कि त्यांना बोलतं केलं आणि बोलू दिलं.

  • @rupalimahamuni1383
    @rupalimahamuni1383 11 หลายเดือนก่อน +4

    खुप छान मुलाखत
    संपुच नये असे वाटत होते

    • @RaashtraSevak
      @RaashtraSevak 11 หลายเดือนก่อน

      एकूण ५ भाग आहेत

    • @rupalimahamuni1383
      @rupalimahamuni1383 11 หลายเดือนก่อน

      हो मी नंतर पाहिले ५ ही भाग धन्यवाद

  • @sujata107
    @sujata107 11 หลายเดือนก่อน +4

    किती छान व्यक्तिमत्व . किती साध ,सरळ ,निर्मळ मन गुरु विषयी किती आदर प्रेम . चेहऱ्यावर किती निरागस भाव आहेत.🙏🙏

  • @madhurananal4933
    @madhurananal4933 11 หลายเดือนก่อน +6

    अरण्यॠषी हे खरोखरच सार्थ नाव आहे. शतशः प्रणाम. ह्या मुलाखती बद्दल तुमचे मानावे तितके आभार थोडेच आहेत. खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏

    • @RaashtraSevak
      @RaashtraSevak 11 หลายเดือนก่อน

      अजून ४ भाग आहेत, ते ही नक्की बघा.

    • @nandakamble6427
      @nandakamble6427 2 วันที่ผ่านมา

      Sorry chukun dislike touch zale

  • @vinayakgunjal4507
    @vinayakgunjal4507 วันที่ผ่านมา

    ही मुलाखत अमूल्य असा ठेवा आहे.

  • @BagulWorld
    @BagulWorld ปีที่แล้ว +4

    संत व्यक्तिमत्त्व कोणाला म्हणावं याचं यथार्थ दर्शन चितमपल्ली सर यांच्या रूपात एक मूर्तिमंत उदाहरण आहे.

  • @shrutipandharpure4871
    @shrutipandharpure4871 ปีที่แล้ว +7

    खूप सुंदर मुलाखत मी त्यांचा ॓पंखा॑😅 आहे जवळजवळ सगळी पुस्तके माझ्याकडे आहेत त्यांची. कोणाच्याही वाट्याला सहसा येत नाही असं समृद्ध जीवन जगले आहेत ते. अनुभवांचा खजिना आहे.

  • @pradnyashelke9422
    @pradnyashelke9422 9 หลายเดือนก่อน +1

    बाकी मुलाखत एकदम झकास आहे

  • @dipakbhawar4961
    @dipakbhawar4961 ปีที่แล้ว +6

    किती निर्मळ मनाचा माणूस!!!!!!

  • @Jadhav_Rahul________
    @Jadhav_Rahul________ 2 ปีที่แล้ว +13

    कर्मठ योगी मारुती चित्तमपल्ली sir..🙏🙏

    • @yogeshmore3517
      @yogeshmore3517 3 วันที่ผ่านมา

      कर्मठ नहियेत ते, मृदू आणि निसर्गप्रेमी आहेत

  • @myopinion5038
    @myopinion5038 ปีที่แล้ว +14

    आपले तसेच टीमचे खुप खुप आभार ,
    🙏🏻🙏🏻 ..आपल्यामुळे ह्या ऋषिंचे दर्शन घडले ,धन्यवाद …🙏🏻🙏🏻

  • @dhanashreenaik2619
    @dhanashreenaik2619 4 หลายเดือนก่อน +1

    Guru BHO namah koti koti pranam कोटि-कोटि pranam sashtang dandvat

  • @shaileshkulkarni6525
    @shaileshkulkarni6525 ปีที่แล้ว +3

    परमपूज्य ऋषितुल्य चितमपल्ली जी हे भारतीय वन्य जीवनाला पडलेले अर्थपूर्ण आणि सोनेरी स्वप्न आहेत. अत्यंत कष्टदायी जीवनाची सुरुवात ही इतकी संपन्न आणि समृद्ध, ज्ञानवर्धक आयुष्यात होईल हे ईश्वरी वाक्य. ज्या थोड्या लोकांचे चरण धरावे वाटतात त्यापैकी चितमपल्ली जी होत.

  • @bhagyashreepatole8900
    @bhagyashreepatole8900 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर मुलाखत . खूप खूप धन्यवाद👏👏👏👏👏🙏🙏🙏🙏🌷🌷🌷🌷🌷

  • @smitakawale3484
    @smitakawale3484 2 ปีที่แล้ว +9

    अप्रतिम! आधुनिक काळात जन्माला आलेले ऋषी... 🙏🙏

  • @arundhati.kamalapurkar7734
    @arundhati.kamalapurkar7734 11 หลายเดือนก่อน +7

    अरण्यऋषींना सादर शिरसाष्टांग नमस्कार!
    🌻🙏🌻

  • @urmilaapte9853
    @urmilaapte9853 ปีที่แล้ว +6

    श्री. मारुती चितमपल्ली यांचे अनुभवसिद्ध विचार ऐकायला आवडतायत.... पण मुलाखत कोणीतरी त्या क्षेत्रातल्या जाणकार व्यक्तीने घ्यायला हवी होती असे वाटून गेले.☺️

  • @wamandongre1272
    @wamandongre1272 4 หลายเดือนก่อน

    Atishay sunder mulakhat ghetlit, aani aapan jast na bolta samorchyala bolu dyave ha aadarsha thevlat. Vaidya sir aani Priyatai doghancheli Abhinandan. 🙏🙏🙏

  • @swatipaithankar7572
    @swatipaithankar7572 ปีที่แล้ว +3

    अवलिया. खूप छान वाटले. भारावून गेले. मनापासून धन्यवाद.

  • @AmarajaBhute
    @AmarajaBhute 26 วันที่ผ่านมา

    अद्भूत व्यक्तिमत्व🙏🙏🙏

  • @deepaphatak3751
    @deepaphatak3751 11 หลายเดือนก่อน +1

    अगदी योग्य नाव .. खरोखरीच.अरण्य ऋषी🙏🙏🙏 यांचे जेवढं ऐकू तेवढं थोडं आहे

  • @sharadadhavvlog
    @sharadadhavvlog ปีที่แล้ว +1

    सर अभिमान वाटला भावुक झालोय असे पण विडिओ असतात जे खूप काही शिकवून जातात।

  • @TheShashin
    @TheShashin 11 หลายเดือนก่อน +1

    विलक्षण, अदभुत आणि अनाकलनीय असे समृद्ध ज्ञान म्हणजे मारुती राव चितमपल्ली साहेब होय. प्रणाम गुरुवर्य प्रणाम...🙏🙏🙏

  • @deepalisontakke5079
    @deepalisontakke5079 ปีที่แล้ว +6

    पक्षी आणि प्राणी यांची खुपच छान माहिती मिळाली.धन्यवाद.🙏

  • @pravinwaghmare3284
    @pravinwaghmare3284 11 หลายเดือนก่อน +2

    निशब्द झालो सर ऋषितुल्य डोळ्यात पाणी आलं 😢

  • @rameshwarrathod2741
    @rameshwarrathod2741 4 หลายเดือนก่อน

    खुप सुंदर असी निसर्गाविषयी माहिती दिली सर धन्यवाद 🎉

  • @umagujarathi5805
    @umagujarathi5805 11 หลายเดือนก่อน +1

    Rashtr sevak team ne hi mulakhat gheun marathi vachakanwar dongraevde upkar kele aahet.❤

  • @snehakale7345
    @snehakale7345 11 หลายเดือนก่อน +1

    सर शतशःत प्रणाम सर, एक अद्भुत व्यक्तीमत्व आहात तुम्ही... अनेक उत्तम व्यक्तिमत्वांचा तुम्हाला झालेला परीस स्पर्श ... आईने दिलेले अद्भुत ज्ञान... त्यामध्ये तुमचा असणारा प्रचंड असा त्याग , मेहनत... डॉक्टर सलीम अलींची लाभलेली साथ.. या सगळ्यामुळे तुम्ही अरण्यऋषी या पदापर्यंत सिद्धरूढ झालात... तुमच्या अद्भुत अशा ज्ञानामुळे आमचे ... जंगला विषयीचे कुतूहल वाढवत गेलात... जंगलातल्या अद्भुत विश्वाचा परिचय करून दिलात... जंगलवाटा धूंडाळल्याच पाहिजेत ही प्रेरणा देत राहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद ❤❤

  • @mainuddinfaras3079
    @mainuddinfaras3079 11 หลายเดือนก่อน +1

    लहानपणी नाव एकल ल,,,,,, जबरदस्त मुलखात,,, आपल्याला खूप shubechaya

  • @user-eb2dx2ir5s
    @user-eb2dx2ir5s 6 หลายเดือนก่อน

    अरण्य rushi he nav agdi samarpak

  • @navnathyewale2582
    @navnathyewale2582 11 หลายเดือนก่อน +2

    राष्ट्र शेवक टिम चे अभार
    चितमपल्ली देव माणसाची
    संपूर्ण जिवनपट आओझरता
    ऐकायला मिळाला एक तपस्वी
    ऋषितुल्य साधु ज्ञानपिपासू
    प्राणी फक्षी जंगलप्रेमी लेखक राष्टभक्त
    स्थीतप्रज्ञ निसर्ग वेडा अवलीया
    आम्ही त्यांचे खुप चाहते आहोत
    धन्यवाद
    आम्हु

  • @vinitad6463
    @vinitad6463 11 หลายเดือนก่อน +1

    मध्ये मध्ये जे फोटो दाखवून त्या त्या गोष्टी ची ओळख करून दिलीत ,ते खूप छान केलेत, म्हणजे माहिती मिळते आणि एका ऋषींची ओळख झाली. ❤कुठलीही गोष्ट समजून घेण्यासाठी यज्ञ करावा लागतो हे खरं आहे

  • @parasmehar6563
    @parasmehar6563 ปีที่แล้ว +26

    Real Jungle Man... deserves to be Padma award for his all devotion n great work for Forest, wild life and Nature ..Hats off to you Maruti sir 🙏🙏

    • @Patil983
      @Patil983 ปีที่แล้ว

      Padma award deserves him

    • @vidyadhamankar7584
      @vidyadhamankar7584 11 หลายเดือนก่อน

      खरंच त्यांना पद्म पुरस्कार मिळायला हवा

  • @bharatikulkarni7960
    @bharatikulkarni7960 11 หลายเดือนก่อน +1

    वनमहर्षी मारुती चितमपल्ली म्हणजे आपल्या आवडत्या विषयाचा ध्यास घेऊन त्या साठी पराकोटीची अभ्यासू वृत्ती कशी जोपासावी याचे मूर्तिमंत उदाहरण आहे .....🙏🙏... शतशः नमन.
    ....

  • @sachinfulari5863
    @sachinfulari5863 ปีที่แล้ว +4

    श्री. मारुती गुरूंचे खूप खूप आभार. अप्रतिम मुलाखत, लाख मोलाचे अमूल्य संशोधन, अभ्यास फक्त काही क्षणात मिळाला, जुन्या गोष्टी नावानिशी नव्याने शिकलो, खूप आभार आपले.

  • @DattatrayJadhav
    @DattatrayJadhav 2 ปีที่แล้ว +5

    खूप मोठा माणूस.. अप्रतिम मुलाखत...

  • @RaviArankar1240
    @RaviArankar1240 6 หลายเดือนก่อน

    छान ! गुप्त धन व त्यातुन येणा-या आवाजाविषयीच ज्ञान एका ( तथाकथीत ) शास्त्रज्ञाकडून ( ? ) मिळत असेल तर सर्वसामान्य अर्धशिक्षीत , अशिक्षीत व्यक्तीस फारसा दोष देण्याचं काही कारण नाही .

  • @ashokgaikwad1957
    @ashokgaikwad1957 ปีที่แล้ว +6

    कम्माल......सुप्रसिध्द मराठी गाणं आहे,..त्यातला शब्द , हनाम ' याचा अर्थ काय हा भुंगा डोकं पोखरत होता,...ती बैलाची एक जात आहे हे कळलं....वाह वाह.....धन्य चितमपल्ली सर....🙏🙏🙏

    • @exhilaratelife
      @exhilaratelife 11 หลายเดือนก่อน

      Kuthle gaane sir

    • @sushmachandratre8611
      @sushmachandratre8611 11 หลายเดือนก่อน +1

      ​@@exhilaratelifeडौल मोराच्या मानंचा.... तान्या सर्जाची हन्नाम जोडी

  • @sanjayraghoji3627
    @sanjayraghoji3627 11 หลายเดือนก่อน +1

    अद्भुत जिथे झुकल्यावर सुध्दा अभिमान वाटतो 🙏🙏

  • @rahpar5198
    @rahpar5198 ปีที่แล้ว +1

    सर तुमचि चिकाटी पाहुन आश्चर्य वाटले,धन्य आहात तुम्ही, प्रणाम

  • @vasantbarde4274
    @vasantbarde4274 ปีที่แล้ว +12

    This is a n golden opportunity sirji i witnessed such a beautiful interview

  • @dhanashreenaik2619
    @dhanashreenaik2619 4 หลายเดือนก่อน +1

    🙏👏🙏👏🙏👏

  • @ganpatraodeshpande1292
    @ganpatraodeshpande1292 11 หลายเดือนก่อน

    वृक्षवल्ली आम्हा सोयरी ' वनचरें
    पक्षीही सुस्वरे आळवीती '
    संत तुकारामांच्या अभंगाप्रमाणे जीवन जगणारा एक असामान्य " अरण्य ऋषी .
    सादर दंडवत

  • @ashokkurhade8762
    @ashokkurhade8762 11 หลายเดือนก่อน +1

    Great.

  • @shrikantagnihotri1752
    @shrikantagnihotri1752 ปีที่แล้ว +2

    खरोखर एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व.

  • @vilesh8543
    @vilesh8543 11 หลายเดือนก่อน +1

    Legend never forgets childhood bedtime stories of jungle from aai. Aai Tula Naman. 🍁🍁

  • @swatikshemkalyani3977
    @swatikshemkalyani3977 ปีที่แล้ว +3

    Khup motha manus, salam aahe Sirana🙏

  • @uvitawkar
    @uvitawkar ปีที่แล้ว +3

    Classic n great 👍

  • @umasawant3015
    @umasawant3015 ปีที่แล้ว +2

    डॉ. सलीम अलींबाबत व्यक्त होताना सरांचे अश्रू माझ्याही डोळ्यात आले. सच्ची माणस दुर्मिळ असतात.

  • @sunandasambrekar207
    @sunandasambrekar207 6 หลายเดือนก่อน

    निसर्गात एकरूप झालेला महामानव🙏

  • @user-ne9ne5lh2n
    @user-ne9ne5lh2n ปีที่แล้ว +2

    देवतुल्य, असामान्य आणि प्रचंड आदरणीय ... मनापासून तुमचे आभार. अशी मुलाखत तुम्ही आम्हाला भेट केलीत. शतशः नमन सर

  • @sadanandmhatre4501
    @sadanandmhatre4501 11 หลายเดือนก่อน

    वृक्षवल्ली आम्हां सोयरे वनचरी.
    खरोखरचं आपलीं मुलाखत अद्भुत व अप्रतिम झाली आहे,
    सर,आपले नांव वर्तमान पत्रातून वाचलेले आहे.ऋषीतुल्य व्यक्तिमत्व आहे.आपले ज्ञान अगाध आहे.....!!एकदम ओरिजनल..... निरीक्षक..

  • @pratibhabarde366
    @pratibhabarde366 ปีที่แล้ว

    Khup sundar interview 👌

  • @TheShashin
    @TheShashin ปีที่แล้ว +2

    Kharach Rushitulya Vyaktimatva

  • @vinitad6463
    @vinitad6463 11 หลายเดือนก่อน +1

    इतकं सुंदर काही आम्हाला दाखवल्या बद्दल शतशः आभार ❤

  • @sukhdeokapgate3058
    @sukhdeokapgate3058 3 หลายเดือนก่อน

    अरण्य वाचक लेखक!

  • @geetastimeandspace9410
    @geetastimeandspace9410 11 หลายเดือนก่อน +2

    पक्षी जाय दिगंतरा , घरत्यापलिकडे ही पुस्तके वाचली .पक्षिकोष लहान पुस्तक वाचले .मारुती चितमपल्ली या mahatmyala नमस्कार.🙏🏻🙏🏻🌹🌹🕊️🦋

  • @devidasmarathe2676
    @devidasmarathe2676 ปีที่แล้ว

    खुपच सुंदर!🌹💐💐🌹🙏🙏🙏

  • @thefuhrer183
    @thefuhrer183 11 หลายเดือนก่อน

    Khupach अप्रतिम 👌👌👌👌👌👌🌳🌴🌿🌱

  • @aratidhuri9100
    @aratidhuri9100 11 หลายเดือนก่อน +2

    Truly incredible…. Speechless after listening to his dedication…

  • @shaliniingulkar2360
    @shaliniingulkar2360 ปีที่แล้ว +3

    खूप सुंदर. किती down to earth aahet. 🙏🙏🙏

  • @mohan8391
    @mohan8391 ปีที่แล้ว

    Jyachyapudhe natmastak vhave ase vyaktimatva.
    Shatshaha naman.

  • @namdeobodake6263
    @namdeobodake6263 ปีที่แล้ว

    अतिशय उदबोधक व उत्तम मुलाखत आहे👍👌💐

  • @parmanandgavade7426
    @parmanandgavade7426 ปีที่แล้ว

    अप्रतिम 🙏🙏🌹🌹

  • @manasvisworld2975
    @manasvisworld2975 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान माहिती 👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @madhuramusic1226
    @madhuramusic1226 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम

  • @Loveyou-uh9js
    @Loveyou-uh9js 11 หลายเดือนก่อน

    खूप खूप खूप खूप धन्यवाद.. आजपर्यंत खूप channel पाहीले.... पण आज प्रथमच वाटते आहे की मी एक योग्य channel subscribe केला आहे. .. आज you tube वर इतके दिवसांनी मला जे काही हवं ते मिळालं आहे ज्याचा मी इतके दिवस शोध घेत आहे... खूप खूप धन्यवाद. आपला ज्ञान दानाचा यज्ञ असाच सुरू ठेवा..❤❤❤

    • @RaashtraSevak
      @RaashtraSevak 11 หลายเดือนก่อน

      खूप खूप धन्यवाद ! आपल्या शुभेच्छाच आहेत ज्या आम्हाला चांगलं काम करायला प्रेरित करतात !
      ह्या मुलाखतीचे अजून ४ भाग आहेत ते ही नक्की बघा.

  • @shundi5
    @shundi5 2 ปีที่แล้ว +4

    खूप खूप छान, आवडलं ऐकायला🙏

  • @shashikantmali9993
    @shashikantmali9993 5 หลายเดือนก่อน

    फारच सुंदर ऋषी तुल्य व्यक्ती

  • @sangeetachaudhari5553
    @sangeetachaudhari5553 8 หลายเดือนก่อน

    सरांचे चकवा चांदन आत्मचरित्र वाचा खुप अप्रतिम आहे

  • @rachanavilankar1093
    @rachanavilankar1093 ปีที่แล้ว +1

    खूपच अभ्यासपूर्ण व मन हेलवणारी मुलाखत.धन्यवाद.

  • @sank79
    @sank79 2 ปีที่แล้ว +12

    V nice... this information is valuable , he is such a devoted person..

  • @ChinmayeeChaudhari-ce1de
    @ChinmayeeChaudhari-ce1de 11 หลายเดือนก่อน +1

    ❤❤such a wonderful time, which I spend to hear this katha❤❤.

  • @trupteeingole1809
    @trupteeingole1809 10 หลายเดือนก่อน

    Khup chan mulakhat😊

  • @sunitatendulkar1925
    @sunitatendulkar1925 ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर मुलाखत येवढे मोठे व्यक्ति पण किती साधेपणा खुप छान माहिती मिळाली

  • @surekhadeshpande3813
    @surekhadeshpande3813 ปีที่แล้ว +1

    ज्याला भेटले त्यांच्या कडून ते चांगले च शिकले दुसऱ्यांचे गुण घ्यायला सुध्दा सोमोरील व्यक्ती गुणीच लागते

  • @shilpaagnihotri9659
    @shilpaagnihotri9659 4 หลายเดือนก่อน

    Beautiful,haert touching 😢

  • @somnathwaje1726
    @somnathwaje1726 11 หลายเดือนก่อน

    खुप ग्रेट 🙏🙏👌