श्री मोरोपंत कृत गंगास्तव l यशोधन एकतारे l Ganga Staw by Yashodhan Ektare

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 มิ.ย. 2024
  • वृत्त : पृथ्वी
    अनेक शत पाळिसी अकृप जंतु जे घातकी
    समुद्धरिसि जाह्नवि ! त्रिपथगे ! महापातकी
    नसे जड मयूर हा, द्रवुनि यासि दे आसरा
    करील सुरभी सुखी, जवळ आलिया, वासरा ॥२७॥
    फिरे वृक, दशास्यही, युनदि ! ऐकिली मात ती
    पये अहि जसे, तसे कुमति ते वरे, मातती
    शिरीहि परमेश्वरे चढविलीस तू, तो भली
    तुलाचि म्हणतो, तुझी बहु सुकीर्ति हे शोभली ॥२८॥
    वृत्त : स्रग्धरा
    देवूनि क्षिप्र आधी अभयवर, भवत्रस्त हे, तोक पाळी
    राहेना त्वन्मृदंकी, विधिलिखित असे भोग जो तो, कपाळी
    लाजाया, भक्तभाळा भगवति ! तुझिया, जिष्णुचे भाळ, लागे,
    माते ! माथाचि वाहे तुज, तरिच महादेवही भाळला गे ॥३०॥
    वृत्त : सवाई
    मज्जननक्षयदुःख हरो तव मज्जन सज्जनसंमतसंगे !
    की तुझिया चरणस्मरणे कळिकाळ महादुरिताचळ भंगे
    कोण असा जन ? यन्मन न त्वदुदार यशीच निरंतर रंगे
    दीन मयूर गळा पडला शरणागत, हा अभयोचित गंगे ! ॥३१॥
    वृत्त : घनाक्षरी
    तारिले त्वा बहु जंतु ।
    त्यांचे न गणुनि मंतु ।
    तुझ्या स्नाना सप्ततंतु ।
    मोटे लाजती ॥
    अंती होता स्मृती मात्र ।
    प्राणी तव दयापात्र ।
    हरिहरतुल्यगात्र ।
    होवुनीया साजती ॥
    असी तुझी यशे फार ।
    त्रिभुवनी वारंवार ।
    गंगे ! माते ! अत्युदार ।
    भावे नित्य गाजती ॥
    पाव नता, पावनांत।
    ख्याता, दया जी मनांत ।
    भक्ता मयूरा जनांत ।
    धन्य करो आज ती ॥ ३२॥
    वृत्त : अश्वधाटी
    सारी महापाप, वारी तपस्ताप, हारी तुझे आप सर्वा जना
    रंगे यशी सर्व, भंगे द्विषद्गर्व, गंगे! गमे खर्व मेरू मना
    माते ! तुझे पाय दाते, दुजे काय या ते नको, हाय देती धना
    गावे सदा तीर भावे, सुखे नीर प्यावे, म्हणे धीरगी ते न ना ॥३३॥
    आगा विलोकुनि, न रागासि येसि, अनुरागा त्यजूनि, सदये ! •
    यागादि सर्व फळ मागा' असे म्हणसि, भागासि भव्य पद ये
    कागाहि विष्णुपदि जागा मिळे, भजक जागा स्वयेचि करिसी
    नागास्यसेचि तुजला गात ते, दुरित आगामि तेहि हरिशी ॥३४॥
    वृत्त : चामर
    सर्व जीवसृष्टिच्ये अनंत भव्य संपदे !
    देवि ! जाह्नवि ! स्वभक्तदुष्कृताद्रिकंपदे !
    आपल्या तटी वसीव हा मयूर सेवटी
    ब्राह्मणप्रियार्थ विष्णु बाळसा वसे वटी ॥३६॥
    वृत्त : पंचचामर
    नको करू विचार फार, सार कीर्ति आयती,
    मिळे सुदीन - रक्षणे तुला, न योग्य काय ती ?
    अजामिळादिरक्षणे यश प्रभूत साधुनी,
    प्रभु प्रसिद्ध वर्णिला प्रसन्नबुद्धि साधुनी ॥३७॥
    (संस्कृत - आर्या)
    शिवविष्णुभक्तयाऽलंभूतदयाधर्मसक्तया देवि l
    वत्सस्त्वया जनन्या सह संयोज्योऽवने भ्रान्तः ॥३८॥
    (संस्कृत - गीति)
    भागीरथ्यास्तीरे बालकमिव देवि ! मातुरङ्के माम्
    स्थापय ! माऽपयशोऽस्तु स्वर्धन्या मम तवाप्युदारायाः ॥३९॥
    (आर्या)
    श्रीकाशीत रहावे हे चित्ती, परि नसेचि धन काही
    कनकाही तर्पावे प्रभुनी सद्‌गुणचि जेवि जनकाही ॥४०॥
    #Arya #moropant #मोरोपंत #marathi #marathikavita #marathikirtan
  • บันเทิง

ความคิดเห็น • 1