श्री टेंबे स्वामी महाराज - पंढरपूर.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ต.ค. 2024
  • 🙏🏻 नमो गुरवे वासुदेवाय 🙏🏻
    कोल्हापूरच्या महालक्ष्मी अंबाबाईचे दर्शन घेऊन श्री शास्त्रीबुवा (परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी महाराज) भिलवडी येथे आले. तेथे श्री पादुकांचे दर्शन घेऊन ते पंढरपूरला आले. भगवान श्री विठ्ठलाचे दर्शन झाल्यानंतर एका ब्राह्मणाने त्यांना डाळे फुटाण्याचा प्रसाद देऊ केला. तो प्रसाद अन्नपूर्णाबाईंनी घेतला पण श्री शास्त्रीबुवांनी नाकारला. तेव्हा अन्नपूर्णाबाई म्हणाल्या, "अहो; प्रसाद आहे तो, नाकारू नका. खायचा नसेल तर नका खाऊ, पण जवळ तरी घ्या !" ते ऐकून श्री शास्त्रीबुवांनी प्रसादाची पुरचुंडी आपल्या जवळच्या एका फडक्यात बांधून ठेवली. त्यानंतर ते उभयता एका धर्मशाळेत मुक्कामी आले.
    रात्री भगवान श्री पांडुरंगांनी श्री शास्त्रीबुवांना स्वप्नात विचारले की, "तुम्ही आमचा प्रसाद ग्रहण का केला नाही ?" त्यावर श्री शास्त्रीबुवा अत्यंत नम्रपणे म्हणाले, की भगवान तो प्रसाद बाजारातील फुटांण्याचा होता. असे पदार्थ ब्राह्मणाने खाऊ नयेत, हे शास्त्र आपणच निर्मिले आहे. शास्त्र पालन करणे हेच आमचे ब्रीद आहे. म्हणून आम्ही प्रसाद घेतला नाही. क्षमा करावी !" त्यावर 'बरे तर' असे म्हणून देव अदृश्य झाले. जाग आल्यावर श्री शास्त्रीबुवांनी जवळची पुरचुंडी शोधली, पण ती नाहीशी झालेली होती.
    🙏🏻 अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏🏻

ความคิดเห็น • 9

  • @manishkarnik4212
    @manishkarnik4212 29 วันที่ผ่านมา

    श्री गुरूदेव दत्त.💐

  • @anand96128
    @anand96128 2 ปีที่แล้ว

    श्री गुरुदेव दत्त

  • @sriramanamaharshisatsangam5690
    @sriramanamaharshisatsangam5690 3 หลายเดือนก่อน

    Excellent work. Pl give hi donor English subtitles also for non marathi speakers 🙏🙏🙏

  • @amitchitre3725
    @amitchitre3725 4 หลายเดือนก่อน

    AVADHOOT CHINTAN SHREE GURUDEV DATTA

  • @rasikashahane2789
    @rasikashahane2789 หลายเดือนก่อน

    Shree vasudevay namah

  • @pradnyadumbare4083
    @pradnyadumbare4083 2 ปีที่แล้ว

    Avdhut Chintan Shri gurudev Datta 🙏🏻🙏🏻🌹🌹🌹🌹

  • @govindarajurattihalli9383
    @govindarajurattihalli9383 2 หลายเดือนก่อน

    Translate to kannada

  • @ganpatdalvi4826
    @ganpatdalvi4826 3 หลายเดือนก่อน

    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त