मावा मोदक विसराल जेव्हा माहित पडेल 1 कप गव्हाच्या पिठापासून मोदक बनवण्याची सोप्पी पद्धत

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ก.ย. 2024
  • #gavhachemodak #wheatflourmodak #ganeshchaturthispecialmodak #snehaskitchen
    Gavhache Modak Recipe In Marathi | गव्हाचे मोदक | How to make Wheat Flour Modak | Gavhache modak By Sneha's kitchen
    साहित्य - २ कप गव्हाचे पीठ, १ कप साजूक तूप, प्रत्येकी २½ tblsp काप केलेले काजू आणि पिस्ता, २ tblsp खसखस, १ tblsp वेलची पावडर, १ कप सेंद्रिय गुळ आणि ½ कप डेसिकेटेड कोकोनट ( सुक्या खोबऱ्याचा खीस )
    कृती - प्रथम १ tblsp तुपात मंद आचेवर खसखस, काजू आणि पिस्ता खरपूस भाजून घ्यावा. त्यानंतर ३ tblsp साजूक तूप घालून त्यात गव्हाचे पीठ घालून मंद आचेवर किमान १५/१६ मिनिटे सुगंध सुटे पर्यंत सतत परतत राहावे. ( सुरुवातीला संपूर्ण तूप घालू नये. पिठात तूप घालताना थोडे थोडे आणि १ मिनिटांचा अंतर ठेवून घालावे. आपल्याला संपूर्ण कृतीसाठी १ कप संपूर्ण तुपाचा वापर करायचा आहे. त्यापेक्षा अधिक तूप घालू नये, नाहीतर मोदक प्रमाणापेक्षा मऊ आणि लुसलुशीत होतील ) त्यानंतर यात खोबऱ्याचा खीस घालून तोही १ मिनिटं परतावा. आता पीठ, खोबरं भाजून झाल्यावर बाजूला काढून घ्यावे. आता गुळ फक्त वितळून एक उकळी काढावी. ( एक तारी किंवा दोन तारी पाक बनवू नये. ) गुळाला उकळी आल्यावर त्यात सर्व भाजलेले साहित्य घालावे, वेलची पूड घालावी आणि चांगले एकजीव करून गॅस बंद करावा. संपूर्ण मिश्रण कोमट करून मोदकाच्या साहाय्याने मोदक तयार करून घ्यावे. हे मोदक बाहेर २५ दिवस आरामात राहतात.
    #gavhachemodak #wheatflourmodak #ganeshchaturthispecialmodak
    गव्हाचे मोदक,Fried Modak,तळलेले मोदक,गव्हाचे उकडीचे मोदक,Gavhache modak,Gavhache Ukadiche modak, गव्हाच्या कणकेचे उकडीचे मोदक,How to make Fried Modak,Talniche Modak,Maharashtrian Fried Modak,Steamed wheat flour modak,गेंहुँ के आटे के मोदक,तळलेले मोदक बनवण्याची संपूर्ण कृती,modak banane ki vidhi,पोह्याचे मोदक,मावा मोदक,Ukdiche Modak Recipe,Ganesh Chaturthi Special Modak Recipe,Chocolate Modak,काजू मोदक,स्टीम मोदक बनाने की विधि,परफेक्ट उकडीचे रवा मोदक,rava modak,सुबक उकडीचे मोदक,mawa ke modak,Coconut Modak,Instant Modak,Paan Modak Recipe,Ukadiche Modak for Ganesh Chaturthi,Rasmalai modak recipe,

ความคิดเห็น • 4

  • @sarikapatil5767
    @sarikapatil5767 19 วันที่ผ่านมา +1

    अप्रतिम मोदक मी करून पाहीन ❤

    • @snehaskitchen77
      @snehaskitchen77  18 วันที่ผ่านมา

      धन्यवाद ❤️ नक्कीच करुन पहा

  • @anujavs2481
    @anujavs2481 17 วันที่ผ่านมา +1

    Khup chhan ❤