Mahad Sasan Kathi Spardha 2023

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 3

  • @vijayambede1428
    @vijayambede1428 8 หลายเดือนก่อน +1

    काठी नाचवणारे माझे बाबा ❤
    ताम्हाणे गावचे माजी सरपंच.
    श्री. बाळकृष्ण गणपत अंबेडे. 😍

  • @rakeshshinde5491
    @rakeshshinde5491 6 หลายเดือนก่อน +1

    सासन काठी म्हणजे काय?

    • @thesomeshkhodke
      @thesomeshkhodke  6 หลายเดือนก่อน

      सासन काठी हे देवाच्या निशाणाचे (ध्वजाचे) प्रतिक मानले जाते. सासन काठी प्रामुख्याने दक्षिण रायगड,मध्य कोकण आणि घाट माथ्यावरील जिल्ह्यातील गावात जत्रा उत्सवात पहावयास मिळतात. सासन काठ्यां करिता महाड तालुका प्रसिद्ध आहे.
      सासन काठी हा एक उंच बांबू असतो त्याला रंगबिरंगी कपड्याने सजवले जाते. काठीच्या टोकावर भगवा ध्वज, मोरपिसांचा गुच्छ लावला जातो. काही ठिकाणी पितळेचे घुंगरू सुद्धा बांधतात. काठीच्या खाली ती नाचविण्यासाठी आडवी फळी त्याला पिंड असे संबोधतात (त्याचा आकार पिंडी सारखा असतो म्हणून) ती खांद्यावर घेऊन काठी नाचवायची असते. सासन काठी ही खालू बाजा आणि नगाऱ्याच्या तालावर नाचवली जाते सोबतच सनई वर विविध पारंपरिक गाणी वाजवली जातात.
      हल्ली काही वर्षांपासून सासन काठीला लाईट लावण्याचा प्रकार पहावयास मिळत आहे. याने काठीची शोभा अजून वाढते आणि रात्रीच्या काळोखात सुद्धा आपण दूरवरून काठी पाहू शकतो. महाड आणि आसपास असणारे गावं तसेच पोलादपूर या ठिकाणी सासन काठी नाचवण्याच्या स्पर्धा गेली अनेक वर्ष सुरू आहेत. काही खेळाडू हे त्या काठीवर असणाऱ्या पिंडीवर लहान मुलांना उभे करून (व्हिडिओ मध्ये पाहू शकता) सुद्धा काठी नाचवताता! हा साहसी खेळ असून याला साहसी खेळाचा दर्जा देण्यासाठी अनेकजण प्रयत्नशील आहेत. 🙏