फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ส.ค. 2008
  • गीत - ग. दि, माडगूळकर
    संगीत - सुधीर फडके
    स्वर - सुधीर फडके
    कलाकार शाहीर अमरशेख
    चित्रपट - प्रपंच (१९६१)
    राग - तिलककामोद, देस (नादवेध
    फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार
    विठ्ठला, तू वेडा कुंभार !
    माती, पाणी, उजेड, वारा
    तूच मिसळसी सर्व पसारा
    आभाळच मग ये आकारा
    तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंत, ना पार !
    घटाघटांचे रूप आगळे
    प्रत्येकाचे दैव वेगळे
    तुझ्याविना ते कोणा नकळे
    मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणा मुखी अंगार !
    तूच घडविसी, तूच फोडिसी
    कुरवाळिसि तू, तूच ताडीसी
    न कळे यातुन काय जोडीसी ?
    देसी डोळे, परि निर्मिसी तयांपुढे अंधार !
  • เพลง

ความคิดเห็น • 761

  • @shriniwasjoshi9046
    @shriniwasjoshi9046 5 ปีที่แล้ว +822

    ही गाणी म्हणजे महाराष्ट्राचे अस्सल वैभव आहे.

  • @yogeshs._7794
    @yogeshs._7794 2 ปีที่แล้ว +195

    हे गीत म्हणजे महाराष्ट्रातील संगीत क्षेत्रातील अस्सल रत्न 👌🏻💯💌

  • @prakashmore8295
    @prakashmore8295 ปีที่แล้ว +23

    😢वयाच्या आठव्या वर्षी हा सिनेमा विटाचया पांढरया भिंतीवर 57वर्षांपूर्वी पाहिला. 5वर्षापूर्वी ती भिंत बघायला गेलो.खूप निराशा झाली. पण स्मृतीसारखी देणगी देवाने दिलीच आहे. त्यात हरखून गेलो.मी किती श्रीमंत आहे की महाराष्ट्रात जन्मलो आणि मराठी कुटुंबात जन्मलो वाढलो.

  • @santoshgandhi6403
    @santoshgandhi6403 ปีที่แล้ว +48

    माझ्या आई बाबांचे आवडते गाणे, हे ऐकत आम्ही वयाची ५७ वर्षे गाठली . आज आई बाबांची तीव्र आठवण झाली

  • @sunilkad7807
    @sunilkad7807 ปีที่แล้ว +34

    ही असली गाणी अधूनमधून ऐकली की असे वाटते की अजूनही आपले पाय जमिनीवर आहेत
    म्हणजेच वास्तवाचे भान राहते.

  • @kirankumbhar1424
    @kirankumbhar1424 4 ปีที่แล้ว +118

    त्यावेळी आधुनिक उपकरणे नसून सुद्धा ही गाणी मंत्रमुग्ध करणारी आहेत.. 🙏

    • @rahullaxane
      @rahullaxane 2 ปีที่แล้ว +1

      Ho n kharach ❤️

  • @vishwanathdatye1036
    @vishwanathdatye1036 3 ปีที่แล้ว +74

    मोजक्या शब्दात जीवनाचे तत्वज्ञान गदिमांनी मांडले आहे व बाबूजींच्या अलौकीक स्वरसाज म्हणजे चमत्कारच 🙏🙏

    • @deorambhujbal483
      @deorambhujbal483 ปีที่แล้ว

      सदर गीत ,प्रपंच ,या चित्रपटातील ,गदिमा लिखित व बाबूजी म्हणजे श्री सुधीर फडके यांनी गायलेले आहे।या गीतांमध्ये खूप मोठा अर्थ या आशय भरलेला आहे।पृथ्वी ,चंद्र तारे ग्रह मिळून तयार झालेली आकाशगंगा व अशा असंख्य आकाशगंगा मिळून तयार झाले ते ,ब्रह्मांड ।हे ब्रह्मांड हे पाच मूल तत्वांपासून निर्माण झाले आहे।ती पाच मूल तत्वे म्हणजे--पृथ्वी आप, तेज,वायू आणि आकाश।
      सदर गीतांमध्ये ब्रह्मांडाची निर्मिती खूप अर्थपुर्णरित्या वर्णन केली आहे।माती पाणी उजेड वारा ।तूच मिसळशी सर्व पसारा।आभाळच मग ये आकारा।तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंत ना पार।
      विठ्ठला तू वेडा कुंभार।
      सोप्या भाषेत ब्रह्मांड निर्मिती सांगितली आहे।अणू रेणू मध्ये ब्रह्म आहे।ब्रह्म म्हणजेच चेतना।अध्यात्माचे मूळ।Spirituality।अणू रेणू ब्रह्मांडाची सुक्ष्मात सुक्ष्म प्रतिकृती आहे ।
      गीत श्रवणाचा आंनद अतिशय अवर्णनीय असा आहे।गदिमांच्या प्रतिभेला आणि बाबूंजोच्या गायनाला सलाम।अप्रतिम।।।।।

  • @shobhatengaskar4242
    @shobhatengaskar4242 3 ปีที่แล้ว +182

    खरंच गदीमा आणि सुधीर फडके हे महाराष्ट्रचे अनमोल रत्न होते. सर्व गाणी अवीट आहेत ऐकत राहावे वाटते

    • @satishc1445
      @satishc1445 2 ปีที่แล้ว +2

      Nice comments shobha

    • @suhaspatil4129
      @suhaspatil4129 ปีที่แล้ว +1

      These are the golden song of Marathi film

    • @prakashsakhare8405
      @prakashsakhare8405 7 หลายเดือนก่อน

      This type of such marathi songs are golden movement to new generation.

    • @amar5981
      @amar5981 6 หลายเดือนก่อน

      ​@@satishc1445🎉

  • @namdeomagar332
    @namdeomagar332 4 ปีที่แล้ว +110

    अशी गाणी ऐकली की,जुने ते सोने याचा प्रत्यय याची देही याची डोळा अनुभवता येतो.जीवनाचा मतितार्थ सांगून जातात ही गाणी !

  • @akshaygaikwad3031
    @akshaygaikwad3031 2 ปีที่แล้ว +65

    गाण्याचे शब्द आणि शब्दांतील अर्थ आणि ताल लय अतिशय सुरेख आणि अतर्मुख करणारा आहे. ही गाणी खरोखरच महाराष्ट्र चे वैभव आहेत.

    • @deorambhujbal483
      @deorambhujbal483 ปีที่แล้ว

      सदर गीत ,प्रपंच ,या चित्रपटातील ,गदिमा लिखित व बाबूजी म्हणजे श्री सुधीर फडके यांनी गायलेले आहे।या गीतांमध्ये खूप मोठा अर्थ या आशय भरलेला आहे।पृथ्वी ,चंद्र तारे ग्रह मिळून तयार झालेली आकाशगंगा व अशा असंख्य आकाशगंगा मिळून तयार झाले ते ,ब्रह्मांड ।हे ब्रह्मांड हे पाच मूल तत्वांपासून निर्माण झाले आहे।ती पाच मूल तत्वे म्हणजे--पृथ्वी आप, तेज,वायू आणि आकाश।
      सदर गीतांमध्ये ब्रह्मांडाची निर्मिती खूप अर्थपुर्णरित्या वर्णन केली आहे।माती पाणी उजेड वारा ।तूच मिसळशी सर्व पसारा।आभाळच मग ये आकारा।तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंत ना पार।
      विठ्ठला तू वेडा कुंभार।
      सोप्या भाषेत ब्रह्मांड निर्मिती सांगितली आहे।अणू रेणू मध्ये ब्रह्म आहे।ब्रह्म म्हणजेच चेतना।अध्यात्माचे मूळ।Spirituality।अणू रेणू ब्रह्मांडाची सुक्ष्मात सुक्ष्म प्रतिकृती आहे ।
      गीत श्रवणाचा आंनद अतिशय अवर्णनीय असा आहे।गदिमांच्या प्रतिभेला आणि बाबूंजोच्या गायनाला सलाम।अप्रतिम।।।।

    • @sanketikhare6453
      @sanketikhare6453 ปีที่แล้ว

      Tumhi mala ya ganyacha arth sangu shkta ka?

  • @123deepakkakkar
    @123deepakkakkar 9 ปีที่แล้ว +424

    फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार
    विठ्ठला, तू वेडा कुंभार !
    On the rotating wheel You shape the soil ! Oh Lord You are a blissful potter!
    माती, पाणी, उजेड, वारा
    तूच मिसळसी सर्व पसारा
    आभाळच मग ये आकारा
    तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंत, ना पार !
    Soil, water, light & wind, You mix all this chaos and... the sky takes shape ! There is no end and limit to your facets !
    घटाघटांचे रूप आगळे
    प्रत्येकाचे दैव वेगळे
    तुझ्याविना ते कोणा नकळे
    मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणा मुखी अंगार !
    Every facet's unique, thus is everybody's fate ! No one but You can comprehend it ! Some get butter, while some has to swallow burning coals !
    तूच घडविसी, तूच फोडिसी
    कुरवाळिसि तू, तूच ताडीसी
    न कळे यातुन काय जोडीसी ?
    देसी डोळे, परि निर्मिसी तयांपुढे अंधार !
    You create, You break, You embrace and You only oust ! What's Your design nobody knows ! You give eyes, but create the darkness before them !

  • @gutekar9608
    @gutekar9608 5 ปีที่แล้ว +154

    😇अश्या गाण्यांना मरण नाही😘
    माझा आवड त गाणं आहे
    मी हे अभंग महणून रेल्वे च्या भजनात घेण्याचा प्रयत्न करत आहे....!

    • @harshadam1398
      @harshadam1398 3 ปีที่แล้ว

      Ho

    • @abhishekpande6511
      @abhishekpande6511 2 ปีที่แล้ว

      खरंच

    • @deorambhujbal483
      @deorambhujbal483 ปีที่แล้ว

      सदर गीत ,प्रपंच ,या चित्रपटातील ,गदिमा लिखित व बाबूजी म्हणजे श्री सुधीर फडके यांनी गायलेले आहे।या गीतांमध्ये खूप मोठा अर्थ या आशय भरलेला आहे।पृथ्वी ,चंद्र तारे ग्रह मिळून तयार झालेली आकाशगंगा व अशा असंख्य आकाशगंगा मिळून तयार झाले ते ,ब्रह्मांड ।हे ब्रह्मांड हे पाच मूल तत्वांपासून निर्माण झाले आहे।ती पाच मूल तत्वे म्हणजे--पृथ्वी आप, तेज,वायू आणि आकाश।
      सदर गीतांमध्ये ब्रह्मांडाची निर्मिती खूप अर्थपुर्णरित्या वर्णन केली आहे।माती पाणी उजेड वारा ।तूच मिसळशी सर्व पसारा।आभाळच मग ये आकारा।तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंत ना पार।
      विठ्ठला तू वेडा कुंभार।
      सोप्या भाषेत ब्रह्मांड निर्मिती सांगितली आहे।अणू रेणू मध्ये ब्रह्म आहे।ब्रह्म म्हणजेच चेतना।अध्यात्माचे मूळ।Spirituality।अणू रेणू ब्रह्मांडाची सुक्ष्मात सुक्ष्म प्रतिकृती आहे ।
      गीत श्रवणाचा आंनद अतिशय अवर्णनीय असा आहे।गदिमांच्या प्रतिभेला आणि बाबूंजोच्या गायनाला सलाम।अप्रतिम।
      ।।

  • @swatidamle864
    @swatidamle864 4 ปีที่แล้ว +42

    ही गाणी म्हणजे महाराष्ट्रची शान

  • @amitgajageshwar51
    @amitgajageshwar51 ปีที่แล้ว +14

    आमच्या वडिलांचे आवडते गाणे हे गाणे ऐकल्यानंतर वडिलांची खूप खूप आठवण येत होती डोळ्यातून पाणी आले

  • @Vaibhavdabade_VD6792
    @Vaibhavdabade_VD6792 ปีที่แล้ว +15

    गाण्यातील एक शब्द आणि शब्द हृदयाचा ठाव घेतो
    गदिमा आणि सुधीर फडके शत शत नमन👌👌👌

  • @nandkumarkhardikar8522
    @nandkumarkhardikar8522 8 ปีที่แล้ว +100

    सदा आठवणीत राहणारी गाणी !

  • @omsairam2818
    @omsairam2818 3 ปีที่แล้ว +2

    Juna Te Sona👍👌👌👌👌

  • @radhakrishnamuli3356
    @radhakrishnamuli3356 3 หลายเดือนก่อน +2

    हे माझ्या वडिलांच्या अतिशय आवडीचे गाणे...

  • @nagoraogawali1142
    @nagoraogawali1142 ปีที่แล้ว +8

    माझ्या बाबांचे आवडते भावगीत होतें.
    ते हे भजन हमेशा म्हणायचे.
    ते हार्मोनियम वादक होते.
    🙏🌹

  • @rajeshreesawant2719
    @rajeshreesawant2719 2 ปีที่แล้ว +2

    अहाहाहाहा कीती कित्ती गोड गाणं
    माझी विठू माऊली 🙏🌺🙏

  • @rameshtingle9818
    @rameshtingle9818 3 ปีที่แล้ว +9

    जीवनातील तत्वज्ञान व आउ श्याचे पूर्ण सार हया गितात सांगितलेले aahel

  • @harryshaz100
    @harryshaz100 ปีที่แล้ว +17

    Goosebumps! So proud to Marathi! So proud to be varkari!!

  • @dnyaneshpanchal2906
    @dnyaneshpanchal2906 7 ปีที่แล้ว +135

    In the days of Honey Sing's songs, such songs smell sweeter than Honey and purify my mind and my thoughts.

    • @darshanmarkeart
      @darshanmarkeart 3 ปีที่แล้ว +6

      खरंय एकदम 😭🙏

  • @deshpremi_2024
    @deshpremi_2024 10 หลายเดือนก่อน +2

    गदिमा व सुधीर फडके अलौकिक प्रतिभा. परमेश्वरी कृपा.

  • @khasskhaterahokitchen1992
    @khasskhaterahokitchen1992 4 ปีที่แล้ว +4

    अविस्मरणिय अविट असे गाणे

  • @eccentricpramod8861
    @eccentricpramod8861 4 ปีที่แล้ว +28

    फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार..
    माती हा प्रसरणशील पदार्थ. माती आपल्या *स्थिर* हातात धरली तरी बोटांमधुन निसटते, आणि ह्याच मातीला आकार देण्यासाठी एक फिरतं चाक वापरलंं जातं जे *अस्थिर* आहे। ही लीला फक्त तो पांडुरंगच करू शकतो।

    • @user-sh4dv2kb7c
      @user-sh4dv2kb7c 3 ปีที่แล้ว +1

      मी शैलजा सोनाळकर मला हे
      गाणे लहान पणा पासुन खुप खुप आवडते आता उतार
      वयात पण त्याची गोडी कमी झाली नाही स्पर्धेत पण मी
      हेच गाणे नेहमी म्हणते🙏🙏

    • @eccentricpramod8861
      @eccentricpramod8861 3 ปีที่แล้ว

      @@user-sh4dv2kb7cआपल्याला आपल्या पुढील आयुष्यासाठी खुप खुप शुभेच्छा. सद्गुरू तुमच्या सर्व उचित इच्छा पूर्ण करोत. अंबज्ञ 🙏

    • @deorambhujbal483
      @deorambhujbal483 ปีที่แล้ว

      @@user-sh4dv2kb7c सदर गीत ,प्रपंच ,या चित्रपटातील ,गदिमा लिखित व बाबूजी म्हणजे श्री सुधीर फडके यांनी गायलेले आहे।या गीतांमध्ये खूप मोठा अर्थ या आशय भरलेला आहे।पृथ्वी ,चंद्र तारे ग्रह मिळून तयार झालेली आकाशगंगा व अशा असंख्य आकाशगंगा मिळून तयार झाले ते ,ब्रह्मांड ।हे ब्रह्मांड हे पाच मूल तत्वांपासून निर्माण झाले आहे।ती पाच मूल तत्वे म्हणजे--पृथ्वी आप, तेज,वायू आणि आकाश।
      सदर गीतांमध्ये ब्रह्मांडाची निर्मिती खूप अर्थपुर्णरित्या वर्णन केली आहे।माती पाणी उजेड वारा ।तूच मिसळशी सर्व पसारा।आभाळच मग ये आकारा।तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंत ना पार।
      विठ्ठला तू वेडा कुंभार।
      सोप्या भाषेत ब्रह्मांड निर्मिती सांगितली आहे।अणू रेणू मध्ये ब्रह्म आहे।ब्रह्म म्हणजेच चेतना।अध्यात्माचे मूळ।Spirituality।अणू रेणू ब्रह्मांडाची सुक्ष्मात सुक्ष्म प्रतिकृती आहे ।
      गीत श्रवणाचा आंनद अतिशय अवर्णनीय असा आहे।गदिमांच्या प्रतिभेला आणि बाबूंजोच्या गायनाला सलाम।अप्रतिम।...

  • @akash_gavale
    @akash_gavale 3 ปีที่แล้ว +6

    गीतकार गदिमा & संगीतकार बाबूजी❤️🙏🏼

  • @UdayHaldavnekar-ik6jn
    @UdayHaldavnekar-ik6jn หลายเดือนก่อน +1

    कै. प्रल्हाद शिंदे यांनी आपल्या भक्तिरसाने परिपूर्ण अशा आवाजात या पारंपारिक चाल असलेल्या गीतातून परब्रह्म पांडुरंगांचे यथार्थ वर्णन करुन त्याची महती सांगितली आहे. खूपच छान.

  • @sunitasuryawanshi3017
    @sunitasuryawanshi3017 8 หลายเดือนก่อน +2

    अप्रतिम छानच गाणे गायले गायक वादक धन्यवाद श्री सद्गुरू माऊली बाबा मेरा namaste 🙏🏻

  • @letstalkthetruth440
    @letstalkthetruth440 3 ปีที่แล้ว +7

    महाराष्ट्र अगर महाराष्ट्र है तो वह यहाँ की संत परम्परा के आशीर्वाद से है। शत शत नमन उन सभी प्रकट अप्रकट ब्रह्मरूप संतों को जिन्होंने मानवमात्र में प्रेम का संदेश दिया।
    आजकल तो भाषा विवाद तथा अन्य विवाद से माथा सर से झुक जाता है।

  • @Vaibhav_Mendhi
    @Vaibhav_Mendhi 6 ปีที่แล้ว +47

    विठ्ठला तू वेडा कुंभार........ माझे बालपन आठवले

  • @sanketsaurkar9711
    @sanketsaurkar9711 2 ปีที่แล้ว +48

    Level of spirituality is so divine in this song that one will never feel alone and Will accept this fact that if no one is there Lord is there with you despite whomsoever you pray they all are one just with different names, born in different 'yuga'.🤗

    • @bharathange8161
      @bharathange8161 2 ปีที่แล้ว +1

      आसे गीत होने नाही

    • @nedunuri9
      @nedunuri9 ปีที่แล้ว +1

      WELL SAID

    • @sanketthoke9983
      @sanketthoke9983 ปีที่แล้ว

      देवभूमी, संतांची भूमी ....या भूमीला त्रिवार वंदन 🙏

    • @Palenque_pupikaka
      @Palenque_pupikaka 8 หลายเดือนก่อน

      Wish the rest of the non-indian non-hindu world would get as innocent and as pure as you

  • @shivprasadpimpalkar3088
    @shivprasadpimpalkar3088 ปีที่แล้ว +3

    🙏विठ्ठला तू वेडा कुंभार.❤. दैव व माणसातील भेद विसरायला लावणारी गाणी.. शब्द न शब्द बोलतो.

    • @deorambhujbal483
      @deorambhujbal483 ปีที่แล้ว

      सदर गीत ,प्रपंच ,या चित्रपटातील ,गदिमा लिखित व बाबूजी म्हणजे श्री सुधीर फडके यांनी गायलेले आहे।या गीतांमध्ये खूप मोठा अर्थ या आशय भरलेला आहे।पृथ्वी ,चंद्र तारे ग्रह मिळून तयार झालेली आकाशगंगा व अशा असंख्य आकाशगंगा मिळून तयार झाले ते ,ब्रह्मांड ।हे ब्रह्मांड हे पाच मूल तत्वांपासून निर्माण झाले आहे।ती पाच मूल तत्वे म्हणजे--पृथ्वी आप, तेज,वायू आणि आकाश।
      सदर गीतांमध्ये ब्रह्मांडाची निर्मिती खूप अर्थपुर्णरित्या वर्णन केली आहे।माती पाणी उजेड वारा ।तूच मिसळशी सर्व पसारा।आभाळच मग ये आकारा।तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंत ना पार।
      विठ्ठला तू वेडा कुंभार।
      सोप्या भाषेत ब्रह्मांड निर्मिती सांगितली आहे।अणू रेणू मध्ये ब्रह्म आहे।ब्रह्म म्हणजेच चेतना।अध्यात्माचे मूळ।Spirituality।अणू रेणू ब्रह्मांडाची सुक्ष्मात सुक्ष्म प्रतिकृती आहे ।
      गीत श्रवणाचा आंनद अतिशय अवर्णनीय असा आहे।गदिमांच्या प्रतिभेला आणि बाबूंजोच्या गायनाला सलाम।अप्रतिम।।।।

  • @kautikkhairnar9742
    @kautikkhairnar9742 5 ปีที่แล้ว +11

    old is gold. पूर्वीचे चित्रपट आशय प्रधान आणि भावना व्यक्त होत आहे

  • @vijaykumarsharma8700
    @vijaykumarsharma8700 2 ปีที่แล้ว +6

    बाबुजींना नमन, इतक्या अजरामर रचना दिल्याबद्दल कोटी कोटी धन्यवाद🙏💕

  • @milindaklujkar6668
    @milindaklujkar6668 2 ปีที่แล้ว +19

    Gold! pure Gold! Sudhir Phadke and Ga Di Ma are truly Music Magicians. A song with extremely deep meaning. No words are enough to describe the lyrics of Ga Di Ma and voice of Sudhir Phadke. Beautiful!!!

  • @ASGEETZ
    @ASGEETZ 4 ปีที่แล้ว +24

    Tears comes whenever I listen this song
    Vitthal Vitthal

  • @rajeshwargholappatil4395
    @rajeshwargholappatil4395 2 ปีที่แล้ว +5

    मन प्रसन्न झाल हे गाण ऐकुन 🥰

  • @shrijeetpolke
    @shrijeetpolke 13 ปีที่แล้ว +24

    Wonderful song that reaches to your heart . Makes you realize that music brings you near to god.
    फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार
    विठ्ठला, तू वेडा कुंभार
    माती पाणी, उजेड वारा, तूच मिसळसी सर्व पसारा
    आभाळच मग ये आकारा
    तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंत ना पार
    घटा घटांचे रुप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे
    तुझ्याविणा ते कोणा न कळे
    मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणा मुखी अंगार
    तूच घडविसी, तूच फोडीसी, कुरवाळीसी तू तूच ताडीसी
    न कळे यातून काय जोडीसी
    देसी डोळे परी निर्मिसी तयापुढे अंधार

    • @Krishna_ki
      @Krishna_ki 2 ปีที่แล้ว

      👍🙏🙏😊

  • @sunilmhatre1064
    @sunilmhatre1064 7 ปีที่แล้ว +18

    गीत ग. दि. मा स्वर संगीत सुधीर फडके वा काय जोडी अप्रतिम

  • @pandurangkumbhar59
    @pandurangkumbhar59 12 ปีที่แล้ว +12

    राजाध्यक्ष हे गाणे आम्हा रसीकांपर्यंत् पोहचवल्याबद्दल आभार् !

    • @kailasborhade8282
      @kailasborhade8282 4 ปีที่แล้ว +2

      माझ्या आवडीचे भजन

  • @dhanrajchoudhary4472
    @dhanrajchoudhary4472 9 ปีที่แล้ว +364

    गाण्यात अथ॑ लपलाय=आपली आई फिरत चाक आहे ती आपल्याला पोटात घेऊन 9 महिने फिरत होती व तो भगवंत आपल मडक घडवत होता आई एेक पण तीच्या पोटी आलेल्या प्रत्येकाचे दैव वेगळ

    • @prasadagte102
      @prasadagte102 8 ปีที่แล้ว +7

      +dhanraj choudhary Dhanyavaad...! Great description..!

    • @ujwalaraut906
      @ujwalaraut906 7 ปีที่แล้ว

      Prasad Agte "5ml to

    • @mukeshpawar3830
      @mukeshpawar3830 7 ปีที่แล้ว +3

      nice khara aahe parmeshwar ekach aahe pan manusaki aata rahilelei nahi ganyat bhawa chan aahe dole dilet pan tari pudhe andhar aahe mhanje kay lalch ninda nafarat swarthi bhaw lapdaw khotepana chori danga swatacha kam karun ghenyasathi god bolne nanatar khod modane hyala kahi artha nahi ashya kamat manus adkalay hi aapan swatachi halat swata karun ghetlel kono kunachi madat karayala tayar nahi karan tyacha dhan kami hoil mhanun aai udrat wadhawate aani nanatar tyacha aaila aapn lakshya det nahi jya devani eka parmeshwarani aaplyala banwale tyala olkhat nahi manus khup adkalay babano baher pada dolyancha wapar kara dukha bagha sukh dya lokana kanane tyancha radna eku naka tyana hasawa dewane don hat dilet tyat mawel tewde ghya sandun jaychya agodar kuna garibala dewun taka chukala asel tar maf kara

    • @mangalmali7321
      @mangalmali7321 7 ปีที่แล้ว

      dhanraj choudhary pm

    • @swarupsalokhe6988
      @swarupsalokhe6988 7 ปีที่แล้ว

      👌

  • @sagardoke9579
    @sagardoke9579 4 ปีที่แล้ว +3

    🚩विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल🚩

  • @xyz-yf2rt
    @xyz-yf2rt 3 ปีที่แล้ว +3

    आजच्या तणावाच्या काळात जगण्याचे आधार आहेत ही गाणे

  • @axykumbhar0079
    @axykumbhar0079 4 ปีที่แล้ว +4

    जय गोरोबा काका

  • @sribalaji85
    @sribalaji85 10 ปีที่แล้ว +54

    i donno maraati, but my lord vittal's name is coming in this. daily atleast once i hear this song in my mbile

    • @shripadgodse9544
      @shripadgodse9544 6 ปีที่แล้ว +1

      Srivathsan S pm

    • @007kmilind
      @007kmilind 6 ปีที่แล้ว +1

      Great 👍

    • @easychemistrybykadamjee4031
      @easychemistrybykadamjee4031 5 ปีที่แล้ว +2

      Almighty Vitthal is behind any language.
      We are blessed by Lord Vitthal.

    • @Asajinkya
      @Asajinkya 4 ปีที่แล้ว +2

      one of the best compositions in Marathi.....Soothing and relaxing...Thanks to great Babuji💐

  • @satishkunte
    @satishkunte 10 ปีที่แล้ว +83

    The entire philosophy of life said in 3 minutes. My favorite childhood song. Great job by the great poet and by the great composer and singer. Thanks for uploading.

    • @sopnwaghchaure2638
      @sopnwaghchaure2638 7 ปีที่แล้ว +1

      Satish Kunte

    • @banothprudviraj1212
      @banothprudviraj1212 3 ปีที่แล้ว

      Xi DC out5t

    • @deorambhujbal483
      @deorambhujbal483 ปีที่แล้ว

      सदर गीत ,प्रपंच ,या चित्रपटातील ,गदिमा लिखित व बाबूजी म्हणजे श्री सुधीर फडके यांनी गायलेले आहे।या गीतांमध्ये खूप मोठा अर्थ या आशय भरलेला आहे।पृथ्वी ,चंद्र तारे ग्रह मिळून तयार झालेली आकाशगंगा व अशा असंख्य आकाशगंगा मिळून तयार झाले ते ,ब्रह्मांड ।हे ब्रह्मांड हे पाच मूल तत्वांपासून निर्माण झाले आहे।ती पाच मूल तत्वे म्हणजे--पृथ्वी आप, तेज,वायू आणि आकाश।
      सदर गीतांमध्ये ब्रह्मांडाची निर्मिती खूप अर्थपुर्णरित्या वर्णन केली आहे।माती पाणी उजेड वारा ।तूच मिसळशी सर्व पसारा।आभाळच मग ये आकारा।तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंत ना पार।
      विठ्ठला तू वेडा कुंभार।
      सोप्या भाषेत ब्रह्मांड निर्मिती सांगितली आहे।अणू रेणू मध्ये ब्रह्म आहे।ब्रह्म म्हणजेच चेतना।अध्यात्माचे मूळ।Spirituality।अणू रेणू ब्रह्मांडाची सुक्ष्मात सुक्ष्म प्रतिकृती आहे ।
      गीत श्रवणाचा आंनद अतिशय अवर्णनीय असा आहे।गदिमांच्या प्रतिभेला आणि बाबूंजोच्या गायनाला सलाम।अप्रतिम।।।

    • @sanketikhare6453
      @sanketikhare6453 ปีที่แล้ว

      Could you please explain the meaning of this song?

    • @nicholasflammel2017
      @nicholasflammel2017 7 หลายเดือนก่อน

      @@sanketikhare6453 Vithhala is the crazed potter who is moulding the earth according to his will. He makes them and breaks them and there is no limit to the pots he makes. And he makes pots of all shapes and sizes and in some, butter is kept and in some burning coal. No one understands his actions as he gives eyes to us but still everyone is in the dark and they only see darkness.
      Well I am a Bengali, Gaudiya Vaishnav, who can barely understand and tries to learn Marathi mainly from Vitthal Bhajans and Abhangs from the great Bhimsen Joshi to Sudhir Phadke among others. So my translation is very poor. I try to listen to different types of songs of all Vaishnava and Bhakti devotees be it Surdas' Braj or Tulsidas and Kabir's Awadhi to Chaitanya Mahaprabhu, Narottam Dasa, and the Padavali Kirtan of Bengal to Meera Bai's Rajasthani music.
      I have never been to Maharashtra but I want to visit Pandharpur among other places like Ajanta, Ellora caves etc some day.

  • @che5316
    @che5316 2 หลายเดือนก่อน +1

    Nanna Vitthala.Nanna Devaru..Any language is fine for me to praise my lord Vitthala. Namo Bhagavathe Vasudevaya. Koti Koti..Namskara from Bengaluru..

  • @subhashpadole8797
    @subhashpadole8797 2 ปีที่แล้ว +1

    June te sona 🙏🙏🙏 june citrapatace nadac khula 🙏🙏🙏

  • @NathuramSweetsay
    @NathuramSweetsay 12 ปีที่แล้ว +20

    Translation: On the rotating wheel You shape the soil ! Oh Lord You are a blissful potter! Soil, water, light & wind, You mix all this chaos and... the sky takes shape ! There is no end and limit to your facets ! Every facet's unique, thus is everybody's fate ! No one but You can comprehend it ! Some get butter, while some has to swallow burning coals ! You create, You break, You embrace and You only oust ! What's Your design nobody knows ! You give eyes, but create the darkness before them !

    • @deorambhujbal483
      @deorambhujbal483 ปีที่แล้ว

      सदर गीत ,प्रपंच ,या चित्रपटातील ,गदिमा लिखित व बाबूजी म्हणजे श्री सुधीर फडके यांनी गायलेले आहे।या गीतांमध्ये खूप मोठा अर्थ या आशय भरलेला आहे।पृथ्वी ,चंद्र तारे ग्रह मिळून तयार झालेली आकाशगंगा व अशा असंख्य आकाशगंगा मिळून तयार झाले ते ,ब्रह्मांड ।हे ब्रह्मांड हे पाच मूल तत्वांपासून निर्माण झाले आहे।ती पाच मूल तत्वे म्हणजे--पृथ्वी आप, तेज,वायू आणि आकाश।
      सदर गीतांमध्ये ब्रह्मांडाची निर्मिती खूप अर्थपुर्णरित्या वर्णन केली आहे।माती पाणी उजेड वारा ।तूच मिसळशी सर्व पसारा।आभाळच मग ये आकारा।तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंत ना पार।
      विठ्ठला तू वेडा कुंभार।
      सोप्या भाषेत ब्रह्मांड निर्मिती सांगितली आहे।अणू रेणू मध्ये ब्रह्म आहे।ब्रह्म म्हणजेच चेतना।अध्यात्माचे मूळ।Spirituality।अणू रेणू ब्रह्मांडाची सुक्ष्मात सुक्ष्म प्रतिकृती आहे ।
      गीत श्रवणाचा आंनद अतिशय अवर्णनीय असा आहे।गदिमांच्या प्रतिभेला आणि बाबूंजोच्या गायनाला सलाम।अप्रतिम।।।।।

  • @umagaur2018
    @umagaur2018 ปีที่แล้ว +3

    या आवाजाला तोड नाही अतिशय मुलायम स्वर्गीय आनंद

  • @ainstonutony
    @ainstonutony ปีที่แล้ว +2

    जीवनाचे सत्य ....

  • @vaishalinarwade4026
    @vaishalinarwade4026 3 ปีที่แล้ว +11

    God is a mad potter who's madly in love with humanity... 🙏

    • @atulpatil2289
      @atulpatil2289 2 ปีที่แล้ว

      Yes

    • @satishc1445
      @satishc1445 2 ปีที่แล้ว +1

      Geetkar says vitthala tu veda kumbhar vaishali

  • @anildhotre2468
    @anildhotre2468 2 ปีที่แล้ว +3

    जय श्रीराम 🚩🙏

  • @vinayakbharambe3342
    @vinayakbharambe3342 3 ปีที่แล้ว +3

    व्वा, किती छान.
    ऐकतच रहावं, बाबूजींचा
    आवाज जणू तोंडात खडीसाखर
    घोळतेय.

  • @pramodkulkarni4051
    @pramodkulkarni4051 8 หลายเดือนก่อน +1

    या भक्ती संगीताची आजच्या काळाला गरज आहे .

  • @rockydude714
    @rockydude714 2 หลายเดือนก่อน

    असे सिनेमा म्हणजे समाधान आनंद मिळत असे अलौकिक 👌👌

  • @atulvikasraokawalkar2577
    @atulvikasraokawalkar2577 2 ปีที่แล้ว +1

    जय हरी विठ्ठल माऊली

  • @deepakbhosale861
    @deepakbhosale861 11 หลายเดือนก่อน +1

    जुने ते सोने म्हणूनच म्हणतात. ❤❤🙏🙏🌹🌹

  • @sunilpatekar53
    @sunilpatekar53 2 ปีที่แล้ว +1

    खुप खुप सुंदर आवाज व संगीत कानाला बरे वाटते हे गीत

  • @hiteshgujarathi4636
    @hiteshgujarathi4636 3 ปีที่แล้ว +2

    ग. दि.मा तुम्हाला साष्टांग दंडवत 🙏

  • @nilimajadhav2097
    @nilimajadhav2097 3 ปีที่แล้ว +17

    Very nice message conveyed through simple words... feeling blessed that got to listen this ...

  • @milindkakare4397
    @milindkakare4397 8 หลายเดือนก่อน +1

    प्रत्येक गाणं म्हणजे प्रत्येकाच्या जीवनातील चढ उतार,सुख दु:खच. आरसा.

  • @vijaydabholkar5390
    @vijaydabholkar5390 2 ปีที่แล้ว +2

    मराठीचे हेच वैभव

  • @govindnadagude8871
    @govindnadagude8871 4 ปีที่แล้ว +2

    अशा गाण्यांमधून आपल्याला जुन्या गोष्टी पाहायला मिळतात आणि असे वाटते की तू पुन्हा ये

  • @anilsalve6018
    @anilsalve6018 2 ปีที่แล้ว +2

    महाराष्ट्र संस्कृतीचे दर्शन!

  • @Swastishri
    @Swastishri 3 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम ! सुंदर शब्द आणि चाल 😊👍
    मन शांत करणार हे आणखीन एक भक्तीगीत

  • @sakzz76
    @sakzz76 2 ปีที่แล้ว +3

    किती सुंदर आणि अर्थपूर्ण गाणी होती आधीची mazya आजी आणि बाबा la khup aavdychi whenever I miss my grandparents i listen to this era ❤️

    • @Akrushta
      @Akrushta ปีที่แล้ว +1

      हो ना साध्या 2 ओळी जरी घेतल्या कोणत्या पण तरी पुरेसा अर्थ निघेल खूप साकार शब्द वेचून वेचून एक विहंगम रचना करून मोहन स्वरात गायली जायची आधीची गाणी, माझ्या पण आज्जी का खूप आवडतं हे गीत आणि मुख्य गोष्ट म्हणजे आज ती माझ्या साठी आहे जिवंत ❤️🥺🤗❤️

  • @abhij4370
    @abhij4370 3 ปีที่แล้ว +1

    जुन्या काळात सोयी सुविधा नव्हत्या पण ते लोक किती आनंदाने आणि सुखी आणि एकत्र राहत होते.... आणि आता बघा.. एक मित्र दुसऱ्या मित्रावर विश्वास ठेवू शकत नाही.. एकमेकांच्या जीवावर उठले.

  • @xyz-yf2rt
    @xyz-yf2rt 2 ปีที่แล้ว +3

    अशी गाणी ऐकून तान तणाव निघून जातो. जगण्याला उभारी देतात

  • @shrirangkumbhar2118
    @shrirangkumbhar2118 2 หลายเดือนก่อน

    भक्ती संगीत म्हणजे मानवाच्या जीवनाचा आधार

  • @shivajichaudhari3257
    @shivajichaudhari3257 2 ปีที่แล้ว +1

    फार छान गाणं. जुनं ते सोनं . परत असे सिनेमा बनणार नाही

  • @nandkumarbhoir6456
    @nandkumarbhoir6456 4 ปีที่แล้ว +1

    काय लिहायचं तेच कळत नाही.एक अजरामर कलाकृती....

  • @Rctruth
    @Rctruth 3 ปีที่แล้ว +1

    फारच छान , सोज्वळ संगीत आणि उत्तम गायन !!!!
    कसं काय dislike करतात लोकं आणि का ??? अंधार

  • @satishdidore983
    @satishdidore983 11 หลายเดือนก่อน

    मोजक्या शब्दांत जीवनाचे तत्त्वज्ञान सांगणारे गीत

  • @user-fd2gc5bs8q
    @user-fd2gc5bs8q 7 หลายเดือนก่อน +1

    अशी गाणी आजच्या तरुण पिढीला ऐकण्याची फार गरज आहे कारण त्यांना मोबाईल मधून डोकं वर काढायला सवडच नसते निदान या निमित्ताने तरी थोडी मोकळीक मिळते

  • @mohanshinde6143
    @mohanshinde6143 หลายเดือนก่อน +1

    अत्यंत अप्रतिम गीत, माझ्या लहानपणी मी कित्येक वेळा ऐकत असे. धन्यवाद 🙏🏻🙏🏻

  • @rushikeshkumbhar5323
    @rushikeshkumbhar5323 2 ปีที่แล้ว +2

    हे गान जुन्या आठवणी ताज्या करून देते
    खूप छान 🙏😊

  • @milandadhe3845
    @milandadhe3845 3 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर

  • @pd5910
    @pd5910 2 ปีที่แล้ว +1

    रामकृष्ण हरी 🎊👑🙏🚩

  • @rahalkar108
    @rahalkar108 14 ปีที่แล้ว +12

    This is so wonderful!. This is why GaDiMa is called Sant Kavi. It is inconceivable how GaDiMa has put the essence of all Vedic Philosophy in such poetic words that anyone can understand and appreciate. Truly great composition!!

  • @sonalikumbhar5896
    @sonalikumbhar5896 3 ปีที่แล้ว +7

    Old is gold..

    • @Akrushta
      @Akrushta ปีที่แล้ว +1

      अय्य तू पण कुंभार ये 😂❤️🤗 वेडी कुंभार

  • @swapnilchinchawade9598
    @swapnilchinchawade9598 2 ปีที่แล้ว +2

    संपुर्ण जीव सृष्टी कशी निर्माण झाली आणि या मध्ये घडणाऱ्या घटना कशा प्रकारे घडविल्या जातात हे यातुन समजते

  • @duck9597
    @duck9597 7 ปีที่แล้ว +16

    back to childhood when my grandfather listen this every morning

    • @surekhapatil1317
      @surekhapatil1317 7 ปีที่แล้ว +2

      same in my home also

    • @shrikantmore6589
      @shrikantmore6589 7 ปีที่แล้ว

      omkar pawar yes that's why exactly I love this song..

    • @tukaramkulkarni8905
      @tukaramkulkarni8905 7 ปีที่แล้ว

      pratik Patil 🐶🐮👙

    • @sandeepbaragale6327
      @sandeepbaragale6327 7 ปีที่แล้ว

      +Tukaram Kulkarni ✨🎈✨🎈✨🎈✨
      🎈🌟🎉🎂🎉🌟🎈
      ✨🎉🎁🌟🎁🎉✨
      ✨🌟🌟✨🌟✨✨
      ✨🌟🌟🌟✨
      ✨🌟✨
      ✨ 🌟 ✨
      🔥
      💗❤💗
      💗❤❤❤💗

    • @poonamzalkikar3621
      @poonamzalkikar3621 7 ปีที่แล้ว +2

      Sandeep Baragale bhakiti

  • @shilpadhatrak5418
    @shilpadhatrak5418 3 ปีที่แล้ว +1

    अशी जुनी गाणी आवडतात

  • @Kishorkailash
    @Kishorkailash 3 ปีที่แล้ว +2

    ही गाणी म्हणजे खरा खजिना.. कशाशी तुलनाच नाही करु शकत कोणी..😍

  • @user-hf3ih3rc3h
    @user-hf3ih3rc3h 3 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम संकल्पना 🙏🙏🙏

  • @vijayjadhav7628
    @vijayjadhav7628 8 หลายเดือนก่อน

    लय भारी किती वेळा ऐकावे तरी आजही ऐकू वाटते

  • @madhukarsukale4667
    @madhukarsukale4667 3 ปีที่แล้ว +1

    प्रभू तू दयाळू आहेस.

  • @durg_bharat797
    @durg_bharat797 ปีที่แล้ว +1

    ही गाणी मराठी भाषेचा आत्मा च आहे

  • @73pradipshinde52
    @73pradipshinde52 3 ปีที่แล้ว +2

    Ashi juni gani eklyvar man prasanna hote 🎶😍😍😍😥

  • @sunilgaikwad7000
    @sunilgaikwad7000 8 ปีที่แล้ว +1

    वाह खूपच छान सुंदर

  • @rohinikakade6361
    @rohinikakade6361 7 ปีที่แล้ว +29

    junya ganyani man trupt hote.apratim theva.

  • @mohanshinde6143
    @mohanshinde6143 10 หลายเดือนก่อน

    माझे बालपणीचे अत्यंत आवडीचा अभंग.

  • @mangeshbhoir7395
    @mangeshbhoir7395 ปีที่แล้ว

    ह्या गाण्यांनी आपले बालपण जिवंत ठेवले

  • @vishalpardesi6045
    @vishalpardesi6045 2 ปีที่แล้ว +1

    किती किती निरागसता....☺️

  • @vishwanathlamkhade1054
    @vishwanathlamkhade1054 2 ปีที่แล้ว +1

    अशी गांनी अभंग खुप दुर्मिळ

  • @vivekanandpatil9858
    @vivekanandpatil9858 5 ปีที่แล้ว +2

    अति सुंदर !!!!!

  • @Shriyallurkar-ev6in
    @Shriyallurkar-ev6in 2 หลายเดือนก่อน

    Kharacha ahe vittal ha majha veda ahe majha aaekato mi kiti chukich. Vagalo tari ❤

  • @pradipwadkar44
    @pradipwadkar44 3 ปีที่แล้ว +1

    अतिशय आवडते गाणे