पन्हाळगड

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ก.ย. 2024
  • कोल्हापूर जिल्हयातील पन्हाळगड हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील किल्ला आहे. संरक्षणाच्या दृष्टीने इतर किल्ल्यांच्या तुलनेने डोंगरी किल्ल्यांना अधिक महत्व होते. डोंगरी किल्ल्यांचे महत्व सांगताना कौटिल्य लिहतात, 'भुईकोट किल्ल्यापेक्षा पाणकोट किल्ला चांगला व पाणकोट किल्लापेक्षा डोंगरी किल्ला चांगला महाराष्ट्रात गिरीदुर्गाची संख्या फार मोठी होती व आहे.
    पन्हाळ्याला साधारण १,२०० वर्षांचा इतिहास आहे.हा किल्ला प्रथम शिलाहार भोज राजा नृसिंह याच्या कारकीर्दीत बांधण्यात आला. हा किल्ला पूर्वी नाग जमातीतील लोकांकडे होता. याचे पहिले नाव पन्नग्नालय होते.
    छत्रपती शिवाजी महाराज सिद्दी जौहरच्या वेढ्यात याच किल्यात अडकून पडले होते. गुप्तहेरांनी शोधून काढलेल्या मार्गाने ते ६०० माणसांसकट पन्हाळयावरून विशाळगडाकडे निसटले. बरोबर शिवा काशीद (प्रति शिवाजी) व बाजीप्रभू देशपांडे होते. तेव्हा मार्गात शिवा काशीद याने प्रति शिवाजी महाराज बनून व बाजीप्रभूने घोडखिंड थोपवून धरून आपले प्राण स्वराज्यासाठी अर्पण केले.

ความคิดเห็น • 35