सुप्रसिद्ध मराठी शांत गाणी | Ha Khel Sawalyancha | Aala Aala Vara | Old Marathi Silent Songs

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 ก.พ. 2025
  • เพลง

ความคิดเห็น • 432

  • @gopalwaghmare23
    @gopalwaghmare23 ปีที่แล้ว +25

    आताच्या काळात अशी गिते, निर्माण होणे म्हणजे अशक्यचं, त्या काळची गिते म्हणजे माणसाला तणावमुक्त व ऊर्जा निर्माण करण्याची प्रेरणा देत होती,अतिशय सुंदर शब्द रचना,सुमधुर संगीत आणि तितक्याचं गोड आवाजातील गायक,आज ही वारंवार ऐकण्यास भाग पढतात. 👌🏻👌🏻👌🏻

    • @deepadeshpande3797
      @deepadeshpande3797 2 หลายเดือนก่อน

      अशी अवीट गाणी ऐकताना मनाची मरगळ जाते. आणि सुमधुर आवाज स्वर आणि तलवाद्य संगीत कानात, मनात, तनात मोहरून जाते. धन्यवाद 🌹

    • @sushilghosalkar1314
      @sushilghosalkar1314 หลายเดือนก่อน

      अर्थपूर्ण शब्द....सुमधुर चाल.... अवीट गोड आवाज....❤

  • @laxmichandbarve3909
    @laxmichandbarve3909 11 หลายเดือนก่อน +66

    हे आपल्या भारताचे हिरे आहेत हिरे हे आपलं नशीब आहे की यांचे आपल्याला सहवास लाभला यांना शतकोटी प्रणाम🎉❤

  • @prakashlohar-t4y
    @prakashlohar-t4y 2 หลายเดือนก่อน +12

    मी 1983 चा आहे . घराची भयंकर गरिबी व होणारे हाल त्यातून ही गाणी ते दिवस सहन करायला मदत करायचे. त्या वेळी पडके घर घरात बाथरूम पण नव्हते . घर म्हणजे म्हशीचा गोटाच होता . झोपायला फाटक्या गोधड्या व ओली जमीन. जेवण म्हणजे भाकरी, आमटी व भात भाजी म्हणजे काय माहीतच नव्हते तरीही घरात एक रेडिओ होता त्यातून ही गाणी कानावर पडली की नवीन ऊर्जा अंगात यायची. पण आता बंगल्यात राहून व मऊ गादी वर झोपून व कानात ब्लू टूथ घालून एसी ची हवा खात ही गाणी ऐकताना 30 वर्षे मागे गेल्यासारखे वाटते.

  • @Savitajay357
    @Savitajay357 9 หลายเดือนก่อน +147

    मी १९८४ चा आहे, मी इयत्ता ३री पासुन (MURPHY) रेडिओ वर ऐकत आलोय सकाळी शाळेत जाण्यासाठी ५ वाजता उठणे असायचे परिक्षे करीता पहाटे ३,४ वाजता उठवायचे घरचे तेव्हा कंटाळा आळस जावा मनोरंजन म्हणून रेडिओ वरची गाणी ऐकवायची एक एक ओळ एक एक गाणं आठवतं , पुन्हा बालपणात जातो आता ऐकल्यावर ही गाणी. आता नाही परत ते दिवस फक्त गाणी सोबती आठवणींना उजाळा

    • @mandaraslekar9282
      @mandaraslekar9282 6 หลายเดือนก่อน +15

      खरंय.. मी पण त्याच सलाचा आहे.. आणि सकाळी शाळेत जायच्या आधी हीच गाणी रेडिओ वर ऐकत मोठे झालो आणि खरंच ही गाणी पुन्हा बालपणात घेऊन जातात. पण आता हीच गाणी उगाच एकट्यात ऐकायला लागतात.. कारण चॉईस बदलली आहे बाकीच्यांची.

    • @VijayNikalje-wp5zs
      @VijayNikalje-wp5zs 5 หลายเดือนก่อน +1

      19:08 19:15 19:15 19:15 19:16 19:16 19:16 19:16

    • @sunitakumbhar8063
      @sunitakumbhar8063 2 หลายเดือนก่อน

      असंच होतं आमचंही 😊रम्य बालपण...रम्य गाणी...रम्य आठवणी

    • @apnaadda680
      @apnaadda680 2 หลายเดือนก่อน +1

      Same here ❤

    • @vipingaikwad6276
      @vipingaikwad6276 หลายเดือนก่อน +1

      मी 1995 मधला पण तरी सुद्धा आज्जी आजोबा गावी गेल्यावर सुट्टी मधे रेडियो लावायचे हे गाणे खरच आठवण येते त्या क्षणांची. म्हणून मला गावाची जास्त ओढ आहे सिम्पल अँड स्वीट लाइफ स्टाइल. स्वर्ग म्हणजे गावच आहे. Its just dragging us to these past days. ❤❤❤❤

  • @sawantvilas5277
    @sawantvilas5277 ปีที่แล้ว +337

    अशी सुंदर गाणी ऐकता ऐकता बालपण सरलं, तरूणपणात ही गाणी हृदयात घर करून राहिली आणि आता वयाच्या 62 त ही गाणी मनाला त्या बालपणात ❤❤ घेऊन जातात. गाणी ऐकताना डोळ्यासमोर ते दिवस पुन्हा फिरून आले. सुंदर आकाशवाणीचे दिवस आठवले. आयुष्याचा तो काळ खुप सुंदर होता. 1970 ते 1980 तो सुवर्ण काळ पुन्हा फिरून जीवनात आला तर..... मी देवाचे आभार मानेन.🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @ganeshrane325
    @ganeshrane325 7 หลายเดือนก่อน +12

    ही गाणी आताच्या पिढीला सुद्धा ऐकवायला हवीत. त्यांना सुद्धा नक्कीच गोडी लागेल. माझ्या घरी मराठी जुनी नवी गाणी नेहमीच लावत असतो.माझा मुलगा १९९८ चा आहे. त्याला सुद्धा ही गणी खूपच आवडतात. विशेष करुन प. हृदयनाथ् मंगेशकरांच सांगित त्याला फारच आवडतं. आपणा सर्वांनी आपल्या मुलांनां या आपल्या मराठी गाण्यांची गोडी लावावी.

  • @umeshpawar605
    @umeshpawar605 ปีที่แล้ว +8

    हि तर सर्व गाणी मन तृप्त करणारी आहेत,मला ती गायला सुध्दा आवडतात,या गाण्यात जी गायक मंडळी आहेत ती पंचरत्न आहेत.असे गायक पून्हा होणे शक्य नाही.❤❤

  • @gautammangaonkar7537
    @gautammangaonkar7537 ปีที่แล้ว +9

    या धावपळीच्या जिवनात अश्या गाण्यामुळे रात्री खुप छान व समाधान वाटते .. दिवसभराचा थकवा निघून जातो..

  • @helloppl7767
    @helloppl7767 ปีที่แล้ว +15

    यातील सारेच गायक म्हणजे एकेक रत्नच जणू...अन् गाण्यांची गोडी अवीट....कितीही ऐकले तरी नवीन तरतरी देणारी....हल्ली असेगायक अन् गाणीही दुर्मीळच....अप्रतिम....🎉🎉🎉,,💐💐💐👍👍🙏🙏

    • @SunilLad-tm8xi
      @SunilLad-tm8xi ปีที่แล้ว +1

      अप्रतिम गाणी खूप छान👏✊👍

  • @sakshiamin1854
    @sakshiamin1854 10 หลายเดือนก่อน +29

    मी 1999 ची आहे. रोज सकाळी शाळेत जाताना रेडिओ वर ही गाणी लागायची ही गाणी अईकत अईकत शाळेची तयारी करायची..... खरच ती गाणी अएकली कि वेगळी च प्रसन्नता मिळते.

    • @akshaygg2760
      @akshaygg2760 2 หลายเดือนก่อน

      ही गाणी स्मिथ हस्यच कारण आहे

  • @nitinkurhade3409
    @nitinkurhade3409 4 หลายเดือนก่อน +12

    सगळ्यांच्या कमेंट वाचतानाच खूप खूप भारी वाटलं.. तुम्ही सगळे अतिशय संवेदनशील, निर्मळ मनाचे व्यक्ती आहात..

  • @ROHITRAMTEKE-w8w
    @ROHITRAMTEKE-w8w 11 หลายเดือนก่อน +15

    Mi 1992 cha ahe pn amchya gharat amche mothe vadildhari manas hi gani aikat hoti ani hi gani aikata aikata amhi mothe zalo.youtub vr hi gani bhetlyamule amhi shatasha...abhar vyakta karto.❤❤❤❤❤❤

    • @asifsayyed9436
      @asifsayyed9436 6 หลายเดือนก่อน

      1996... 98... चि आमची पण मुले आहेत..ती पण ही गाणी ऐकतात...
      Thanks..
      तुमची पिढी पण उतारवयात आमच्यासारखी दर्दी राहील..सदा सुखी रहा ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @abhijitsadlge314
    @abhijitsadlge314 ปีที่แล้ว +94

    असे दिवस आणि असे कलाकार आणि त्याची अदाकारी पुन्हा जन्माला होणं शक्य नाही आम्ही खूप नशीबवान आहोत की आम्हास मिळाले

    • @sunitapanchal8835
      @sunitapanchal8835 ปีที่แล้ว +10

      मन शांत करणारी सुमधुर गाणी..अशी गाणी पुन्हा होणे नाही...नवीन पिढीलाही भारावून टाकतील असे संगीत...😊

    • @vibhamorajkar7205
      @vibhamorajkar7205 9 หลายเดือนก่อน +3

      ❤❤Qqq❤❤❤😊

    • @dhanajipatil4805
      @dhanajipatil4805 6 หลายเดือนก่อน

      6:08 6:47 6:49 6:52 6:58

    • @SunilKumar-ov5pc
      @SunilKumar-ov5pc 4 หลายเดือนก่อน

      😊​@@sunitapanchal8835

  • @nandkishorpandurangmohite609
    @nandkishorpandurangmohite609 7 หลายเดือนก่อน +4

    अप्रतिम, मी 1962 मध्ये जन्मलो,आज 62 पूर्ण झाले,असे गाणे ऐकाचे म्हणजे रेडिओ ची आठवण नक्कीच येणार.आपली आवड हा कार्यक्रम घरातील सर्व आवर्जून ऐकत असत.❤

  • @maheshwarsonawane4249
    @maheshwarsonawane4249 ปีที่แล้ว +6

    अहो अगदी पासष्टीत देखील आकाशवाणी तशीच गोडी आहे

  • @priyankakiishor5995
    @priyankakiishor5995 16 วันที่ผ่านมา

    From childhood memories WOW khup khup sunder Thanks

  • @kapildhavan2719
    @kapildhavan2719 ปีที่แล้ว +13

    सर्व रसिक गायकांना माझा मानाचा मुजरा तुमच्यासारखी मूर्ती होणे नाही

  • @mayurbhor705
    @mayurbhor705 2 หลายเดือนก่อน +1

    या गाण्यामधली अमृतरूपी शब्द वर्षाव कानावर पडताच ही सुंदर गाणी सतत हवी हवीशी वाटत त्यात मधुर सुंदर आवाज आणि संगीत सर्व टीमचे मनापासून आभार... मराठी भाषा खूप सुंदर आहे.

  • @SapnaRedij
    @SapnaRedij 3 หลายเดือนก่อน +1

    किती सुंदर गाणी खूप छान वाटत,मी 1960 मधील लहान असल्यापासून ही गाणी ऐकायची सकाळी आई रेडिओ लाऊन आम्हाला तयार करायची,गाणी म्हणत म्हणत ,ते सारे प्रसंग आज बऱ्याच दिवसाने गाणी ऐकल्यावर डोळ्यासमोर आले ,खूप मान प्रसन्न झालं❤❤❤❤

  • @varshakunjir5544
    @varshakunjir5544 ปีที่แล้ว +2

    खूपच सुंदर अप्रतिम अशी गाणी अवीट गोडवा

  • @sanjaykale4641
    @sanjaykale4641 8 หลายเดือนก่อน +9

    मी 1976 चा आहे रेडिओ वर मोठा आवाज करून हि गाणी ऐकणे हा माझा आवडता छंद ❤❤❤ सलाम🙏सगळे कलाकराला

    • @asifsayyed9436
      @asifsayyed9436 6 หลายเดือนก่อน +1

      मी तर रात्री आवाज बारीक करून 1..2 वाजेपर्यंत ऐकायचो 😂😂

    • @asifsayyed9436
      @asifsayyed9436 6 หลายเดือนก่อน

      1.9.1971

  • @ravinakambli9474
    @ravinakambli9474 8 หลายเดือนก่อน +3

    माझं बालपण गविच गेला त्या काळी कपडे धून भांडी घासन ही काम घराबाहेरच असायची माग murphy चा रेडिओ मोठ्या आवाजात लावायचा आणी काम करायची❤🎉 खूप छान वाटायचं🎉 आताही संध्याकाळी लवकर काम आवरून बाल्कनीत बसून ही गाणी ऐकताना डोळ्यासमोर मात्र गावाचं दिसतो❤🎉

  • @MrunmayiHegiste
    @MrunmayiHegiste 9 วันที่ผ่านมา

    अगदी मनाला शांतता आणि आनंद देतात ही गाणी पुन्हा बालपणात घेऊन जातात त्यावेळी रेडियो हाच विरंगुळा असायचा

  • @minayaRane-zh6nv
    @minayaRane-zh6nv 2 วันที่ผ่านมา

    Sundet collection Marathi song thanku

  • @shraddhapednekar2565
    @shraddhapednekar2565 ปีที่แล้ว +6

    सर्वात आधी सारेगामा मराठीचे अभिनंदन❤
    इतकी सुंदर गाणी आम्हाला ऐकायला दिल्या बद्दल
    सर्वच गाणी अप्रतिम🙏👍

  • @chandrashekharjakhalekar1746
    @chandrashekharjakhalekar1746 11 หลายเดือนก่อน +1

    अवीट गाणी. उत्तम अल्बम.सा रे गा मा टीमला धन्यवाद.

  • @chandrakantmalavade3366
    @chandrakantmalavade3366 ปีที่แล้ว +14

    अतिशय सुंदर गीत संकलन,प्रसारण...दर्जेदार, कर्णमधूर अर्थबद्ध गीतांना मनमोहक संगीत,त्याला सजवलेले स्वरसाज म्हणजे सुरेल मैफलच!!

  • @sharadlabde7461
    @sharadlabde7461 3 หลายเดือนก่อน +1

    अशी गाणी ऐकायला मिळतात हे आपलं मोठं भाग्य आहे,अशा गायिका व गायक आपणांस लाभावे ही एक ईश्वरीय देणगी आहे.

  • @arunkale3807
    @arunkale3807 11 หลายเดือนก่อน +1

    काय ती गाण्यांची रचना आणि गायकांनी ही गायलीत तरूण पणी तर ह्यदयात जावून बसलीत अविस्मरणीय ,अविट ऐकतांना त्या तारूण्यात पोहचतो जणू धन्य तो काळ अशारचना गाणे संगीत न होणेआता.😊

  • @santoshkamble3449
    @santoshkamble3449 5 หลายเดือนก่อน

    मी 1976 चा आहे खरंच खूप सुंदर गाणी आहेत, रोजच्या कामाच्या धावपळीत थोडासा वेळ काढणं ही शक्य नाही, कामाच्या व्यापानं असं वाटतं कि आपली बॅटरी लो झालीय, पण ही गाणी ऐकल्यावर पुन्हा एकदा मन भरून आलंय, आणि आपली बॅटरी पुन्हा चार्ज झालीय. खरंच खूप खूप धन्यवाद यु ट्यूब चे.

  • @rajeshmahorkar4895
    @rajeshmahorkar4895 5 หลายเดือนก่อน

    अवीट अशी कधीही ऐकावी...पुन्हा पुन्हा ऐकावी अशी मोहक गाणी आणि ती सादर करणारी दैवी देणं असलेले महान गायक आमच्या काळात आम्हाला लाभले ही देवाचच कृपा म्हणायची.

  • @neelampatil195
    @neelampatil195 ปีที่แล้ว +18

    मराठी असल्याचा अभिमान वाटतो, गवॅ वाटतो, खूप सुंदर काव्य, गोड संगीत, अप्रतिम गायकी ,एकत्रित आणली. शतशः धन्यवाद

    • @JesusChrist-Gives-Eternal-Life
      @JesusChrist-Gives-Eternal-Life ปีที่แล้ว

      আপনি কি জানেন যে ঈশ্বর আপনাকে ভালবাসেন? যীশু খ্রীষ্ট হলেন ঈশ্বর এবং ঈশ্বর ও স্বর্গের একমাত্র পথ। যীশু আমাদের পাপের জন্য মারা গিয়েছিলেন, কবর দেওয়া হয়েছিল এবং আবার পুনরুত্থিত হয়েছিল যাতে যারা তাঁকে বিশ্বাস করে তারা স্বর্গে অনন্ত জীবন পায়। প্রভু যীশু খ্রীষ্টে বিশ্বাস করুন এবং আপনি সংরক্ষিত হবে. জন 3:36💌💌

    • @nirmalajagtap345
      @nirmalajagtap345 ปีที่แล้ว

      सर्व गाणी खूपच छान

  • @dilipkoli7375
    @dilipkoli7375 4 หลายเดือนก่อน +7

    ही गाणी एका क्षणात सुंदर अशा भूतकाळात घेऊन जातात आणि त्यासोबत च्या सर्व आठवणी जागृत करतात

  • @VickySonawane-e3f
    @VickySonawane-e3f ปีที่แล้ว +9

    जुनी गाणी म्हणजे मनाला शांतता
    जुनी गाणी म्हणजे ह्रदयला तृप्तता

  • @rajeshmahorkar4895
    @rajeshmahorkar4895 5 หลายเดือนก่อน +1

    आमच्या लहानपनी सकाळी 12 वाजेची शाळा असायची 11 वाजता कामगार सभा की कुठला छान कार्यक्रम असायचा त्यावर ही सुंदर गाणी लागायची त्यावेळेला उरात धडधड व्हायची का...? तर शाळेत जावं लागायचं म्हणून ..., वाटायचं काय रोज रोज ती रटाळ शाळा ? इतकी सुंदर गाणी,ते धुंद करणारं.., मनाला एक वेगळीच ऊर्जा देणारं सुंदर वातावरण सोडून शाळेत जावं लागणार..., काही गाणी ऐकून मन कसं हलक हलक व्हायचं पण त्यात ते कामगार सभेच संगीत ऐकू यायचं आणि ...,हातातलं काम, खेळणं त्या वेळेला बंद करावं लागायच आणि शाळेची तयारी करताना नकोनको व्हायचं पण कानावर कुठून तरी ही गाणी ऐकायला यायची बर वाटायचं .

  • @smitarathod4376
    @smitarathod4376 7 หลายเดือนก่อน

    मनाला शांतता देणारी, अर्थपूर्ण अशी गाणी.... खजिना आहे हा आपल्याला लाभलेला....
    माझ्या मुलीला मी हिच गाणी ऐकवते... जुन्या काळातील अर्थपूर्ण अशा शब्दांनी भरलेली.....
    माझ्या आई - वडिलांमुळे आम्ही ऐकली आता आमच्या मुलांना ऐकवतो

  • @bharatitandale641
    @bharatitandale641 ปีที่แล้ว +3

    ❤❤ ह्दय ला स्पर्श करुन देतात ही गाणी..... तरुण वयातील आठवणी जाग्या होतात सध्या ५९ मध्ये पदार्पण केले आहे गाणी खूप आवडतात गाणी गायला पण आवडते❤

  • @mosinmomin495
    @mosinmomin495 ปีที่แล้ว +2

    😢😢😢😢😢 शब्द नाहीत राव खुप खुप धन्यावाद अशी गाणी ऐकवल्या बद्दल😢😢😢दिल जीत लिया यार

  • @ketkikedarjoshi7574
    @ketkikedarjoshi7574 ปีที่แล้ว +4

    खरचं अप्रतिम गाणी

  • @statuslover2229
    @statuslover2229 14 วันที่ผ่านมา

    खरंच जुनी गाणी खूपच छान होती ❤

  • @ratangosavi5400
    @ratangosavi5400 ปีที่แล้ว +5

    अशी अवीट आणि सुंदर गाणी आमच्या पिढीत तयार झाली आणि आम्हाला ऐकायला मिळाली हे आमचे भाग्यच! धन्यवाद सारेगामा!

    • @vinodnikam1224
      @vinodnikam1224 2 หลายเดือนก่อน

      ❤ By 3🎉😊

  • @sandhyagupte2388
    @sandhyagupte2388 ปีที่แล้ว +3

    खूप छान...लहानपणीचा रेडिओ आठवला..👌

  • @ManoharKerkar-d1b
    @ManoharKerkar-d1b 16 วันที่ผ่านมา

    त्या काळी अवीट गोड गाणी आली आणि कायम मनात फिट होऊन राहिली old is gold

  • @AkshayJadhav-c8u
    @AkshayJadhav-c8u 3 หลายเดือนก่อน +1

    मी १९८४ ची माझ्या वडिलांना पहाटे 4 लाच रेडियो लावून ही अशी सुंदर दिवसाची सुरूवात करणारी गाणी ऐकण्याची आवड असायची.तीच आवड माझ्यातही उतरली.
    खुप छान वाटले ठाणे ऐकून.

  • @shalinigupte
    @shalinigupte ปีที่แล้ว +1

    उत्तम! आकाशवाणी वरचा आपली आवड कार्यक्रम आठवला!

  • @meenasanjeev4269
    @meenasanjeev4269 6 หลายเดือนก่อน +1

    ,❤❤❤ निशब्द भावना

  • @punamkamble7984
    @punamkamble7984 ปีที่แล้ว +1

    Mastch kharch khup chan aahet 😊

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 ปีที่แล้ว +1

    छान अजरामर मराठी गाणी धन्यवाद.

  • @sadhanagaikwad3432
    @sadhanagaikwad3432 9 หลายเดือนก่อน +4

    गानसम्राज्ञी भारतरत्न सुप्रसिद्ध लता मंगेशकर यांनी गायलेल्या गाणी आणि जोडीला सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले मॅडम आणि सुप्रसिद्ध गायक मोहम्मद रफी साहेबांचा आवाज आणि सुप्रसिद्ध गायक सुधीर फडके यांच्या साथीदार अरूण दाते यांनी गायलेल्या गाण्यांनी पुन्हा एकदा त्या काळात जातो आणि नव्याने गाणी ऐकाव्यास वाटत खूप मनापासून प्रेम आभार मानले आहे 👍

  • @kavitahatankar9818
    @kavitahatankar9818 ปีที่แล้ว +3

    Kay..Mast collection aahe ..sagali gani ek number ❤

  • @ShrineetaNagoji
    @ShrineetaNagoji ปีที่แล้ว +3

    खुपच छान 👌👌💕💕

  • @archanashinde8277
    @archanashinde8277 ปีที่แล้ว +4

    Khup sunder

  • @yadnyasalgaokar3127
    @yadnyasalgaokar3127 ปีที่แล้ว +1

    ❤ अवीट ❤

  • @anjalistenly532
    @anjalistenly532 ปีที่แล้ว +18

    ❤ दिल्ली, मला ह्या ह्रदय संर्शी गान्या चाच सहारा माझ़्या जवळपास कोणी नाही , वेळ काढून रोज ऐकते मन कसे शांत होते, शब्दा वाचुन , शब्दा च्या पलीकडे,....... 💖🌹

    • @DipankarSawale-c1b
      @DipankarSawale-c1b ปีที่แล้ว

      खरंच खूप छान आहेत... मी पण रोज ऐकतो....

  • @anushkapawar2223
    @anushkapawar2223 ปีที่แล้ว +6

    खरंच या आताच्या काळात ही मराठी जुनी गाणी ऐकायला कुठे मिळतात अप्रतिम 👌🏻👌🏻👍🏻👍🏻

  • @mangaltaksale1973
    @mangaltaksale1973 10 หลายเดือนก่อน +5

    खूप छान परत परत कितीही वेळा हि गाणी ऐकली तरीही ऐकाविशी वाटतात मनापासून सर्वांचे धन्यवाद

  • @ErkrishnaChaudhari
    @ErkrishnaChaudhari 6 วันที่ผ่านมา

    Nice 😊👌

  • @santoshgodambe1906
    @santoshgodambe1906 7 หลายเดือนก่อน +2

    दातेसर, लतादीदी, फडकेसाहेब, रफी, आशाताई ❤

  • @neeraamde5965
    @neeraamde5965 ปีที่แล้ว +7

    खुप खुप सुंदर.मन अगदी शांत,तृप्त झाले.खुप धन्यवाद. 🌹

  • @jagganathkadnis5328
    @jagganathkadnis5328 7 หลายเดือนก่อน

    जगन्नाथ कापडणी जयहिंद जय महाराष्ट्र सादर गाणी लहान पाणी रेडिओ ऐकत असे मन शांत प्रफुलीत होत As4 असे गीत कलावंत होणे काळाचीच परीक्षा सर्व गीते भावपूर्ण समाज जीवनाशी निगडित आहे सर्वना धन्यवाद जय जवान जय किसान ❤❤❤❤

  • @sunilshelke5046
    @sunilshelke5046 ปีที่แล้ว +2

    सुवर्ण काळ सुमधुर गाणी सुश्राव्य गायक सारेच अप्रतिम 🌹❤️

  • @suchitaghadi5279
    @suchitaghadi5279 ปีที่แล้ว +3

    खुप छान, सुंदर गाणी

  • @milindsuryawamshi8904
    @milindsuryawamshi8904 10 หลายเดือนก่อน +3

    आत्ताच्या इतक्या भयंकर धावपळीच्या जीवनात इतकी सुंदर , गोड गाणी तयार होणं practically अशक्य , आता कसे सगळे फास्ट , गाणी पण जी येतात ती अशीच असतात आली कधी गेली कधी कळत पण नाही , गोडवा नाही काही नाही, सगळा उच्छृंखलपणा, त्या मुळे ही गाणी अजरामर च आहेत , किती गोड , खिळवून ठेवतात , मी कितीतरी गाणे गातो पण starmakers वर थोडे आपल्याला पण जमते का बघतो😂 .... या सर्व गायकांना , संगीतकारांना , कलाकारांना त्रिवार नमस्कार🙏🙏🙏

  • @anjalicharoskar8767
    @anjalicharoskar8767 ปีที่แล้ว +3

    Majhya lahanpani majhe vadil aai redio vr aaikachi hi gaani,,Aaj te gane aaikun mala khup chhan vatale,,majhe aai vadil doghe Aaj Hayat nahi,, tyanchi khup aathwan zali gaanee aaikat rahve vatate,, jenekarun mi majhya aai vadilansobat ch ahe ase vatate 😘😘🙏🙏🙏

  • @SawantSir-su9lp
    @SawantSir-su9lp ปีที่แล้ว +1

    Thanks Saregama.Best of luck.

  • @supriyagurav5482
    @supriyagurav5482 ปีที่แล้ว +1

    Khup sunder gani ahet

  • @mpk1312
    @mpk1312 ปีที่แล้ว +4

    अक्षरशः मेजवानी आहे. एकाच व्हिडिओ त सर्व गोड गाणी 😊

  • @rajivpatil6816
    @rajivpatil6816 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम ❤ ऐकावे तेवढं कमीच .

  • @sanjayyewle3476
    @sanjayyewle3476 ปีที่แล้ว +6

    ❤❤❤ सर्व सुरेल गायकांना माझा मानाचा मुजरा ❤❤

  • @sharadmanjrekar9913
    @sharadmanjrekar9913 ปีที่แล้ว +1

    Kupch chhan वाटले ही गाणी एकूण❤❤

  • @SHREESHTHIYYA
    @SHREESHTHIYYA ปีที่แล้ว +6

    अप्रतिम गाणी मन तृप्त होऊन गेले ही गाणी संपू नये असे वाटत होते ❤❤

  • @SarikaKalkutgi
    @SarikaKalkutgi 6 หลายเดือนก่อน +3

    मी १९७३ चा आठवीत असल्यापासून आजतागायत ही गाणी नेहमीच ऐकतो. कधी कंटाळाच येत नाही 😃

  • @ravindrabhagyawant6358
    @ravindrabhagyawant6358 ปีที่แล้ว +5

    जिवंत गाणी आहेत ही. बालपण आठवले ☺️

  • @santoshkotnis7639
    @santoshkotnis7639 ปีที่แล้ว +3

    विविध प्रकारची गोड गाणी आहेत.
    छानच.

  • @MansiMulam-s3n
    @MansiMulam-s3n ปีที่แล้ว

    Khup chhan gaani Marathi khajina

  • @varshabendale903
    @varshabendale903 ปีที่แล้ว +5

    निवड छान

  • @bharatiarote3162
    @bharatiarote3162 ปีที่แล้ว +13

    अप्रतिम गाणी, मन अगदी तृप्त झाले

    • @JesusChrist-Gives-Eternal-Life
      @JesusChrist-Gives-Eternal-Life ปีที่แล้ว

      আপনি কি জানেন যে ঈশ্বর আপনাকে ভালবাসেন? যীশু খ্রীষ্ট হলেন ঈশ্বর এবং ঈশ্বর ও স্বর্গের একমাত্র পথ। যীশু আমাদের পাপের জন্য মারা গিয়েছিলেন, কবর দেওয়া হয়েছিল এবং আবার পুনরুত্থিত হয়েছিল যাতে যারা তাঁকে বিশ্বাস করে তারা স্বর্গে অনন্ত জীবন পায়। প্রভু যীশু খ্রীষ্টে বিশ্বাস করুন এবং আপনি সংরক্ষিত হবে. জন 3:36💌💌

    • @jagdishdeshmukh4134
      @jagdishdeshmukh4134 ปีที่แล้ว

      💐

  • @rajendradhage5545
    @rajendradhage5545 ปีที่แล้ว +1

    सकाळच्या प्रहरी ही सर्व गाणी ऐकून दिवसभरासाठी ऊर्जा देतात आणि मन प्रसन्न ठेवण्यास मदत करतात.

  • @lalitakamble8194
    @lalitakamble8194 ปีที่แล้ว +2

    very nice ❤❤❤❤❤

  • @dipakmhatre1674
    @dipakmhatre1674 ปีที่แล้ว +2

    अप्रती नीवड मनम्द आनंद

  • @zarinakhan424
    @zarinakhan424 ปีที่แล้ว +2

    Khup surekh ❤❤❤❤

  • @nivruttiarjun8218
    @nivruttiarjun8218 ปีที่แล้ว +1

    Khupch chan ❤

  • @NarendraGedam-y2v
    @NarendraGedam-y2v ปีที่แล้ว +1

    अप्रतिम आहे

  • @sujatakarande6077
    @sujatakarande6077 7 หลายเดือนก่อน +1

    सुंदर, अप्रतीम, आशी गनी हालली ऐकायला नाही मिलत ❤

  • @prathmeshnimbalkar9141
    @prathmeshnimbalkar9141 หลายเดือนก่อน +1

    Love marathi evergreen 🌲 ❤️

  • @prabhakargawde228
    @prabhakargawde228 7 หลายเดือนก่อน

    Khup chan sarve kalakar.

  • @sunandachawade9413
    @sunandachawade9413 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम, अजरामर ani अमर सदाबहार गाणी

  • @deepikaprabhu1119
    @deepikaprabhu1119 ปีที่แล้ว +3

    मनमोहक गाणी.

  • @mukuljadhav8950
    @mukuljadhav8950 ปีที่แล้ว +2

    मराठी चा स्वाभिमान ❣️
    एकलव्य सरकार ❣️

  • @leenab1328
    @leenab1328 23 วันที่ผ่านมา

    I Adore 🥺 ❤Old Era 💓 Songs
    Such souls are God's grace to mankind
    Charansparsh 🙇‍♀️🌹to all legendary souls
    Tears roll down my eyes always for Maa Saraswati
    Lata Mangeshkar ji 🙇‍♀️ The Nightingale of the Universe
    You will always remain in my heart forever
    Gratitude 🌷 🍃 🙏 🥹

  • @sanjaysavant8434
    @sanjaysavant8434 ปีที่แล้ว +2

    👌👌❤ खूपच छान

  • @mukeshwankhede4183
    @mukeshwankhede4183 3 หลายเดือนก่อน

    मी 1981 चा आहे सकाळी सकाळी खूप सुंदर गाणे ऐकायला मिळायचे धन्य ते दिवस

  • @parul7872
    @parul7872 6 หลายเดือนก่อน +1

    या सगळ्या गाण्यात एक वेगळाच आपलेपणा वाटतो ❤

  • @saneeshchoudankar891
    @saneeshchoudankar891 ปีที่แล้ว +3

    Sunder gaani

  • @sachinjagtap9117
    @sachinjagtap9117 7 วันที่ผ่านมา +1

    मी 1978 बाकी काय बोलू या विषयावर..🙏

  • @vikramkadam8689
    @vikramkadam8689 2 หลายเดือนก่อน

    अत्यंत कर्णमधुर गाणी आहेत..आतापर्यंत हजारो वेळेस ही गाणी ऐकूनही कधीच कंटाळा येत नाही..आमच्या बालपणी टी.व्ही.नव्हते, करमणुकीसाठी फक्त रेडिओ असायचा..त्या काळात लग्नामध्ये हुंडा म्हणून रेडिओ देत असत..मर्फी, फिलिप्स, बूश कंपनीचे रेडिओ असायचे..सुरुवातीच्या काळात तर रेडिओ साठी लायसन लागायचे..घरात खुंटीला रेडिओ लटकवलेला असायचा..रेडिओच्या बॅंडवर MW व SW लिहिलेले असायचे.त्या बाल वयात आम्हाला त्याचा अर्थ कळायचा नाही..सकाळी रेडिओ सुरू होतानाची संकेत धून खूप आवडायची..त्यानंतर वंदे मातरम होई..भक्ती गितांनी दिवसाची सुरूवात होई..त्यानंतर मराठी,हिंदी बातम्या..चित्रपट संगीत, आपली आवड,युवावाणी, अशा कार्यक्रमांची जणू मेजवानीच असायची..गावात काही श्रीमंत लोकांकडेच रेडिओ असायचा..त्याकाळी सिलोन केंद्रावर बुधवारी रात्री आठ वाजता बिनाका गीतमाला हा कार्यक्रम अत्यंत लोकप्रिय होता.." भाईयों और बहनों..पादान नंबर एक पर है फिल्म देशप्रेमी का यह गाना असे आपल्या भारदस्त आवाजात अमीन सयानी म्हणायचे व त्यानंतर " ताने धीन तंदाना " हे गीत सुरू होई..आम्ही जास्तीत जास्त मराठी गाणी ऐकायचो.दादा कोंडके यांची गाणी म्हणजे आमचा जीव की प्राण..अगदी " झाल्या तिन्ही सांजा " पासून " ढगाला लागली कळ " पर्यंत दादांची सर्वच गाणी आम्हाला तोंडपाठ होती व आजही वयाच्या 57 व्या वर्षी ही गाणी तोंडपाठ आहेत..हल्ली टी.व्ही.वर शेकडो चॅनेल्स असली तरी रेडिओवर गाणी ऐकण्याचे ते दिवस कधीच विसरणार नाहीत.." बालपणीचा, काळ सुखाचा " हेच खरं..आता ते दिवस परत येतील का ? माझे बालपण मला कोणी परत देईल का ? ..असो, ही कर्णमधुर गाणी ऐकताना मात्र माझे बालपण मला आठवते व नेहमीच मी ही गाणी ऐकतो..धन्यवाद..!!

  • @vijaykumarmangure4806
    @vijaykumarmangure4806 ปีที่แล้ว +5

    अप्रतिम निवड आणि कलेक्शन 😊👌👌👍

  • @rashmiupadhye9109
    @rashmiupadhye9109 8 หลายเดือนก่อน +1

    Surekh, apratim ganni ahayt, me non maharashtrian assun, me evdhi hee ganni aikleli nahi majia lahann pan.
    Pan jevha passna amhi Swargandharv Sudhir Phadke baghitli, tevha passna bhautek daa roz marathi ganni aikto.
    Ashia gaani kadhi parat honar nahi . Amhi khup nasheebvan ahot, hee ganni aikila.
    Hyaa sagle mahan kalakarani kiti karun thevle, ki aplila ayush purnar nahi hee ganni aikat rahila❤❤

  • @rajeshgupte8805
    @rajeshgupte8805 5 หลายเดือนก่อน

    खरच, गाण्यांचा सुवर्ण काळ होता तो.

  • @sanjeevyadav9541
    @sanjeevyadav9541 ปีที่แล้ว +3

    मस्त कलेक्शन आहे ❤❤