३ एप्रिल २०१७ सामुहिक स्वच्छता अभियान | महानत्यागी बाबा जुमदेवजी यांचा ९६ वा जन्मोत्सव विशेष |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 28 พ.ย. 2024
- प्रत्येकवर्षी आपण ३ एप्रिलला महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या जन्मोत्सवानिमित्य आयोजित मानवधर्माचा भव्य शोभायात्रेत सहभागी होतो. पण शोभायात्रा कार्यक्रम झाल्यावर टिमकी ते वर्धमान नगर या मार्गावर मोठ्या प्रमाणात कचरा होतो. आपण तर शोभायात्रा व कार्यक्रम झाल्यावर आपआपल्या घरी निघून जातो पण तो कचरा तसाच रस्त्यावर पडून राहतो. त्यामुळे त्या भागातील लोक, दुकानदार आपल्या परमात्मा एक मार्गाला बट लावतात. महानत्यागी बाबा जुमदेवजींनी इतके महानकार्य केले आणि आपण त्यांचे सेवक असा कचरा करून निघून जातो हे बरोबर नाही. तसेच स्थानिक प्रशासनावर स्वच्छता करण्यासाठी ताण यतो.
तर महानत्यागी बाबा जुमदेवजी यांनी दिलेला स्वच्छतेचा संदेश कृतीत उतरविण्यासाठी यावर्षी ३ एप्रिल २०१७ ला टिमकी ते वर्धमान नगर या मार्गावर 'परमात्मा एक सर्व सेवक-सेविका यांच्या सहकार्याने 'सामुहिक स्वच्छता अभियान' चे आयोजन करण्यात आले. या स्वच्छता अभियानमध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यासह मध्यप्रदेश, छत्तीसगड मधील जवळपास २२५ पेक्षा जास्त स्वयंसेवकांनी श्रमदान केले. इतक्या मोठ्या प्रमाणात विविध भागातील स्वयंसेवकांना एकत्र राबविण्यात आलेले हे अशाप्रकारचे पहिले स्वच्छता अभियान आहे.
आता पुढे पण असे अनेक उपक्रम सर्व सेवक-सेविकांच्या सहकार्याने आपण राबवत राहू.
महानत्यागी बाबा जुमदेवजी यांचे मार्गदर्शन भाग १,२,३,४ ऐकण्यासाठी/बघण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
भाग - १ : • महानत्यागी बाबा जुमदेव...
भाग -२ : • महानत्यागी बाबा जुमदेव...
भाग -३ : • महानत्यागी बाबा जुमदेव...
भाग -४ : • महानत्यागी बाबा जुमदेव...